विद्याभारती आयोजित पालक परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विवेक मराठी    03-Feb-2023
Total Views |
 
vivek
 
 
विद्याभारती रत्नागिरी जिल्हातर्फे रविवार दि. 08 जानेवारी 2023 रोजी चिपळूण येथील ब्राह्मण साहाय्यक संघाच्या हॉलमध्ये दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत पालक परिषद संपन्न झाली. त्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
 
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर विद्याभारती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ’जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे’ या स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीताचे सादरीकरण केले. विद्याभारती रत्नागिरी जिल्हाध्यक्षा प्रा. सोनालीताई खर्चे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर विद्याभारती कोकण प्रांत कार्यवाह संतोषजी भणगे यांचे सत्र झाले. त्यांनी बालकाचा सर्वांगीण विकास व पंचकोश विकसन हा विषय मांडला. पुढील सत्रात विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानचे माजी उपाध्यक्ष मा. दिलीपराव बेतकेकर यांनी ’'Learn to learn'’ या विषयांतर्गत अभ्यासाच्या अनेक पद्धती तसेच स्मरण कौशल्यासाठी काही तंत्र समजावून दिली. यानंतर विद्याभारतीच्या पंचकोशाधारित गुरुकुलची क्लिप दाखविण्यात आली. शेवटच्या सत्रात पालकांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्याभारती रत्नागिरी जिल्हा सदस्य डॉ. अमित चितळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष दीपक वारे यांनी आभारप्रदर्शन केले. विद्याभारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा. गोविंदचंद्रजी महंत यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली.
 
 
vivek
 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पालक छायाताई मुसळे, डॉ. जयंत मेहेंदळे, शरद मुसळे, प्रकल्प समन्वयक प्रसाद सनगरे, सर्व कार्यकर्ते, शिक्षकवृंद व पालक यांचे सहकार्य लाभले.