एक जिगरबाज पत्रकार - तारेक फतेह

विवेक मराठी    28-Apr-2023
Total Views |
 @के. विक्रम राव
 
 
musalim
पाकिस्तानी वंशाचे ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार तारेक फतेह यांचे नुकतेच निधन झाले. तारेक फतेह हे दशहतवाद आणि इस्लामबद्दल परखड मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानाला खडेबोल सुनावले होते... त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख...
 
पाकिस्तानला आपल्या या प्रसिद्ध पत्रकाराचा मृत्यू नेहमीच हवाहवासा होता. 24 एप्रिल 2023 रोजी तारेक फतेह गेले. ते कर्करोगाचे रुग्ण होते. टोरांटो (कॅनडा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे वय 73 वर्षे होते. भारतीय मुसलमान तारेक फतेह यांचा अत्यंत द्वेष करायचे, कारण ते शरियतमध्ये बदल करण्याच्या बाजूने होते.
 
  
कराची येथे 20 नोव्हेंबर 1949 रोजी जन्म झालेले तारेक फतेह नेहमी पाकिस्तानच्या विरोधात होते. ते अखंड भारताचे समर्थक होते. त्यांची आई सुन्नी होती, मुंबईची. बायको नर्गिस शिया, गुजराती दाउदी बोहरा. फतेह स्वत:ला अत्यंत स्पष्टपणे नशिबाचे बळी म्हणायचे. त्यांचे वडीलसुद्धा अन्य मुसलमानांप्रमाणे जीन्नांचे ऐकून खलिस्तानाच्या पाकिस्तानला आले. परंतु ते मृगजळ ठरले. मी पाकिस्तानी होतो, आता मी कॅनडाचा आहे. पंजाबी मुस्लीम कुटुंबातील होतो, जे आधी शीख होते. माझी श्रद्धा इस्लाममध्ये आहे. त्याचे मूळ यहुदी धर्मात आहे. तरुण असताना फतेह मार्क्सवादी विद्यार्थी नेते होते. त्यांनी जीवरसायनशास्त्रात पदवी घेतली. कराचीतील सन नियतकालिकाचे ते बातमीदार होते. जनरल झिया-उल-हक यांच्या लष्करी सरकारने त्यांना दोनदा तुरुंगात पाठविले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला.
  
 
तारेक फतेह भारतीय मुसलमानांना सल्ला देत राहिले - आपल्या आत्म्याला इस्लामी बनवा, मेंदूला नाही. गर्वावर हिजाब घाला, चेहर्‍यावर नको. बुर्क्याने डोके झाका, चेहरा नव्हे. तारेक यांनी रजत शर्मा यांच्या आप की अदालतमध्ये सांगितले होते, की “बाबर हा तर भारतीय इतिहासाचे भंगार होते. तो हिंदुस्थानी लोकांना काळे वानर मानत असे.’‘ म्हणून राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले, तेव्हा तारेक आनंदित झाले होते. त्या अर्ध्या रात्री, 2018च्या ऑगस्ट महिन्यात फतेह हे 12 हजार किलोमीटर दूर टोरांटोमध्ये आपल्या अंथरुणावर धोतर गुंडाळून नाचले होते. तेव्हा टीव्हीवर बातमी आली होती की त्याच दिवशी नवी दिल्ली नगरपालिकेने सात दशकांनंतर औरंगजेब रोडचे नाव बदलून ते ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड’ असे केले होते. फतेह यांच्या मते हा एक ऐतिहासिक कलंक मिटला होता. त्यांच्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात फतेह हे नेहमीच ब्रिटिश राजमधील मोगलांच्या महिमामंडनाचे कठोर टीकाकार राहिले. त्यांनी अनेकदा म्हटलेही होते, की अत्याचारी औरंगजेबाची नावनिशाणी भारतातून पुसली गेली पाहिजे. मग त्यांच्या सूचनेला पूर्व दिल्लीचे लोकसभेतील भाजपा सदस्य महेश गिरी यांनी गती दिली. आपल्या भाषणात फतेह म्हणालेही होते, “आज केवळ हिंदुस्थानच इस्लामिक राष्ट्रांच्या दहशतीचा खात्मा करू शकतो, म्हणून तुम्ही आरंभी नवी दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव दारा शिकोह रोड करू शकता का?” हा त्यांचा प्रश्न होता. औरंगजेबाने आपला सख्खा भाऊ दारा शिकोह याला लाल किल्ल्याजवळ हत्तीच्या पायी देऊन चिरडले होते. त्यांचे शिर थाळीत ठेवून पिता शाहजहान याला नाश्त्यात वाढले होते. मोदी सरकारने तीन वर्षांत औरंगजेब रोडचे नाव बदलले.
 
 
तारेक फतेह त्यांच्या टीव्ही कार्यक्रमात वारंवार म्हणायचे की त्यांना बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून पाहायचे आहे, पाकिस्तानने त्यांना गुलाम करून ठेवले आहे. काश्मीरवरील पाकिस्तानच्या हिंसक हल्ल्यांचा ते नेहमी निषेध करत राहिले. ते मुळातच फाळणीच्या विरोधात होते. ‘यहुदी माझे शत्रू नाहीत’ या त्यांच्या पुस्तकात फतेह यांनी स्पष्ट लिहिले होते की ‘भ्रामक इतिहासाच्या परिणामी यहुदींवर अत्याचार करण्यात आला.’ मुंबईत 9 नोव्हेंबर 2008 रोजी यहुदी नागरिकांवर झालेल्या गोळीबाराने ते संतप्त झाले होते. या वैमनस्याच्या मुळांचा त्यांनी शोध घेतला. यहुदींबद्दल असलेली उत्कट घृणा हेच इस्लामचे मूळ तत्त्व आहे, असे त्यांना आढळले. यावर उपाय शोधण्याच्या बाजूने ते होते.
 
 
तारेक फतेह यांनी इस्लामी देशांकडून असाहाय्य मुस्लिमांची उपेक्षा हे धार्मिक ढोंग असल्याचे म्हटले होते. रोहिंग्या मुसलमान न्यायाचे अधिकारी आहेत, ते उपेक्षेला पात्र नाहीत, असे ते मानत असत. एक मानवी संकट उद्भवले आहे, जिथे एका संपूर्ण लोकसंख्येवर अत्यंत निर्घृण अत्याचार करण्यात येत आहेत. ते जातीय आणि धार्मिक अल्पसंख्याक आहेत. म्यानमारमध्ये लक्षावधी रोहिंग्या मुसलमान एका हुकूमशहाच्या सेनेने केलेल्या क्रूर कारवाईमध्ये देशोधडीला लावण्यात आले. ते शरण मागत आहेत, विशेषत: मुस्लीम देशांकडून. मात्र हे सगळे इस्लामी देश गप्प आहेत.
 
 
तारेक फतेह यांनी तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या इस्लामाबादमधील लाल मस्जिद आणि तिच्यातील दहशतवाद्यांवरील कारवाईमागच्या राजकारणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या दृष्टीने हे कारस्थान होते. तारेक फतेह यांनी लिहिले होते, ‘जनरल मुशर्रफ आणि त्यांना आसरा देणार्‍या अमेरिका, दोघांनाही हे जाणवायला पाहिजे की मलेरियाशी लढण्यासाठी दलदल रिकामी करायची गरज आहे, वेगवेगळ्या डासांना मारण्याची नाही. पाकिस्तानातील इस्लामी दहशतवादाशी लढण्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे की बनावट मतदार याद्या संपुष्टात आणाव्यात आणि लोकशाही निवडणुका घ्याव्यात. निर्वासित राजकारण्यांना देशात परतण्याची मुभा द्यायला हवी.’
 
 
 
मात्र तारेक फतेह यांना देशद्रोही ठरविण्यात आले. अखिल भारतीय फैजान-ए-मदीना परिषदेने एका खासगी वृत्तवाहिनीवरील तारेक फतेह यांच्या ’फतेह का फतवा’ या आकर्षक कार्यक्रमावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती. बरेलीतील एका मुस्लीम संघटनेने कथितरित्या आपल्या टीव्ही कार्यक्रमातून गैर-इस्लामी विचारांचा प्रसार करण्याबद्दल तारेक फतेह यांचे शीर कलम करणार्‍याला 10 लाख रुपये पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.
 
 
फतेह यांना श्रद्धांजली देताना टीव्ही समीक्षक शुभी खान म्हणाल्या, “काही वेळ तर समजलंच नाही की काय म्हणू? काय विचार करू? टीव्ही वाहिन्यांवर आम्हा दोघांचे सत्यासाठी आणि अनेकदा एकमेकांसाठी भांडणे आठवले. तारेकभाई, तुमची मशाल विझलेली नाही. आताही मुस्लीम युवक ती अधिक प्रखरतेने पेटवतील.’
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साप्ताहिक पांचजन्यने लिहिले - त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. तारेक फतेह इस्लामी कट्टरतेचे घोर विरोधक होते.
 
 
खऋथगच्या श्रमिक पत्रकार सदस्यांनीही तारेक फतेह यांच्या सन्मानार्थ आपला लाल झेंडा खाली उतरवला. त्यांच्या पत्रकार-कन्या नताशा यांच्यासाठी शोकसंवेदना! सलाम योद्धा तारेक! तुमचा विजय होवो!
 
 
मूळ हिंदी लेखाचा अनुवाद : देविदास देशपांडे