अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक कोईम्बतूरजवळील उटी येथे संपन्न

विवेक मराठी    15-Jul-2023
Total Views |


vivek
कोईम्बतूरजवळील उटी येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय "प्रांत प्रचारक बैठकीत " संघाच्या शाखांना त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांनुसार अधिक सक्रिय करण्यावर चर्चा करण्यात आली. संघाची ही वार्षिक बैठक यावर्षी 13, 14 आणि 15 जुलै 2023 रोजी कोईम्बतूरजवळील उटी (जिल्हा निलगिरी), तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली होती.
 (VSK) : बैठकीत मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. मणिपूरमधील संघ स्वयंसेवक समाजातील प्रबुद्ध लोकांसोबत शांतता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि पीडित बांधवांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या बैठकीत संघ स्वयंसेवकांकडून पीडित लोकांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याचा विस्तार करण्यावर विचार करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी परस्पर सौहार्द आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याची विनंती करण्यात आली आहे. यासोबतच कायमस्वरूपी शांतता आणि पुनर्वसनासाठी सरकारने सर्वतोपरी कार्यवाही करण्याचे आवाहनही करण्यात आले.
 
बैठकीत हिमाचलमधील मंडी, कुल्लू आदी जिल्हे, उत्तराखंड आणि दिल्ली येथे नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी संघाकडून सुरू असलेल्या सेवा कार्याचा आढावा घेण्यात आला, तत्काळ उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भूतकाळात वेगवेगळ्या प्रांतात आलेल्या इतर आपत्तींमध्ये केलेल्या कामांची माहिती देण्यात आली.
 
 
संघाच्या शाखांकडून सामाजिक जबाबदाऱ्यांनुसार तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या गरजेनुसार वेळोवेळी अनेक सामाजिक व सेवाकार्ये केली जातात. बैठकीत अशा कामांच्या तपशिलांसह अनुभवांची देवाणघेवाणही झाली आणि संघाच्या प्रत्येक शाखेला या दिशेने अधिक सक्रिय करण्याची योजना आखण्यात आली आहे.
 
या वर्षी 2023 मध्ये संघाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षासह एकूण 105 संघ शिक्षा वर्ग पूर्ण झाले, ज्यामध्ये देशभरातील एकूण 21566 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये चाळीस वर्षांखालील 16908 स्वयंसेवक आणि चाळीस ते पासष्ट वयोगटातील 4658 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
 
 
बैठकीत मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 39451 ठिकाणी संघाच्या 63724 दैनिक शाखा, 23299 साप्ताहिक मिलन आणि इतर ठिकाणी 9548 मासिक मंडळी आहेत. बैठकीत संघाच्या विविध उपक्रमांबरोबरच आगामी शताब्दी वर्षातील कार्यविस्तार आणि शताब्दी विस्तारक योजनेचाही आढावा घेण्यात आला.
 
 
बैठकीत प्रामुख्याने संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीला आदरणीय सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत, माननीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे जी आणि सर्व सहकारी आणि इतर सर्व अधिकारी प्रांत प्रचारकांसह उपस्थित होते. यासोबतच संघप्रणित विविध संघटनांच्या अखिल भारतीय संघटन मंत्र्यांचा सहभाग होता.