गाजर बासुंदी

विवेक मराठी    16-Sep-2023
Total Views |
गाजर बासुंदी
साहित्य (सहा जणांसाठी)
 

gajar basundi 
 
एक लिटर दूध, पाव किलो साखर, पाव किलो गाजर, शंभर ग्राम मावा, एक चमचा वेलची पूड, काजू तुकडा(आवश्यकतेनुसार) जराशी केसर,
कृती
 
पहिले सर्व गाजर स्वछ धुवून वरचा व खालचा भाग कापून घ्यावा , साले काढून घ्यावी व ते गाजर कूकर मध्ये ठेवून त्यात पाणी न घालता तीन शिट्या होऊ द्याव्या.
 
एक लिटर दूध छान उकळी येई पर्यंत गरम करावे, नंतर त्यात साखर टाकून परत एकदा एक उकळी येई पर्यंत गरम करावे,
उकडलेले गाजर व मावा एकत्र करून मिक्सर मध्ये एकदम बारीक व एकजीव करून घ्यावे,
 
आता हे गाजर व माव्याचे मिश्रण गरम दुधात टाकावे, वरतून काजू तुकडा, वेलची पावडर टाकून दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर उकळून घ्यावे,उकळत असतात ज्या भांड्यात आपण गाजर बासुंदी बनवणार आहोत त्यात एक मोठा चमचा ठेवावा म्हणजे बासुंदी त्या भांड्याच्या बाहेर येणार नाही,
 
आता सर्व जिन्नस दुधात एकजीव झाले असतील, तर गॅस बंद करावा व वरतून आपल्याला हवी तितकी केसर पेरावी,
थंडगार करून अथवा गरम सुद्धा खायला देऊ शकतो,
 
ह्या एकाच गोड पदार्थात आपण गाजरचा हलवा आणी बासुंदी ह्या दोघांची चव घेऊ शकतो,
एकदा नक्की करून बघा
 
गाजर बासुंदी
 
धन्यवाद
सौ.तनुजा हेरंब प्रधान
सानपाडा नवी मुंबई