‘पितांबरी नर्सरी’वैविध्यपूर्ण शोभिवंत रोपांची उपलब्धता

विवेक मराठी    19-Jan-2024   
Total Views |
शेतकर्‍यांसाठी शाश्वत व खात्रीशीर उत्पन्नासाठी ’शोभिवंत फूलशेती’ एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी ‘पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन’ने ‘पितांबरी नर्सरी फ्रेंचायजी’ हे अभिनव बिझनेस मॉडेल पुढे आणले आहे. याद्वारे शेतकरी व ग्राहकांना खात्रीशीर रोपांचा पुरवठा करण्यासाठी दापोली तालुक्यातील साखळोली येथे ‘पितांबरी नर्सरी’ची निर्मिती केली असून साखळोली येथे रोपनिर्मिती व तळवडे येथे ‘ग्रीन हाऊस’ उभारण्यात आले आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण मातृवृक्षांची व शोभिवंत रोपांची उपलब्धतता करून देण्यात आली आहे.

Pitambari Nursery
आजचे युग हे धावपळीचे आणि वेगवान बनले आहे. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की, सध्याची जीवनशैली शाश्वत आहे का? बदल हा निसर्गाचा एक भाग आहे. परंतु, सध्या ज्या पद्धतीने बदल होत आहेत, त्यानुसार पर्यावरणीय क्षमतांचा, बदलांचा विचार केला जातो का? म्हणून आजच्या काळात शाश्वत जीवनशैली/ विकास महत्त्वाचा आहे. शाश्वत विकास (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) हा निसर्गाशी जोडलेला आहे. भारतातील पश्चिम थरच्या वाळवंटात राहणारा बिश्नोई समाज हा त्यांच्या निसर्गावरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडून पर्यावरणाचे रक्षण केले जाते. उर्वरित समाजाचे काय? ‘कोविड-19’पासून माणसाच्या अंतरंगात निसर्गाबद्दलची ओढ निर्माण होऊ लागली. गावात, शेतात, पडीक जमीन, सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, कॉर्पोरेट कार्यालयांच्या ठिकाणी पाने, फुले, शोभिवंत झाडांची, उद्यानाची गरज भासू लागली. दिवसेंदिवस शहरीकरण वाढते आहे आणि त्यामुळे बागांचे महत्त्व वाढत आहे. थोडक्यात काय, तर माणूस पुन्हा निसर्गाकडे वळत आहे.
 
 
2013 पासून आम्ही निसर्गाधारित, पर्यावरणपूरक कामात गुंतलो आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण किमान ग्रामीण जीवनशैलीपैकी आपल्या कार्यालयात किंवा प्लॉटमध्ये किमान एखादे असे शोभिवंत झाड लावू शकतो का, हा विचार मनात आला आणि या पार्श्वभूीवर दापोली तालुक्यातील साखळोली येथे प्रमाणित रोपांची खास नर्सरी विकसित केली. यासोबतच तळवडे येथे आधुनिक पद्धतीने ‘ग्रीन हाऊस’ची उभारणी केली आहे. याकरिता ’पितांबरी’चा उद्यान विद्या विभाग सक्षम करण्यासाठी ’पितांबरी’ने ’डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’शी करार केला आहे. या माध्यमातून ’उद्यानविद्या’ विषयातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रमाणित मातृवृक्षांसह सर्व रोपे व कलमे तयार केली जातात.
 

Pitambari Nursery 
 
‘पितांबरी नर्सरी’मध्ये सर्व प्रकारची शोभिवंत रोपे उपलब्ध आहेत. यामधे मुख्यत्वे करून ‘इन् डोअर’ व ’आऊट डोअर’ अशी विभागणी आहे. त्याबरोबरच झुडुपवर्गीय शोभिवंत रोपे ‘गोल्डन डुरांडा’, ‘एकालिफा’, ‘क्रोटॉन’, ‘इक्झोरा’, ’टगर’, ‘बोगनवेल’, ‘कण्हेर’, ‘पॉईनसेटीया’ अशा विविध रंगछटा असलेल्या झुडुपांना लॅण्डस्केपिंगसाठी विशेष मागणी असते. जास्वंदीचे विविध प्रकार, गुलाबाचे विविध प्रकार, सदाफुली, अनंतचाफा, झेंडू, पोर्चुलाका, मोगरा, पारिजातक, रातराणी, सोनचाफा अशा प्रकारच्या फूलझाडांची मागणी घरांमध्ये, संकुलांमध्ये वाढत आहे. ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनीही हवा शुद्ध करणारी ‘इन् डोअर’ झाडांची यादी केली आहे यामधे ’जेड’, ‘पीस लिली’, ‘स्नेक प्लांट’, ‘शेवंती’, ’अरेकापाम’, ’सिंगोनिअम’, ‘एन्थुरियम’, ’एग्लोनिमा’, ‘एलोकेशिया’ अशी रोपे ‘पितांबरी नर्सरी’मार्फत मोठ्या प्रमाणात विकण्यात येतात. तसेच ‘अडेनियम’चे विविध प्रकार, ’सक्युलन्ट्स’चे प्रकार, ’ऑर्चिड’च्या विविध जाती, ’लकी बांबू’, ‘बोन्साय’, ‘हँगिंग प्लांटस्’, विविध प्रकारच्या ‘क्रिपर्स’ ज्यांचा उपयोग ‘ग्रीन वॉल’ म्हणून केला जातो. आदी फूलरोपांची निर्मिती तसेच विक्री केली जाते. या रोपांना मोठी मागणी असून यात ‘मार्जिन’ही चांगले असते.
 

Pitambari Nursery 
 
रोपांची शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मिती करण्यासाठी व देखभालीसाठी उद्यान विशेषतज्ज्ञांची (हॉर्टिकल्चरिस्ट) नेमणूक करण्यात आली आहे. प्रमाणित रोपे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘पितांबरी नर्सरी फ्रेंचायजी’ हे एक ‘बिझनेस मॉडेल’ पुढे आणले आहे. बाराही महिने नर्सरीधारकांना आर्थिक उत्पन्न मिळावे, याकरिता ऋतुमानानुसार वर्षभर एकच ठिकाणी रोपे उपलब्ध व्हावीत, त्याचे योग्य व्यवस्थापन व वाहतूक करणे सोयीचे व्हावे आणि रोपांची विक्री साखळी निर्माण व्हावी, या हेतूने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात ‘पितांबरी नर्सरी शाखा’ स्थापन करण्याची अशी ही योजना आहे. आतापर्यंत 34 शाखा स्थापन झाल्या आहेत. यामुळे राज्याच्या विविध विभागांतील शेतकरी, ग्राहक, बागायतदार आमच्याशी जोडले गेले आहे. यामुळे दर्जेदार रोपांची साखळी तयार झाली आहे.
 
 
Pitambari Nursery
 
दर्जेदार शोभिवंत रोपे, विक्रीपश्चात सेवा आणि सल्ला या विश्वासार्हतेमुळे राज्यात ‘पितांबरी नर्सरी’तील रोपांची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे, ‘पितांबरी’च्या कृषी पर्यटन केंद्रात आलेले पर्यटकही ‘पितांबरी’ची नर्सरी पाहून रोपांची मागणी करू लागले आहेत. याखेरीज घरातील कुंडीमध्ये, इमारती अथवा संकुलाच्या सुशोभीकरणासाठी औद्योगिक कारखान्यांपासून, कॉर्पोरेटकार्यालये, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक कार्यालये अशा सर्वच क्षेत्रांमध्ये लॅण्डस्केपिंगसाठी शोभिवंत झाडांची/ रोपांची मागणी वाढत आहे. त्यामुळे ‘पितांबरी नर्सरी’धारकांसाठी शोभिवंत रोप विक्री हा एक खात्रीशीर व्यवसाय बनला आहे. आज अनेक नर्सरीधारक अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी व तरुण व्यावसायिकांनी अधिक माहितीसाठी लेखाखालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या माध्यमातून तुम्हीही आमचे ‘बिझनेस पाटर्नर’ होऊ शकता आणि शाश्वत उत्पन्न मिळवू शकता.
 
 
 
सगळ्यात महत्त्वाचे, अनेक इमारती, घरांना, कार्यालयांना शोभिवंत रोपांमुळे शोभा आली आहे. या शोभिवंत रोपांमुळे हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. अनेक राहिवाशांना शोभिवंत रोपांचा सुगंध अनुभवायला मिळत आहे. अशाप्रकारे इमारती, कार्यालये हरित जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. शाश्वत पर्यावरण विकासातील हा खारीचा वाटा आम्हाला समाधान देणारा आहे. येत्या काळात सर्व प्रकारच्या शोभिवंत रोपांकरिता स्वयंपूर्ण विक्री साखळी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात ‘पितांबरी नर्सरी’ची शाखा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी लागणारी उत्पादने, कुंडी, कोकोपीट, खते, औषधे, पंप, गार्डन साहित्य हे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी आमचे काम सुरू आहे. विशेषतः लागवडीसाठी व देखरेखीसाठी ‘कुशल माळी प्रमाणपत्र’ अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणध्वनी : 9867112714

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.