इंद्रायणी काठी राष्ट्रसाधकांची मांदियाळी...

विवेक मराठी    25-Nov-2024
Total Views |
alandi indrayani  
‘राष्ट्रसाधक’ प्रशिक्षण शिबिर म्हणजे आत्मविकासापासून राष्ट्रभक्तीपर्यंतचा प्रवास आहे व ‘देश हा देव असे माझा... अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा...’ हे या शिबिराचे ब्रीदवाक्य आहे. हे आगळेवेगळे, नावीन्यपूर्ण शिबिर असून प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी ही सुवर्णसंधी आहे. हे शिबिर संत ज्ञानेश्वरांची समाधी असलेल्या आळंदी या तेजोमय स्थानी म्हणजेच इंद्रायणीच्या तीरावर डिसेंबर महिन्यात राष्ट्रसाधक शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर आध्यात्मिक क्षेत्रातील एक अग्रणी संस्था श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ व विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणारे ‘विवेक व्यासपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने भरविले जाणार आहे.
प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाला देशासाठी आपण काही तरी करावे, असे मनापासून वाटत असते; पण नेमके काय केले पाहिजे याविषयी मनात स्पष्टता नसते व देशसेवा करण्याचा मार्गही गवसत नसतो. हा संभ्रम संपवून राष्ट्रसेवेसाठी उभे ठाकण्याकरिता एक सुवर्णसंधी अशा सर्व जागरूक नागरिकांना प्राप्त झाली आहे. ती संधी म्हणजे अखिल विश्वासाठी ’पसायदान’ मागणार्‍या संत ज्ञानेश्वरांची समाधी असलेल्या आळंदी या तेजोमय स्थानी म्हणजेच इंद्रायणीच्या तीरावर या डिसेंबर महिन्यात राष्ट्रसाधक शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर आध्यात्मिक क्षेत्रातील एक अग्रणी संस्था श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ व विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणारे ‘विवेक व्यासपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने भरविले जाणार आहे.
 
 
त्यासाठी आपण सर्वप्रथम ‘राष्ट्रसाधक’ ही संकल्पना समजून घेऊ या! आपण हे जाणतोच की, आपल्या भारतीय परंपरेनुसार ब्रह्मचैतन्याचा साक्षात्कार घडणे, हे मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे, असे मानले जाते. मात्र आत्मचैतन्य ते ब्रह्मचैतन्य असा प्रवास घडताना यामध्ये ‘राष्ट्रचैतन्य’ ही एक महत्त्वाची पायरी आहे, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आत्मविकास साधण्यासाठी प्रयास करणार्‍या साधकाचा आत्मसाक्षात्काराचा विकासक्रम लक्षात घेतला तर आत्मचैतन्य ते ब्रह्मचैतन्य हा आंतरिक विकास व आत्मचैतन्य ते राष्ट्रचैतन्य हा बहिरंग विकास मानावा लागतो.
कालावधी ः- डिसेंबर दि. 20, 21, 22
स्थान ः- श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय, वडगांव-घेनंद रस्ता, ज्ञानसागर मंगल कार्यालयासमोर, श्रीक्षेत्र आळंदी (देवाची), ता. खेड, जि. पुणे.
शिबिराचे शुल्क केवळ रु. 3500/- (शुल्कात समाविष्ट - तीन दिवसांचा निवास, भोजन, चहा-न्याहारीसह प्रशिक्षण सामग्रीचा समावेश आहे.)
अधिक माहितीसाठी
संपर्क क्रमांक
 
विनय सराफ : 9881201684,
किरण दुधाने : 9552841581
यात प्रामुख्याने खालील विषय महत्त्वाचे असून त्यावर या शिबिरात मार्गदर्शन आणि चर्चा घडून येणार आहे.
 
अंतरंग विकासाचा विचार करताना त्यात पाच विषय समजून घ्यावे लागतात.
 
1. मनुष्य देह व त्याची सार्थकता
2. अध्यात्माची आवश्यकता
3. सद्गुण संपत्तीचा विकास
4. कर्मसिद्धांत, पाप-पुण्य संकल्पना
5. देशसेवेसाठी निष्काम कर्मयोग
बहिरंग विकासाचा विचार करताना त्यात पाच विषय समजून घ्यावे लागतात.
1. प्रेरणा
2. ‘मीच का?’ या प्रश्नाचा शोध
3. संघटनात्मक कामाचे स्वरूप आणि महत्त्व
4. संवाद/नेतृत्व कौशल्य
5. संशोधन
6. परिवर्तनाच्या दिशेने प्रवास
 
 
आपल्या पारंपरिक अध्यात्म साधनेत ब्रह्मचैतन्य व आत्मचैतन्य यांच्या परस्परसंबंधांची विस्तृत चर्चा केली आहे; परंतु ब्रह्मचैतन्य, राष्ट्रचैतन्य व आत्मचैतन्य यांच्या परस्परसंबंधांची चर्चा पुरेशी झालेली नाही. आपले राष्ट्र सुरक्षित नसेल तर आपला समाजही सुरक्षित नसतो व अशा समाजात व्यक्तिगत अध्यात्म साधनाही नीटपणे शक्य होत नाही. अध्यात्म साधनेतील सामाजिक व राष्ट्रीय विषयांचे महत्त्व अनेक संतमहात्म्यांनी सांगितले आहे; परंतु त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याआधारे जनप्रबोधन, जनप्रशिक्षण व जनसंचालन असा उपक्रम अद्याप झालेला नाही. तो आपण ‘राष्ट्रसाधक’ या संकल्पनेद्वारा करीत आहोत. या संकल्पनेतून सर्व समाजच सामूहिक अध्यात्म साधनेतून सामूहिक अध्यात्म शक्ती निर्माण करेल, जी प्रथम आपल्या देशाची व नंतर विश्वाची सामूहिक आध्यात्मिक उन्नती करीत ब्रह्मचैतन्याची प्राप्ती करून घेईल. या प्रवासात स्पर्धेपेक्षा सहकार्याचे, शोषणापेक्षा पोषणाचे, व्यक्तिगत अहंकारापेक्षा समूह भावनेचे महत्त्व लक्षात येत जाईल व आजच्या सामाजिक वातावरणातील रजोगुण व तमोगुण यांचे प्रदूषण कमी होईल. समाजोन्नतीच्या दृष्टीने राष्ट्रकार्य करण्यामागे आपण लोककल्याणार्थ समाजाची सेवा करतो आहोत अथवा देशसेवा करतो आहोत, अशी उपकृत करण्याची भूमिका बाळगण्याऐवजी ‘आत्मोन्नतीसाठी राष्ट्रसाधना’ अशी भूमिका बाळगून राष्ट्रकार्य करणे म्हणजेच ‘राष्ट्रार्थ कर्मयोग’ होय. आपण सत्त्वगुणाची उपासना करत सात्त्विक भावनेतून समाजाच्या सक्षमीकरणाचे देशकार्य करणे म्हणजेच ‘राष्ट्रार्थ कर्मयोग’ होय.
 
 
राष्ट्रसाधक शिबिर म्हणजे अंतरंग विकास व बहिरंग विकास यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य देण्याचीच एक व्यवस्था अथवा एक चळवळ आहे. राष्ट्रसाधना ही सामूहिक साधना आहे, कारण व्यक्तिगत साधनेपेक्षा सामूहिक साधनेचे परिमाण व्यापक असते. राष्ट्रसाधकांना एका सामूहिक लक्ष्याकडे वाटचाल करायची आहे. समाजमन उन्नत आणि प्रगल्भ बनविणे हे आपले उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक राष्ट्रसाधक अंतरंग विकासाची व्यक्तिगत साधना करणार आहे. याच साधनेला बहिरंग विकासाची जोड आपणास द्यावयाची आहे. अंतरंग विकास हा आपल्या उपासनेशी संबंधित असला किंवा उपास्यदेवता- ईश्वरभक्ती- यासोबत संबंधित असला तर बहिरंग विकास हा सामाजिक कार्याशी निगडित आहे. आत्मविकासाची साधना ही खडतरच असते; पण ती करीत असताना आपण ईश्वराकडे कोणत्याच प्रकारची तक्रार करीत नाही आणि साधनापथावर अविचल राहून वाटचाल करीत राहतो. जेव्हा आपण समाजभक्तीचा विचार करू तेव्हासुद्धा त्या खडतर वाटचालीबाबत अथवा येणार्‍या अडचणींबाबत कोठेही तक्रार न करता आपल्याला समाजाच्या आत्मनिर्भरतेसाठी व सक्षमीकरणासाठी राष्ट्रसाधनाच करायची आहे. प्रत्येक साधनेत ऊर्जा असते आणि ऊर्जेत परिवर्तन घडविण्याचे प्रचंड सामर्थ्य असते. समाज एकत्रितपणे आपला उद्धार घडविण्यासाठी कसा सक्षम होईल याचा विचार करून आपल्याला समाजाची सामूहिक कर्मचेतना जागृत करायची आहे. ती वैचारिक ऊर्जा आपल्यात जागृत व्हावी याच दृष्टीने अंतरंग विकासाच्या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आलेली असून त्याला बहिरंग विकासाची उचित जोड दिलेली आहे. हे ’राष्ट्रसाधक’ प्रशिक्षण शिबिर म्हणजे आत्मविकासापासून राष्ट्रभक्तीपर्यंतचा प्रवास आहे व ‘देश हा देव असे माझा... अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा...’ हे या शिबिराचे ब्रीदवाक्य आहे. या पावन आळंदीमध्ये भक्तिमार्गाची कास धरून समाजाप्रति म्हणजेच देशासाठी योगदान देण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊ या! या शिबिरात सहभाग घेऊन ‘राष्ट्रसाधक’ संकल्पना समजून अंतरंग आणि बहिरंग विकास साधताना या ’तेजाची’ अनुभूती घेऊ या! हे दोन्ही विकास रंजकतेने एकत्रित साधता येणारे असे हे आगळेवेगळे, नावीन्यपूर्ण शिबिर असून प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी ही सुवर्णसंधी आहे. या शिबिरासाठी मर्यादित संख्येतच साधकांना प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे आपल्यासाठी इच्छुक व्यक्तींनी तातडीने आरक्षण करावे, असे संयोजकांनी आवाहन केले आहे.
चला तर मग...
राष्ट्रभक्तीसाठी आपले व्यक्तिमत्त्व घडवून ’राष्ट्रसाधक’ होऊ या!
मुग्धा वाड
9552451077