संघाच्या क्रमिक विकासातील दोन महत्त्वपूर्ण पत्रे

विवेक मराठी    16-Apr-2024   
Total Views |
@रवींद्र जोशी
 

rss 
डॉ. हेडगेवारांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1926 च्या एप्रिल महिन्यात विदर्भातील रामटेकला श्रीराम नवमीच्या यात्रेतील अव्यवस्था, यात्रेकरूंना धक्काबुक्कीमुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी तरुण स्वयंसेवकांच्या मदतीने प्रथम सेवाकार्य सुरू केले. या सेवाकार्यातील सातत्य आणि स्थानिक प्रतिसाद स्पष्ट करणारी डॉ. हेडगेवारांची दोन पत्रे संघाच्या क्रमिक विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे पूर्वज कंदकुर्ती या गावचे.
 
गोदावरी, वंजरा व हरिद्रा या नद्यांचा त्रिवेणी संगम आणि मराठी, तेलुगू व कानडी भाषा प्रेमाने नांदणारे व मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे सुंदर मंदिर हे या गावाचे वैशिष्ट्य. वेदअध्ययन व अध्यापन तसेच गोदावरीच्या तटावर कुस्ती खेळणारे बलदंड हेडगेवार कुटुंब असा या घराण्याचा लौकिक. आज कंदकुर्ती हे गाव तेलंगणा राज्यात आहे.
 
 
परकीय मुगल आक्रमणात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा दुष्परिणाम म्हणून अनेक कुटुंबे गाव सोडून जाऊ लागली. राजे भोसले यांच्या राजधानीत नागपूरला वेदविद्येला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. विद्या असून उपासमारीत, दारिद्य्रात जगण्यापेक्षा नागपूरला उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. हेडगेवारांचे पूर्वज आल्याची नोंद इतिहासाने घेतली आहे.
 
 
 
डॉ. हेडगेवारांचे वडील बळीरामपंत आणि आई रेवतीबाई आपल्या मुलांना सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार आणि सायंकाळी शुभंकरोती म्हणण्याचा संस्कार आदी देण्याविषयी सजग होते. कालांतराने डॉ. हेडगेवारांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1926 च्या एप्रिल महिन्यात विदर्भातील रामटेकला श्रीराम नवमीच्या यात्रेतील अव्यवस्था, यात्रेकरूंना धक्काबुक्कीमुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी तरुण स्वयंसेवकांच्या मदतीने प्रथम सेवाकार्य सुरू केले. या सेवाकार्यातील सातत्य आणि स्थानिक प्रतिसाद स्पष्ट करणारी डॉ. हेडगेवारांची दोन पत्रे संघाच्या क्रमिक विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. येथे नमूद करीत असलेले पहिले पत्र रामटेकचे मा. संघचालक भय्यासाहेब तोतडे यांस, तर दुसरे पत्र संघाचे प्रथम प्रचारक व अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख बाबासाहेब आपटे यांना लिहिलेले आहे.
 

rss 
 
रामटेक येथील रामनवमीच्या यात्रेची सुव्यवस्था निर्माण करण्याचे समाधान प्राप्त करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी स्वयंसेवकांच्या सहभागाने सातत्याने 1926 ते 1934 पर्यंत प्रयत्न केला.
 
 
रामभक्तांच्या प्रदीर्घ संघर्ष - बलिदान - साहस - श्रद्धा व पराक्रम यातून अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा संपूर्ण जगाने पाहिला, अनुभवला.
 
 
लेखक ‘कुटुंब प्रबोधन’ या गतिविधीचे अखिल भारतीय संयोजक आहेत.

रवींद्र जोशी

लेखक  ‘कुटुंब प्रबोधन’  या  गतिविधीचे  अखिल  भारतीय  संयोजक  आहेत.