मसाल्यांची मिश्रशेती, हमखास उत्पन्नाची खात्री!

विवेक मराठी    22-Apr-2024   
Total Views |
भारतीय जेवणाची चव वाढवणारे व अद्वितीय सुगंध असणारे भारतीय मसाले गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वर्चस्व राखून आहेत. मिश्रशेतीतही त्यांचं योगदान अनन्यसाधारण असून मसाला पिकांची लागवड शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणारी आहे. म्हणूनच शेतीविषयक निरनिराळे प्रयोग करणारा पितांबरीचा कृषी विभाग मसाला पिकांची लागवड व याद्वारे मिश्रशेतीचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन करीत आहे.
 
Pitambari Nursery 
भारताला 'Spice Bowl of World' असे म्हटले जाते. भारतीय आहारात मसाल्यांना महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच भारतात मसाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षी 11.4 मिलियन टन्सपर्यंत भारतात मसाला पिकांचे उत्पादन घेतले गेले. मसाल्यांच्या शेतीसाठी उपलब्ध अनुकूल वातावरण, मसाले उत्पादन खरेदी करण्यासाठी असलेला मोठा व्यापारी वर्ग अशा कारणांमुळे आज शेतकरी वर्गाला मसाला पिकांची शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. भारतात 100 हून अधिक मसाल्यांचे प्रकार आढळतात. यामध्ये काळी मिरी, जायफळ, धने, जिरे, आले, मिरची, हळद यांना व्यापारी दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. तसेच आंबा, जांभूळ, नारळ, केळी अशा फळपिकांमध्ये मसाला पिकांची मिश्र लागवड करता येते.
 
 
पितांबरीच्या कृषी विभागानेही रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे आणि ताम्हाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर मसाला पिकांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑल स्पाइस, काळी मिरी, जायफळ, दालचिनी, तेजपत्ता या मसाला पिकांचा समावेश आहे. पितांबरीने आपल्या क्षेत्रात जायफळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून ’कोकण स्वाद’ व ’सुगंधा’ या जातींची 100 हून अधिक कलमे लावली आहेत. यांची लागवड मुख्यत्वे करून नारळबागेत करण्यात आली आहे. यासाठी पाण्याची निचरा होणारी जमीन निवडण्यात आली. 10 वर्षे जुनी नारळबाग असलेल्या शेतामध्ये 5 मी. 5 मी. अंतरावर 1 मी. 1 मी. 1 मी. खड्डा खणून त्यामध्ये पितांबरीचे ’गोमय’ सेंद्रिय खत वापरण्यात आले. ही लागवड साधारणतः जून-जुलै महिन्यांत पूर्ण करण्यात आली. जायफळात मादी व नर झाडे वेगवेगळी असून त्यांच्या बागेत गुणोत्तर राखणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अधिकृत मातृवृक्षांपासून तयार केलेल्या कलमांचीच लागवड करावी लागते. म्हणूनच पितांबरीने बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून खात्रीशीर कलमे घेऊन त्याची लागवड केली. यापासून तयार होणार्‍या मसाला कलमांची विक्रीही आपण पितांबरी नर्सरीमार्फत करतो.
 
Pitambari Nursery
 जायफळ
 
जायफळ या पिकाला कुठल्याही रोग व किडीचा विशेष धोका नसून त्याचा संगोपन खर्चही कमी आहे. जायफळाला रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी 1% बोर्डो मिश्रण फांदीला लावण्यात आले. शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यानंतर साधारणतः सहा वर्षांनंतर झाडांना फळधारणा सुरू होते आणि ती 20 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू राहते. जून ते सप्टेंबर कालावधीत काढणी केली जाते. जायफळासोबतच काळ्या मिरीची दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेऊन पितांबरीने ’पन्नीयुर-1’ व ’बुशपेपर’ जातीच्या काळ्या मिरीची लागवड केली आहे. यासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातून अधिकृत रोपे आणून छाट कलमाद्वारे ती रोपे वाढवण्यात आली व नारळबागेत त्याची लागवड करण्यात आली. 2 ते 3 रोपे एका खड्ड्यात लावून त्यास बांबूचा आधार देण्यात आला.
 
Pitambari Nursery 
 सर्व मसाला वनस्पती
 
त्याचे रोगांपासून संरक्षण होण्यासाठी पितांबरीचे ’बी. व्ही. एफ. शिल्ड’ व ’कोपर ओक्सी क्लोराइड’ या बुरशीनाशकांची वेळोवेळी फवारणी करण्यात आली. काळी मिरी 7-8 महिन्यांत तयार होत असून डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत त्याचे उत्पादन मिळते. एका झाडापासून सुरुवातीच्या काळात 1 ते 2 किलो काळी मिरी मिळते. तसेच मोठ्या परिपक्वझाडापासून 2 ते 3 किलो, तर तीन वर्षांनंतर 100 ते 125 किलो प्रति एकरपर्यंत काळी मिरी उपलब्ध होते. त्यानंतर त्यास पाण्यात उकळवून उन्हात किंवा ड्रायरच्या साहाय्याने वाळवले जाते.
 
Pitambari Nursery 
 दालचिनी
 
याव्यतिरिक्त दालचिनी, तमालपत्र, ऑल स्पाइसेस आणि वेलची या मसाला पिकांची लागवडही प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. ही सर्व मसाला रोपे पितांबरी नर्सरी व पितांबरी नर्सरी फ्रँचायसी येथे उपलब्ध असून त्यांना मोठी मागणी आहे ’नर्सरी स्पाइस गार्डन’ आणि ’लाखी बाग’ ही अभिनव संकल्पनाही मिश्रपीक मसाला लागवडीसाठी पितांबरी नर्सरीच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी तयार केली आहे. त्याचीदेखील शेतकर्‍यांनी पितांबरीच्या प्रतिनिधींकडून माहिती घ्यावी.
 
 
 
Pitambari Nursery
 काळी मिरी
 
आपल्याकडे मोनोक्रॉपिंग म्हणजे दर हंगामात एकच एक पीकपद्धती रुजलेली आहे. त्यामुळे दरवर्षी विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि उत्पादनातही घट होत आहे. त्यामुळे ही पीकपद्धती बदलण्याची गरज आहे. पितांबरीच्या साहाय्याने मिश्रशेती करताना आपणास पीक व्यवस्थापनाबद्दल परिपूर्ण माहिती दिली जाते. यात पितांबरी गोमय या खताचा तसेच पितांबरीच्या अन्य खतमात्रांचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण उत्पादनवृद्धी करता येऊ शकते. मिश्रशेतीचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी पितांबरी कंपनीचे कृषितज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.
 
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. भ्रमणध्वनी - 9867112414.. 
www.pitambari.com

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.