२०२५ ला रंगणार भारत चीन युद्ध

विवेक मराठी    24-Apr-2024
Total Views |
 @अजिंक्य तरटे 
 
d gukesh 
बुद्धिबळातील नवीन विश्वविजेता होण्यासाठी कोण आव्हान देणार, हे ठरवणाऱ्या कँडीडेट स्पर्धेत भारताचे ग्रँडमास्टर, चेन्नईचे सुपुत्र डी.‌ गुकेश यांनी विजय संपादित केला. ही स्पर्धा जिंकणारे ते जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहेत. ते २०२५ साली होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ विश्वविजेता स्पर्धेत विद्यमान बुद्धिबळ विश्वविजेता चीनच्या ग्रँडमास्टर डींग लिरेन याला विश्वविजेता पदासाठी आव्हान देतील.
 
पुढील 2025 या वर्षी भारत आणि चीन यांच्यात युद्ध रंगणार आहे. मात्र काही घाबरायचे कारण नाही कारण हे युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर रंगणार नाहीये या युद्धात काहीही जीवित आणि आर्थिक हानी होणार नाही हे युद्ध रंगेल पूर्णतः वातानुकूलित अश्या हॉल मध्ये. या युद्धात भारताकडून प्रतिनिधीत्त्व करतील चेन्न्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी. गुकेश तर चीनकडून ग्रँडमास्टर डिंग लिरेन हे प्रतिनिधींच्या करतील, हे युद्ध रंगेल बुद्धिबळाच्या 64 स्केअरच्या पटावर. हत्ती, घोडा उंट वजीर या पारंपरिक सैन्याच्या आधारे हे युद्ध खेळले जाईल. या युद्धातील विजेता बुद्धिबळाचा विश्वजिजेता म्हणून ओळखला जाईल. बुद्धिबळ कॅन्डीडेट 2024स्पर्धा चेन्नईचे ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी जिंकल्यामुळे, पुढील वर्षी 2025 ला हे भारत चीन युद्ध रंगेल....
 
 
तर मित्रांनो, सन 1944 पासून दरवर्षी बुद्धिबळाचे आंतरराष्टीय स्तरावर नियमन करणार्‍या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑफ दि इचेस अर्थात ’फिडे’ कडून विश्वविजेता होण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्या वेळी विद्यमान विश्वविजेत्यास नवीन विश्वविजेता होण्यासाठी कोणता बुद्धिबळपटू आव्हान देणार ? हे ठरवण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते ज्यास ‘कॅन्डीडेट‘ स्पर्धा म्हणतात. जगातली अव्वल 8 खेळाडू ही स्पर्धा खेळतात . या कॅन्डीडेट स्पर्धेतील विजेता विद्यमान विश्वविजेत्यास आव्हान देतो.
 
 
तर 2024 मधील कॅन्डीडेट स्पर्धा 3 एप्रिल ते 21 एप्रिल या दरम्यान कॅनडा देशातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चेन्नईचे भूमिपुत्र डी. गुकेश यांनी या स्पर्धेत झालेल्या 14 सामन्यात फक्त एका डावात पराभव स्वीकारत 9 गुणांची कमाई करत, विजेतेपद मिळवल्याने, आता विद्यमान पुरुष बुद्धिबळ विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन याला आव्हान देणार हे स्पष्ट झाले आहे.
 
 
ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या इतिहास बघितल्यास ही स्पर्धा जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू आहेत. ते आता फक्त 17 वर्षाचे आहेत. ते पुढील दोन दशके सहज बुद्धिबळ खेळू शकतात. या प्रदीर्घ कालावधीचा विचार करता ग्रँडमास्टर डी. गुकेश हे बुद्धिबळ क्षेत्रात मोठी झेप घेऊन भारताची पताका अभिमानाने उंचावत ठेवतील, हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही. अन्य मैदानी खेळात जशी खेळाडूला वयोमर्यादेची अट आहे तोच प्रकार बुद्धिबळात देखील आहे. अन्य मैदानी खेळात जर खेळाडूं 32 ते 34 या दरम्यान निवृत्ती स्वीकारत असेल, तर बुद्धिबळाच्या बाबतीत ही मर्यादा थोडी लांबत 39 ते 40 वर्षाची होते, इतकाच काय तो फरक. आता प्रसिद्ध असलेले ग्रँडमास्टर विदित गुजराथी, ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, हे बुद्धिबळ खेळाडू 30 ते 35 या वयोगटातील आहेत, त्या अर्थाने त्यांचा खेळ उतरणीला लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची जागा घेणारे ग्रँडमास्टर डी. गुकेश हे आपली चुणुक दाखवून देत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्या खेळाचे वैशिष्ट म्हणजे प्रतिस्पर्ध्याला विचार करायला भाग पडेल, अश्या खेळ्या करणे. या आधी त्यांनी बुध्दिबळाच्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांना फिडे सर्किट या बहुमानातील दुसरे स्थान मिळाले आहे. यावर्षी कॅन्डीडेट स्पर्धा जिंकणारे ग्रँडमास्टर डी. गुकेश हे ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारे दुसरेच भारतीय बुद्धिबळपटू आहेत. ग्रँडमास्टर विश्वनाथन यांनी 2014 साली ही स्पर्धा जिंकली होतो, त्यावेळी कॅण्डीडेटच नव्हे तर बुद्धिबळ विश्वविजेता पदाला देखील ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी गवसणी घातली होती. त्यानंतर विश्वनाथन आनंद यांच्याच शहरातील अर्थात चेन्नई मधील ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी हा मोठा पराक्रम केला. मात्र या साठी तब्बल 10 वर्षाचा वेळ जावा लागला. आपल्या भारतात दुदैवाने सी फॉर क्रिकेट असा अर्थ घेतला जातो अनेक क्रिकेटर्सला मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळतात. क्रिकेट हा अत्यंत मोजक्या देशात खेळाला जाणारा मुळातील विदेशी खेळ आहे. तर बुद्धिबळाचे नियमन करणार्‍या फिडेचे जगातील 19 0 देश सदस्य आहेत. आणि हा खेळ पूर्णतः भारतीय आहे. हा खेळ भारतीयांनी भारतात शोधला आहे.बँडमिंटन सारखा पुण्यात मात्र ब्रिटिशांनी शोधलेला नाही. एका अर्थाने क्रिकेट गुलामीचे प्रतीक आहे जे कोणत्याही सार्वभौम देशासाठी अपमानास्पद आहे, मात्र बुद्धिबळासाठी ही बाब लागू होत नाही. त्यामुळे भारतीयाने बुद्धिबळ या खेळात मिळवलेले यश अत्यंत महत्त्वाचे आहे.