लग्नाच्या ‘जादू’ची गोष्ट

विवेक मराठी    05-Apr-2024
Total Views |
@ओंकार दाभाडकर
लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या गोड दिवसांनंतर सुरू होणार्‍या छोट्या छोट्या कुरबुरींपासून घटस्फोट घेण्याची वेळ येईपर्यंत निर्माण झालेल्या गंभीर कलहांच्या मुळाशी काही ठरावीक कारणं असतात. त्याचा शोध घेणे, त्यावर तोडगा काढणे हे करणं सोडून टोकाचा निर्णय घेण्याकडेच कल दिसतो. अशा 500 हून अधिक जोडप्यांचा वैवाहिक प्रवास कायमचा पालटून टाकणारा एक उत्कृष्ट उपक्रम म्हणजे ‘मॅजिक ऑफ मॅरेज’ हे चारदिवसीय निवासी शिबिर.
wedding
 
कोणत्याही जोडप्याच्या नात्याची - एक तर सगळं छान किंवा किंचित कुरबुर; पण काळजीचं काही नाही किंवा अतिशय तणावग्रस्त - अशा तीनपैकी एक स्थिती असते. या स्थिती बर्‍याच अंशी नात्याच्या नावीन्याशी निगडित असतात.
 
 
लग्न नुकतंच झालं असेल तर अपवादात्मक उदाहरणं सोडल्यास टोकाचा तणाव शक्यतो नसतोच. सगळं खूप छान छान सुरू असतं. हळूहळू लग्न मुरतं - एकमेकांचे दोष स्पष्टपणे दिसायला- जाणवायला- बोचायला- सुरुवात होते; परंतु एकमेकांवरील विश्वास, प्रेम, मुलंबाळं, सांसारिक अवलंबित्व यामुळे वीण घट्ट असते. नातं सुरळीत सुरू असतं; परंतु काही जोडप्यांच्या बाबतीत (जे आजकाल काही न राहता बहुतांश होतंय की काय अशी अवस्था आहे.) मतभेद, गुण-दोषांच्या फटी, वाद, कलह, संशय - हे सगळं इतकं टोकाला जातं, की वेगळं होण्याशिवाय पर्याय उरत नाही.
 
हा सगळा प्रकार आपल्या समाजाने ओपन सीक्रेट करून टाकला आहे - आणि त्यामुळे खरं तर समस्या अधिक बिकट होत आहे. म्हणजे, नवरा-बायकोमधील वाद घरोघरी असतातच, हे एकीकडे सार्वत्रिक स्वीकृत असलं तरी त्याबद्दल खुली चर्चा, मदत मागणं/करणं, कुणाकडे सल्ला घ्यायला जाणं हे काहीच होत नाही. उलट जे काही आहे ते शक्यतो दोघांनी आपापसात काय ते सोडवून घ्यावं, असं सर्वांनीच ठरवून टाकल्यामुळे अनेक जोडपी आमचं खूपच वाईट आहे आणि त्यावर उपाय शक्य नाही, या निष्कर्षावर येईपर्यंत तिसर्‍या कुणाशी बोलतही नाहीत!
 
wedding 
अशा असंख्य जोडप्यांना प्रचंड तणावग्रस्त अवस्थेतून अतिशय आनंदी, आशादायी, उत्साही अवस्थेत केवळ चार दिवसांत घेऊन जाणारा - 500 हून अधिक जोडप्यांचा वैवाहिक प्रवास कायमचा पालटून टाकणारा - एक उत्कृष्ट उपक्रम म्हणजे - मॅजिक ऑफ मॅरेज हे चारदिवसीय निवासी शिबिर.
 
पुण्याला कातरखडक (मुळशी) सारख्या रम्य ठिकाणी ऋषी संस्कृती विद्या केंद्र या संस्थेतर्फे हे निवासी शिबिर राबवलं जातं. आता उत्तम प्रतिसादामुळे केंद्राने छत्रपती संभाजीनगर व इतर शहरांमध्येदेखील शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे.
 
 
सिद्ध समाधी योग मुळे सुपरिचित ऋषि प्रभाकर गुरुजी यांनी ऋषी संस्कृती विद्या केंद्र स्थापन केलं आहे. एरोनॉटिकल इंजिनियर आलेल्या गुरुजींच्या सान्निध्यात श्री मनोज लेखी आले आणि पूर्णवेळ स्वतःचा तसेच इतरांचाही आध्यात्मिक व प्रापंचिक प्रवास अधिक उन्नत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेच आता ऋषी संस्कृती विद्या केंद्र येथे अनेक विलक्षण प्रकल्पांवर काम करतआहेत. मॅजिक ऑफ मॅरेज हा त्यांतीलच एक प्रकल्प.
 
 
लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या गोड दिवसांनंतर सुरू होणार्‍या छोट्या छोट्या कुरबुरींपासून घटस्फोट घेण्याची वेळ येईपर्यंत निर्माण झालेल्या गंभीर कलहांच्या मुळाशी काही ठरावीक कारणं असतात.
 
 
मुळात स्त्री आणि पुरुष यांत विचार करण्याची, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत फार वेगळी असते. स्त्री व्यक्त होणारी आणि समोरच्याने ऐकावं व व्यक्त व्हावं, ही अपेक्षा करणारी असते. पुरुष चर्चा न करता समस्या सोडवण्याकडे अधिक लक्ष देणारा असतो. स्त्रीला प्रेम व्यक्त करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी हव्या असतात. पुरुष मूक कृतीने, काळजी घेऊन प्रेम व्यक्त होतं असं समजणारा असतो. अर्थात, हा समस्त स्त्री-पुरुषांना एकाच गठ्ठ्यात बांधण्याचा प्रकार वाटू शकतो. तो तसा नसून आपलं मानसशास्त्र काय सांगतं - आपला मेंदू कसा घडला आहे - इतकंच समजून घेण्याचा हा भाग आहे. गंमत म्हणजे - हे सगळं अजिबात कंटाळवाणं होऊ न देता, असंख्य हास्याचे फवारे उडवत, हळुवारपणे ‘अरेच्चा! हे असं होतंय होय!’ असे किती तरी ‘युरेका’ क्षण अनुभवून देत मॅजिक ऑफ मॅरेज सुरू होतं.हलक्याफुलक्या छोट्या छोट्या सेशन्समधून तणावग्रस्त जोडप्यांना रिलॅक्स करत करत शिबिर पुढे पुढे किचकट समस्यांना हात घालतं. सासू-सुनेच्या भांडणात मुलगा आणि नवरा असणार्‍या पुरुषाच्या उडणार्‍या त्रेधातिरपिटीपासून ते व्यसनाधीन, बाहेरख्याली नवर्‍यामुळे बायकोला आलेल्या उद्विग्नतेपर्यंत सर्व काही कमालीच्या सौम्य, पण अत्यंत परिणामकारकतेने हाताळलं जातं.
 
 
wedding 
 
मुख्य म्हणजे हे सगळं समोर कुणी तरी ज्ञानी मनुष्य बसला आहे आणि आपण सर्वांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून ऐकायचं आहे - असं अजिबात नसतं. आपले ट्रेनर्स स्वतःचे अनुभव सांगतात, आपल्यालाही बोलतं करतात, आपल्याकडून बरंच काही करून घेतात.
 
आज आपल्याला शिकवायला आलेले समोरचे ट्रेनर्स स्वतः किती तणावग्रस्त होते हे ऐकून आपल्यालाच आधार वाटतो. आपल्याबरोबर सहभागी झालेली इतर जोडपी त्यांच्या तक्रारी, अडचणी, त्यांची आपसातली बाजू सांगताना बघून कित्येकांना ‘अरे, आपलं तर किती छान आहे!’ असं वाटून जातं.
 
 
अनेकदा वय वर्षे 55-60 असणारी जोडपी आम्ही सुखी आहोत... बस अजून छान संसार व्हावा म्हणून आलो आहोत, असं म्हणतात; पण शिबिराच्या मध्यात - दोघेही घळघळा रडत रडत मोकळे होऊन सांगतात की, त्यांना वाटत होतं, संसार छान सुरू आहे - पण अजून किती छान होऊ शकतो - एकमेकांसाठी अजून किती करू शकतो - किती करायला हवं आहे - याची जाणीव आत्ता झाली आहे त्यांना!
 
 
Magic of Marriagehttps://manojlekhi.in/magic-of-marriage/

7040540450
 
 
काही गमतीशीर तर काही गंभीर, काही आनंददायक तर काही अत्यंत नाजूक - आपल्या जोडीदाराबरोबर या विविध टास्क करताना राहून राहून आपण हे सगळं फार उशिरा करतोय, असं सर्व जोडप्यांना वाटत राहातं... तर नुकतंच लग्न झालेल्यांना आपण इथे आलो ते फार बरं झालं हेही पटून जातं!
 
 
घटस्फोटाची केस दाखल करायची आहे; पण शेवटचा प्रयत्न म्हणून हे शिबिर केलं आणि घटस्फोटाचा विचारच रद्द करून पुढे अतिशय सुखी संसार केलेली किती तरी जोडपी आहेत. बायकोने केस दाखल करून नवर्‍याला काही दिवस तुरुंगात धाडला होता, नवरा बायकोला रोज मारहाण करतो - अशा अत्यंत टोकाच्या अवस्थेत असलेली जोडपीदेखील शिबिरादरम्यान हातात हात घेऊन, एकमेकांमध्ये हरवून जात प्रेमाने जवळ आलेली आहेत.
 
 
‘हा माझ्यावर प्रेमच करत नाही आणि हिला माझी कदरच नाही’ - अशा तक्रारी घेऊन आले आणि जाताना ‘मला अजिबात कल्पना नव्हती की, माझ्या जोडीदाराने माझं जीवन इतकं समृद्ध केलं आहे!’ अशा प्रेम आणि कृतज्ञतेने भारावलेल्या अवस्थेत परत गेले - हा या शिबिराचा सार्वत्रिक अनुभव आहे.
 
 
अर्थात - चार दिवसांच्या कार्यशाळेमुळे जीवन कायमचं बदलत नसतं. जादू दिसताना क्षणार्धात काही तरी विलक्षण झाल्यासारखं वाटतं; पण त्यामागे दीर्घ प्रयत्न असतात, सराव असतो. जादू घडण्याची प्रक्रिया पायरीपायरीने घडत असते. ती पाळली गेली की जादू निर्माण होते.
 
 
‘मॅजिक ऑफ मॅरेज’ आपल्याला हीच प्रक्रिया शिकवतं, आपल्याला प्रात्यक्षिक दाखवतं, आपल्याकडून करूनही घेतं.
 
ती जादू टिकवून ठेवणं - हे आपलं काम असतं. ते कसं करायचं तेही आपल्याला सांगितलं, शिकवलं जातंच! आपण फक्त ती प्रोसेस कटाक्षाने पाळायची - बस इतकंच!