‘सुदर्शन’च्या शाश्वत शुभारंभानेच दिली ‘अक्षय’ हमी...

विवेक मराठी    31-May-2024
Total Views |
 
@धनंजय कुलकर्णी
 9822290958

Sudarshan Saur Shakti
सौर ऊर्जा ही अक्षय आहे. त्याचा प्रत्यय आता जरी सर्वांना येत असला, तरी आम्ही याविषयी 1985 पासून जनजागृती करायला सुरुवात केली होती. घरोघरी फिरलो... पर्यावरण जागृती केली अन् हे करत करत मग ‘सुदर्शन’चे रोपटे लावले, जे आज अक्षय स्वरूपात लाखो-करोडोंच्या घरात गेले आहे. ही भावना आहे सुदर्शन सौरची मुहूर्तमेढ रोवणारे व सबंध हिंदुस्थानात हा ब्रँड पोहोचवणारे संजयअप्पा बारगजे यांची.
  
सुदर्शन स्प्रिंग्ज’ नावाने छत्रपती संभाजीनगर येथे आधी कंपनी होतीच. त्याला वाढवत व पर्यावरणविषयक जागृती करत आम्ही अर्थात माझे पार्टनर श्रीधरराव जिंतूरकर यांनी ‘सुदर्शन सौर’ सुरू केली. 1989 साली माझ्या मुलाच्या- सुदर्शनच्या नावाने ही फॅक्टरी सुरू केली तेव्हा आज जेवढी मोठी झाली आहे तेवढी मोठी होईल, हा विचारच केला नव्हता, असेही संजय बारगजे म्हणाले.
 
 
Sudarshan Saur Shakti
 ‘सुदर्शन सौर’ची मुहूर्तमेढ रोवणारे बारगजे
 
वास्तविक आम्ही सुदर्शन सौर हे सोलर वॉटर हीटर्सचे डिझायनर आणि निर्माते घरोघरी प्रचार करते झालो. वीज, कृत्रिम इंधन, मानवनिर्मित इंधन यांना कुठे तरी मर्यादा येणार आहेत, त्यांचे दर वाढणार आहेत, हे नागरिकांच्या गळी उतरवणे त्या काळी फारच कठीण जात होते. ‘पाहू’, ‘चलता है...’, ‘तुम्ही हे काय करू लागले’ अशी उत्तरे आम्हाला त्या काळी मिळत होती; पण आज त्यातील बरेच जण आम्हाला आमच्या कार्यासाठी व निर्मितीबाबत कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात ना तेव्हा आम्ही कृतकृत्य होतो. एवढ्या वर्षांची मेहनत फळाला आली. अहो, जेव्हा हा व्यवसाय सुरू केला ना, तेव्हा तुम्हाला सांगतो, अक्षरश: एक वर्षात केवळ चार सोलर युनिट विकले गेले होते; पण आम्ही दोघे कुठेही डगमगलो नाही, चिकाटी सोडली नाही, काम करत राहिलो. आधीच्या कंपनीतून आलेला अनुभव यात कामी आला. त्या काळी आजकाल जसे इनव्हेस्टर मिळतात तसे मिळायचे नाहीत. टर्नओव्हर वगैरे अतिशय व्यावहारिकपणाही नव्हता. आम्ही काही हजार रुपयांची गुंतवणूक करत हा व्यवसाय सुरू केला. आम्ही सुदर्शन सौर हा अक्षय ऊर्जा क्षेत्रातील देशभरातला पहिला प्रकल्प उभारला. बरोबर 10 वर्षांनी आम्हाला ‘बेस्ट डिकेड कंपनी’ हा अचीव्हमेंट अ‍ॅवॉर्ड मिळाला. एकच मिशन घेऊन एकाच प्रकल्पात सातत्य ठेवणे, यात वेगवेगळे प्रयोग करत राहणे आणि त्यातून सर्जनशील व्यक्ती मिळत राहणे, ही आमच्या दृष्टीने मोठी बाब ठरली. त्या काळी मेडा, केंद्र सरकारचे अधिकारी, सुधीर गोयल, एन. श्रीनिवासन अशी माणसं भेटत गेली. आम्ही आमच्या पर्यावरण जागृती मोहिमेत यशस्वी होत गेलो.
 
 
Sudarshan Saur Shakti
 
कंपनीला त्या काळी अनुदानही मिळते हे आमच्या गावीही नव्हते; पण गोयल श्रीनिवासन अशा लोकांनी विश्वास दिला. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा झाला. हळूहळू कंपनी बाळसं धरत होती, युवावस्थेत येत होती. यातूनच याचे महत्त्व हिंदुस्थानात पटू लागले आणि कंपनी मोठी झाली, असे संजयअप्पा बारगजे म्हणाले. आज कंपनीचा टर्नओव्हर कोटींच्या घरात आहे, हे सांगताना अप्पा म्हणाले, जिंतूरकरांची मुलगी देवयानी, आमचा मुलगा सुदर्शन, या दोघांच्या सोबत असलेली यंग डायनॅमिक टीम आज यात वेगवेगळे आणि मोठे प्रयोग करत आहे. ग्रीसला फियाडो कंपनीशी करार करत तेथे सोलर रूम हीटर, सोलरवरील विविध उपकरणांची निर्मिती करणार आहे. सोलर दिवे व सोलर बॅटरीपासून अनेक उपकरणे देवयानी आणि आमच्या टीमने केली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. सुदर्शन सौर, भारतीय सोलर वॉटर हीटर ईटीसी मार्केटमध्ये ‘ग्लास लायनिंग इनॅमल कोटेड‘ टाक्या तयार करणार्‍यांमध्येही ही आमची पहिली कंपनी असल्याचे सांगताना बारगजे यांच्या स्वरात अभिमान होता.

Sudarshan Saur Shakti
 
आम्ही आमच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने उद्योगात नाव निर्माण केले आहे. भारतीय सोलर वॉटर हीटर मार्केटमध्ये इनॅमल-लेपित टाक्या सादर करणार्‍या आम्ही पहिल्या कंपन्यांपैकी एक होतो. आम्ही सुदर्शन सौर येथे, उत्तम दर्जाची उत्पादने आणि विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहिल्यानेच आमची भरभराट झाली.
Sudarshan Saur Shakti 
बारगजे म्हणाले, आमच्या कंपनीला भारत सरकारकडून ‘सर्वोच्च विक्री’ आणि ‘सर्वोत्तम सेवा नेटवर्क’साठी पुरस्कार मिळाले आहेत. आमच्या संपूर्ण भारतातील 350 हून अधिक डीलर्सच्या विस्तृत नेटवर्कने आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली. हे नेटवर्क काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आहे. आम्ही सौर ऊर्जा, प्रकाश, उष्मा पंप आणि पाण्याचे पंप यांसारखे सौर ऊर्जा प्रदान करतो. आम्ही ISO 9001:2015, ISO 14001:2015 आणि CARE SP-1A प्रमाणित आहोत म्हणूनच आम्ही घरगुती वापरकर्ते आणि आंतरराष्ट्रीय उत्पादक, व्यापारी आणि असेंबलर यांना कस्टम OEM सोलर वॉटर हीटर्सदेखील पुरवत असतो, असेही अप्पा बारगजे म्हणाले. या उद्योग उभारणीत अर्थात माझ्यासह संजय श्रीधरराव जिंतूरकर, महेंद्र प्रल्हादराव बारगजे, संगीता महेंद्र बारगजे आणि अंजली संजय जिंतूरकर हे सध्याचे मंडळ सदस्य आणि संचालक आहेत. आम्ही यानंतर देवयानी आणि सुदर्शन यांच्या खांद्यावर आता विविध कंपन्यांचे प्रोजेक्ट्स दिले आहेत. आमचा तरुणांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांना त्यांच्या कृतिशील उपक्रमांना वाव देत असतो, कारण आम्ही कंपनी स्थापन करताना अक्षय ऊर्जा ही मोठी ऊर्जा मानून एक दृष्टी ठेवली. ते पुढे म्हणाले, पृथ्वीमातेला मदत करण्यासाठी शाश्वत स्रोत म्हणून सौर ऊर्जेच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करणे ही दृष्टी आजपर्यंत ठेवली आहे.