भाशन

विवेक मराठी    09-May-2024   
Total Views |

 

 सुप्रीचा बाप कन्फ्यूज झाल्ता.. म्या पक्ष काहाडलाय का नाटक कंपणी ह्ये त्येला समजंना झाल्तं.. भाशन आटवत नसल्याणं रडण्याचं नाटक करूण पब्लिकची साहाणुभूती मिळवूण र्होयत्या गप म्हागं जाऊण बसला.. हिकडं संज्याणं सोशल मीडियावाल्याला मोबाइल लावला आनिदादा भावुक जाले..’ आशी न्यूज सोडाय सांगिटली..
 

vivek
 
 
अर्कचित्र - अमोघ वझे

सुप्रीच्या घरात यकदम उत्साहाचं वातावरन हुतं.. सुप्रीचा बाप कड्डक फांडरे इस्तरीवाले कपडे घालूण पडवीत कवाचा तय्यार हून बसल्याला.. सु्प्री, सुप्रीची मम्मी आन् इतर बाया ठेवनीतल्या साड्या न्येसून, नट्टापट्टा करूण आर्द्या तासाणं भाईर आल्या तवर सुप्रीच्या बापाबरबर र्होयत्याचा बाप, संज्या, योग्या आनि धा-पंदरा पंटर आशे सम्देधी गावटी चानक्य मल्टिफर्फज ष्टेडेमकडं निगायच्या तय्यारीतच हुते.. भराभरा गाड्या भरूण गोतावळा चाल्ल्याला र्होयत्याचं भाशन आयकाया.. र्होयत्या म्हंजी सुप्रीच्या बापाचा जीव की प्रान.. घरात तं यांव करीण त्यांव करीण आशी भाशा वापरायचा त्यामुळं र्होयत्या भाश्नात सुप्रीच्या बाजूनं बोलूण आपोझिशनची हवा कशी टाइट करतू त्ये बगाया सम्दी तमाश्याला चाल्ल्यावानी चाल्ल्याली.. जीपड्यात बसूण सुप्रीची टकळी कंटिन्यू चाल्ल्याली.. ‘माय.. र्होयत्या लै गुनाचाय बै.. जस्सं त्येला सांगिटलंय णा की तुला भाशन करावं लागतंय तस्सं आरश्यासमूर हुबा र्हाऊन हातवारे करत भाश्नाची प्र्याक्टिस काय करतूय, माला यून यून भाशन काय म्हनून दाकिवतूय, यकांदा मुद्दा चुकला का पुन्ना पयल्यापास्नं काय भाशन म्हनतूय, आत्यायेची हानू का त्येची ठासूम्हनून कवाबी यून यून नव्या नव्या आयडीया सांगायचा बै..! परवा तं रातीचे दोन वाजल्याले आसतानी यून म्हन्लाआत्या, त्येजमलेल्या माज्या तमामने सुर्वात करू का भाश्नाची..? यकदम धासू..!?’ बया.. उडालीच झोप माजी..! डेडिकेशन झबरदस्त हाय आपल्या र्होयत्याचं..’ बायकांच्या आश्या बोलन्यानं डायवरश्येजारी बसल्याल्या संज्याला ष्टार्टर बसला.. ‘आपल्या र्होईत दादाच्या येकेक करामती म्हंजी..’ त्येला मदीच तोडत सुप्रीचा बाप हातानंचपासम्हन्ला.. संज्याला हिरमुसायलाबी टाइम द्येता डायवरणंधी गावटी चानक्य मल्टिफर्फज ष्टेडेममदी गाडी घुसवली..
 

सुप्री आन् तिचा बाप आल्याला समजताच ष्टेडेमवं पळापळ जाली.. सॉगताला तुतारी वाजवनारा मानूस ऐन टायमाला मुतारीत गेल्याणं संज्याणं जाऊन तुतारी उच्यालली.. कोनत्या भोकात फुकल्यावं कोनत्या भोकातनं आवाज येतू हे संज्याला समजस्तवर सुप्री आन् तिचा बाप धरूण आनल्याल्या मानसांची गर्दी कापत पयल्या रांगतल्या सोफ्यावं जाऊन बसल्ये.. समद्या बायका बसल्यावं सुप्रीचा बाप सोफ्यावं टेकाया आनि संज्याच्या तुतारीतनंफ्र्यांआसा आवाज यायला येकच टाइम जाला.. पब्लिक फुटल्याचं पाहूण सुप्रींणं संज्याकं येक लुक टाकला तसा संज्या गुमान तुतारी सोडून ष्टेजच्या म्हागं पळाला..

 

सॉगताची 25-30 भाश्नं जाल्यावं र्होयत्या आला आनि माइकसमूर हुबा र्हाऊण त्येणं सुप्रीच्या बापाला उभ्या उभ्या णमस्कार घाटला.. ‘आमचे आदर्शआशी सुर्वात करूण 60-70 लोकांची लिहून आनल्याली नावं वाचता वाचता र्होयत्याला घाम फुटला.. त्या नादात र्होयत्या दीड म्हयना पाठ क्येल्यालं भाशनच इसारला.. परीक्षेच्या टायमाला मारत्यात तस्सा रट्टा मारल्याला.. आईन टायमाला पयलं वाक्यच इसारल्याणं फुडचं सम्दं सपाट जाल्तं.. तरीबी सुप्रीच्या बापाच्या भाश्नाची नक्कल करता करता लक्षामदी र्हायल्येलेसहकार, कुस्ती संगट्ना, लातूर, वांगी, पैलवाण, मटनआशे शबूद प्येरत त्येणं वाक्य टाकनं चालू ठिवल्यालं.. पन प्याट्रूल संपल्याली गाडी टाकीत फूक मारू मारू चालवूण र्होयत्याबी थकला.. घरच्यांची निराश त्वांडं त्येला दिसाय लागली.. इज्जत जाईन ती येगळी, वर सुप्रीचा बाप घरी न्येऊन समजनारी बडबड करंन ती येगळी हा इच्यार करूण त्यो घायकुतीला आला.. सेवटी आपल्या आत्याचा हुकमी डाव टाकायचं त्येला यकदम आटवलं.. त्येणं बोलता बोलता म्होट्टा पॉझ घेटला.. आता र्होयत्या फुडं काय बोलनार याचा इच्यार सम्दी करत आस्तानीच र्होयत्याणं येकदम चिरकट आवाजातझायेब...’ म्हनत भोकाड पसारलं.. पब्लिक र्होयत्याकं बगायचं सोडून सुप्रीच्या बापाकं बगाय लागले.. तितं सम्दं आलबेल हाय म्हनल्यावं मंग र्होयत्याकं पाहातात तं र्होयत्या डुळ्यातनं पानी काहाडता रडत हुता.. हातानं डुळे पुसत पान्याची बाटली पिन्याची ॅक्टिंग तं यवडी झब्बरदस्त क्येली का येका पिच्चरचा हिर्रो बनू शकतो आसं त्येला सोत्तालाच वाटून ग्येलं.. र्होयत्याची करामत बगूण सुप्रीला घईवरूण आलं आनि डुळ्यातनं पानी काडलं आस्तं तं आजून रिअल वाटलं आस्तं आसंबी वाटून ग्येलं.. सुप्रीचा बाप कन्फ्यूज झाल्ता.. म्या पक्ष काहाडलाय का नाटक कंपणी ह्ये त्येला समजंना झाल्तं.. भाशन आटवत नसल्याणं रडण्याचं नाटक करूण पब्लिकची साहाणुभूती मिळवूण र्होयत्या गप म्हागं जाऊण बसला.. हिकडं संज्याणं सोशल मीडियावाल्याला मोबाइल लावला आनिदादा भावुक जाले..’ आशी न्यूज सोडाय सांगिटली..
 

ह्ये सम्दं मागच्या पारावं शांतपने बसून बगनारं येक गावटी घालीब म्हन्लं, ‘रो रो के बुरा हाल है तेरा घालीब, ॅक्टींगमें कुछ बात रही पैरोतले जमीं..!’ र्होयत्या डुळे पुसत र्हायला.. पब्लिक हासत र्हायली..!

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.