पितांबरीची ‘सुबहर द्रवरुप खते’ पीक उत्पादनवाढीचा भागीदार

विवेक मराठी    25-Jun-2024   
Total Views |
pitambari
पितांबरी सुबहर द्रवरुप खतांचा महाराष्ट्रातील सर्वच मुख्य पिकांवर वापर झाला आहे. यामुळे पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. परिणामी, पितांबरीच्या द्रवरुप खतांची मागणी वाढत आहे. ही यशस्विता लक्षात घेता येत्या काळात खतांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये, मिश्र द्रवरुप खते, पीकनिहाय (Crop Special) खते बाजारात आणण्याचा पितांबरीचा मानस आहे.
नमस्कार शेतकरी बंधूनो,
 
यंदा देशात दमदार पाऊस पडणार असल्याचे भाकीत आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु आहे. हा लेख तुमच्या वाचनात येईपर्यंत राज्याच्या काही भागात खरीप पेरणीला सुरूवातही झाली असेल. यंदाचा हंगाम अधिकाधिक उत्पादन देणारा ठरो, यासाठी सदिच्छा. हा खरीप हंगाम केंद्रवर्ती ठेवून प्रस्तुत विषय तुमच्यासमोर सादर करत आहे. दिवसेंदिवस शेतीचा उत्पादनखर्च वाढत आहे. बेसुमार पारंपारिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. परिणामी, पिकांची उत्पादकता कमी झाली. या खतांव्यतिरिक्त दुसरा पर्याय शेतकर्‍यांना उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना याच खतांचा वापर करावा लागत आहे. म्हणूनच या खतांचा वापर कमी करून शास्त्रोक्त व अद्यावत द्रवरूप खतांचा सहभाग पीक उत्पादनात घेणे आवश्यक आहे. उत्तम पर्यावरणपूरक कृषी निविष्ठा शेतकर्‍यांना उपलब्ध होण्यासाठी ’पितांबरी अ‍ॅग्रिकेअर डिव्हिजन’ सतत प्रयत्नशील आहे. पितांबरीचे ’गोमय सेंद्रिय खत’ व नव्यानेच उपलब्ध केलेली ’पितांबरी नीम पावडर’ यांना शेतकर्‍यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 
याखेरीज पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी पितांबरीने ’सुबहर द्रवरुप खते’ बाजारात आणली आहेत. यामध्ये ’सुबहर UAN’ (32:00:00), ’सुबहर APP’ (10:34:00), ’सुबहर PPP’ (00:24:24) आणि ’सुबहर CN’ या खतांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपारिक रासायनिक खतांच्या तुलनेत ही खते जमिनीत जास्त काळासाठी क्रियाशील राहतात व त्यातील अन्नद्रव्यांचा अपव्यय होत नाही. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे ही खते जमिनीत क्षार निर्माण करत नाही. त्यामुळे जमिनीची हानी होत नाही. स्थायू (रासायनिक) खतांच्या तुलनेत या सुबहर द्रवरुप खतांना साठवणूक, वाहतूक व वापरासाठीचा खर्चही कमी येतो. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी होतो. युरियाचे उदाहरण घेतल्यास युरियातील नत्र 3 ते 7 दिवसापर्यंतच जमिनीत उपलब्ध असतो. त्यानंतर तो निष्क्रिय होतो. याउलट यु. एन. 32 मधील नत्र हे 25 ते 30 दिवसांपर्यंत पिकासाठी उपलब्ध राहते. यामुळे पिकांना नत्राची कमतरता भासत नाही. त्यासाठी या खतांचे वैशिष्ट्ये समजून घेऊ.
 
पितांबरी सुबहर यु. ए. एन्. 32 (32:00:00)
 
या खताच्या वापराने पिकांना मुबलक प्रमाणात नत्र (नायट्रोजन) उपलब्ध होते. युरिया (16%), अमोनिकल (8%) आणि नायट्रेट (8%) या तिन्ही स्वरुपातील नत्राचा पिकांना एकाच वेळी पुरवठा होतो. युरिया या स्वरुपातील नत्र पिकांना त्वरित उपलब्ध होते, अमोनिकल व नायट्रेट नत्राचा पुरवठा मंद गतीने दीर्घ काळासाठी निरंतर होत रहातो, याचाच परिणाम म्हणून पिकांना त्याच्या आवश्यक अवस्थांमध्ये पूर्ण वेळ नत्र जमिनीतून मिळत राहते. युरिया व इतर खतांच्या तुलनेत नत्राचे बाष्पीभवन व लिचिंग होत नाही व अन्नद्रव्यांचा अपव्यय टळतो. परिणामी हे खत कमी लागते. 45 किलो युरियाच्या बॅगेच्या तुलनेत 1 लिटर यु. ए. एन्. 32 पुरेसे ठरते. हे खत पिकांना ठिबक, फवारणीद्वारे किंवा आळवणीद्वारेही देता येते. तसेच इतर किटकनाशकांसोबत एकत्रित वापरता येते. यामुळे याच्या वापरखर्चातही कपात होते.
 
या खतामध्ये नायट्रोजन इनहिबिटर्स व पिकांसाठी आवश्यक उत्प्रेरकांचे असाधारण मिश्रण आहे. यामुळे त्वरीत पिकांवर परिणाम दिसतात, पिकांना काळोखी येऊन शाखीय वाढ जलद होते व फुटवेही वाढतात.
 
pitambari  
 
सुबहर ए.पी.पी. (10:34:00)
 
हे नत्र (नायट्रोजन) आणि स्फुरद (फॉस्फरस) मिश्रित खत आहे. यामध्ये 10% नत्र, 34% स्फुरद पॉली फॉस्फेट स्वरुपात आहे. पोषक घटक आणि रासायनिक गुणधर्मांमुळे सुबहर ए.पी.पी. ला ’स्टार्टर खत’ म्हणून संबोधले जाते. हे खत पाण्यात पूर्णपणे विरघळत असल्याने पिकांना अन्नद्रव्ये सहज व दीर्घकाळासाठी उपलब्ध होतात. सुबहर ए.पी.पी.च्या वापरामुळे पिकांच्या मुळांचा विकास चांगला होतो. फुलधारणा व फळधारणेस चालना मिळते. प्रकाश संश्लेषण व अन्ननिर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. पिके कणखर व सशक्त बनतात.
 
सुबहर पी.पी.पी. (00:24:24)
 
हे स्फुरद (फॉस्फरस) व पालाश (पोटॅश) युक्त खत आहे. हे खत पिकांच्या फुलधारणा व फळधारणेसाठी अतिशय उपयुक्त आहे. या खतामुळे फुलगळ कमी होऊन फळांचा आकार, वजन व गुणवत्ता सुधारते. हे खत क्लोराईड मुक्त असल्यामुळे इतर खतांप्रमाणे (उदा. म्युरेट ऑफ पोटॅश) जमिनीचे नुकसान होत नाही.
 
सुबहर सी. एन्. (10:00:00:15:0.2 Mg)
 
सुबहर पी.पी.पी. प्रमाणेच हेही खत पिकांच्या उत्पादनवाढीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हे खत कॅल्शिअम नायट्रेट व मॅग्नेशिअम यांचे एकत्रित मिश्रण आहे. कॅल्शिअम हे अन्नद्रव्य पिकाच्या फुलधारणेपासून फळधारणेपर्यंत पिकांसाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावते. मॅग्नेशिअममुळे प्रकाश संश्लेषण व हरितद्रव्य निर्मिती जलद गतीने होते. परिणामी उत्पादनात व त्याची गुणवत्तेत वाढ होते.
 
 
वरील सर्व उत्पादने पितांबरीने 500 पेक्षा अधिक शेतकर्‍यांच्या शेतावर विविध पिकांवर वापरलेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या समाधानानंतरच ही खते बाजारात आणली गेली.
 
 
कल्याण तालुक्यातील कृषीरत्न पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी आपल्या भेंडी व कलिंगड या पिकांवर या द्रवरुप खतांचा वापर केला. खतांच्या वापरामुळे भेंडीच्या फुटव्यात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाल्याचे ते सांगतात तसेच त्यांची किटकनाशके व रोगनाशकांची फवारणी कमी करावी लागली. भेंडीच्या तोड्यांमध्येही वाढ झाल्याचेही त्यांच्या निर्दशनास आले.
गेल्या 15 वर्षापासून कलिंगडाचे उत्पादन घेणारे प्रगतीशील शेतकरी निलेश पाटील (अब्जे, ता.वाडा ) यांनी फक्त पितांबरीची सुबहर द्रवरुप खते व गोमयचा वापर करुन यावर्षी 6 एकरवर कलिंगडाची लागवड केली. या लागवडीमधे दरवर्षीपेक्षा दीड लाख रुपयांचा नफा अधिक झाल्याचे ते सांगतात. यंदाच्या वर्षी झालेली फळधारणा (फ्रुट सेटींग) मागील 15 वर्षात झाली नव्हती हे त्यांनी आवर्जून सांगितले, तसेच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20% ने कलिंगड उत्पादनात वाढ झाली. प्रथमच त्यांचे कलिंगड निर्यात झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही यशस्विता लक्षात घेऊन येत्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्ये, मिश्र द्रवरुप खते पीकनिहाय (Crop Special) खते बाजारात आणण्याचा आमचा मानस आहे. आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात पितांबरीची ’सुबहर द्रवरूप खते’ उपलब्ध होतील. पितांबरीची ही उत्पादने आपल्या पिकांसाठी प्रायोगिक तत्वावर वापरून बघायची असल्यास पितांबरीच्या कृषी तज्ज्ञांकडून संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल.
 
 
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमाकांवर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9820979166, 8383864818, 8779858835
Website: www.pitambari.com

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.