@प्रतिनिधी
शेतीसाठी माती, पाणी आणि वीज हे घटक सर्वात महत्त्वाचे आहेत; पण आजही शेतकर्यांच्या कृषिपंपांना 24 तास वीज उपलब्ध होत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत शासनाकडून शेतकर्यांना सौर कृषी वाहिनी उभारणीसाठी 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते.
शेतीसाठी पाणी आणि वीज हे महत्त्वाचे घटक आहेत; पण राज्यातील शेतकर्यांना आजही कृषी विजेची समस्या भेडसावत आहे. राज्यातील एकूण 29 दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे 45 लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीजपुरवठा करणे आवश्यक असते. या समस्यांवर मात करण्यासाठी ’मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ नावाची एक अभिनव योजना जून 2017 मध्ये सुरू करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने या योजनेची ’मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 (चडघतध 2.0) म्हणून पुनर्रचना केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी पंप देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून सौर कृषिपंपाच्या किमतीच्या 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते. अनुसूचित जातीजमातीच्या लाभार्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते.
राज्यात ’अटल सौर कृषिपंप योजना’ राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लाख पारेषणविरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा 25000 (पंप), दुसरा टप्पा 50000 आणि तिसरा टप्पा 25000 असा असणार आहे. सौर कृषिपंपासोबत दोन डी.सी. एल.ई.डी. बल्ब, मोबाइल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची (बॅटरी लाभार्थ्यांनी घ्यावी.) सुविधा उपलब्ध असणार आहे.
लाभार्थी निवडीची पात्रता (3 व 5 अश्वशक्ती)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्याकडे शाश्वत जलस्रोत असलेली जमीन असणे आवश्यक आहे. असे असेल तर 5 एकरांपर्यंत शेतजमीनधारकास 3 अश्वशक्ती सौर कृषिपंप व 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीनधारकास 5 व 7.5 अश्वशक्ती सौर कृषिपंपाचा लाभ मिळू शकतो. अतिदुर्गम व जनजाती भागातील शेतकर्यांना या योजनेत प्राधान्य दिले गेले आहे. महावितरणकडे विद्युतजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
7.5 अश्वशक्ती सौर कृषिपंपासाठी निकष
शेतकर्याकडे विहीर किंवा कूपनलिका असणे अनिवार्य आहे. अद्ययावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित आणि अंशतः शोषित गावांमधील विहीर व कूपनलिकांसाठी नवीन सौर कृषिपंप दिले जाणार नाही. अद्ययावत भूजल अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसा स्थिती 60 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीर व कूपनलिकांमध्ये नवीन सौर कृषिपंप देण्यास पात्र आहेत. खडक क्षेत्रात खोदल्या जाणार्या विंधन विहिरी या शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे या ठिकाणी नवीन सौर पंप दिले जाणार नाही.
सौर कृषिपंपाचे फायदे
या योजनेमुळे शेतकर्यांना दिवसा विनाव्यत्यय विजेच्या पुरवठ्याची उपलब्धता होते. वीज बिलापासून मुक्तता, डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च, पर्यावरणपूरक परिचलन, शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथक्करण करण्यास मदत होते. याशिवाय औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीजग्राहकांवरील क्लास सबसिडीचा बोजा कमी करण्यास या योजनेचा फायदा होतो.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकर्यांनी या योजनेमध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्जदाराचा सातबारा व इतर शेतीची कागदपत्रे, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हीींिीं://ुुु.ारहरवळीलेा.ळप/ीेश्ररी-ाीर्ज्ञीूं/ळपवशुमाी.हिि आणि हीींिीं://ुुु.ारहरवळीलेा.ळप/ीेश्ररी/ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत कोटेशनचा भरणा आपल्या भागातील जवळच्या महावितरण केंद्रावरदेखील करू शकता. त्यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महावितरण केंद्रास अवश्य भेट द्यावी.
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये सौर ऊर्जा ही शाश्वत आणि निरंतर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. त्यामुळे सौर कृषिपंपामुळे शेतकर्यांच्या अनेक समस्यांना पूर्णविराम मिळण्यास मदत होणार आहे.
माहितीस्रोत: इंटरनेट