संरक्षण क्षेत्राची नवी भरारी

05 Aug 2024 17:27:46
काशीनाथ देवधर
9881253425
गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने हाती घेतलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’चा प्रभाव वाढत आता आपण जवळजवळ 90% स्वदेशी, स्वयंपूर्ण होत आहोत व एक शस्त्रास्त्रे आयात करणारा देश, जो आयात करण्यामध्ये जगात क्रमांक एकवर होता, तो स्वयंपूर्ण बनत असतानाच वेगाने निर्यातक्षम होत आहे, ही मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे. त्यातच भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानातही मोठी झेप केवळ क्षेपणास्त्रेच नाही, तर स्वतःचे जवळजवळ सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे अथवा युद्धासाठी अत्यंत आवश्यक स्वदेशी तंत्रज्ञान व उत्पादने आपली स्वतःची आहेत. अंतरिक्ष मोहिमांबरोबरच भारत हा अण्वस्त्रधारी देश असून आता जगात महाशक्तींमध्ये गणला जातो.
 
vivek
 
 
भारताने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसर्‍या टप्प्याची (Ballistic Missile Defence System Phase-2 (BMD-Ph2))  प्रत्यक्ष फायरिंग चाचणी यशस्वी केली. ओडिशाच्या बालेश्वरजवळील किनारपट्टीजवळच्या ITR येथील प्रक्षेपण स्थळ क्र. 3 वरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. शत्रुलक्ष्याची नक्कल म्हणून ITR बेटावरून 24 जुलै 2024 ला सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी एक पृथ्वी क्षेपणास्त्र (शत्रुलक्ष्य) डागण्यात आले. अवघ्या चारच मिनिटांत बालासोर (बालेश्वर) च्या चांदिपूर येथील प्रक्षेपण स्थळ क्रमांक 3 वरून शत्रुलक्ष्य नष्ट करण्यासाठी BMD-Ph2 हे क्षेपणास्त्र डागले गेले. चाचणी करण्यापूर्वी ठरवलेली सगळी उद्दिष्टे 100% पूर्ण करण्यात यशस्वी झाले आणि या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र फेज-2 ची यशस्वी चाचणी करून संरक्षण क्षेत्रात भारत शक्तिशाली आहे हे सर्व जगाला दाखवून दिले. 5000 किमी अंतरावरून येणार्‍या शत्रुलक्ष्य बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हवेतल्या हवेतच नष्ट करून शत्रूपासून बचाव करणारी स्वदेशी बनावटीची तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाची युद्धप्रणाली विकसित करून आत्मनिर्भरतेकडे अजून एक भक्कम पाऊल टाकण्यात DRDO यशस्वी झाले आहे. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संपूर्ण भारतीयांच्या वतीने DRDO चे अभिनंदन केले. डामरा या बेटावरून शत्रुलक्ष्य डागण्यात येताच बालेश्वरच्या समुद्रकिनारी असणारी ITR येथील प्रक्षेपक स्थळ-3 येथील जमिनी व समुद्रावरील लावलेल्या यंत्रणांद्वारे कानोसा घेऊन पूर्ण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा कार्यरत झाली व शत्रुलक्ष्याचा मागोवा घेऊ लागली. याच यंत्रणेतील हवाईरक्षण करणारे दुसर्‍या टप्प्यातील क्षेपणास्त्र ((BMD-Ph2) ) हे छेद-क्षेपणास्त्र (Interceptor) डागले गेले आणि सटीकतेने, अचूकपणे शत्रुलक्ष्य हवेतच नष्ट करून भारताच्या क्षमता पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केल्या. एका अर्थाने जशी इस्रायलची आयर्नडोम यंत्रणा सर्वश्रुत आहे तशीच ही आपली सुरक्षा कवच यंत्रणा. यामध्ये गेल्या दहा वर्षांत भारताने खूप मोठे यश मिळवले असून या सुरक्षा कवच यंत्रणेमध्ये SRSAM- कमी पल्ला क्षेपणास्त्र, MRSAM- मध्यम पल्ला क्षेपणास्त्र, LRSAM- लांब पल्ला क्षेपणास्त्र, तसेच QRSAM- जलद प्रतिक्रिया देऊन तत्काळ पलटवार करणारे क्षेपणास्त्र, त्यातच आकाश, ब्राह्मोससारखी घातक व विश्वासार्ह क्षेपणास्त्रे ज्यायोगे भारतावर येणार्‍या कोणत्याही व कसल्याही हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन शत्रू निष्प्रभ व पराभूत करण्याची क्षमता या विविध क्षेपणास्त्रांच्या योग्य व तारतम्याने केलेल्या उपयोगामुळे भारत हा सुरक्षित ठेवणे शक्य आहे. सुरक्षा कवच या बहुस्तरीय संरक्षण रचनेमध्ये महत्त्वाची भर ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या विकसनामुळे पडून मजबुती आली आहे. याची सुरुवात PAD (Prithvi Air Defence) म्हणजेच प्रद्युम्न छेद-क्षेपणास्त्र हे पृथ्वी वातावरण कक्षेबाहेरच शत्रुलक्ष्य भेदून टाकते, भूपृष्ठापासून 50-120 किमी उंचीवरच शत्रूचे MRBM (मध्यम पल्ला) किंवा 1RBM (मध्यम व दूर पल्ल्याच्या दरम्यान पल्ला असणारे ’शत्रुलक्ष्य’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सहजतेने भेदण्याची क्षमता म्हणजे आवाजाच्या पाचपट (5 MACH) वेगाने असणारे शत्रुलक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. याला Exo-atmospheric AD missile म्हणतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिला टप्पा (stage) घनरूप इंधन व दुसरा टप्पा द्रवरूप इंधन वापरून पृथ्वी क्षेपणास्त्र यंत्रणा आधारित असून दिशा बदलासाठी बाजूस असलेले छोटे छोटे अग्निबाण (Thrusters) च्या साहाय्याने अचूकता साधली जाते. स्वदेशी निर्देशन प्रणालीमध्ये रडार व INS (Inertial Navigation System) याचा उपयोग करून 3000 किमीवरून येणारे लक्ष्यवेध घेतले जाते व अचूक लक्ष्यभेद होतो. प्रद्युम्न क्षेपणास्त्रास जी रडार यंत्रणा आहे ती एका वेळेस 150 शत्रुलक्ष्यांवर तसेच सर्वात धोकादायकावर नजर ठेवून निर्णय घेते. याच्या अनेक यशस्वी चाचण्या होऊन ते सेवेत दाखल झालेले आहे.
 
 
याच मालेतील दुसरे क्षेपणास्त्र AAD अर्थात अश्विन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र म्हणजेच प्रगत भूपृष्ठापासून हवाई संरक्षण क्षेपणास्त्र हे भूपृष्ठापासून 40 किमीच्या आतील उंचीवर शत्रुलक्ष्य भेदते. याला Endo-atmospheric AD Missile म्हणतात. याची निर्देशन प्रणालीसुद्धा ’प्रद्युुम्न’प्रमाणेच असते. याच्याही अनेक यशस्वी चाचण्या होऊन व प्रत्येक वेळी सुधारणा करून भारताच्या सुरक्षा कवच या यंत्रणेत महत्त्वाचे स्थान आहे.
 
 
या क्षेपणास्त्र विकसनांत गेल्या दहा वर्षांत खूप वेग पकडला आणि आपल्याच प्रणालीमध्ये जास्तीत जास्त किंबहुना स्वदेशी तंत्रज्ञान विकास करून भारतीय सुरक्षा कवच जास्त मजबूत होत आहे. त्याचीच पुढची कडी म्हणजे PAD-प्रद्युम्नची व AAD-अश्विनची जागा झऊत ने घेतली आहे व BMD फेज-1 पूर्ण केली. त्यायोगे भूपृष्ठापासून 150 ते 180 किमी उंचीवरील शत्रुलक्ष्य मजबुतीने व अचूकतेने भेदणे शक्य आहे. BMD-Ph2 पर्यंत भारताचे सुरक्षा कवच सुसज्ज होतेच. त्यातच नवीन चाचणीने, BMP-Ph2 क्षेपणास्त्र प्रणालीने भर पडली. BMD सुरुवातीस AD-1 छेद-क्षेपणास्त्र विकास करून निम्न बाह्य वातावरण कक्षेमधील, तसेच वातावरणीय कक्षेमधील (Endo-atmospheric) LRBM शत्रुलक्ष्य अचूक छेदणे शक्य झाले व त्याच्या यशस्वी चाचण्याही केल्या आहेत.
 
 
AD-2 छेद-क्षेपणास्त्र (Interceptor) चा 5000 किमी पल्ला ठेवला असून IRBM आणि ICBM नष्ट करण्याची क्षमता आहे. शत्रुलक्ष्य हे वातावरण कक्षेमध्ये असू देत किंवा वातावरण कक्षेबाह्य निम्न स्तरांतील (low-exo atmospheric) शत्रुलक्ष्य अचूक भेदणे शक्य आहे.
 
 
PDV, PDV-2, AD-1, AD-2 या सर्व छेद-क्षेपणास्त्रासाठी प्रामुख्याने उच्च प्रतीचे घन इंधन स्वदेशी तंत्रज्ञान निर्मित वापरले आहे. तसेच अतिशय यशस्वी ठरलेली आणि विश्वसनीय स्वदेशी निर्देशन प्रणालीचा उपयोग केला आहे.
 
BMD-Ph2  छेद-क्षेपणास्त्राची संपूर्णपणे यशस्वी चाचणी नुकतीच 24 जुलै 2024 या दिवशी बालेश्वर येथे घेतली ज्यामध्ये संपूर्ण नेटवर्ककेंद्रित युद्धअस्त्र प्रणाली सिद्ध असल्याची खात्री झाली. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार या छेद-क्षेपणास्त्राची सफल चाचणी ओडिशाच्या समुद्रकिनारी चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (एकात्मिक परीक्षण सरावभूमी) येथे केली. BMD-Ph2 साठी असणारी यंत्रणांचे जाळे ज्यामध्ये जमिनीबरोबरच समुद्रातील विविध जहाजांवर सेंसर लावले होते त्याच्याद्वारा शत्रुलक्ष्य-नकली - Detect, Recogniseआणि Identify होते आहे व यंत्रणा योग्य काम करत आहेत हे तपासले गेले. त्याद्वारा दिल्या गेलेल्या माहितीआधारे त्याचे विश्लेषण करून स्वयंनिर्णय घेऊन छेद-क्षेपणास्त्रास आदेश देणे, आदेशाप्रमाणे छेद-क्षेपणास्त्र डागले जाणे आणि त्याचीनिर्देशन व नियंत्रण प्रणालीने योग्य मार्ग दिशा व वेग घेऊन अचूकतेने वाटचाल करून शत्रुलक्ष्य भेदून नष्ट करणे अशी सर्व क्रियाकलाप योग्य वेळी योग्य पद्धतीने केल्याची या चाचणीमुळे खात्री झाली आणि सर्व भारतीयांची छाती गर्वाने फुलून आली, त्याबद्दल सर्वांनी DRDO चे अभिनंदन केले.
 
 
गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने हाती घेतलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’चा प्रभाव वाढत आता आपण जवळजवळ 90% स्वदेशी, स्वयंपूर्ण होत आहोत व एक शस्त्रास्त्रे आयात करणारा देश, जो आयात करण्यामध्ये जगात क्रमांक एकवर होता, तो स्वयंपूर्ण बनत असतानाच वेगाने निर्यातक्षम होत आहे, ही मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे. त्यातच भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानातही मोठी झेप केवळ क्षेपणास्त्रेच नाही, तर स्वतःचे जवळजवळ सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे अथवा युद्धासाठी अत्यंत आवश्यक स्वदेशी जहाजे, विमानवाहू जहाज युद्धनौका, तेजस लढाऊ विमान, प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर, अरिहंत वर्गीय पाणबुड्या, अर्जुन रणगाडे, पिनाक अग्निबाण प्रणाली, ATAGS मैदानी-डोंगरी तोफा ही सर्व स्वदेशी तंत्रज्ञान व उत्पादने आपली स्वतःची आहेत. अंतरिक्ष मोहिमांबरोबरच भारत हा अण्वस्त्रधारी देश असून आता जगात महाशक्तींमध्ये गणला जातो. म्हणूनच पंतप्रधान म्हणतात, “अब हम (भारत) न आँख झुकाकर बात करेंगे। न हम आँख दिखाकर बात करेंगे। हम आँख से आँख मिलाकर बात करेंगे।’
 
 
कारण आँख दिखाना हमारी संस्कृति नहीं है। ‘जीयो और जीने दो’, ही आमची संस्कृती. BMD-Ph2 या छेद-क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत नक्कीच ताकदवान व बळकट झाला. प्रामुख्याने चीनला भारताशी युद्ध करताना दहादा विचार करावा लागेल, की भारताशी युद्ध करावे की नाही. अशीच प्रगती भारतमातेस विश्वगुरू बनवेल यात तिळमात्र शंका नाही.
Powered By Sangraha 9.0