राजकारणात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ही सामूहिक महत्त्वाकांक्षा बनावी लागते. असे झाले तरच राजकारणात यश मिळते. महत्त्वाकांक्षा चांगली असते; परंतु ती आपल्यावर स्वार होऊ देता कामा नये. महत्त्वाकांक्षेवर आपल्याला स्वार होता आले पाहिजे. आपल्याला न पेलवणारी महत्त्वाकांक्षा घेऊन वावरणार्यांची राजकारणाच्या इतिहासात अनेक उदाहरणे आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाकांक्षा असावीच लागते. महत्त्वाकांक्षा नसेल तर, जीवनात प्रगती होणे फार अवघड आहे. ओझी वाहणे एवढेच काम नशिबी येते. शिक्षण नसेल तर डोक्यावर किंवा पाठीवर ओझी वाहावी लागतात आणि शिक्षण असेल तर, कार्यालयातील कामाची ओझी वाहावी लागतात. दोन्ही ठिकाणी ओझ्याच्या प्रकारात फरक असतो; पण ‘ओझी’ या संकल्पनेत फरक नसतो.
औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा असेल तर, उराशी एक स्वप्न बाळगावे लागते आणि आपले जीवन समर्पित करून त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अपार कष्ट करावे लागतात. नौरोजी टाटा, वालचंद हिराचंद, अण्णासाहेब किर्लोस्कर, बिर्ला आणि आताच्या काळातील धीरुभाई अंबानी असे अनेक घराण्यांचे औद्योगिक संस्थापक दूरदृष्टीचे आणि महत्त्वाकांक्षी होते. त्यांनी आपल्या उराशी एक स्वप्न बाळगले होते. सगळेच जण टाटा, बिर्ला, अंबानी होणे शक्य नसते; परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर, औद्योगिक महत्त्वाकांक्षेने झपाटलेले उद्योग करणारे शेकड्याने सापडतील. कॅमलिनचे दांडेकर, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, बांधकाम क्षेत्रातील हावरे बंधू अशी असंख्य नावे घेता येतात.
उद्योग क्षेत्राप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही डोळ्यांपुढे महत्त्वाकांक्षा ठेवून काम करावे लागते. राजकीय क्षेत्राचा विचार करता हे उद्योग क्षेत्रापेक्षा अत्यंत वेगळे क्षेत्र आहे. या क्षेत्रात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ही सामूहिक महत्त्वाकांक्षा बनावी लागते. असे झाले तरच राजकारणात यश मिळते. महात्मा गांधीजींची महत्त्वाकांक्षा होती देशाला स्वराज्य प्राप्त करून देण्याची. ही महत्त्वाकांक्षा त्यांच्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती समूहाची महत्त्वाकांक्षा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची होती. ती त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा राहिली नाही. ही महत्त्वाकांक्षा सर्व समूहाची झाली आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना जिवाला जीव देणारे सहकारी लाभले.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी जनजागृती केली. अन्यायग्रस्त मराठी माणूस, मराठी तरुण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावला आणि तो कृतिशील झाला. आपले हक्क पदरात पाडून घ्यायचे असतील तर, शिवसैनिकांच्या भाषेत सांगायचे तर, ‘राडा’ केल्याशिवाय काही मिळत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक आणि प्रसंगी दोन हात करणारा शिवसैनिक उभा केला. त्यांची महत्त्वाकांक्षा त्या वेळच्या समस्त मराठी तरुणांची महत्त्वाकांक्षा झाली.
सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते महत्त्वाकांक्षी होते. अध्यक्षपद सोडायलाच तयार नव्हते. एका बैठकीत त्यांना उचलून बाजूच्या बाथरूममध्ये बंद करण्यात आले. सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आणि सोनिया गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सीताराम केसरी हे वाचाळवीर होते. संजय राऊत हे त्यांचे जणू पुत्र म्हणायला हरकत नाही...
नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला आणि 85-86 नंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. मराठीपण आणि हिंदुपण यात तसे काही अंतर नाही. मराठीपण हे हिंदुत्वाचे प्रादेशिक रूप आहे. त्यामुळे विचारधारा बदलली, असे कोणालाच वाटले नाही. शिवसैनिकांनाही असे वाटले की, आपण आता व्यापक झालो आहोत. काळाची ती गरज होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. तेही जबरदस्त महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांची एकमेव महत्त्वाकांक्षा होती की, मला, म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे. त्यांचे परममित्र संजय राऊत यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेला फुलवले आणि अनेक उचापती करून 2019 ला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे उद्धव कधी म्हणाले नाहीत. महत्त्वाकांक्षी असलेला कोणताही राजकारणी असे कधीही म्हणत नाही की, मला मुख्यमंत्रीपद पाहिजे किंवा मला पंतप्रधानपद पाहिजे. तो व्यूहरचना अशी करतो की, जणू काही आपली निवड सहजपणे झाली आहे. ते सांगू लागले की, ‘मी बाळासाहेबांना वचन दिले आहे की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन.’ (मीच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईन.)
ही त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा शिवसेना समूहाची झाली नाही. म्हणून एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले. शिवसेनेची 70 टक्के शक्ती बाहेर राहिल्यामुळे 30 टक्के शक्तीचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत विशेष पडला नाही. लोकसभेत मुसलमानांच्या एकगठ्ठा मतदारांमुळे आणि झोपलेल्या हिंदू मतदारांमुळे त्यांना चांगल्या जागा मिळाल्या. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी दोन-तीन शब्दांत सांगायचे तर, ‘असंगाशी संग केला’. त्यावर विस्तृत लिहिण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ढेकणांच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नासला साधू तैसा।’ ‘असंगाशी संग’ हा उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणाबाहेरच्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम आहे. इंग्रजीत त्याला एक्सेसिव्ह अॅम्बिशन म्हणतात.
अमर सिंह हे मुलायम सिंह यादव यांचे तोंडाळ नेते होते. संजय राऊत यांचे पूर्वज. त्यांची उपयुक्तता संपली आणि मुलायम सिंह यांनी त्यांना पक्षातून हाकलून लावले. अखिलेश यादव यांनी त्यांना काहीही किंमत दिली नाही. आपल्याला न पेलवणारी महत्त्वाकांक्षा घेऊन वावरणार्यांची वर दिलेली काही उदाहरणे आहेत.
महत्त्वाकांक्षा चांगली असते; परंतु ती आपल्यावर स्वार होऊ देता कामा नये. महत्त्वाकांक्षेवर आपल्याला स्वार होता आले पाहिजे. ती जर आपल्यावर स्वार झाली तर, स्वाराचा नेपोलियन होतो, मुसोलिनी होतो, हिटलर होतो, इराणचा रेजा शहा पहलवी होतो, सद्दाम हुसेन होतो, सीरियाचा आसाद होतो. नेपोलियनच्या डोक्यात फ्रेंच साम्राज्य सर्व युरोपभर पसरविण्याचे भूत शिरले. त्याने रशियावर स्वारी केली. चारएक लाख सैनिक त्यात ठार झाले आणि नेपोलियन पराभूत होऊन परत आला. तिथून त्याच्या पतनाचा काळ सुरू होतो. हिटलरला आर्यांचे साम्राज्य निर्माण करायचे होते. त्यानेही रशियावर हल्ला केला. नेपालियनच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. रेजा शहा पहलवीने इराणला आधुनिक बनविण्याचा प्रयत्न केला. आधुनिक म्हणजे युरोपीयन बनविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे हात भाजले. इराणमध्ये क्रांती झाली, जीव वाचविण्यासाठी त्याला पळून जावे लागले. सीरियाच्या आसाद आणि इराकच्या सद्दाम हुसेन यांचीही कहाणी काही वेगळी नाही.
भारताचा विचार करता सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते महत्त्वाकांक्षी होते. अध्यक्षपद सोडायलाच तयार नव्हते. एका बैठकीत त्यांना उचलून बाजूच्या बाथरूममध्ये बंद करण्यात आले. सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आणि सोनिया गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सीताराम केसरी हे वाचाळवीर होते. संजय राऊत हे त्यांचे जणू पुत्र म्हणायला हरकत नाही. सध्या मुंबईत एक बातमी फिरते आहे की, मातोश्रीच्या बैठकीत शिवसैनिकांनी संजय राऊत यांना उचलले, बाथरूममध्ये बंद केले आणि बेदम मारले. काय झाले हे त्यांचे त्यांनाच माहीत.
अमर सिंह हे मुलायम सिंह यादव यांचे तोंडाळ नेते होते. संजय राऊत यांचे पूर्वज. त्यांची उपयुक्तता संपली आणि मुलायम सिंह यांनी त्यांना पक्षातून हाकलून लावले. अखिलेश यादव यांनी त्यांना काहीही किंमत दिली नाही. आपल्याला न पेलवणारी महत्त्वाकांक्षा घेऊन वावरणार्यांची वर दिलेली काही उदाहरणे आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेपायी विचारधारेशी तडजोड केली. 25 वर्षे ज्यांच्याबरोबर काढली त्या पक्षाला सोडले. पक्षनिष्ठ कार्यकर्ते, पक्ष आणि निशाणी घेऊनच बाहेर पडले. आता त्यांच्याकडे मातोश्री राहिली आहे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा फोटो राहिला आहे.
अजूनही वेळ गेेलेली नाही. राजकारणात चुका होतात आणि त्या खूप शिकवून जातात. शिकायचे ठरविले तर मार्ग काढता येतो. केलेली चूक दुरुस्त करता येते आणि गेलेले वैभवही परत मिळवता येते. उद्धव ठाकरे कोणता मार्ग स्वीकारतात ते येणारा काळच ठरवेल.