समन्वय - क्षात्रतेजाचा आणि ब्राह्मतेजाचा

26 Nov 2025 17:32:58


क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा समन्वय होतो तेव्हा राष्ट्र स्वबोधजागृतीने उभे राहते, ही आपली परंपरा आहे. नरेंद्र मोदी हे क्षात्रतेजाचे प्रतीक आहेत आणि मोहनजी भागवत हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहेत. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या समन्वयातून राष्ट्रतेज प्रकट होते. या दोघांचा समन्वय म्हणजेच राष्ट्रीय अस्मिता.


अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज आरोहणाचा पवित्र कार्यक्रम वेदमंत्रांच्या उच्चारात 25 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाला. डिसेंबर 1992 साली रामजन्मभूमी स्थानावर एक छोटे मंदिर बांधले गेले. 22 जानेवारी 2024ला या छोट्या मंदिराचे भव्य मंदिरात रूपांतर झाले आणि मंदिरात रामलल्ला दिव्य तेजाने विराजमान झाले. आधी पाया मग कळस आणि कळसावर ध्वजारोहण या क्रमाने भारतीय अस्मितेचे राम मंदिर उभे राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नरेंद्र मोदी हे क्षात्रतेजाचे प्रतीक आहेत आणि मोहनजी भागवत ब्राह्मतेजाचे प्रतीक आहेत. भारताचा इतिहास हे सांगतो की, जेव्हा क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा समन्वय होतो तेव्हा राष्ट्र स्वबोधजागृतीने उभे राहते. क्षात्रतेजाचे कार्य सुख, शांती, समृद्धी, संरक्षणसिद्धता आणि पराक्रम करण्याचे असते आणि ब्राह्मतेजाचे कार्य सर्व विश्वकल्याणकारी ब्राह्मतेज प्रकट करण्याचे असते, या दोघांचा समन्वय म्हणजे राष्ट्रीय अस्मिता.

विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/

प्रभू रामाच्या काळात क्षात्रतेजाचे प्रकटन रामाने केले, ब्राह्मतेजाचे प्रतिनिधित्व विश्वामित्र आणि वसिष्ठ यांनी केले. नंतरच्या काळात चंद्रगुप्त मौर्याने क्षात्रतेज प्रकट केले. आर्य चाणक्याच्या ब्राह्मतेजाची साथ त्याला लाभली. विजयनगरचे साम्राज्य हरिहर बुक्कराय आणि विद्यारण्य स्वामी यांच्या समन्वयाने झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांचे आशीर्वाद लाभले, ही आमची परंपरा आहे.

विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या समन्वयातून राष्ट्रतेज प्रकट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र कष्ट करून राज्य विकासाच्या महायज्ञात गुंतलेले आहेत. राष्ट्र परमवैभवसंपन्न होण्यासाठी भौतिक विकास अत्यंत आवश्यक आहे. आपल्या राज्यात कुणी भुकेला राहू नये, कुणी वंचित राहू नये, दुर्बल राहू नये. त्याला सन्मानाने जीवन जगता येईल अशा सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे कार्य नरेंद्र मोदी न थकता निरंतर करीत आहेत. पण ते तिथेच थांबलेले नाहीत. ते हे जाणून आहेत की, केवळ भौतिक समृद्धी हे आपल्या राष्ट्राचे आत्मतत्त्व नाही. उत्कर्ष आणि श्रेयस हातात हात धरून केले पाहिजेत.
आपल्या राष्ट्राचे अमरत्व त्यात आहे. जगाचा इतिहास हे सांगतो की, समृद्ध देश उभे राहतात, काही काळ जगावर प्रभुत्व निर्माण करतात आणि नंतर लयाला जातात. भारत मात्र गेल्या दहा हजार वर्षापासून आपल्या अक्षय धर्म उर्जेने ताठ उभा आहे. जेव्हा आपण स्वबोध विसरतो तेव्हा पतनाचा कालखंड सुरू होतो. आपली बुद्धी खराब होते. हीनभाव निर्माण होतो. अशा कालखंडातही साधुसंत व सत्पुरुष धर्म जागृत ठेवण्याचे काम करतात आणि इतिहासाच्या एका वळणावर धर्मचक्र पुन्हा एकदा गतिमान होते आणि उत्थानाचा कालखंड सुरू होतो.

विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/

या उत्थानाच्या कालखंडातून आपण आता जात आहोत. नरेंद्र मोदी क्षात्रतेजाचे प्रतीक आहेत आणि मोहनजी भागवत ब्राह्मतेजाचे प्रतीक आहेत. या समन्वयातून युगधर्माचे प्रकटीकरण होत असते. हा युगधर्म एकाच वेळी समरस समाजजीवन निर्माण करणारा, सर्व प्रकारची भौतिक समृद्धी निर्माण करणारा आणि स्वसंरक्षणसिद्ध असतो. त्याचवेळी तो विश्वकल्याणकारी, विश्वपर्यावरणरक्षक आणि व्यक्तीचा कर्तव्यभाव जागृतीचाही असतो. आपले शास्त्रवचन असे आहे, ’यतो धर्म: ततो जय:’ जेथे धर्म आहे, तेथे विजय आहे. राममंदिरावरील धर्मध्वज हे सांगतो की, येणारा कालखंड हा आसुरी शक्तीवर विजयच विजय मिळविणारा कालखंड राहणार आहे. सर्वत्र विजयच विजय आहे.

Powered By Sangraha 9.0