शिक्षणसंस्था की पांढरपेशा दहशतवादाचे आगार

    01-Dec-2025
Total Views |

डॉ. विवेक राजे
9881242224


इस्लाममध्ये विकृत अशी तथाकथित धर्मतत्त्वे पिढ्यानपिढ्या जोपासली गेली. त्यामुळे सगळ्याच मुसलमानांच्या धारणा समान झाल्या आहेत. असे वातावरण दहशतवादासाठी पोषक आणि हे काम निर्वेध करण्यासाठी सुरक्षित जागा महत्त्वाची. आजच्या काळात ती जागा फक्त शैक्षणिक संस्थाच देऊ शकतात. किंबहुना शिक्षणसंस्था या पांढरपेशा दहशतवादाचे आगार झालेले आहे. समाजसेवेचा वा शैक्षणिक संस्थेचा मुखवटा घातला की सुरक्षा यंत्रणांना गाफील ठेवता येते. त्याशिवाय अनुदानातून करोडो रूपयांची देणगी आणि त्याहून महत्त्वाचे आपले कट्टरपंथी अतिरेकी विचार पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होते.

10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीला लाल किल्ल्याबाहेर शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. त्या आधीच्या आठवड्यात गुजरातमध्ये रायसिन या जहाल विषाचा साठा सुरक्षा यंत्रणांनी जप्त केला. या दोन्ही घटनांमध्ये असलेल्या प्रतिष्ठाप्राप्त, उच्चशिक्षित मुस्लीम डॉक्टर्सचा सहभाग, तसेच दिल्लीजवळील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठापर्यंत पोहोचणारे या घटनांचे धागेदोरे यामुळे ’पांढरपेशे कट्टरपंथी’ म्हणजे ’व्हाइटकॉलर टेररिस्ट’ हा विषय ऐरणीवर आला. थोडं बारकाईने पाहिले तर अनेक उच्चशिक्षित माणसे कट्टरपंथी वा आतंकवादी संघटनांशी पूर्वापार संबंधित होते, नव्हे अशा संघटनांची स्थापनाच उच्चशिक्षित लोकांनी केलेली आहे हे लक्षात येते.

विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/


सय्यद मुहम्मद उमर शेख हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील उच्चशिक्षित. याने 9/11 च्या आतंकी हल्ल्यात म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 2011 मध्ये झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या मुहम्मद अत्ता याला एक लाख अमेरिकी डॉलर पाठवले होते. या शिवाय या मुहम्मद उमर शेखने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या काफिल्यावर तब्बल तीन आत्मघातकी हल्ले घडवून आणले होते. भारतीय संसदेवर 2001मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू हा उच्च पदवीधर होता. मुहम्मद अत्ता हा इंजिनिअर तरूण 9/11च्या हल्ल्यात सहभागी होता. अयुमान अल जवाहीरी हा ओसामा बिन लादेनचा उजवा हात स्वतः डॉक्टरच होता. ओसामा बिन लादेन हा सिव्हिल इंजिनिअर होता. यासीन भटकळ, अब्दुल सुभान कुरेशी, डेव्हिड हेडली, झाकिर नाईक असे कितीतरी अतिरेकी उच्चशिक्षित, उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले, आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील होते. फक्त अशिक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या मागास तरुण आतंकवादी होतात या समजाला ही यादी सहजपणे छेद देते.

विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/


दोन केडर्सची आवश्यकता

हे लक्षात घेतले पाहिजे की, कोणत्याही संघटनेला किमान दोन प्रकारच्या माणसांची गरज असते. एक म्हणजे जे अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील असतात आणि संघटनेने सोपविलेले कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी तयार असतात. दुसरे म्हणजे, सुशिक्षित बुद्धिमान, तंत्रज्ञ, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सुस्थापित असलेले. ही दुसर्‍या प्रकारची माणसे सर्वसाधारणपणे या संघटनेसाठी वैचारिक, तात्त्विक तसेच व्यूहरचनात्मक कार्य करतात व ते व्यूहरचनाकार असतात. बस्तरच्या जंगलातील नक्षलवाद्यांना सगळी बौद्धिक, तात्त्विक, सामाजिक आणि व्यूहरचनात्मक पार्श्वभूमी देणारे सगळे अर्बन नक्षली हे शहरात राहणारे, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सुस्थापित, विद्यापीठातील प्राध्यापक व लेखक होते आणि आहेत हे विसरून चालणार नाही. पण तरीही हे सुशिक्षित, प्रतिष्ठाप्राप्त माणसे कट्टरपंथी किंवा ते मूलतत्त्ववादी का होत असावेत हा प्रश्न पडतो. पी. चिदंबरमसारख्या भारताच्या माजी गृहमंत्र्यांना देखील हा प्रश्न पडलेला दिसतो. परंतु प्रत्येकच संघटनेला अशा किमान दोन केडरच्या माणसांची आवश्यकता असते.

धर्मविचार हेच मूळ

आधुनिक शिक्षण घेतलेला, वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारा, सामाजिक प्रतिष्ठा असलेला सधन माणूस कट्टरपंथी आतंकवादी कसा होऊ शकतो, हा प्रश्न फक्त हिंदू समाजातील लोकांनाच पडतो. याला कारणे हिंदू धर्माचा मुळातूनच असलेला उदार दृष्टीकोन, कोणत्याही कर्मकांडाचा आग्रह नसणे आणि सर्वसमावेशकतेतून आलेल्या विविधतेचा स्वीकार ही होत. हिंदू धर्मात अनिवार्य असे काहीच मानत नाहीत. मात्र या तुलनेत अब्राहमिक धर्म काही निश्चित कर्मकांडाचा आग्रह धरताना दिसतात. जसे ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा, रविवारची चर्चमध्ये प्रार्थना, इस्लाममध्ये सुंता, दर दिवशी पाच वेळा नमाज, रमजानचे रोजे, ईदच्या दिवशीचा विशेष नमाज अशा काही गोष्टींना अनिवार्य समजण्यात येते. याचा परिणाम त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीवर निश्चितपणाने होत असतो. इस्लाममध्ये प्रत्येक व्यक्तीवर काही संकल्पना बिंबविल्या जातात. एक म्हणजे जो इस्लामवर म्हणजे फक्त आणि फक्त अल्लाहवर श्रद्धा ठेवत नाही, तो अश्रद्ध म्हणजे काफीर. या काफिराला पृथ्वीवर जगण्याचा अधिकार नाही. एक तर त्याने श्रद्धावान व्हावे, म्हणजे इस्लाम स्वीकारावा किंवा श्रद्धावानाच्या हातून मरण पत्करावे. अश्रद्ध व्यक्तींना जो यमसदनास पाठवणारी व्यक्ती ’गाजी’, म्हणजे अल्लाहची लाडकी व्यक्ती. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही दार-उल-हरबमध्ये आहात. म्हणजे भारतासारख्या हिंदुबहुल आणि गैर इस्लामीशासित प्रदेशात असता तेव्हा तुमच्यावर सतत अन्यायच होत असतो असे मानून अन्याय होतोय असा सतत आक्रोश करीत राहा. तसेच लुटीत मिळालेली कोणतीही संपत्ती ही माल-ए-गनिमत असल्याने तुमचा त्यावर हक्क असतो. एखाद्या काफिराची फसवणूक करून हत्या केली तरी ती अल्लाहकडे अल-तकिया म्हणून मान्य असते. अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाची जर एखादा समाज पिढ्यानपिढ्या, शतकानुशतके जोपासना करीत राहिला तर ते या समाजाच्या ठाम धारणांमध्ये रूपांतरित होतात. मग उच्चशिक्षित असोत की अल्पशिक्षित, त्या समाजातील लोकं त्या धारणा जोपासत राहतात. इस्लाममध्ये विकृत अशी तथाकथित धर्मतत्त्वे पिढ्यानपिढ्या जोपासली गेली. हिंसक आणि असहिष्णु संस्कार शतकानुशतके केले गेले. त्यामुळे लहानथोर, स्त्रीपुरुष, सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब अशा सगळ्या मुसलमानांच्या धारणा समान झाल्या. कालसुसंगत असे अनेक बदल या बंदिस्त समाजाने आणि अत्यंत ताठर अशा धर्माने नाकारले. याचा परिणाम म्हणजे या समाजाच्या धारणांमधे कोणतेही बदल झाले नाही.
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/



सेल्फ रॅडिकलायझेशन

त्याचप्रमाणे आजच्या काळात एक भयंकर प्रकार, समाज माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून घडताना दिसतो. तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या किंवा पोस्ट समाजमाध्यमांवर बघत जाता, त्याच प्रकारच्या बातम्या व पोस्ट तुम्हाला पाहायला-वाचायला पाठवल्या जातात. यातून सुशिक्षित वर्ग तेच तेच वाचून आणि बघून स्वतःच्या नकळत कट्टरपंथी वा अतिरेकी विचारांचा होत जातो. तेच तेच वाचून किंवा ऐकून हेच आपल्या अवतीभोवती घडते आहे, हेच जगाचे वास्तव आहे अशी या वर्गाची समजूत होत जाते. थोड्या काळात या समजुतींचे रूपांतर विश्वासात होते. मग या विश्वासाचे रूपांतर धारणांमधे होते. याला ’सेल्फ रॅडिकलायझेशन’ म्हणणे योग्य ठरेल.

हा कट्टरपंथी किंवा अतिरेकी विचारांचा झालेला, सुशिक्षित माणूस मग घडणारा प्रत्येक अत्याचार आपल्याच समाजावर होतो आहे अशी स्वतःची आणि स्वतःच्या समाजाची समजूत अत्यंत परिणामकारकपणे करून देऊ लागतो. हे लोक सुशिक्षित, बुद्धीमान व अत्यंत संवेदनशील असतात. ते तर्कशुद्ध विचार आणि मांडणी करू शकतात. एखाद्या मोठ्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी दृष्टी आणि विशेष प्रशासनिक क्षमता यांच्यात ठासून भरलेल्या असतात. आपल्या सगळ्या विध्वंसक हालचाली गुप्तपणे करीत ते सहजपणे समाज आणि सुरक्षा यंत्रणा यांच्या डोळ्यात धूळ फेकत राहतात. सर्वसामान्य लोकांपुढे त्यांची प्रतिमा नेहमीच समाजहितैषी, सभ्य, कायद्याचे पालन करणारे अशी असते. ते ही प्रतिमा नेहमीच जपण्याचा प्रयत्न करीत असतात, जेणेकरून सामान्य माणसाच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण व्हावी. बहुतांशी वेळा ते यात यशस्वी देखील होतात. यांच्या जवळच्या व्यक्तींना आणि कुटुंबाला देखील यांची ही दुसरी बाजू अनेकदा अज्ञात असते.



उपयोगी चौकट ’संस्था’

या तथाकथित अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी, मग कृती करणारी तसेच व्यूहरचनात्मक विचार करणारी अशी दोन्ही प्रकारची माणसे लागतात. त्यांना आवश्यक ते बळ देण्यासाठी, त्यांनी निर्वेध काम करण्यासाठी सुरक्षित जागा लागते. ती जागा आजच्या काळात फक्त शैक्षणिक संस्थाच देऊ शकतात. समाजसेवेचा वा शैक्षणिक संस्थेचा मुखवटा घातला की सुरक्षा यंत्रणांना गाफील ठेवता येते. शिक्षणाच्या नावाखाली करोडो रूपयांची देणगी आणि अनुदान मिळविता येते. आवश्यक संसाधने उभारणे सोपे होते. आपले कट्टरपंथी अतिरेकी विचार पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होते. समाजात उजळ माथ्याने फिरणारे, आपल्या कट्टरपंथी विचारांचे, प्रतिष्ठित व सधन मनुष्यबळ सतत मिळत रहाते. हे विचार कोवळ्या मनांवर बिंबवण्याची उत्तम संधी शैक्षणिक संस्थांमध्येच मिळते. भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात जर एकाच वेळी अनेक ठिकाणी आतंकवादी कृत्ये घडवून आणायची असली तर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते. दोन-चार जणांच्या छोट्या गटाच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट असते. असे मनुष्यबळ जमविण्याचे काम अनेक शैक्षणिक संस्था करू शकतात.

भारतीय कायद्याच्या चौकटीत राहून आज तरी आतंकवादी गतिविधींसाठी लागणारा प्रचंड पैसा जमवण्याची व जिरविण्याची क्षमता फक्त शिक्षण संस्थांमध्येेच आहे. त्यातही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देणार्‍या संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा ओघ येतच असतो. सरकारी अनुदान, देणग्या, परदेशातून पाठविण्यात येणारा निधी, शैक्षणिक प्रवेशासाठी देण्यात येणारी रोख देणगी अशा विविध मार्गांनी हा पैसा येत असतो. हा बेहिशोबी पैसा जिरवणे हे या संस्थांसाठी देखील एक आव्हानच असते. आतंकवादी संघटनांना आवश्यक असलेले हालचालीचे स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि गोपनीयता शिक्षण संस्था आणि त्यातही अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण देणार्‍या संस्थांच्या आडोशाने सहज मिळू शकते. तिथे त्यांच्या प्रयोगशाळांसाठी लागणारी उपकरणे, यंत्रसामग्री तसेच रसायनांच्या बरोबर अनेक गोष्टी बेमालूमपणे आणता येतात.

विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/


भारतात मदरसा शिक्षण सुरक्षा यंत्रणाना चकमा देऊ शकेल असे चलाख मनुष्यबळ देण्यात कमी पडते आहे, याची जाण आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनाना आधीच आलेली आहे. त्यातही जोपर्यंत काँग्रेस पक्षाचे सरकार केंद्रात अधिकारपदी होते, तोपर्यंत अनेक गोष्टी सुखनैव चालल्या होत्या. काही घटनांचा बभ्रा झालाच तर 370 कलमाने विशेष दर्जा प्राप्त जम्मू-काश्मीर प्रदेश वापरता येत होता. पण केंद्रातील भाजपा सरकारने कलम 370 हटवून तो प्रदेश केंद्रशासित केल्याने तेथील सुस्थापित नेटवर्क निरूपयोगी ठरले. जम्मू-काश्मीर राज्यात अतिरेकी संघटनाना प्राप्त झालेली कवचकुंडले आता गळून पडली आहेत. त्यामुळे यावर योग्य उपाय म्हणजे सुशिक्षित, प्रतिष्ठित अशा पांढरपेशा लोकांचा अतिरेकी कारवायांसाठी वापर करणे, हाच होय. एका मौलवीने आतातायीपणे केलेल्या कृतीमुळे एका व्यापक कटाचा पर्दाफाश झाला. या कारस्थानात सामील असलेल्या उच्चशिक्षित डॉक्टर्समुळे सर्वसामान्य माणसाच्या नजरेत नसलेली भारतातील इस्लामिक आतंकी विचारधारेची ही काळी बाजू उघड झाली. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला विशेष प्रावधानाने दिलेली विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय यांच्यावर सुरक्षा यंत्रणा आणि सजग नागरिकांनी निगराणी ठेवणे गरजेचे झालेले आहे. पांढरपेशे कट्टरपंथी वा आतंकवादी या घटनांच्या आधीदेखील कार्यरत होतेच. भारतातील मुस्लीम आतंकवादी संघटना आणि त्यांचे व्हाइटकॉलर टेररिस्ट किंवा पांढरपेशे आतंकवादी या घटनांच्या निमित्ताने पुन्हा नव्याने उघडकीस आले एवढेच.