काफिरद्वेषाच्या दहशतवादी विषवल्लीची पाळेमुळे

05 Dec 2025 15:23:27
@प्रमोद पाठक
 
bengali muslim
हजारो हजारो हिंदू मंदिरे तोडून आक्रमकांनी एकच सामाजिक वास्तव स्थानिक निवासी हिंदूंवर ठसविण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे,“आम्ही (आक्रमक) तुमच्यापैकी नव्हेत. आम्हाला तुमच्या धर्म आणि संस्कृतीशी काही देणेघेणेच नाही. आम्ही तिचा उच्छेदही करत राहू.” ते एवढेच करून थांबले नाहीत, तर त्यांनी इथे धर्मांतराचे सत्र चालू ठेवत, जोरजबरदस्ती करत स्थानिकांनासुद्धा इथल्या संस्कृती आणि परंपरांपासून तोडले. त्यांनी इथल्या धर्मांतरित समाजाची पाळेमुळे उखडली. त्याचा परिणाम हुमायून कबीरच्या या देश-परंपराविरोधी घोषणेतून समोर येतो आहे. विषवल्लीची ही दुसरी डहाळी आहे.
क्रवार, दि. 21 नोव्हेंबरला सर्व भारतीय हिंदूंना मूळापासून हलविणारी घोषणा पश्चिम बंगालमधून ऐकायला मिळाली. तृणमूल काँग्रेसच्या हुमायून कबीर या आमदाराने बाबरी मशीद पुन्हा बांधण्याची घोषणा मुर्शिदाबाद येथे केली. तिची पहिली वीट ठेवण्याचा दिवसही जाहीर केला. तो आहे 6 डिसेंबर. या दिवशी सर्व रामभक्तांनी बाबरी मशीद पाडून धुळीला मिळवली होती. त्यानंतर श्रीराममंदिर उभारले जाईपर्यंत घटनाक्रम आपल्याला माहीत आहे. श्रीराममंदिराच्या कामाची भौतिक समाप्ती दि. 25 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होण्याचा मुहूर्त जाहीर झाला होता. तो पाच दिवसांचा ध्वजारोहण सोहळा सुरू होण्याच्या दिवशी आणि मुसलमानांना पवित्र वाटणार्‍या शुक्रवारच्या दिवशी, जुन्या बाबरी मशिदीच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे मढे कबरीतून काढण्याच्या उद्देशाने बाबरच्या मुलाचे नाव असलेल्या हुमायून कबीरने बाबराच्या नावाने नवी मशीद बांधण्याची घोषणा करावी, ही गोष्ट अखिल हिंदू समाजाच्या भरून येत असलेल्या जखमेवर मीठ चोळून परत भळाभळा वाहायला लावणारी होती. तसेच घडले. लगोलग हिंदू साधू-संत-महंतांच्या बाबरी मशिदीच्या विरोधात घोषणा आणि पत्रके येऊ लागली. संपूर्ण हिंदुस्थानातून त्याचा निषेध होतो आहे. ती बांधायला सुरुवात झाल्यास ती लगोलग पाडून एकविसाव्या शतकातील कलंक पुसण्याच्या द़ृष्टीने हिंदू तरुण पुढे सरसावत आहेत. त्यातच चारच दिवसांनी दुसरी बाब उघड झाली. ज्या जमिनीवर ती बांधण्याची घोषणा झाली ती जमीन हुमायूनची किंवा त्याच्या बापाची नाहीच. त्यावर पाच हिंदूंचा सामायिक मालकी हक्क आहे. त्यांनी तो अनेक वाहिन्यांवर बोलून जाहीर केला. पुढे जाऊन त्याच जागेवर भव्य राममंदिर बांधण्याचा संकल्प जाहीर केला.
 
 
त्यावर प्रतिक्रिया देताना हुमायूनने जो मशीद बांधण्याला विरोध करेल त्याला जोड्याने मारण्याची धमकी दिली, तशीच मशीद बांधण्याच्या कामात गरज भासल्यास मरण्यासाठी पाचशे मुसलमान तयार आहेत अशी शेखी मिरवली. हे प्रकरण 6 डिसेंबरपर्यंत कुठवर चिघळते ते पुढे दिसेलच. पण त्या निमित्ताने हिंदूंच्या अस्मितेशी उभा दावा मांडणे हे विषवल्लीचे एक मूळ उघडे पडले.
 
 
अनेक वाहिन्यांना या घोषणा-प्रतिघोषणांमुळे चर्वितचर्वण करण्यासाठी खाद्य मिळाले. त्यातील काही वाहिन्यांनी मुस्लीम वक्ते बोलावून त्यांच्यात चर्चा घडवून आणली. जे सरळसरळ दहशतवादी मनोवृत्तीचे म्हणून प्रेक्षकांना पूर्वीपासून माहिती आहेत त्यांनी बाबरच्या नावाने मशीद बांधण्याला पाठिंबा दिला. नेहमीप्रमाणे मतस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य आणि संविधानाचा पाठपुरावा केला, जणू हेच संविधानाचे पाठीराखे आहेत. त्यात एक-दोन शहाण्यासारखा विचार करणार्‍या मुल्लांनी या कल्पनेचा स्पष्ट शब्दांत विरोध केला. भारतात हिंदूंशी वाकड्यात जाऊन राहणे दूरगामी दुष्परिणाम घडवेल असेही सांगितले. एका मुस्लीम वक्त्याने उदाहरण दिले की, जसे मुस्लिमांमध्ये कोणीही आपल्या मुलाचे नाव यझीद ठेवत नाही. कारण त्याने पै. महंमदांचा नातू हुसेन याचा नृशंसपणे वध केला. तेव्हापासून यझीद हे नाव काळिमा फासले गेलेले नाव झाले. जे मुस्लिमांना यझीद आणि त्याच्या नावाविषयी वाटते तेच हिंदूंना बाबराच्याविषयी आणि त्याच्या नावाविषयी वाटते.
 
 
शाळा-महाविद्यालयातून शिकवल्या गेलेल्या इतिहासात बाबराची कुकर्मे शिकवली गेली नसली तरी 1991सालानंतर बाबराच्या चरित्राबाबत हिंदू सतर्क झाले. बाबरनामा या त्याच्या आत्मचरित्रातील अनेक नृशंस कथा पुढे आल्या. एका ठिकाणी त्याने हिंदूंच्या मोठ्या नरसंहाराचे वर्णन लिहिले आहे. धारातीर्थी पडलेल्या हिंदूंच्या मुंडक्यांचे त्याने ढिगारे रचले. त्याविषयी तो मोठ्या गर्वाने लिहितो. ते सर्व रौरव नरकाचे धनी झाले, अशी शेखी मारतो. (बाबरनामा, 2017 आवृत्ती, 371 पृष्ठ) अशा हिंदूद्वेष्ट्याच्या नावाने मिरवणारी मशीद बांधणे या विचाराने कोणत्या हिंदूंच्या मस्तकात तिडीक उठणार नाही?
 
 
देश हारविलेला समाज
 
या प्रकारची बहुसंख्यांकांना डिवचणारी गोष्ट करणारे भारतीय खंडातील मुसलमान हे त्यांचा देश, त्याला जोडून येणारी आत्मानुभूती आणि अस्मिता हरवलेले आहेत. इस्लामचा उगम अरब समाजात झाला. तो त्याच प्रदेशात प्रथम पसरला. ते अरब त्यांच्या देशातच स्थायिक राहिले. तिथेच त्यांनी आपापसात मारामार्‍या, लढाया केल्या. त्यामुळे धर्म बदलला तरी त्यांची संस्कृती टिकून राहिली. त्यात सातत्य राहिले.
 
 
इजिप्तचे ठळक उदाहरण आहे. इजिप्तमध्ये त्यांची जुनी संस्कृती, तिचे अवशेष धर्मांतरानंतर नष्ट केले गेले नाहीत आणि आज तर त्या बळावर इजिप्त हे प्रवासी केंद्र झाले आहे. जी गोष्ट इजिप्त, सीरिया, जॉर्डन या देशात घडली ती इराणपलीकडे अफगाणिस्तान आणि भारतात घडली नाही. याचे कारण इथे जरी पहिले मुस्लीम आक्रमण अरब आक्रमक मुहंमद बिन कासिमने केले तरी त्याचा फार परिणाम झाला नाही. नंतर मध्य आशियातून आलेल्या अनेक आक्रमकांनी आक्रमणे करून जेव्हा इथे राजसत्ता स्थापन केल्या तेव्हा त्यांची परंपरागत वांशिक मातृभूमी तुटली होती. तिच्यामुळे येणार्‍या राष्ट्रीय, सांस्कृतिक अस्मितेचा दुवा नाहीसा झाला. ते फक्त आक्रमक म्हणून उरले. त्यांना इथल्या संस्कृतीशी नाळ जुळवून घेण्याचा प्रश्नच नव्हता.
 
 
हजारो हजारो हिंदू मंदिरे तोडून आक्रमकांनी एकच सामाजिक वास्तव स्थानिक निवासी हिंदूंवर ठसविण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे,“ आम्ही (आक्रमक) तुमच्यापैकी नव्हेत. आम्हाला तुमच्या धर्म आणि संस्कृतीशी काही देणेघेणेच नाही. आम्ही तिचा उच्छेदही करत राहू.” ते एवढेच करून थांबले नाहीत, तर त्यांनी इथे धर्मांतराचे सत्र चालू ठेवत, जोरजबरदस्ती करत स्थानिकांनासुद्धा इथल्या संस्कृती आणि परंपरांपासून तोडले. त्यांनी इथल्या धर्मांतरित समाजाची पाळेमुळे उखडली. त्याचा परिणाम हुमायून कबीरच्या या देश-परंपराविरोधी घोषणेतून समोर येतो आहे. विषवल्लीची ही दुसरी डहाळी आहे.
 
कोणत्याच गैरमुस्लीम राजकारण्यांना अथवा प्रशासनाला धार्जिणा असत नाही. कारण तो त्याच्या मनोधारणेनुसार त्या देशातील समाजाच्या कष्टावर त्या देशातील धनसंपत्ती अथवा उत्पादनावर जगत नसून अल्लाच्या कृपेवर जगतो आहे. दार-उल-हर्ब-शत्रूप्रदेशात त्याच्या जगण्याचे जे काही साधन त्याला मिळते ते केवळ अल्लामुळे. तो अल्लाचे आभार मानतो. सभोवती सारे काफीरच असतात. 
 
त्याला राजकीय पदर आहे. सध्या मतदार तपासणीचे काम बंगालमध्ये सुरू आहे. त्यात प्रामुख्याने तृणमूलचे कार्यकर्ते बी .एल.ओंवर दबाव आणून अडथळे आणत आहेत. त्याचे परिणाम, घुसखोरी करणार्‍यांना वेगळे काढून बांगलादेशात पाठविण्यात आले तर तृणमूलच्या मतदानावर परिणाम नक्की होईल. अशा वेळी असा भावनिक मुद्दा उपस्थित करून मुसलमान मतांना पक्के करण्यासाठी बाबरी नावाच्या मशिदीची हूल उठविणे हा हेतू असू शकतो. श्रीमती ममताजींनी त्या विरोधात मत प्रदर्शन करण्याचे टाळले, तसेच त्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला येणार नाही, असेही विधान केले नाही आणि मुसलमानांचा पाठिंबा जाणार नाही याची काळजी घेतली. या प्रकारचे मुस्लीम भावनिक एकीकरण हे मुस्लीम समाजाच्या देशाविषयीचे मातृत्वमय ममत्व नष्ट झाल्याच्या भावनेत आहे. ज्यांची मुळे नष्ट झाली आहेत अशांना ज्यांची मुळे पक्की रुतलेली आहेत त्यांच्या विरोधात द्वेषाची विषवल्ली फोफावणे सहज होते. हा समाज जेव्हा इंडोनेशियातील मुस्लीम समाजाप्रमाणे आपली मुळे येथील मातीत रूजवेल तेव्हाच तो स्थानिक हिंदूंशी गुण्यागोविंदाने वागेल, साहचर्याने राहील.
 
आम्ही काय कुणाचे खातो रे?
 
या शीर्षकाचा अभंग स्वामी रामदासांनी लिहिला आहे. 4-5 दशकांपूर्वीच्या पिढीला तो माहिती होता. त्याची विषवल्लीच्या संबंधात आठवण झाली. 2024ची निवडणूक झाल्यावर अनेक विश्लेषकांच्या आणि त्या संबंधाने उघड मतप्रदर्शन करणार्‍या भाजपाच्या निर्वाचित संसद सदस्यांनी सांगितले की, सर्व प्रकारच्या सुविधा मिळूनही मुस्लीम मतदारांनी भाजपाला मतदान केले नाही. एक प्रकारे तो उद्वेग होता. त्यांनी लक्षात घेतले नाही की, मुस्लीम समाजातील जो मुळे हरविलेला भाग आहे तो कोणत्याच गैरमुस्लीम राजकारण्यांना अथवा प्रशासनाला धार्जिणा असत नाही. कारण तो त्याच्या मनोधारणेनुसार त्या देशातील समाजाच्या कष्टावर त्या देशातील धनसंपत्ती अथवा उत्पादनावर जगत नसून अल्लाच्या कृपेवर जगतो आहे. दार-उल-हर्ब-शत्रूप्रदेशात त्याच्या जगण्याचे जे काही साधन त्याला मिळते ते केवळ अल्लामुळे. तो अल्लाचे आभार मानतो. सभोवती सारे काफीरच असतात.
 
 

bengali muslim 
 इद हुसेन यांनी ओपस Among the Mosques या पुस्तकात स्थलांतरित मुस्लिमांची वाढती संख्या आणि स्थानिक समाजावर परिणाम यावर भाष्य केले आहे.
हे केवळ भारतातच घडते अशी गोष्ट नाही. सिरिया, इराक, येमेन, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमधून अरब उन्हाळ्याच्या रणकंदनात युरोपमध्ये पलायन केलेले हे मातृभूमीपासून पाळेमुळे तुटलेले घुसखोर त्या देशात मिळालेल्या सर्व प्रकारच्या सुविधा, निवासस्थान, आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि त्या त्या देशातील प्रशासनाच्या मेहरबानीने मिळालेले रोजगार इ. उपभोगून स्थानिक समाजव्यवस्थेच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. त्यांना स्थानिक कायदा आणि सुव्यवस्था मान्य नाही. त्यांना त्यांच्यासाठी मुस्लीम कायदा शरियाचे पालन करण्यासाठी वेगळी न्यायव्यवस्था उभी करून पाहिजे. हे इथेच थांबत नाही. लंडन, मँचेस्टर इ. काही शहरांमधून त्यांनी संख्याबळ आणि उद्दामपणाच्या जोरावर स्थानिकांना हुसकावून लावले आहे. इंग्लंडमधील सात मोठ्या शहरांची पाहणी करून तेथील मशिदींमधून सर्वेक्षण करून ब्रिटिश नागरिक आणि देशप्रेमी झालेल्या इद हुसेनने Among the Mosques (2021) हे पुस्तक लिहिले. त्यात त्याने स्थलांतरित मुस्लिमांची वाढती संख्या आणि स्थानिक समाजावर होणार्‍या अस्फुट आक्रमणाची स्थिती निवेदन केली होती. त्या पुस्तकाचा परिचय मी ‘इंग्लंडमधील कैराना’ या शीर्षकाखाली करून दिला होता. त्याच दरम्यान इंग्लंडमध्ये शाळकरी मुलींना विशेषत: गोर्‍या पौगंडावस्थेतील मुलींना येनकेन प्रकारेण फूस लावून धाकाखाली ठेवून शोषण करणारी टोळी पकडली गेली होती. त्यात प्रामुख्याने पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी स्थलांतरितांचा समावेश होता. त्यांची माहिती बाहेर आल्यावर कळले की, ही कृत्ये ते इंग्रजी राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांचा त्यांच्या परीने सूड उगवण्यासाठी करत होते. काय तर्कट आहे पाहा. ज्या देशाने त्यांच्या देशातील बंडाळींचा मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करून त्यांना सहाय्य केले, त्याच देशातील 4-5 पिढ्यांनंतर जन्मलेल्या अनभिज्ञ तरुणींना सूडापोटी असे वागवणे याला एकच समर्थन त्यांच्या दृष्टीकोनातून आहे, ‘आम्ही काय कुणाचे खातो रे.’ त्यामुळे आसरा देणार्‍या देशांशी त्यांना एकनिष्ठ राहण्याची आवश्यकता वाटत नाही.
 
 
या मनोवृत्तीच्या वर्णनाला पुष्टी देणारी घटना हा लेख लिहिण्याच्या सुमारास घडली आहे. एका अफगाण शरणार्थीने वॉशिंग्टन डी. सी. येथे पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला करून दोघांना जबर जायबंदी केले. त्याची माहिती अशी की, रहमतउल्ला लखनपाल जो बायडेनच्या कारकिर्दीदरम्यान अफगाण शरणार्थी म्हणून आला. तो आपल्या पत्नी आणि पाच मुलांसह अमेरिकेत राहात होता. सर्व सुखसोयींचा फायदा घेऊन आणि शरणार्थी म्हणून मान्यता मिळाल्यानंतरही त्याला तुमच्या-आमच्या दृष्टीने ही दुर्बुद्धी व्हावी, याचे कारण अमेरिकन राष्ट्रापती कृतज्ञ राहण्याची त्याला भावनिक गरज वाटली नाही. कारण ‘आम्ही काय कुणाचे खातो रे?’
 
 
विषवल्लीला खतपाणी घालणारे
 
काही दिवसांनी तपासानंतर असेही उघडकीस येईल की, रहमतउल्ला अमेरिकेत पोहोचला तेव्हा शहाण्यासारखा वागत होता. अमेरिकन झालेला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याची वागणूक बदलली. त्याने आपली वेशभूषा बदलली. तो मशिदीत आणि त्या परिसरात जास्त वेळ घालवू लागला. आता त्याने जाणूनबुजून हे आत्मघातकी पाऊल उचलले. यावरून निष्कर्ष निघतो की, मशिदीत गेल्यानंतर तो ज्या मुल्लांच्या संपर्कात आला होता त्या मुल्लांनी त्याला दहशतवादी विचारांनी भारून टाकले.
 
जगात सगळीकडे मुस्लीम समाजांमध्ये हेच घडताना दिसते. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्या मुळाशी कोणीतरी मुल्ला-मौलवी असतो. तो शुक्रवारी आणि काही इस्लामी उत्सवांच्या वेळी देत असलेली भाषणे प्रक्षोभक असतात. ते मुल्ला-मौलवी आपले भाषण ऐकणार्‍यांचे, नमाजींचे मन काफिरांच्या आणि गैरमुस्लिमांच्या द्वेषाने -Kafirophobiaने- भारून टाकतात. भारतातही हीच स्थिती आहे. मी स्वत: अशी भाषणे प्रत्यक्ष ऐकली आहेत आणि काही वेळी ते भाषण देणार्‍या मुल्लांशीही हुज्जत घातली आहे. शुक्रवारच्या भाषणांनंतर युद्धखोर मन:स्थितीत बाहेर पडणार्‍या नमाजींच्या थव्यातील भारलेपण मी अनुभवले आहे. जे जास्त भारले जातात ते या मुल्लांच्या अधिकाधिक कह्यात जातात. मुस्लीम समाजात काफिरद्वेषांच्या विषवल्लीला रूजवून तिला खतपाणी घालण्याचे काम हे मुल्ला लोक सातत्याने करत असतात.
 
 
माझे स्पष्ट मत झाले आहे की, काही जिल्ह्यांमधून विखारी भाषणे देऊन नमाजींमध्ये काफिरद्वेषाच्या विषवल्ली रोवून तिला सातत्याने पाणी घालणार्‍या काही मुल्लांची भाषणे ध्वनी/दृकश्राव्य मुद्रित करून त्यांच्यावर सामाजिक शांतता भंग करण्याचे खटले न्यायालयात रितसर चालवावेत. ती प्रकरणे फार रेंगाळत न ठेवता त्या सर्वांना योग्य शिक्षा दिल्या जाव्यात. त्यानेच या विषवल्लीला खतपाणी घालण्यावर आळा बसेल. या सर्व कारवाईचा योग्य परिणाम अन्य नमाजींवरही होईल. ही संपूर्ण विषवल्ली नष्ट होण्यासाठी 2047 ही मुदत ठरवावी.
Powered By Sangraha 9.0