गिरीशकाका प्रभुणे यांना पुत्रशोक

विवेक मराठी    07-Mar-2025
Total Views |
 
vivek
 
पिंपरी:  क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांचे चिरंजीव व प्रसिद्ध चित्रकार मुकेश प्रभुणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झालेे. निधनसमयी त्यांचे वय 49 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
 
 
मुकेश यांच्या आकस्मिक निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला. प्रभुणे कुटुबांचे सांत्वन केले. मुकेश हे चित्रकार होते. त्यांचे बंधू मयुरेश आणि भगिनी मनस्विनी हे दोघेही पत्रकार आहेत. मुकेश यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत व लेखक पद्मश्री रमेश पतंगे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, रा.स्व.संघाचे पिंपरी-चिंचवड संघचालक, चापेकर समितीचे सचिव ॲड. सतिश गोरडे यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.