मधमाशीपालनाला ‘मधुक्रांती’ जोड

17 May 2025 12:14:46
 
krushivivek
 
मध हा अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असतो. त्यामुळे मानवी आहारात व औषधांत मधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. देशात मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय मधमाशीपालन अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत लघु अभियान 1, लघु अभियान 2 आणि 3 समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जातात.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. यानंतर मधुमक्षिकापालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना एक लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे. तसेच विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करता येणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-200 ज्ञलपर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-100 ज्ञलपर्यंत) ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
अधिक माहितीसाठी
राष्ट्रीय मधमाशी मंडळ,
नवी दिल्ली 011-23325265, 23325265
मधुक्रांती पोर्टल- हेल्पलाईन- 18001025026, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे- (020)29703228 यावर संपर्क करावा. जास्तीत जास्त मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी.
नोंदणी ही फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. स्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या 10 ते 100 फ्रेमसाठी 250 नोंदणी शुल्क, 101 ते 250 फ्रेमसाठी 500 रुपये, 250 ते 500 फ्रेमसाठी एक हजार, 501 ते 1 हजार फ्रेम साठी दोन हजार, 1001 ते दोन हजार फ्रेमसाठी दहा हजार, 2001 ते 5 हजार फ्रेमसाठी 25 हजार, 5001 ते दहा हजार फ्रेमसाठी एक लाख तर दहा हजारापेक्षा अधिक फ्रेमसाठी दोन लाख नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
- प्रतिनिधी
सौजन्य - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, महाराष्ट्र राज्य
Powered By Sangraha 9.0