ऑपरेशन सिंदूर: दहशतीविरुद्ध भारताचे धर्माधिष्ठित निर्णायक प्रत्युत्तर!

17 May 2025 18:22:14
लेखक: शीराज़ कुरैशी, अधिवक्ता
 

vivek 
 
जम्मू-काश्मीरमधील रमणीय पर्यटनस्थळ पहलगाम येथे नुकताच झालेला भ्याड दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा स्पष्टपणे दाखवून देतो की, दहशतवाद हा भारताच्या एकतेस, शांततेस व संस्कृतीस सतत आव्हान देतो आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले, आणि हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी आखलेले षड्यंत्र होते. अशा परिस्थितीत भारत सरकार व भारतीय सेनेने सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ लष्करी कारवाई नसून, एक नैतिक, राष्ट्रधर्माधिष्ठित व आध्यात्मिक कर्तव्य आहे.
 
 
‘सिंदूर’चे प्रतीकात्मक महत्त्व
 
‘सिंदूर’ भारतीय संस्कृतीत मंगल, शक्ती व रक्षणाचे प्रतीक मानले जाते. या ऑपरेशनला हे नाव देऊन हे दर्शवले गेले आहे की ही कारवाई केवळ सूडासाठी नाही, तर राष्ट्राच्या रक्षणासाठी, धर्माच्या मर्यादेसाठी व शांतीसाठी आहे.
 
धार्मिक प्रेरणा: धर्मयुद्धाचा सिद्धांत
 
भारताची ही कारवाई धर्मयुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात:
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः॥
(गीता 2.37)
 
अर्थ: तू जर युद्धात मारला गेलास, तर स्वर्गप्राप्ती होईल, आणि जर विजय मिळवला, तर पृथ्वीवर राज्य करशील. म्हणून, हे कौन्तेय, युद्धासाठी दृढनिश्चय करून उभा राहा!
 
हा श्लोक भारतीय नेतृत्व व सेनेला हे संदेश देतो की, अन्याय व दहशत जेव्हा डोके वर काढेल, तेव्हा नुसती क्षमा नव्हे तर धर्माधारित शक्तिप्रयोगच योग्य ठरतो.
 
पाकिस्तानची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन
पाकिस्तानच्या भूमीतून वारंवार भारतात दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. भारताने अनेकदा संयम दाखवला, शांततेचा हात पुढे केला, पण:
दुष्टं दण्डयेत् शास्त्रज्ञो न निर्गुणमपीश्वरः।
सुगुणोऽपि परित्याज्यो यत्र दोषोऽतिभूरणः॥
(नीतिशतक)
 
अर्थ: दुष्ट व्यक्तीला शास्त्रज्ञ माणसाने दंड द्यावा. जिथे दोष खूप मोठा आहे, तिथे गुण असूनही त्या व्यक्तीला त्यागणे योग्य असते.
ऑपरेशन सिंदूर ही केवळ कारवाई नसून एक स्पष्ट संदेश आहे - भारत आता शांत बसणार नाही.
 
राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ
 
भारताचा धर्म नेहमीच शांती, सहिष्णुता व करुणा राहिला आहे. पण जेव्हा या मूल्यांवर आघात होतो, तेव्हा शौर्यच धर्म बनतो.
 
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्॥
(मनुस्मृति 8.15)
 
अर्थ: जो धर्माचा नाश करतो, तो स्वतः नष्ट होतो; आणि जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो. म्हणून धर्माचा त्याग करू नका.
 
आम्ही त्यांना मारले ज्यांनी आम्हाला इजा पोहचवली - हे क्रोधाचे नव्हे, तर न्यायाचे घोषवाक्य आहे. जेव्हा निरपराध पर्यटकांची हत्या होते, सैनिकांवर हल्ले होतात, तेव्हा ते सहन करणे पाप होते आणि प्रतिशोध धर्म ठरतो.
 
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील अचूक व धाडसी कारवाई
हे फक्त लष्करी ऑपरेशन नाही - हे एक राष्ट्राच्या धर्म, गौरव व अस्मितेचे प्रतीक आहे.
 
हनुमानाचे लंकादहन: प्रतीकात्मक संदर्भ
 
रामायणात जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत बंदिवासात ठेवले, तेव्हा भगवान रामांचे दूत हनुमानजी तेथे पोहोचले. त्यांना राक्षसांनी अपमानित केले, त्यांच्या शेपटीला आग लावली. हनुमानाने तो अपमान सहन केला नाही - त्यांनी संपूर्ण लंका जाळून टाकली.
 
दिष्ट्या हता राक्षसाः पापकर्माणो ह्यनेकशः।
लङ्कां दग्ध्वा पुनः प्राप्तः त्वं दूतः श्रेयसी मतिः॥
(वाल्मीकि रामायण, सुन्दरकाण्ड)
 
अर्थ: अनेक पापकर्म करणार्‍या राक्षसांचा संहार करून तू लंका जाळून परत आला - हे एका आदर्श दूताचे लक्षण आहे.
भारतानेही आज तेच केले - ज्यांनी देशावर वार केला, त्यांना धर्माधिष्ठित दंड दिला.
 
भारतीय सेनेचे पराक्रम: एक वीरगाथा
 
भारतीय सेना ही केवळ लष्करी संस्था नाही - ती एक जीवंत संकल्पना आहे, जिथे प्रत्येक सैनिक असे व्रत घेतो:
 
स्वदेशे पुण्यं, परदेशे रणं।
विजय हेच धर्म आहे, आणि शांती त्याचे फळ।
 
सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राइक आणि आता ऑपरेशन सिंदूर - हे दाखवतात की, भारतीय सेना प्रत्येक हुतात्म्याची शपथ पूर्ण करते.
 
शत्रुना विनाशाय स्वजनस्य हिताय च।
धर्मसंस्थापनार्थाय वीरः संजायते पुनः॥
 
अर्थ: शत्रूंचा विनाश व आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी, वीर पुन्हा पुन्हा जन्म घेतात.
 
पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व: धैर्य व दृढनिश्चयाचे उदाहरण
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची परराष्ट्रनीती शांतीची पण आणि शौर्याची पण म्हणून परिभाषित केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘सहिष्णु भारत’मधून ‘जयिष्णु भारत’ झाला आहे.
 
ना हम छेड़ते हैं, ना हमें कोई छेड़े
पर जो हमें छेड़े, वो फिर छेड़ न पाए।
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥
(भगवद्गीता 2.47)
 
मोदीजींनी याचा आदर्श दाखवला - त्यांनी फळाची चिंता न करता दहशतीच्या मुळावर प्रहार केला.
 
धर्म आणि राष्ट्रधर्माचे यश
 
ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या लष्करी ताकदीची, सांस्कृतिक परंपरेची आणि राजकीय नेतृत्वाची त्रिवेणी आहे. हे लंकेच्या दहनाचे आधुनिक रूप आहे, जिथे भारताने दहशतवादरूपी रावणाला धडा शिकवला आहे.
 
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
(गीता 4.8)
 
आज भारत पुन्हा धर्माचे रक्षण करत आहे - नीतीने, शक्तीने व आत्मगौरवाने.
शेवटचा संदेश:
 
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने।
विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥
 
अर्थ: जंगलात सिंहाचा ना अभिषेक होतो ना तसा संस्कार. तो स्वतःच्या शौर्यामुळेच जंगलाचा राजा होतो.
भारतही आता स्वाभिमानी, आत्मनिर्भर व शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभा ठाकला आहे.
 
लेखक: शीराज़ कुरैशी, अधिवक्ता
संपर्क: 9893168910
Powered By Sangraha 9.0