आयकॉन स्टील - ‘डीएस सळई’चा ब्रँड

विवेक मराठी    05-May-2025
Total Views |
Icon Steel
उत्तुंग उद्योगाच्या भिंती गुणवत्ता आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभ्या असतात. संयमित वाटचाल, नावीन्याची आस, सततचे संशोधन, बाजारपेठेचा कानोसा, ग्राहकाचे समाधान आणि प्रचंड विश्वासार्हता यातूनच ‘ब्रँड’ तयार होतो. बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या सळई उत्पादनात ’आयकॉन स्टील’नेही याद्वारेच विशेष ओळख निर्माण केली आहे. अडचणींवर मात करीत गुणवत्तापूर्ण उत्पादनांची परंपरा निर्माण केलेल्या या कंपनीने आता ‘मजबुती‘ आणि ’डक्टिलिटी’चे संतुलन असणारी ‘डीएस सळई’ उत्पादित केली आहे. बांधकाम क्षेत्राची गरज लक्षात घेऊन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान ‘आयकॉन स्टील’ने साध्य केले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी यांच्याकडून एकूण वाटचालीचा घेतलेला हा आढावा...
उच्च गुणवत्ता आणि दर्जाबरोबरच डक्टिलिटी आणि शक्ती या दोन्हींचे संतुलन साधत ’आयकॉन स्टील’ उद्योग समूहाने ’डीएस गुणवत्ता’ असलेल्या सळ्यांचे उत्पादन सुरू केल्याने अभियंता वर्गाची त्याला विशेष पसंती मिळत आहे. सळईचे उत्पादन करताना डक्टिलिटी वाढविल्यास शक्ती कमी होते आणि शक्ती वाढविल्यास डक्टिलिटी कमी होते. याचप्रमाणे काही बांधकामांमध्ये शक्ती असलेल्या सळ्यांची गरज भासते, तर काही बांधकामांमध्ये लवचीक सळईची गरज जास्त असते. आता बांधकामाच्या गरजेप्रमाणे सळई तयार झाल्याने साधारण सळईच्या तुलनेत बांधकामाध्ये अभियंत्यांच्या शिफारसीनुसार ’डीएस गुणवत्ता’ असलेल्या सळईचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अमेरिका, युरोप येथे डक्टिलिटी आणि शक्तीच्या संतुलनाला खूप महत्त्व दिले जाते. आज देशभरात उंच पूल, बहुमजली इमारती आणि भव्य बांधकाम प्रकल्पांची कामे विद्युतवेगाने सुरू आहेत. या बांधकामांमध्ये सळ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येते. एखाद्या मोठ्या बांधकामाचे भवितव्य हे त्याच्या सळ्यांच्या मजबुतीवरच टिकून असते. योग्य प्रकारच्या सळईची निवड अतिशय महत्त्वाची असते. कारण, सळ्यांच्या दर्जावरच बांधकामाची गुणवत्ता टिकून असते. ’डीएस’ उत्पादनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने हे उत्पादन बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पसंतीस पडले आहे. बेजोड मजबुती आणि हवी तशी लवचीकता असलेल्या ’डीएस’ सळ्यांना अभियंत्यांसह बांधकाम क्षेत्रात मोठी मागणी आहे.
 
 
दीर्घकाळाची वाटचाल
 
1991 मध्ये जालना एमआयडीसीमध्ये 25 टन प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेली छोटी रोलिंग मिल स्थापन करण्यात आली. त्याकाळात सळईला तेवढी मागणी नव्हती अन् उठावही नव्हता. आरसीसी बांधकाम क्वचित केले जायचे. शिवाय गुणवत्तेच्या निकषावर बाजारपेठेत नागपूर, नाशिकपेक्षा जालन्यातील सळईला दुय्यम मानले जायचे. त्यामुळे सुरुवातीचा काळ अतिशय खडतर होता. पुढे बांधकाम उद्योगाचा विस्तार झाला आणि जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे मध्यमवर्गाची संपत्ती वाढल्याने बांधकाम क्षेत्राची भरभराट झाली. शहरांमध्ये गगनचुंबी इमारती आकार घेऊ लागल्या आणि बांधकाम क्षेत्र व्यापक झाले. कंपनीच्या प्रगतीला पूरक असलेल्या दर्जेदार स्टीललाही महत्त्व प्राप्त झाले.
 

Icon Steel 
 
2003 मध्ये, कंपनी फायदेशीर ठरली आणि MIDC प्लॉट क्रमांक R-12 येथे एक मोठा कारखाना सुरू केला, ज्याची उत्पादन क्षमता प्रतिदिन 300 टन होती. कंपनीने ब्रँडिंग, दर्जेदार उत्पादने आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आणि प्रशिक्षणाद्वारे डीलर्सचे नेटवर्क तयार केले. या मजबूत पायामुळे कंपनीला दुय्यम कंपन्यांमध्ये देशातील सर्वात मोठी रोलिंग मिल म्हणून स्थापित करण्यात मदत झाली.
 
 
Icon Steel
 
नवनवे तंत्रज्ञान स्वीकारण्यावर कंपनीचा नेहमीच भर राहिला. स्टील प्लँट आणि रोलिंग मिलची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. एकीकडे बिलेट बनत जाते, तर दुसरीकडे रोल होत जाते. अशी दुहेरी प्रक्रिया व्हायची, त्यामुळे उत्पादन खर्च वाढायचा, तसेच प्रदूषणही जास्त व्हायचे. यावर कंपनीने डायरेक्ट रोलिंग हे नवे तंत्रज्ञान अमलात आणले. साधारण 2015 चा काळ होता. काहीसे मंदीचे वातावरण होते. स्टील मार्केटची परिस्थिती ठीक नव्हती. बँकांनी अर्थसहाय्य करण्यास नकार दिला होता. त्यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच खासगी क्षेत्रातून कर्ज घेत कंपनीने नव्या प्लांटची निर्मिती केली. त्यानंतर 500 टन प्रतिदिन इतकी क्षमता झाली. त्यानंतर 2018मध्ये विस्तार करण्यात आला आणि उत्पादन क्षमता प्रतिदिन 1000 टन इतकी वाढविली गेली. सध्या मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामे होत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी घरांचे बांधकाम वाढत आहे. शासनाच्या तशा योजना तयार होत आहेत. यातून बांधकाम क्षेत्र अधिक वाढत जाणार आहे. हे लक्षात घेऊन भविष्यात 2000 टन उत्पादन क्षमता करण्याचा संकल्प असल्याचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी यांनी सांगितले.
 
 
बदलांचे साक्षीदार
 
कंपनीने व्यवसायात अनेक बदल पाहिले. नव्या बदलांची तयारीही केली. गुणवत्तेला मार्केटिंगची जोड देत पूर्णक्षमतेने नवे बदल स्वीकारले. अत्यंत कठोर मेहनत घेणारे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी यांनी 17-18 वर्षे महाराष्ट्रभर मार्केटिंग केले. ग्राहकांना काय हवे आहे? बांधकाम व्यावसायिकांच्या अपेक्षा काय आहेत? इंजिनिअर यांचे काय म्हणणे आहे? याचा त्यांनी संपूर्ण अभ्यास केला.
 

Icon Steel 
 
सक्षम नेतृत्व
 
व्यवसायनिपुण असे नेतृत्व ’आयकॉन स्टील’ला मिळाले आहे. व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी हे कंपनीची धुरा सांभाळत असून, जगदीश राठी आणि संजय राठी हे संचालक आहेत. दिनेश राठी हे एका यशस्वी व्यापारी आणि उद्योजक कुटुंबातले. वडिलांच्या कापड व्यवसायात त्यांनी मार्केटिंगचे बाळकडू घेतले. त्यांच्या वडिलांचा कापडाचा घाऊक व्यवसाय होता. गावोगावी जाऊन मार्केटिंग करणे ही त्यांची जबाबदारी होती. या व्यवसायात मार्केटिंगच्या क्षेत्रात अनुभव मिळाल्यामुळे ब्रँडिंग विषयात त्यांची विशेष रुची विकसित झाली. मार्केटिंग करणार्‍या प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य असते. आपल्या उत्पादनाचे ग्राहकाकडून झालेले कौतुक हीच त्याच्यासाठी समाधानाची पोचपावती असते आणि त्यासाठी आवश्यक असतो तो उत्पादनाचा दर्जा. दर्जेदारपणाचे हे धडे दिनेश राठी यांनी अगदी सुरुवातीलाच गिरविले होते. त्यामुळे दर्जा आणि विश्वासार्हता हाच त्यांचा ध्यास बनला. वडिलांचा कापड व्यवसाय असला तरी पोलाद उद्योगाशी ते चांगल्यारीतीने जोडले गेले आणि त्यातूनच ते बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या सळ्यांच्या उत्पादन क्षेत्रातील ’आयकॉन’ बनले.
 

Icon Steel 
 
तज्ज्ञांच्या संशोधनातून असे झाले बदल..!
 
मागील दोन-तीन वर्षांपासून आयकॉन स्टील कंपनीने गुणवत्ता वाढीवर अधिक भर देत नवीन ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी तज्ज्ञांची टीम तयार केली होती. यात प्रामुख्याने आयआयटी कॉलेजचे तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्वांच्या मदतीने कंपनीच्या अद्ययावत प्रयोगशाळेत सळईवर संशोधन करून ’डीएस सळई’चा फार्म्युला तयार करण्यात आला. ’डीएस सळई’ तयार करण्यासाठी पाणी हा घटक अतिमहत्त्वपूर्ण असल्याने कंपनीत आर.ओ. प्लँट बसविला आहे. सळई निर्मितीत बिलेटच्या तापमानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तापमान नियंत्रणासाठी फर्नेस उभारून त्यासाठी लागणारे अत्याधुनिक पी.एल.सी. येथे बसविण्यात आले. गुणवत्तेला प्राधान्य हे तत्त्व पहिल्यापासूनच अंगीकारल्याने ’डीएस’ तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अत्युच्च प्रयत्न करण्यात आले.
 

Icon Steel 
 
मेहनतीचे फळ - ब्रँड म्हणून ओळख
 
दिनेश राठी यांनी सक्षमपणे आपल्या अनुभवातून तीन मोठे ब्रँड निर्माण केले. प्रत्येक ब्रँड यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या प्रत्येक घटकाने प्रचंड मेहनत घेतली. नवे संशोधन व तंत्रज्ञान अंगिकारले. स्वतःच्या उत्पादनात गुणवत्तावाढ करण्यासाठी स्वतः संशोधन केले. त्यासाठी मोठी गुंतवणूक केली. प्रसंगी झीज सोसली. त्याचेच फळ आज कंपनीला मिळते आहे.
 
आज ’आयकॉन स्टील’ आणि ’डीएस सळई’ हा बांधकाम क्षेत्रातील सळ्यांचा मोठा ब्रँड निर्माण झाला आहे. सुप्रसिद्ध सिनेकलाकार अमिताभ बच्चन हे आयकॉन स्टील’ आणि ’डीएस सळई उत्पादनाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत.
 
सामाजिक कामात पुढाकार
 
कंपनीने केवळ व्यवसायावर आणि नफ्यावर लक्ष केंद्रित न करता अनेक सामाजिक कार्यांत उल्लेखनीय सहभाग घेतला आहे. जलसंधारण, वृक्षारोपण, डेन्स फॉरेस्ट निर्मिती असे पर्यावरणविषयक प्रकल्प कंपनीने हाती घेतले. तसेच ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा उपक्रम राबविला. कोरोना काळात आपल्या कर्मचार्‍यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. कंपनीत कार्यरत असलेल्या लोकांसाठी ’आयकॉन स्टील’ने कोरोना लसीकरणाचा उपक्रम हाती राबविला. ’आयकॉन स्टील’च्या वतीने सिव्हिल इंजिनिअर्स, बांधकाम क्षेत्रातील मिस्त्री यांच्यासाठी प्रशिक्षण आणि सेमिनारचेदेखील आयोजन केले. या उपक्रमाद्वारे बांधकामामध्ये गुणवत्तापूर्ण स्टीलची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले.
 
लेख संकलन - सुशांत डोके