देवर्षि नारद पुरस्काराने सा.विवेकच्या संपादक कविता (अश्विनी) मयेकर सन्मानित!

    17-Jun-2025
Total Views |



पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी विश्व संवाद केंद्र मुंबईतर्फे दिला जाणारा देवर्षि नारद पुरस्कार यंदा साप्ताहिक विवेकच्या संपादक कविता (अश्विनी) मयेकर यांना देण्यात आला. या पुरस्काराचे हे यंदाचे 25वे वर्ष आहे. त्या निमित्ताने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया अशा प्रसारमाध्यमांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 11 जणांचा सन्मान करण्यात आला.