.....म्हणून मी संघात आहे

विवेक मराठी    28-Jul-2025
Total Views |
संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर, स्वानुभव लेखन स्पर्धा
 
rss
संघशताब्दीचे औचित्य साधत, स्वानुभवलेखन स्पर्धा साप्ताहिक विवेक आयोजित करत आहे. ही स्पर्धा संघस्वयंसेवकांबरोबरच संघपरिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून संघकार्याशी जोडल्या गेलेल्या सर्व स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांसाठीही खुली आहे. 
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, साप्ताहिक विवेकचे माजी संपादक, ज्येष्ठ विचारवंत-स्वयंसेवक रमेशजी पतंगे यांचे ’आम्ही संघात का आहोत...’ हे विचारप्रवण करणारे पुस्तक अलीकडेच संघशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित झाले. संघकार्य करता करता स्वयंसेवक कसा घडतो, प्रेयसाकडून श्रेयसाकडे त्याचा प्रवास कसा चालू होतो याची पुस्तकात दिलेली उदाहरणे वाचकाला अंतर्मुख करतात. स्वानुभवाशी ताडून पाहायला प्रेरित करतात. विचारांना नवी झळाळी देतात. या पार्श्वभूमीवर आणि संघशताब्दीचे औचित्य साधत, स्वानुभवलेखन स्पर्धा साप्ताहिक विवेक आयोजित करत आहे. ही स्पर्धा संघस्वयंसेवकांबरोबरच संघपरिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून संघकार्याशी जोडल्या गेलेल्या सर्व स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांसाठीही खुली आहे.
 
यात रा.स्व.संघाचा इतिहास सांगणे अपेक्षित नाही. तो या स्पर्धेचा हेतूच नाही, हे लक्षात घ्यावे.
 
संघकामातून आपल्या गाठीशी असलेल्या अनेक चिरस्मरणीय आठवणींमधून महत्त्वाच्या 1/2 आठवणी शब्दबद्ध करायच्या आहेत. त्यासाठी शब्दमर्यादा आहे, 700 ते 900 शब्दांची. हे लेखन 30 ऑगस्टपर्यंत 2025 पर्यंत साप्ताहिक विवेकच्या vivekedit@gmail.com वर युनिकोडमध्ये पाठवायचे आहे. मेल केल्यावर 9594962304 या क्रमांकावर आपल्या नावासहित (फक्त) व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करावा. मेलमध्ये, स्वानुभव लेखन स्पर्धेसाठी असा स्पष्ट उल्लेख असावा. तसेच पत्त्यासहित आपले पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक नमूद केलेला असावा.
 
 
संघविचारांच्या प्रकाशात स्वत:मध्ये झालेला बदल, त्याचे प्रत्यक्ष कृतीत उमटलेले प्रतिबिंब, संघकार्यामुळे मिळालेली नवी जीवनदृष्टी, त्यातून संघकार्याशी आजन्म जोडले राहण्याची मिळालेली प्रेरणा... याबाबतची ही आठवण असावी.
 
 
निवड समितीने निवडलेले तीन सर्वोत्कृष्ट लेख दिवाळी अंकात प्रकाशित होतील. उर्वरित लेखांपैकी लक्षवेधी लेख साप्ताहिक विवेकच्या नियमित अंकातून शताब्दी वर्षाची सांगता होईपर्यंत प्रकाशित केले जातील.
 
 
तर, काही निवडक लेख फक्त नेट आवृत्तीत घेतले जातील.
 
सर्वोत्कृष्ट तीन लेखांना सन्मानपत्रासह पारितोषिके असतील.
  
प्रथम क्रमांक
सा. विवेकचे सन्माननीय वर्गणीदार + ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथभेट
द्वितीय क्रमांक
सा. विवेकचे सन्माननीय वर्गणीदार +
‘आम्ही संघात का आहोत?’ पुस्तकभेट
तृतीय क्रमांक
सा. विवेकचे सन्माननीय वर्गणीदार + ‘संघभाव’ पुस्तकभेट