गुरू सामर्थ्य

09 Jul 2025 16:29:52

rss
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परंपरेचे जसे जतन केले आहे, तसेच कालानुरूप त्यात नवीन आशय भरला. कार्य दीर्घकाळ चालायचे असेल तर कार्य व्यक्तिनिष्ठ होता कामा नये, ते तत्त्वनिष्ठ असले पाहिजे. ते मूल्यनिष्ठ असले पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर संघाचे गुरुपद सोपवून हे होणे शक्य नाही. व्यक्ती कितीही महान असली तरीही त्यात काही ना काही दोष सापडतातच. त्यामुळे सर्वोच्च आदर्श हा परिपूर्ण निर्दोष असावा लागतो. म्हणून संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवून तत्त्वनिष्ठेचा मार्ग स्वीकारलेला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही शंभर टक्के आध्यात्मिक संघटना नाही. आध्यात्मिक संघटनेचा अर्थ होतो, एक दर्शन विचार. तो प्रथम मांडणारा थोर पुरुष मनुष्यजीवनाचे अंतिम लक्ष्य कोणते हे विशद करणारा तत्त्वविचार, दर्शन आणि अनुभव घेणारी एक परंपरा, त्यातून निर्माण झालेले निश्चित स्वरूपाचे कर्मकांड या सर्वांचा मेळ म्हणजे आध्यात्मिक संघटना. या सर्व गुणवैशिष्ट्याने संघ आध्यात्मिक संघटना नाही.
 
 
संघ ही प्रवृत्तीमार्गी संघटना आहे. प्रवृत्तीमार्गी संघटना म्हणजे ज्या संघटनेचा कार्यक्रम समाजोपयोगी वेगवेगळी कर्मे निरंतर करीत राहाणे. संघस्वयंसेवक हे काम संघाच्या माध्यमातूनही करतात आणि संघविचारातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या संघटनांतूनही करतात. या कामाचा अंतिम हेतू जीवन्मुक्त होणे, मोक्ष अथवा निर्वाण प्राप्त करणे असा नाही. राष्ट्र बलवान करणे, समृद्ध करणे आणि विश्वात राष्ट्राला सन्मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे संघकार्याचे उद्दिष्ट आहे.
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
 
 
 
आध्यात्मिक संघटनेला गुरुची आवश्यकता असते. आध्यात्म मार्गात साधना करावी लागते. साधनेचा अभ्यास करावा लागतो. चंचल मनावर नियंत्रण मिळवावे लागते. माणसाची इंद्रिये बाहेर धावत असतात, त्यांना अंतर्मुख करावे लागते. यावर प्रवचने देऊन शून्य उपयोग असतो. त्याचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावा लागतो. म्हणून आध्यात्म मार्गात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परमेश्वर आणि गुरू दोघं एकाच वेळी समोर आले तर अगोदर गुरुचे पाय धरायचे, कारण गुरुमुळे ईश्वरदर्शन होते अशा अर्थाचा एक दोहा आहे. आध्यात्म मार्गातील गुरू महात्म्याविषयी जे लिहिले गेले आहे, ते सर्व जर एकत्र केले तर कैक हजार पृष्ठांचा ग्रंथ होईल.
 
प्रवृत्तीमार्गी संघटनेत गुरूची गरज काय? संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सांगितले की, भगवा ध्वज आपला गुरू आहे आणि तो संघात सर्वश्रेष्ठ आहे. 
 
प्रवृत्तीमार्गी संघटनेत गुरूची गरज काय? संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सांगितले की, भगवा ध्वज आपला गुरू आहे आणि तो संघात सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा डॉक्टरांनी हे सांगितले तेव्हा संघ खूप लहान होता. संघात येणारे देखील लहान मुले आणि तरुण होते. त्यांनी भगवा ध्वज गुरू कसा याच्या बौद्धिक कसरती केल्या नाहीत. सर्वांनी ते मान्य केले. यानंतर भगवा ध्वज आपला गुरू कसा, यावर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांसहित सर्वांनी विवेचन केले आहे.
 
 
स्वतःला विद्वान आणि अभ्यासक म्हणविणारे असंख्य विद्वान आणि राजनेतेही आहेत. राजनेत्यांची संघविषयक मुक्ताफळे येथे देण्याचा मोह टाळतो. या विषयाच्या संदर्भात त्यांची दखल घ्यावी असे मला वाटत नाही. भगव्या ध्वजाला गुरूस्थानी ठेवून संघाने दोन गोष्टी केल्या आहेत, 1) प्राचीन परंपरेचे पालन केले आणि 2) कालानुरूप नवीन आशय देण्याचे काम केले.
 
 
भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या निर्वाणाच्या क्षणी आनंद याने प्रश्न विचारला की, तुमच्यानंतर या संघाचा शास्ता कोण? भगवंतांनी उत्तर दिले,“आत्म दीपो भव”! गुरूनानक देव यांनी शीख पंथांची स्थापना केली. गुरूगोविंदसिंग हे दहावे नानक मानले जातात. त्यानंतर गुरुचे स्थान गुरू ग्रंथसाहेब या ग्रंथाकडे आले. तो अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. गुरू गोविंदसिंग यांच्या निर्वाणालादेखील तीनशेहून अधिक वर्षे झाली आहेत. शीख पंथाची वाटचाल गुरू ग्रंथसाहेबाच्या मनन-चिंतनाने उत्तम चालू आहे. ज्ञानदेव माऊलींनी वारकरी पंथाची पायाभरणी केली. ते स्वतः त्याचे नेते झाले नाहीत. वारकरी पंथाची वाटचाल सुमारे आठशे वर्षे अव्याहत चालू आहे.
 
 
नाथ संप्रदायाने निर्गुण आणि निराकाराची उपासना सांगितली. त्यांची नवनाथांची परंपरा आहे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ अशी ही परंपरा चालू राहिली. भगवान गौतम बुद्ध असो, शीख पंथ असो, की नाथ संप्रदाय असो, या सर्वांनी काही गोष्टी समान सांगितलेल्या आहेत. विश्व संचालन करणारी एक शक्ती आहे. ती सर्वव्यापक आहे. सर्व जीवसृष्टीत तिचे अस्तित्व आहे. मनुष्याने सदाचरणी असले पाहिजे. विकारांवर विजय मिळविला पाहिजे, मनोनिग्रह केला पाहिजे. कुठल्याही प्रकारची जातीचे बंधने पाळता कामा नयेत. स्त्री-जातीचा सन्मान केला पाहिजे.
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ईश्वराला मानणारा संघ आहे. संघाने ईश्वराला कोणतेही नाव दिलेले नाही. संघाच्या प्रार्थनेत त्याला प्रभो शक्तिमान म्हटलेले आहे आणि त्या प्रभोचेच कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत असे म्हटले आहे. वर दिलेले कार्य हे ईश्वरी कार्य आहे. संघ वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून हेच काम करीत आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परंपरेचे जसे जतन केले आहे, तसेच कालानुरूप त्यात नवीन आशय भरला. कार्य दीर्घकाळ चालायचे असेल तर कार्य व्यक्तिनिष्ठ होता कामा नये, ते तत्त्वनिष्ठ असले पाहिजे. ते मूल्यनिष्ठ असले पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर संघाचे गुरुपद सोपवून हे होणे शक्य नाही. व्यक्ती कितीही महान असली तरीही माणूस हा विकारवश प्राणी आहे, त्यात काही ना काही दोष सापडतातच. सर्वोच्च आदर्श हा परिपूर्ण निर्दोष असावा लागतो. संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवून तत्त्वनिष्ठेचा मार्ग स्वीकारलेला आहे.
 
 
आपल्या समाजाची मनोवृत्ती व्यक्तीच्या मागे धावण्याची असते. स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेले बहुतेक नेते लोकांच्या आदरास पात्र झाले. सामाजिक आंदोलनातून उभे राहिलेले नेतेदेखील लोकादरास पात्र झाले. हा आदर अंधश्रद्धेत कधी परावर्तित झाला हे लोकांना समजलेदेखील नाही. आमचा सर्वोच्च नेता सर्वगुणसंपन्न आहे, त्याचेच म्हणणे शंभर टक्के खरे आहे, म्हणून त्याचेच अनुसरण केले पाहिजे ही प्रवृत्ती झाली. तिचा अनुभव आपण सातत्याने घेत असतो.
 
 
संघ या दोषापासून शतप्रतिशत दूर आहे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरूजी संघस्वयंसेवकाच्या परमश्रद्धेचे विषय आहेत, पण त्यांचे अंधानुकरण करण्याचे विषय नाहीत. संघस्वयंसेवक ‘आत्म दीपो भव‘ हा मंत्र जगत असतो. ज्या गोष्टी डॉक्टरांच्या आणि गुरूजींच्या काळातही झाल्या नाहीत, पण त्या गोष्टी आताच्या परिस्थितीमध्ये करणे आवश्यक आहे, तेव्हा स्वयंसेवक त्या गोष्टी करू लागतो. तो असा विषय करीत नाही की, सर्वज्ञ डॉ. हेडगेवार, सर्वज्ञ श्रीगुरूजी यांना या गोष्टी कशा दिसल्या नाहीत? तो आपल्या कामाची बीजे त्यांच्या विचारात शोधत राहतो.
 
 
गोरखनाथ यांचे अप्रतिम भजन आहे आणि ते कुमार गंधर्व यांनी अतिशय तन्मयतेने गायले आहे. भावसमाधी लागण्याचे सामर्थ्य त्यांच्या गायनात आहे. या भजनाचे बोल -
 
गुरूजी मैं तो एक निरंजन ध्याऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,
दुःख ना जानूँ जी मैं दर्द ना जानूँ जी मैं,
ना कोई वैद्य बुलाऊँ जी,
सद्गुरू वैद्य मिले अविनाशी,
वाको ही नाडी बताऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,
आणि शेवटच्या कडव्यात म्हणतात, 
‘कहे गोरख जी सुनहो मच्छिंद्र मैं ज्योती मैं ज्योती मिलाऊँ जी’
 
 
गोरखनाथाांचे हे भजन गुरुंना उद्देशून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षाचा प्रवास हा गुरुभक्तीचा प्रवास आहे. गोरखनाथजी ज्याप्रमाणे म्हणतात की, गुरूजी मेें तो एक निरंजन ध्याऊँ जी, दूजे के संग नहीं जाऊँ जी, स्वयंसेवकांच्या दृष्टीने निरंजन म्हणजे एकच संघध्येय. हे ध्येय म्हणजे भारतमातेला परमवैभवाला घेऊन जाण्याचे. दुसरा कुठला ध्यास नाही. या मार्गावरून चालताना अनेक वाटा फुटतात, समाजवाद, साम्यवाद, सेक्युलरवाद, वगैरे वगैरे या कुठल्याही मार्गाने जायचे नाही. एका निरंजन ध्येयाचा ध्यास धरायचा.
 
 
दुःख, दर्द, जे काही होईल ते सहन करीत जायचे. बाहेरच्या कोणाचीही कसलीही मदत घ्यायची नाही. एकच सद्गुरू आहे तो म्हणजे भगवा ध्वज, त्याच्याकडूनच प्रेरणा घ्यायची. आपली नाडीपरीक्षाही त्यालाच करायला लावायची. असे करता करता गोरखनाथ यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘ज्योती में ज्योती मिलाऊँ जी’ संंघ आणि मी याचं अभेद्य नातं निर्माण करायचं. कसं, तर ज्योतीत ज्योत मिळल्यासारखं. म्हणजे मी पणा सोडायचा, अहंकार सोडायचा, ‘मी’ तून ‘आम्ही’ व्हायचं. करायचं आपणच सर्व, पण वाणीतून शब्द काढायचे हे संघकार्य आहे, मी केलं असं नाही, संघाने माझ्याकडून करवून घेतलं.
 
 
गुरू भगव्या ध्वजाचं हे सामर्थ्य आहे. संघाच्या शतकी वाटचालीमध्ये ते स्वयंसेवकांना सांगायची गरज नाही, पण संघाविषयी अकलेचे तारे तोडणार्‍यांनी याचे थोडेतरी मनन-चिंतन करावे. त्यातून त्यांना अल्पबोध व्हायला काही हरकत नाही.
Powered By Sangraha 9.0