साज गणरायाचा

28 Aug 2025 15:11:10
पु. ना. गाडगीळ आणि सन्स
गणेशोत्सव अधिक मंगलमय
करण्यासाठी कटिबद्ध
 
png jewellers 
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेले गणराज. त्याच्या आगमनापूर्वीच जय्यत तयारी सुरू होते. केवळ सजावटीपुरती ती राहत नाही तर गणरायाला सजवण्यासाठी सराफांच्या दुकानांत आभूषणे आणि पूजेच्या साहित्य खरेदीची लगबग सुरू होते. ही खरेदी करताना पारदर्शकता, शुद्धता आणि प्रामाणिक व्यवहार असलेल्या सराफांकडे जाणे ग्राहक पसंत करतो. पु. ना. गाडगीळ  सराफ हे त्यापैकी एक.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडसाठी सुवर्ण हा फक्त मौल्यवान धातू नसून तो आमच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मागील 190 वर्षांहून अधिक काळ आम्ही ही परंपरा आणि संस्कृती जपली आहे. आमच्यासाठी प्रत्येक दागिना हा केवळ अलंकार नसून ग्राहकाच्या विश्वासाचा आरसा आहे. म्हणूनच सुवर्णालंकारनिर्मितीत पारदर्शकता, शुद्धता आणि प्रामाणिक व्यवहार जपण्याला आम्ही सर्वोच्च महत्त्व देतो. आम्ही नेहमी 18 कॅरेट आणि 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वापर करूनच दागिने घडवतो आणि प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्कचे चिन्ह असते. कामगार आणि कारागिरांना सन्मानाने वागवणे, त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करणे हा देखील आमच्या नैतिकतेचा अविभाज्य भाग आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना, त्यांना योग्य किंमत आणि त्यांच्याशी प्रामाणिक व्यवहार करणे हे आमच्या व्यवसायाचे अधिष्ठान आहे. सुवर्णालंकारनिर्मिती हा आमच्यासाठी केवळ उद्योग नाही, तर परंपरा, विश्वास आणि नात्यांची ती शुद्ध परंपरा आहे, जी आम्ही प्रत्येक पिढीतून पुढे नेत आहोत. जपतो आहोत.
 
 
श्रीगणेशाच्या स्वागतासाठी आणि पूजेसाठी पारंपरिक सुवर्ण तसेच रौप्य अलंकारांची खास घडणावळ आम्ही करतो. गणपती बाप्पाच्या अलंकारासाठी खास सोन्याचे मुकुट, कानातील कुंडले, हार, बाजूबंद, पैंजण आणि कंठमणी यांची पारंपरिक मागणी नेहमीच असते. लहान-मोठ्या गणेशमूर्तींसाठी आकारमानानुसार विशेष दागिने घडवले जातात. पारंपरिक मोरमुकुट, रत्नजडित हार, मोत्यांच्या माळा, तसेच हिरे-माणिक जडवलेले छोटे दागिनेही लोकप्रिय आहेत. याशिवाय काही भक्त गणपती बाप्पासाठी सोन्याचे सिंहासन, मुकुटावरील रत्नजडित कलश आणि शेंदूरपेटी यांसारख्या वस्तूंची ऑर्डर देतात. विशेष म्हणजे, चांदीतील छोटे अलंकार व चांदीच्या पैंजणांना देखील मोठी मागणी असते. गणेशोत्सवात भक्तीभावनेने सजावट करत असल्यामुळे या पारंपरिक दागिन्यांना नेहमीच प्रचंड मागणी असते.
 

png jewellers 
 
श्रीगणेश पूजेकरिता सोन्या-चांदीतील पूजा साहित्याची परंपरा आम्ही विशेष जपली आहे. गणेशपूजेसाठी आवश्यक असलेल्या घंटा, थाळी, पळस, ताम्हण, पाट, अभिषेकपात्र, कलश, दिवे, धूप-दीपासाठी लागणारी पात्रे या वस्तूंची सुवर्ण आणि रौप्यधातूत आम्ही निर्मिती करतो. विशेषतः चांदीची मूर्ती, चांदीचे पान, दुर्वा, मोदक, तसेच आरतीसाठी चांदीचा वा सोन्याचा दिवा यांना नेहमीच मागणी असते. काही भक्त श्रीगणेशाला बसविण्यासाठी सोन्या-चांदीचे छोटे सिंहासन, पायपीठ आणि मंडपदेखील घडवून घेतात. पूजा साहित्यामध्ये ‘आरती थाळी’ व ‘पंचारती दिवा’ ही वस्तू खास लोकप्रिय आहेत. गणेशोत्सव हा भक्तिभाव आणि समृद्धीचा उत्सव असल्यामुळे, घराघरात सोन्या-चांदीतील पूजासाहित्य घेण्याची परंपरा जपली जाते. त्यामुळे सुवर्ण व रौप्य पूजा साहित्याची घडणावळ ही आमच्या व्यवसायातील महत्त्वाची परंपरा ठरली आहे.
 
या वर्षी गणेशोत्सवासाठी आम्ही खास सुवर्ण मोदक आणि रौप्य कलश या अनोख्या वस्तू तयार केल्या आहेत. बाप्पाला मोदक अर्पण करण्याची परंपरा असल्यामुळे सुवर्ण मोदक भाविकांमध्ये खास लोकप्रिय होत आहे. दुसरी विशेष निर्मिती म्हणजे रौप्य कलश - हा कलश शुद्ध चांदीचा असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. हा कलश पूजेत अभिषेक वा जलार्पणासाठी वापरता येतो. आमच्या कारागिरांच्या कौशल्यातून आणि आधुनिक तंत्रज्ञानातून या वस्तूंची निर्मिती केली गेली आहे. यामध्ये पारंपरिक सौंदर्य, शुद्धता आणि आधुनिकतेची सुंदर सांगड घातली आहे. त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव भक्तांसाठी आणखी मंगलमय होईल.
सौजन्य - पुरुषोत्तम नारायण गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स, प्रभादेवी शाखा
Powered By Sangraha 9.0