पालिका स्तरावर प्रत्यक्ष विकासकामांचे आजवरचे विकासाचे दाखले देत दिल्या गेलेल्या आश्वासनावर सर्वसामान्य मतदारांनी विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी भाजपा युती प्रयत्न करेल अशी आशा आहे. सर्व विजयी उमेदवारांचे आणि बहुमताच्या बळावर सत्तासूत्रे हाती घेत असलेल्या युतीतील घटक पक्षांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांच्या परिसरातली राखली गेलेली पारंपरिक मते आणि चिथावणीखोर भाषणांनी वळवलेली मुस्लीमबहुल भागातली मुस्लीम मते एवढीच यांची कमाई! यातून काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला धक्का लागला इतकेच यांचे कर्तृत्व. आपल्या उद्धट आणि अविचारी बोलण्यातून त्यांनी मुंबईतील अन्य भाषिकांचा रोष ओढवून घेतला त्याचाही फटका बसला. अदानींसारख्या उद्योजकांवर तोंडसुख घेतले पण आपण जे बोलतो आहोत त्याला छेद देणारी अनेक उदाहरणे आहेत याचा विसर पडला. थोडक्यात ही टीकाही अंगाशी आली. निकालातून हेच स्पष्ट दिसत आहे. तेव्हा, या नंतरही सत्तेच्या राजकारणात सक्रिय राहण्याची इच्छा असेल तर दोघे बंधू कठोर आत्मपरिक्षण करण्याचे कष्ट घेतील आणि स्वत:त तसेच कार्यपद्धतीतही बदल घडवतील अशी आशा करूया.
केंद्रात आणि राज्यात सत्तेची सूत्रे हाती असलेल्या भाजपाच्याच हाती सत्तासूत्रे सोपविण्याचा समंजस निर्णय राज्यातल्या 29 महापालिका क्षेत्रातल्या मतदारांनी घेतला. हा निर्णय केवळ समंजस नाही तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने विकासाभिमुख धोरणे आखून त्यांची जी चोख अंमलबजावणी केली त्या विकासावर सामूहिक शहाणपणाने केलेले शिक्कामोर्तब आहे.
एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतका मोठा अर्थसंकल्प असणारी मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वांत श्रीमंत महानगरपालिका. जी मुंबई नगरी देशाची आर्थिक राजधानी समजली जाते, जी या राज्याची राजधानी आहे अशा महानगरपालिकेत सत्ता मात्र अन्यांच्या हाती होती. या सत्ताधार्यांनी पोकळ आश्वासनांपलीकडे या महानगरीच्या भल्याचे काम केल्याची फारशी उदाहरणे नाहीत. त्यातच गेली 4 वर्षे प्रशासकाच्या हाती कारभार असल्याने सगळा आनंदीआनंदच होता. त्यामुळे राज्यातल्या सत्ताधारी फडणवीस सरकारसह सर्वच जण या महानगरपालिकेच्या निवडणुकीची आणि त्या माध्यमातून सत्ताबदलाची प्रतीक्षा करत होते.
या महानगरपालिकेबरोबरच राज्यातल्या आणखी 28 महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या. चार महापालिका वगळता भाजपा युतीला सर्वत्र भरघोस यश मिळाले. (या 4 महापालिका हातातून का गेल्या यावर पक्षात चिंतन होईल याची खात्री आहे.) या आधी झालेल्या 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्येही भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला उत्तम यश मिळाले. या यशाने हुरळून न जाता त्यांनी 29 महापालिकांसाठी भक्कम मोर्चेबांधणी केली. नियोजनबद्ध प्रचार सभा घेतल्या. राज्याचा कारभार पाहतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनी झंझावाती दौरे केले. अवास्तव आश्वासन देण्याऐवजी जे केले आहे त्याची उजळणी मतदारांसमोर केली. झालेला विकास मतदारांना दिसत होता, अनुभवला होता. पोकळ बातांनी घटकाभर करमणूक करणार्या ठाकरे बंधुंच्या वाचाळपणापेक्षा गांभीर्याने राज्यकारभार करणार्या भाजपा-शिवसेनेच्या युतीला मतदारांनी सुस्पष्ट कौल दिला. देशापेक्षा, राज्यापेक्षा महापालिका स्तरावरचे प्रश्न वेगळे असतात आणि अशा निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीला पाहून मतदान होते असा एक समज आहे. पण या महापालिका निवडणूक निकालांनी त्यालाही छेद दिला असे म्हणता येईल. केंद्र, राज्य आणि महापालिका स्तरावर एका विचाराने काम करणारी मंडळी असतील तर विकासाच्या गतीचा वेग वाढेल, हे कळण्याएवढी महाराष्ट्राची जनता विचारी आहे हेच या निवडणूक निकालांनी अधोरेखित केले आहे.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या 2 ते 4 वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महानगरपालिका, 246 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासन हाकत होते. सुरुवातीला कोरोना महामारी, मग बदललेल्या प्रभाग रचना आणि प्रभागांमध्ये झालेली वाढ, त्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या होत्या. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आणि निवडणुकांचे वारे राज्यात वाहू लागले.
पालिका स्तरावर प्रत्यक्ष विकासकामांचे आजवरचे विकासाचे दाखले देत दिल्या गेलेल्या आश्वासनावर सर्वसामान्य मतदारांनी विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी भाजपा युती प्रयत्न करेल अशी आशा आहे. सर्व विजयी उमेदवारांचे आणि बहुमताच्या बळावर सत्तासूत्रे हाती घेत असलेल्या युतीतील घटक पक्षांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
मराठीचा मुद्दा उचलायचा की हिंदुंचा? या पेचात सापडलेल्या ठाकरे बंधुंच्या सभांना गर्दी होते ती, एकतर जमवलेली असते किंवा सर्वसामान्य लोक त्या सभांना औटघटकेच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहतात असे आता म्हणता येईल. सलग दोन दशके वडिलांच्या कृपेने मिळालेली महापालिकेची सत्ता राखायलाही काही किमान गुणांची अपेक्षा असते याचे भानही नसलेले मोठे ठाकरे आणि एकदा हातात आलेली नाशिकची महापालिकाही पुन्हा राखता न आलेले त्यांचे धाकटे बंधू. करून दाखवले असे म्हणण्याइतकेही काम नावावर जमा नसताना दोघे एकत्र आले. प्रसारमाध्यमातल्या काहींनी या दोघांचे एकत्र येणे ही फार मोठी ऐतिहासिक घटना असल्याचे भासवले. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याच्या, त्यांचे कौटुंबिक सदस्य एकमेकांना भेटण्याच्याही मनोरंजक बातम्या झाल्या. त्यातून फक्त वृत्तवाहिन्यांच्या टिआरपीची सोय झाली. सामान्य मतदार ना प्रसारमाध्यमांच्या दांभिकपणाला भुलला ना यांच्या एकत्र येण्याने हुरळला. तेव्हा, आपण वेगळे राहिलो तरी हरतो आणि एकत्र आलो तरीही हरतोच हे आता त्या दोघांना समजून चुकले असेल. अशा अपरिपक्व नेत्यांच्या एकत्र येण्याने बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच होते हे मतदारांनी त्यांना दाखवून दिले आहे. मतदारांनी मत दिले ते नि:संशय विकासाच्या मुद्द्याला आणि हिंदुहिताचा कृतीशील विचार करणार्या पक्षांना.
बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांच्या परिसरातली राखली गेलेली पारंपरिक मते आणि चिथावणीखोर भाषणांनी वळवलेली मुस्लीमबहुल भागातली मुस्लीम मते एवढीच यांची कमाई! यातून काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला धक्का लागला इतकेच यांचे कर्तृत्व. आपल्या उद्धट आणि अविचारी बोलण्यातून त्यांनी मुंबईतील अन्य भाषिकांचा रोष ओढवून घेतला त्याचाही फटका बसला. अदानींसारख्या उद्योजकांवर तोंडसुख घेतले पण आपण जे बोलतो आहोत त्याला छेद देणारी अनेक उदाहरणे आहेत याचा विसर पडला. थोडक्यात ही टीकाही अंगाशी आली. निकालातून हेच स्पष्ट दिसत आहे. तेव्हा, या नंतरही सत्तेच्या राजकारणात सक्रिय राहण्याची इच्छा असेल तर दोघे बंधू कठोर आत्मपरिक्षण करण्याचे कष्ट घेतील आणि स्वत:त तसेच कार्यपद्धतीतही बदल घडवतील अशी आशा करूया.
डोळ्यांनी दिसणारा विकास आणि त्याच्या बळावर मागितलेली मते यावरच निवडणूक जिंकता येते हे दाखविणारे महापालिकांचे निकाल आहेत. हे यश जसे भाजपा-शिवसेना युतीचे आहे तसे ते मतदारांच्या प्रगल्भतेचेही निदर्शक आहे.