राजेंद्र पंढरपुरे
9623442517
आदित्य काळे (सीईओ) यांची ’एअरॅटिक्स ही भारतातील पहिली मायक्रो वेअरहाउसिंग मार्केटप्लेस आहे. भारतभरात 15 शहरांमध्ये आणि परदेशात नेपाळ आणि दुबई येथे ’एअरॅटिक्स’चा विस्तार झाला आहे.
पुण्यातील उद्योजक आदित्य काळे हे सतत नावीन्याचा शोध घेत असतात. त्यांच्या ’एअरॅटिक्स’ या ’स्टार्टअप’ला केंद्र सरकारचा ’ग्रॅहॅम बेल 2025’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. आदित्य काळे इंडस्ट्रियल वेअर हाउसिंग, हाऊसहोल्ड स्टोअरेज आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ’सामान कक्ष’ (लगेज स्टोअरेज) अशा तीन क्षेत्रांत एकाचवेळी कार्यरत आहेत. त्यांच्या उद्योग क्षेत्राला त्यांनी उत्तम व्यवस्थापनाची जोड दिली आहे. फ्लेक्सिबल स्टोअरेज, ऑन डिमांड स्टोअरेज, कार पार्किंग स्टोअरेज, वैयक्तिक सामानासाठीचे स्टोअरेज अशा कारणांसाठी जागा उपलब्ध करून देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
’एअरॅटिक्स (
www.airattix.com) ही भारतातील पहिली मायक्रो वेअरहाउसिंग मार्केटप्लेस आहे. शहरी भागातील ज्यांच्याकडे अतिरिक्त जागा आहे, त्यांना त्या जागेतून भाडे स्वरूपात उत्पन्न मिळवून द्यायला मदत करणे आणि ज्यांच्याकडे अतिरिक्त सामान आहे, त्यांना ते सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे असे काम ’एअरॅटिक्स’ कंपनी करत आहे. आदित्य काळे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. भारतभरात 15 शहरांमध्ये आणि परदेशात नेपाळ आणि दुबई येथे ’एअरॅटिक्स’चा विस्तार झाला आहे. जागामालकांना उत्पन्नाची हमी मिळत असल्याने भारतात सुमारे 5000 हून अधिक जागामालकांनी ’एअरॅटीक्स’कडे जागांची नोंदणी केलेली आहे. या सेवेसाठी काळे यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. एअरॅटिक्सचे वर्णन ते ’कॉमन मॅन वेअरहाऊस’ असे करतात.
’एअरॅटिक्स’च्या आधी त्यांनी ’इंपिरियल सप्लाय चेन सोल्युशन प्रा.लि.,’ ही कंपनी सुरू केली. इम्पिरियल ही थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स कंपनी असून, ती उत्पादन आणि अभियांत्रिकी कंपन्यांना वेअरहाउसिंग आणि इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट सोल्यूशन ऑफर करते. मोठमोठ्या कंपन्यांकडून त्यांच्या वेअरहाउसिंग कंपनीला मान्यता मिळाली. पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे बंधू, टाटा ऑटोकॉम्प, प्राज, केएसबी, गरवारे टेक्निकल, फायबर्स, बोरोसील, (eka) ग्लोबल, रिलायबल केमिकल्स, रूचिर फुड्स आदी नामांकित कंपन्या त्यांची सेवा घेत आहेत.
इंपिरियल सप्लाय चेन सोल्युशनसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून शरदचंद्र कलगुड यांची नियुक्ती केली आहे. वेअरहाउसिंग क्षेत्रात काळे यांच्याव्यतिरिक्त यशस्वी झालेला मराठी तरुण अपवादानेच असेल. अलीकडेच त्यांनी अयोध्या येथे भाविकांसाठी ’सामान कक्ष’ (लगेज स्टोअरेज) केला आहे. दीड हजार बॅगा ठेवता येतील, एवढी त्याची क्षमता आहे. तीन महिन्यांतच (दिवाळी 2025 मध्ये हे काम सुरू केले) या कक्षाला भाविकांकडून मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. कक्षाच्या जवळच उत्तम असे स्नानगृह असून सामान कक्ष आणि स्नानगृह या सुविधांसाठी माफक शुल्क आकारले जाते. लवकरच उज्जैन आणि वाराणसी येथे असे ’सामान कक्ष’ उघडण्याची त्यांची योजना आहे.
हे तीन व्यवसाय सांभाळण्यासाठी मनुष्यबळ लागते. हे एवढे मनुष्यबळ उभे करून ते जपण्याचे कौशल्यही काळे यांनी सिद्ध केले आहे. योग्य वेतन आणि सवलती हे धोरण त्यांनी त्यांच्या स्टाफसाठी राबवले आहे.
उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी तीन वर्षे आदित्य काळे यांनी नोकरी केली. ते मर्चंट नेव्हीत होते. 2013च्या सुमारास नोकरी सोडून काळे यांनी उद्योग क्षेत्रात करिअर केले. काळे यांचे वडील आर्किटेक्ट आहेत. परंतु आदित्य यांनी व्यवसायासाठी वेगळे क्षेत्र निवडले आणि तिथे ते यशस्वी झाले. त्यांच्या मते घरातच बिझनेस कल्चर असल्याने नोकरी ते उद्योजक हा प्रवास सहजपणे घडला.
केंद्र सरकारच्या विविध योजना, व्यवसायासाठी उत्तर प्रदेशात निर्माण झालेले पोषक वातावरण, महाराष्ट्र सरकारचे उद्योगांना वाव देणारे धोरण अशा कारणांमुळे उद्योगांना चालना मिळाली आहे. नव्या संधींचा फायदा होतकरू तरुणांनाही घ्यावा, त्यांनी धाडस करून नवनवीन क्षेत्रात पदार्पण करून उद्यमशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आदित्य काळे एअरॅटिक्स मुख्य कार्यकारी अधिकारी
Mail ID - info@airattix.com