धर्मे सर्वं प्रतिष्ठितम् - विश्व संघ शिबिर 2025

08 Jan 2026 16:16:03
@श्याम परांडे
 
HSS
 
यंदाचे हिंदू स्वयंसेवक संघाचे (HSS) विश्व संघ शिबीर भाग्यनगर (हैदराबाद) येथील कान्हा शांती वनम् येथे 25 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडले. शिबिराची मध्यवर्ती संकल्पना ‘धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्’ अशी होती. शिबिरादरम्यान नेतृत्व, सेवा, सांस्कृतिक सातत्य आणि वेगाने बदलणार्‍या जगात हिंदू समाजाच्या जबाबदार्‍या या विषयांवरील झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चांना या संकल्पनेने दिशा दिली.
भाग्यनगर (हैदराबाद) येथील कान्हा शांती वनम् येथे 25 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत हिंदू स्वयंसेवक संघाचे (HSS) विश्व संघ शिबीर पार पडले. श्री विश्व निकेतन यांच्या यजमानपदाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या शिबिराला आत्मचिंतन, संवाद, प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणायला हवे. जगभर आपापल्या नोकरी-व्यवसायानिमित्ताने विखुरलेल्या हिंदू नागरिकांचे एक महासंमेलनच या निमित्ताने घडून आले होते. आपल्या मायदेशात होणारे हे शिबीर अनुभवण्यासाठी या काळात जगभरातील हिंदू समाज एकत्र आला होता.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
 
या शिबिरात जगभरातून एकूण 1,611 प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये 1,026 स्वयंसेवक (64%) आणि 585 सेविका (36%) सहभागी झाल्या होत्या. हे सहभागी जगातील सर्व खंडांमधून 79 देशांतील होते. वय आणि जबाबदारीनुसार संतुलित व समावेशक प्रतिनिधित्व या शिबिरात दिसून आले. या शिबिरात 908 कार्यकर्ते, 304 स्वकीय, 193 युवा, 112 किशोर आणि 94 बाल सहभागी झाले होते. या संपूर्ण विविधतेतून पिढ्यान्-पिढ्यांतील संघटनात्मक सातत्य अधोरेखित झाले आणि शिबिराच्या कुटुंबकेंद्रित रचनेचे दर्शनही स्वाभाविकपणे घडले.
 
 
HSS
 
विश्व संघ शिबीर-2025ची मध्यवर्ती संकल्पना धर्मे सर्वं प्रतिष्ठितम् ही होती. ही संकल्पना आपल्याला असे सांगते की, प्रत्येक व्यक्तीचे आचरण, सामाजिक समरसता आणि जागतिक कल्याण यांचा पाया हा धर्मच आहे. आपल्या संस्कृतीची हीच शिकवण आहे आणि हीच गोष्ट या शिबिराने अधोरेखित केली आहे. शिबिरादरम्यान नेतृत्व, सेवा, सांस्कृतिक सातत्य आणि वेगाने बदलणार्‍या जगात हिंदू समाजाच्या जबाबदार्‍या या विषयांवरील झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चांना या संकल्पनेने दिशा दिली.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
 
 
शिबिराची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे, यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच इतर संलग्न हिंदू संघटनांचे प्रतिनिधी यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, धर्म हा भूगोलाच्या पलीकडे जाऊन शांती, समृद्धी आणि संतुलनाचा सार्वत्रिक मार्ग दाखवतो. पुढे इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, हिंदू समाजाने कधीही बळजबरीच्या जोरावर आपल्या धर्माचा विस्तार केला नाही; उलट ज्ञान, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि सांस्कृतिक प्रज्ञा यांचे आदान-प्रदान करून निसर्ग व जगभरातील विविध समाजांशी सुसंवाद साधला.
 
 
आजच्या पिढीला आवाहन करताना त्यांनी हा आपला सांस्कृतिक संदेश आधुनिक भाषा, समकालीन साधने आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगभरात मांडण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जेणेकरून तो आजच्या काळातही सुसंगत राहील.
 
 
धर्माची दृष्टी आणि संघाचे ध्येय हे एकमेकांपासून अविभाज्य आहेत, असे सांगत त्यांनी समाज आणि निसर्गाप्रती मानवाची जबाबदारी अधोरेखित केली. तसेच संघशाखा ही समाजसेवा आणि निसर्गसंवर्धनाची भावना रुजविण्याचे मुख्य केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

HSS 
 
शिबिराच्या धर्मे सर्वं प्रतिष्ठितम् या मध्यवर्ती संकल्पनेवर प्रकाश टाकताना स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या यांनी धर्म म्हणजे मानवी जीवन आणि समाज यातील समतोल साधण्याचा स्रोत म्हणून मांडणी केली. तसेच धर्मामुळे अभ्युदय (भौतिक समृद्धी) आणि निःश्रेयस (आंतरिक परिपूर्णता) दोन्ही साध्य होतात, आणि नैतिक व वैश्विक तत्त्वांचे पालन केल्याशिवाय शांती व विकास अशक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण विश्व धर्माच्या नियमानुसार चालते आणि मानवी समाज त्याच्याशी सुसंगत राहिल्यासच तो फुलतो, असे त्यांनी निरीक्षण नोंदवले.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
 
श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष व आध्यात्मिक मार्गदर्शक आणि कान्हा शांती वनम् यांचे आध्यात्मिक प्रमुख पूज्य श्री दाजी यांनी दररोजच्या सहज ध्यान सत्रांमध्ये स्वत: लक्ष घालून सर्वांना मार्गदर्शन करून या शिबिराला सखोल आध्यात्मिक परिमाण दिले. ही ध्यानसत्रे सहभागींसाठी एक अंतर्मुख करणारा आणि सामूहिक सौहार्द वाढवणारा अनुभव ठरली
 

HSS 
 
आज हिंदू स्वयंसेवक संघ (HSS) जगातील 61 देशांत नियमित उपक्रम राबवित असून, त्याच्या जगभरात 1,750 हून अधिक सक्रिय शाखा कार्यरत आहेत. शिस्तबद्ध शाखा उपक्रम, संघटन बांधणी, सामाजिक नेतृत्व विकास, सेवा उपक्रमांना प्रोत्साहन आणि सांस्कृतिक सहभाग यांच्या माध्यमातून धर्माधारित मूल्यांवर आधारलेले सामाजिकदृष्ट्या जबाबदार व्यक्तिमत्त्व घडवण्याचे कार्य हिंदू स्वयंसेवक संघ करीत आहे.
 
विश्व संघ शिबिर : एक जागतिक परंपरा
 
पाच वर्षांतून एकदा होणारे विश्व संघ शिबिर हे सामायिक शिक्षण, अनुभवांची देवाणघेवाण, संघटनात्मक सुसूत्रता आणि सांस्कृतिक सातत्य यासाठी जागतिक व्यासपीठ ठरते.
 
 
HSS
 
1990 मध्ये प्रदीपये जगत् सवर्र्म् या संकल्पनेसह सुरू झालेल्या या शिबिरांनी जागतिक संदर्भातील हिंदू समाजाच्या बदलत्या जबाबदार्‍यांचे प्रतिबिंब दाखवले आहे-
 
1990 - बेंगळुरू: प्रदीपये जगत् सर्वम्
 
1995 - कायावरोहण, वडोदरा: संघशक्ती विजयत्रीयम्
 
2000 - केशव सृष्टी, मुंबई: विश्व मंगल हेतवे
 
2005 - गांधीनगर, गुजरात: विश्वधर्म प्रकाशेन विश्वशांती प्रवर्तके
 
2010 - पुणे: हिंदू धर्मो विजयताम्
 
2015 - इंदूर: वयं विश्वं जागरयेम्
 
2025 - भाग्यनगर: धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्
 
शिबिराचे यशस्वी आयोजन मुख्य शिक्षिका संगीता छाबडिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समर्पित चमूने केले. काटेकोर नियोजन, शिस्त आणि संघटनात्मक स्पष्टतेमुळे सर्व सत्रे सुरळीत पार पडली. विशेषतः बालगण कार्यक्रम कल्पकतेने राबविण्यात आले, ज्यामुळे मुलांसाठी आनंददायी व शिक्षणात्मक वातावरण निर्माण झाले.
 
 
शिबिराचा समारोप रविवार, 28 डिसेंबर 2025 रोजी कान्हा शांती वनम् येथे जाहीर कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमाला भाग्यनगर शहर व आसपासच्या जिल्ह्यांतील 20,000 हून अधिक नागरिक उपस्थित होते.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
 
या कार्यक्रमात पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा सर्वांना लाभ झाला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कृष्णा एल्ला, सहसंस्थापक व कार्यकारी अध्यक्ष, भारत बायोटेक, उपस्थित होते. तसेच कमलेश डी. पटेल (दाजी), अध्यक्ष व आध्यात्मिक मार्गदर्शक, श्रीरामचंद्र मिशन यांची उपस्थिती अध्यात्म, विज्ञान आणि सेवेतील सुसंवाद अधोरेखित करणारी ठरली.
स्वयंसेवकांचे जागतिक अंतर्गत संमेलन म्हणून सुरू झालेले हे आयोजन पुढे समावेशक व खुले सार्वजनिक कार्यक्रमात परिवर्तित झाले, ज्यातून शिबिराचा समाजाशी असलेला व्यापक संवाद प्रतिबिंबित झाला.
 
 
दिल्लीस्थित, नोंदणीकृत आणि जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती व वारसा यांचा प्रसार करणार्‍या श्री विश्व निकेतन या संस्थेच्या वतीने आयोजित विश्व संघ शिबिर 2025 चे जागतिक समन्वयन सौमित्र गोखले यांनी केले. त्यांना राम वैद्य, अनिल वरटक आणि राजेंद्रन यांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या योगदानामुळे संपूर्ण कार्यक्रम सुसूत्र, समावेशक आणि सौहार्दपूर्ण रीतीने पार पडला.
Powered By Sangraha 9.0