No Kings

वर्ष 2026 हे अमेरिकन स्वातंत्र्यदिनास 250 वर्षे पूर्ण होत असल्याचे वर्ष आहे. स्वतंत्र अमेरिकेच्या सुरूवातीच्या काळात संकटाच्या छायेत होती, आज अमेरिकन जनता स्वातंत्र्याचा अडीचशे वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करतानादेखील अशाच कसोटीच्या काळातून जात आहे. आज अडीचशे वर्षांनी अमेरिकन जनतेला आणि राज्यकर्त्यांना स्वतंत्र अमेरिकेचे जे संस्थापक-जनक थॉमस पेन या अमेरिकेच्या एका संस्थापक पित्याचे शब्द - ‘स्वतंत्र अमेरिकेचा राजा म्हणजे एकाधिकारशाहीने वागवणारा राज्यकर्ता नसेल तर राज्यघटनेने आणि मूल्याधारित लोकशाही असेल’. परत आठवून व्यवहारात कॉमन सेन्स आणण्याची गरज निर्माण झालेली आहे.
These are the times that try men's souls.
Thomas Paine in ""The American Crisis''
2026, म्हणजे या वर्षी, अमेरिकन स्वातंत्र्यदिनास 250 वर्षे पूर्ण होत आहेत. थॉमस पेन हा एक ब्रिटनमध्ये जन्माला आलेला स्वतंत्र अमेरिकेचे जे संस्थापक-जनक (Founding Fathers) समजले जातात, त्यातील एक होता. जरी 4 जुलै, 1776 साली अमेरिकन स्वातंत्र्ययोद्ध्यांनी 13 राज्ये वेगळी करून स्वातंत्र्याची घोषणा केली असली तरी ब्रिटिशांविरुद्धचे युद्ध चालूच होते, ज्याला क्रांतियुद्ध (Revolutionary War) असे म्हटले जाते. हे युद्ध 1783 ला अधिकृतपणे पॅरिस, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये करार होऊन संपले. त्या वेळेस ब्रिटिशांनी अमेरिकेस स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. या काळात अमेरिकन नागरिकांत काही अंशी उदासीनता आली होती आणि त्यांच्यातील विजिगीषू वृत्ती जागृत करण्याची गरज होती. थॉमस पेन याने ते काम केले. त्यांच्या अमेरिकन क्राईसिस या पत्रकरूपी लेखांनी जनतेमध्ये स्फुरण चढले. त्या लेखाचे पहिले वाक्य वर सुरुवातीस इंग्रजीत उद्धृत केल्याप्रमाणे, हा काळ जनतेच्या कसोटीचा काळ आहे, असे आहे. योगायोगाने आजही अमेरिकन जनता स्वातंत्र्याचा अडीचशे वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करताना अशाच कसोटीच्या काळातून जात आहे.
21 व्या शतकाच्या सुरुवातीस, झालेल्या बुश-गोर निवडणुका, 9/11 दहशतवादी हल्ला इथपासून सुरू झालेली अमेरिकन समाजातील वैचारिक दुही ही हळूहळू वाढतच गेली आहे. ट्रम्प यांच्या दुसर्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसर्या कालावधीत या वैचारिक दुहीने अजून एक वरचे शिखर गाठले आहे. यामध्ये बरोबर कोण आणि चूक कोण हे नीरक्षीर वृत्तीने वेगवेगळे करणे असंभवनीय आहे. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी म्हटल्याप्रमाणे, अंतिम जबाबदारी ही राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्राध्यक्षाची असते. जर आधी ती जबाबदारी ही बुश, ओबामा, बायडेन यांची होऊन गेली असेल तर ती आता ट्रम्प यांची आहे.
ट्रम्प विरोधकांना आणि अनेकजण ज्यांनी रिपब्लिकन्स नसूनही ट्रम्प यांना राष्ट्राची वाटचाल अधिक योग्य दिशेने होऊ शकेल या आशेने मते दिली त्यांना न पटेल अशी आणि अमेरिकन स्वातंत्र्यवृत्तीस अमान्य होईल अशी राष्ट्राध्यक्ष हक्काची पोलादी पकड ट्रम्प दाखवू लागले. त्या पकडीचा उपयोग करून अनेक एकतर्फी निर्णय घेतले गेलेत. इराणवर हल्ला हा त्यातील आत्ताचा ताजा अध्याय. वास्तविक अमेरिकन घटनेप्रमाणे राष्ट्राध्यक्षाला अमेरिकन कॉँग्रेसकडून युद्धाला जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. ट्रम्प यांनी अजूनही तशी परवानगी घेतलेली नाही. त्यांना युद्धात पडल्यापासून तशी परवानगी घेण्यास सहा महीने आहेत. पण ते काय करतील हे कुणालाच माहिती नाही. पण त्यांची एकोऽहम् द्वितीयो नास्ति - न भूतो न भविष्यति वागण्याची पद्धत मात्र, राज्यघटनेने अतिशय सखोल मुळापासून रुजलेल्या लोकशाही व्यवस्था असलेल्या अमेरिकेस आणि अमेरिकन जनतेस, आता निरंकुश राजेशाहीचे एकमार्गी वळण घेत आहे का काय अशी भीती वाटू लागली आहे.
या पूर्वपीठिकेस धरून, मार्च 2026च्या अखेरीस अमेरिकेने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. No Kings या घोषवाक्याखाली देशभरात एकाच दिवशी हजारो ठिकाणी आंदोलनं झाली. 28 मार्च रोजी आयोजित या निदर्शनांनी केवळ राजकीय संदेशच दिला नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांबद्दलची जनजागृती नव्याने अधोरेखित केली.
No Kings- हा साधा पण प्रभावी संदेश होता. सत्ता कोणत्याही एका व्यक्तीकडे केंद्रित होऊ नये हा त्यातील प्रमुख मुद्दा. ही चळवळ 2025मध्ये सुरू झाली आणि काही महिन्यांतच ती देशव्यापी स्वरूपात विकसित झाली.
Indivisible
, 50501, कामगार संघटना आणि प्रगतीशील तसेच सत्ताविरोधी कार्यकर्त्यांच्या व्यापक आघाडीने संपूर्ण अमेरिकेतील पन्नासही राज्यांमध्ये 3,000 हून अधिक आंदोलनांचे आयोजन केले. याशिवाय पॅरिस, लंडन, बर्लिन, मेक्सिको आणि कॅनडा यांसारख्या अनेक देशांमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
हे कार्यक्रम मोठ्या शहरांतील (न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., लॉस एंजेलिस, शिकागो, मिनियापोलिस/सेंट पॉल, सॅन फ्रान्सिस्को, बोस्टन, फिलाडेल्फिया) मोठ्या मोर्चांपासून ते लहान शहरांतील आणि अगदी ग्रामीण किंवा पारंपरिक पुराणमतवादी भागांतील (उदा. आयडाहो, वायोमिंग, यूटा, टेक्सास आणि व्हरमाँटमधील छोटे गाव) छोट्या जमावांपर्यंत पसरलेले होते.
मुख्य प्रवाहातील माध्यमांनुसार ही आंदोलनं प्रामुख्याने शांततेत पार पडली. मोर्चे, फलक, घोषणाबाजी (No kings), संगीत (उदा. Bruce Springsteen यांचे कार्यक्रम किंवा प्रेरित सादरीकरणे), तसेच Bernie Sanders, Jane Fonda आणि स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. काही ठिकाणी किरकोळ घटना, जसे की लहान चकमकी किंवा प्रतिआंदोलन करणारे गट दिसून आले.
आयोजकांच्या अंदाजानुसार 8 ते 9 दशलक्ष (80-90 लाख) लोकांनी सहभाग घेतला, ज्याला काही स्रोतांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे एकदिवसीय आंदोलन म्हटले. स्वतंत्र पडताळणी (उदा. जमाव मोजणी प्रकल्पांद्वारे) अजून सुरू होती, पण न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी. आणि ट्विन सिटीजमध्ये लाखोंच्या संख्येने गर्दी झाल्याचे अहवाल होते.
आंदोलनामागील प्रमुख मुद्दे / तक्रारी
स्थलांतर अंमलबजावणी (Immigration enforcement)
आक्रमक Immigration and Customs Enforcement (ICE) कारवाया, निर्वासन प्रक्रिया, आणि अमेरिकन नागरिक/निरीक्षकांवर गोळीबार किंवा मृत्यू झाल्याच्या नोंदवलेल्या घटना (उदा., मिनेसोटातील Renee Good, Keith Porter Jr., Alex Pretti यांसारखी प्रकरणे) अशा अनेक गोष्टी आहेत.
2026 मधील अमेरिका-इराण संघर्ष
लष्करी हस्तक्षेपावर टीका, झालेली जीवितहानी, आणि त्यातून निर्माण झालेला आर्थिक परिणाम जसे की पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी वाढ (उदा. प्रति गॅलन सुमारे 4 पर्यंत वाढ).
व्यापक सामाजिक आणि आर्थिक चिंता
महागाईची झळ आता जीवनावश्यक वस्तूंनाही बसू लागली आहे. अमेरिकन उजव्या विचारांचे विशेष करून ट्रम्पसमर्थक - हे सगळे नसले, तरी बातम्या देण्यापुरत्या संख्येने वांशिक अथवा स्थलांतरितांच्या विरोधात बोलणे वागणे करताना दिसत असल्याने काळजीचे वातावरण तयार झाले आहे.
अमेरिकन मतदान प्रणालीमध्ये निवडणूक ओळख पत्र हा प्रकार नाही. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोग असा प्रकार अस्तित्वात नाही. राज्याराज्यांचे नियम वेगळे असू शकतात. कुठचेच ओळखपत्र न दाखवता मतदान करता येते, विशेष करून जी पारंपरिक डेमोक्रॅटिक राज्ये आहेत तिथे. अर्थातच त्यामुळे काही बेकायदेशीर मतदान सहज होऊ शकते. म्हणून रिपब्लिकन्सचा आणि ट्रम्प यांचा त्याला रास्त विरोध आहे. पण तो विरोध ज्या पद्धतीने दाखवला जात आहे त्यामुळे दुहीच्या आगीत दोन्हीकडून तेलच ओतले जात आहे.
या आंदोलनाचा परिणाम झाला का?
1. प्रतीकात्मक आणि दृश्यमान परिणाम
या आंदोलनांना CNN, NYT, Guardian, AP, NPR इत्यादी प्रमुख माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आणि डेमोक्रॅटिक विचारसरणीच्या शहरांबरोबरच काही रिपब्लिकन/उपनगरी भागांमध्येही व्यापक असंतोष असल्याचे अधोरेखित झाले. या आंदोलनांनी प्रगतीशील आघाड्यांची संघटनात्मक क्षमता दाखवून दिली आणि परदेशातील एकात्मता कार्यक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले.
2. राजकीय गती (Political Momentum)
आयोजकांना अपेक्षा होती की, या आंदोलनांमुळे दीर्घकालीन विरोधाची उभारणी होईल आणि धोरणनिर्मात्यांवर दबाव निर्माण होईल. यापूर्वीच्या फेर्या अमेरिकेच्या अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी मानल्या गेल्या आहेत. काही स्थानिक स्तरावरील कृती विशिष्ट मुद्द्यांवर केंद्रित होत्या, जसे की नवीन खउए केंद्रांना विरोध. मात्र पुढील दिवसात ट्रम्प प्रशासनाकडून कोणत्याही मोठ्या धोरणात्मक बदलांची तात्काळ नोंद झाली नव्हती.
3. प्रशासनाची प्रतिक्रिया
व्हाईट हाऊस आणि रिपब्लिकन नेत्यांनी या आंदोलनांना Trump Derangementअसे संबोधून त्यांची उपेक्षा केली. कोणतीही मोठी सवलत किंवा धोरण बदल जाहीर झाला नाही.
4. प्रत्यक्ष परिणामांवरील मर्यादा
अल्पकालीन धोरणात्मक बदल (विशेषतः स्थलांतर किंवा परराष्ट्र धोरण) घडवून आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कायदेशीर लढाया किंवा निवडणुकीतील बदल आवश्यक असतात. काही उजव्या विचारसरणीच्या टीकाकारांनी या आंदोलनांना कृत्रिमरीत्या उभारलेले (astroturfed) किंवा अतिशयोक्तीपूर्ण म्हटले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या किरकोळ घटना नोंदवल्या गेल्या, पण त्या एकूण आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
थोडक्यात
28 मार्च 2026 रोजीचे No Kings आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर, विकेंद्रित आणि प्रभावी विरोधाचे उदाहरण होते. 2025 मधील आंदोलनांच्या लाटेचा हा विस्तार होता. या आंदोलनांनी मोठ्या संख्येने लोकांना एकत्र आणले.
परंतु तात्काळ धोरणात्मक परिणाम स्पष्ट दिसले नाहीत. विविध माध्यमांनी या आंदोलनांचे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विश्लेषण केले - काहींनी त्याचा व्यापक प्रभाव आणि योग्यतेवर भर दिला, तर काहींनी त्याच्या वित्तपुरवठा आणि मर्यादित लोकसमर्थनावर प्रश्न उपस्थित केले.
यांचा परिणाम जनजागृतीसाठी होत आहे. ट्रम्प आणि रिपब्लिकन्सचे पारंपारिक विरोधक जे अमेरिकन डावे आहेत त्यांना या निमित्ताने लवकरच येणार असलेल्या नोव्हेंबर मधील सिनेट आणि हाऊसमध्ये रिपब्लिकन्सचे बहुमत घालवण्यात होऊ शकतो.
थॉमस पेनने जसे क्रांतियुद्धाच्या वेळेस The American Crisis हे लेख लिहिले तसेच स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळेस कॉमन सेन्स नावाचे लेख लिहिले, संकलित केले. त्यात त्याने नव्याने जन्माला येणार्या लोकशाहीचा भक्कम पाया असलेल्या राष्ट्राच्या नागरिकांना आणि राज्यकर्त्याना उद्देशून लिहिले होते, But where, says some, is the King of America? I'll tell you. Friend, he reigns above, and doth not make havoc on mankind like the Royal Brute of Britain. म्हणजे व्यावहारिक अर्थाने म्हणायचे झाले तर, स्वतंत्र अमेरिकेला राजा म्हणजे एकाधिकारशाहीने वागवणारा राज्यकर्ता नसेल तर राज्यघटनेने आणि मूल्याधारित लोकशाही असेल. आज अडीचशे वर्षांनी अमेरिकन जनतेला आणि राज्यकर्त्याना थॉमस पेन या अमेरिकेच्या एका संस्थापक पित्याचे शब्द परत आठवून व्यवहारात कॉमन सेन्स आणण्याची गरज निर्माण झालेली आहे.