कुंदाताई फाटक यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त

विवेक मराठी    19-May-2026
Total Views |
 
मुंबई : महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनाने सन 2022-23 मध्ये जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महाराष्ट्रदिनी 1 मे 2026 रोजी गृहिणी विद्यालयाच्या सर्वेसर्वा श्रीमती कुंदाताई फाटक यांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
 
 
vivek
 
पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि निधी असे होते. मंत्री- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थित व मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला व बालविकास क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल हा पुरस्कार श्रीमती कुंदाताईंना प्राप्त झाला. मिळालेली पुरस्काराची रक्कम कुंदाताईंनी गृहिणी विद्यालयाला देण्याचे जाहीर केले आहे.