डॉ. क. कृ. क्षीरसागर
9422080865
निसर्गचक्र आणि मानवी अन्नाचा 80 टक्के वाटा सुरक्षित ठेवण्यात मधमाश्यांचे परागीकरणाचे कार्य मोलाचे आहे. याच इवल्याशा जिवाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनातील त्याची भूमिका अधोरेखित करण्यासाठी 20 मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मधमाशी संपली, तर मानवजात चारच वर्षांत संपेल’ हा आईन्स्टाईन यांचा इशारा या जिवाचे गांभीर्य स्पष्ट करतो.
भारताला मध आणि मधमाशा यांचा परिचय फार प्राचीन काळापासून आहे. नवजात बालकाचे उष्टावण चांदीच्या पळीने मध देऊन करण्याची प्रथा पारंपरिक आहे. लग्न सोहळ्यात जावयाचा सन्मान मधुपर्क समारंभात थाटामाटाने केला जाई. आयुर्वेदात औषधोपचाराचे माध्यम मध असे. प्राचीन गुंफा, संस्कृत वेदकालीन वाड्.मय, शिलालेख यांमध्ये मधाचा व मधमाश्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे ज्येष्ठ पुरातत्व-शास्त्रज्ञ डॉ. वि.श्री. वाकणकर यांनी भोपाळ जवळच्या भीमबेटका येथील गुंफांचा शोध लावला. तेथील गुंफा चित्रांची कालगणना इ.स.पूर्वी 15000 ते 11000 येथपर्यंत पोहोचते. येथील गुंफा चित्रांत मधमाशीच्या पोळ्यातून कसे मध संकलन केले जाई हे दर्शविले आहे. तीच पद्धत आजही आदिवासी वापरतात. उपनिषदांपैकी प्रश्नोपनिषदात मधमाश्यांंच्या मोहळातील त्यांच्या कौटुंबिक रचनेचे वर्णन येते. असे असले तरी मधमाशीपालनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांची सुरुवात भारतात व्हायला विसावे शतक उजाडावे लागले.
1910च्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे रेव्हरंड न्यूटन यांनी पोळी बसविण्याच्या सुट्या लाकडी चौकटींच्या पेटीत मोहळ बसविण्याचा प्रयत्न यशस्वी केला. प्रारंभीच्या भारतात विविध ठिकाणच्या अशा प्रयत्नांमध्ये रेव्हरंड स्पेन्सर हॅच, स्वामी शांभवानंद (रामकृष्ण मिशन), एच. विश्वनाथन, एस.के. कल्लापूर या दक्षिणेतील व्यक्तींचा उल्लेख करावा लागेल. उत्तरेत आर.एन. मुटू, प्रा. एस.जी. दासगुप्ता, अमृतराव घाटगे, टी.सी. राजदान यांचा उल्लेख येतो.
स्वातंत्र्योत्तर काळात या प्रयत्नांना देशव्यापी एकसंध स्वरूप प्राप्त झाले. महात्मा गांधींच्या ग्रामोद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नात मधमाशापालन व्यवसायाचा समावेश झाला. 1953मध्ये मुंबई ग्रामोद्योग समिती व नंतर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने हे प्रकल्प सुरू केले. शेवटी राष्ट्रीय पातळीवर विस्तार केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांमुळे व या आयोगाद्वारेच पुण्यातील आज आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेल्या ’केंद्रीय मधमाशापालन व प्रशिक्षण’ संस्थेची स्थापना केली आणि आधुनिक मधमाशापालन व्यवसायाची भक्कम पायाभरणी झाली.
मधमाशापालन हा फक्त ग्रामीण उद्योग राहिला नाही तर त्याची तांत्रिक गरज भागविण्याची जबाबदारी शहरी व्यावसायिकांनाही उचलावी लागली. या व्यवसायामुळे मध, मेण औषधी गुण असलेले मधमाश्यांचे विष, उच्च पौष्टिक गुण असलेले राजान्न वगैरे उत्पादने मोठ्या प्रमाणात सुरू झाली, त्यांची निर्यातही होऊ लागली. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा म्हणजे मधमाश्यांमुळे कृषी आणि फळपिकांचे उत्पादन वाढले, त्यांची गुणवत्ता सुधारली. आपल्या ताटात येणार्या अन्नाचा 80 टक्के भाग मधमाश्यांच्या परागीकरण सेवेमुळे उपलब्ध होतो. आईन्स्टाईन यांनी हे ओळखून म्हटले होते की मधमाशा नष्ट झाल्यावर सर्व मानवजात चार वर्षांतच नष्ट होईल. मधमाश्यांंचे हे महत्त्व आणि त्यांची पर्यावरण संतुलित ठेवण्यातली व ते समृद्ध करण्यातली भूमिका या विषयाची जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक मधमाशी’ दिन साजरा करण्याचा प्रारंभ झाला. सर्व जगभर तो उत्साहाने साजरा केला जातो. त्याची पार्श्वभूमी उद्बोधक आहे.
हा दिवस स्लोव्हेनिया या देशात 20 मे 1734 रोजी जन्मलेल्या शेतकरी कुटुंबातील अँटन जान्स्का याच्या स्मरणार्थ निवडला गेला. जान्स्का हा अर्वाचीन मधमाशा पालन व्यवसायाचा जनक आहे. त्याने आपल्या शेतीक्षेत्रातील ओळखीच्यांना या व्यवसायाचे महत्त्व सांगितले आणि तंत्रज्ञानात पारंगत केले. 1760मध्ये त्याने जगातील पहिल्या मधमाशा शिक्षण प्रशालेची स्थापना केली. 1769मध्ये त्याने या व्यवसायाला वाहून घेतले. पुढे 1771मध्ये या व्यवसायावरील ऊळीर्लीीीळेप ेप इशशज्ञशशळिपस हे जर्मन भाषेतील जगातील पहिले पुस्तक प्रकाशित केले.
यानंतर 2016 साली ऋअज या जागतिक संघटनेने युरोपीय देशांसाठी एका अधिवेशनाचे आयोजन केले आणि त्यात सर्व प्रतिनिधींनी प्रस्ताव मांडला की 20 मे रोजी जनजागृतीसाठी ‘जागतिक मधमाशी दिन’ जगभर साजरा केला जावा. या प्रस्तावाला आणि आयोजनाला अळिोपवळर या आंतरराष्ट्रीय मधमाशा पालक संघाच्या संस्थेने सक्रिय पाठिंबा दिला. पुढे 2017मध्ये हाच प्रस्ताव ऋअज च्या चाळीसाव्या अधिवेशनात मांडला गेला. 2017मध्येच युएनच्या जनरल असेंब्लीने त्याला मान्यता दिली आणि प्रत्येक वर्षी 20 मे रोजी हा दिवस साजरा होऊ लागला. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला सक्रिय प्रोत्साहन दिले. राष्ट्रपती भवन, प्रांतिक राजभवन, कृषी विद्यालये, महाविद्यालये, कृषी संशोधन संस्था वगैरे सर्वत्र हा दिवस आता साजरा होतो.
प्रत्येक वर्षी या दिवसाचे उद्दिष्ट व विषय जाहीर केला जातो. या वर्षी ’इशश ढेसशींहशी ऋेी झशेश्रिश रपव झश्ररपशीं’ हा विषय जाहीर झाला आहे. सामान्य नागरिकांचे प्रबोधन आणि सहभाग हा दिवस साजरा करण्यासाठी अपेक्षित असतो. जगभर आणि भारतातही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे परागीकरण करणार्या मधमाश्यांच्या जीवनकार्याचा शास्त्रीयदृष्ट्या परिचय होणे, पर्यावरण संतुलनासाठीची त्यांची मोलाची भूमिका समजावून घेऊन त्यांचे पालन करणे, रक्षण करणे ही जबाबदारी समाजाने घेणे अपेक्षित आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी व जनजागृती साधण्यासाठी सार्वजनिक बागा, वने, संस्था या ठिकाणी दिवसभर मेळावे घेणे, मधाचे विविध खाद्यपदार्थ तयार करणे, चित्रे काढणे, व्याख्याने व खेळांचे आयोजन करणे अशा माध्यमांचा उपयोग प्रभावी ठरतो. त्याचप्रमाणे मधमाशा संशोधन संस्थांना भेटी देणे, मधमाश्यांवरील चित्रफिती पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. यामुळे समाजातील सर्व वयोगटाच्या नागरिकांपर्यंत हा विषय योजनापूर्वक पोहोचविता येईल.
- लेखक केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था, पुणे
या संस्थेचे निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत.