rohit pawar political stunt
निमित्ताने रोहित पवार यांचे तीन दिवस छान डाएट झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अनायसे देवदर्शन झाले. याहून फार काही हाती लागले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पवार घराण्याचा राजकीय वारसा लाभलेेले रोहित पवार यांनी पंढरपुरात 12 जून रोजी अन्नत्याग उपोषण केले. मुळात उपोषण म्हणजेच अन्नत्याग, तेव्हा नावातल्या द्विरूक्तीपासूनच स्टंटबाजीला सुरूवात झाली. हे उपोषण कशासाठी होते? तर म्हणे, शेतक-यांच्या हितासाठी. शेतकर्यांना सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीतील जाचक अटी काढाव्यात, सातबारा कोरा करावा, अशा अनेक मागण्या होत्या. या संदर्भात 15 जूनला सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर हे मीडियात गाजवण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले. तीन दिवसांतच उपोषणाला घरघर लागल्याने, हे उपोषण क्रांती करेल अशी काही उतावळ्या पत्रकारांनी केलेली भाकिते खोटी ठरली.
रोहित पवार यांना सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांचा अति उपयोग करत आंदोलन करण्याची सवय आहे. हे उपोषणही अशांपैकीच एक. उपोषणाच्या ठिकाणापासून ते उपोषणासाठी उभारण्यात येणारा मंडपापर्यंत, तसेच रोहित यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या पाठिराख्यांपर्यंत सर्वच बाबतीत अगदी काटेकोर नियोजन केलेले होते. त्यासाठी रोहित पवार यांच्या सोशल मीडिया टीमने खूप कष्ट घेतले होते. रोहित यांची अगदी छोटी कामगिरीही वाढवून सांगणे/दाखवणे हे त्यांच्या या टीमचे मुख्य काम. याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने अनेकदा घेतला आहे.
त्यांचे आंदोलन व्हायरल करणारे समर्थक आणि मराठी मीडियातील काही मंडळी रोहित पवार यांच्याकडून येणा-या ब्रेकिंग न्यूजच्या नेहमीच प्रतीक्षेत असतात. प्रश्न असा आहे की खूप गाजावाजा घडवून आणलेल्या या उपोषणातून रोहित पवार यांनी काय साध्य केले? आपण राजकारणात किती सक्रिय आहोत, आपल्याला शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी किती जाण आणि आस्था आहे तसेच, स्व. अजितदादांनंतर पक्षातला मीच मोठा नेता आहे, त्यांचा खरा वारसदार मीच आहे, हे भासवून देण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षात एकजूट नाही. उबाठाचे नेतृत्व थंडावलेले आहे. तर काँग्रेस गटातटांच्या राजकारणात विभागली गेली आहे. शरद पवार थकले आहेत. त्यामुळे सरकारला विरोध करण्यासाठी लागणारी मोठी ताकद सध्यातरी कोणामध्येच दिसत नाही. अशा परिस्थितीचा फायदा रोहित पवार यांनी नाही घेतला तर ते शरद पवारांचे नातू कसले..?! अजितदादा पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये सर्वमान्य असलेला एकही चेहरा नाही. अजितदादांचा पक्ष वेगळा होता हे खरे; पण दोन्ही पक्षांचे कार्यक्षेत्र, त्यांचा मतदार, त्यांचे विषय हे समान आहेत. त्यामुळे अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी रोहित पवार हा सगळा खटाटोप करत आहेत. अशा उद्योगातून आपली राजकीय प्रतिमा सुधारेल असा त्यांचा कयास असावा. त्यामुळे ते कधी कांद्याच्या आंदोलनात दिसतात, तर कधी काही आंदोलन करत असतात. लोकशाहीत आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार असला तरी रोहित पवार यांचे आंदोलन म्हणजे एक स्टंटबाजी असते. आंदोलन, उपोषण ही शस्त्रे खूप मोठी आहेत. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी या शस्त्रांचा वापर करून सरकारला त्यावर तोडगा काढण्यासाठी बाध्य करायचे असते. मात्र विधानसभेतील एखादा आमदार विधानसभा अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची तड लावू शकतो. अधिवेशनात प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधता येते. त्या प्रश्नाची मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना तत्काळ दखल घ्यावी लागते. रोहित पवार यांना स्टंटबाजीत रस असल्याने, हा मार्ग न चोखाळता त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. (मंत्री संजय शिरसाठ यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी डाएट म्हणून उपोषण केले असेल.)
श्रीक्षेत्र पंढरपूरच का?
महाराष्ट्रातील पंढरपूर असे तीर्थक्षेत्र आहे जिथे श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज लाखो भाविक येत असतात. तेथील मध्यवर्ती ठिकाणी असलेला ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ रोहित पवार यांनी उपोषणासाठी निवडला. पोलिसांनी तेथील वाहतूक खोळंबू नये याबरोबरच अन्य काही अटी घालत त्यांना उपोषणाला परवानगी दिली. या परवानगीने रोहित यांचा एक हेतू सफल झाला. चौकात उपोषण आरंभल्याने महाराष्ट्रातून येणारे लाखो भाविकांना अनायसेच यांचे उपोषण दिसणार होते. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठीचे हे आंदोलन त्यांच्यापर्यंत अगदी सहज पोहोचणार होते. याची चाचपणी करूनच उपोषणासाठी जागा निश्चित केली होती. त्यांच्या उपोषणाला काही संघटनांनी, राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता. यातून रोहित पवार यांची प्रतिमा थोडी उजळली असे चित्र तयार झाले. महाराष्ट्राच्या शेतकर्यांसाठी लढणारा नेता असे चित्र उभे करण्याचा काही प्रमाणात का होईना प्रयत्न केला गेला.
जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांची पाठ
रोहित पवार यांच्या आंदोलनाकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दोन मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवली होती. माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जयंत पाटील व राष्ट्रवादीचे उथळ नेते जितेंद्र आव्हाड या दोघांनी आंदोलनाकडे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातच दोन गट झाल्याचे दिसून आले. या दोघांनी आंदोलनस्थळी येण्याचे तर टाळलेच; पण सोशल मीडियावर पोस्ट करून पाठिंबा देखील दर्शवला नाही. गेल्या काही दिवसांपासून हा सुप्त संघर्ष दिसून येत आहे. रोहित पवार जेव्हा आंदोलन करतात तेव्हा तिथे आव्हाड आणि जयंत पाटील फिरकत नाहीत.
अजित दादांच्या अपघातानंतर रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीविरोधात रान उठवले, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. पत्रकार परिषदा घेतल्या. पण जयंत पाटील यापासून अलिप्त राहिले. त्यामुळे भविष्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची सूत्रे रोहि awar, hunger strike, A genuine protest or a political stunt, महा त पवार यांच्या हाती आल्यास जयंत पाटील त्या पक्षात राहतील का? राहिले तरी त्यांचे पक्षातील स्थान काय असेल? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत.
काय साध्य केले?
वास्तविक रोहित पवार यांनी अन्नत्याग उपोषण केल्याने सरकारने शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी दिली नाही. तर, मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी असलेल्या अटींसंदर्भात बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय रोहित यांनी घेतला. उपोषणकर्त्यांना अशी आश्वासने देण्याचा प्रदीर्घ अनुभव रोहित यांच्या काका आजोबांना आहे. याची रोहित यांना कल्पना असणारच. म्हणूनच आश्वासने मिळताच उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन संपलेले नसून मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी टिपिकल राजकीय भूमिका रोहित पवार यांनी घेतली.
त्या निमित्ताने रोहित पवार यांचे तीन दिवस छान डाएट झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अनायसे देवदर्शन झाले. याहून फार काही हाती लागले नाही.
तरीही यातून पार्थ आणि जय पवार या अजितदादांच्या पुत्रद्वयांनी धडा घेतला पाहिजे. रोहित पवार यांचे जनमानसातील वाढते राजकीय वजन हा त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. आज अजितदादांच्या पुण्याईने सत्तेचे वलय व ऊब जय आणि पार्थ यांना आहे. त्यामुळे कार्यकर्ते, नेते त्यांच्या जवळ आहेत. पण जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेऊन जायची असेल, रोहित पवार यांचे वाढते राजकीय वजन कमी करायचे असेल तर यापुढे पक्षवाढीसाठी अजितदादांसारखी कसून मेहनत घ्यावी लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. रोहित पवारांची स्टंटबाजी जनता ओळखते. अशा वेळी जर पार्थ आणि जय पवार यांनी अजितदादांचा आदर्श समोर ठेवत, शेतकर्यांच्या बांधावर जाऊन काम केले, त्यांच्या समस्या सोडवल्या, त्यांना आपलेसे केले तर नक्कीच पक्षासोबतच पक्षाचे नेते म्हणून ते दोघे मोठे होऊ शकतात.
...नाहीतर काका आजोबांनी नातवाचे प्यादे चालवत केलेल्या या धूर्त राजकारणामुळे पार्थ व जय यांच्या राजकीय अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते...