सीजेपी आंदोलनाच्या निमित्ताने तथाकथित आंबेडकरवाद्यांचा वैचारिक गोंधळ

विवेक मराठी    30-Jul-2026
Total Views |
@अ‍ॅड. क्षितिज गायकवाड
 

CJP 
कॉक्रोेच आंदोलन आणि तथाकथित आंबेडकरवादी यांची युती ही पण या वैचारिक गोंधळाचाच एक भाग. जेथे शिव्या, द्वेष, बीभत्स वर्तन व अराजक वृत्ती असेल तिथे बाबासाहेबांचा विचार असू शकत नाही. खर्‍या आंबेडकरवादी जनतेने अशा नेत्यांपासून लांब रहायला हवे.
15 मे 2026ला भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान बनावट पदवीच्या आधारे वकीली व्यवसायात प्रवेश केलेल्या तरुणांवर भाष्य करताना म्हटले की,’देशात आधीच बांडगुळं आहेत जी देशातील व्यवस्थेवर हल्ला करत असतात व जे निकामी तरुण आहेत ते आयुष्यात काही जमत नाही म्हणून झुरळांप्रमाणे इकडेतिकडे घुसून स्वतःच्या अपयशाचा राग जो मिळेल त्याच्यावर काढतात.’ हे सरन्यायाधीशांचे निरीक्षण समाजमाध्यमांवर आले आणि मग काय, निकामी लोकांनी लगेच स्वत:वर ओढवून घेतले की, आम्हाला झुरळ म्हणाले. मग अमेरिकेतील काही भारतीय झुरळे अभिमानाने सांगायला लागली की होय आम्ही झुरळे आहोत. बाकी त्यानंतर काय झाले, कशी आंदोलने झाली, दिल्लीतील हिंसाचार, तेथील विचित्र दिसणारे काही आंदोलक, शिवीगाळ व विद्यार्थ्यांच्या मागण्या व्यतिरिक्त सर्व काही कसे झाले हे आपल्याला माहीत आहेच. परदेशी देणग्या नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने कायदा करण्याचे ठरवले आणि हे आंदोलन पेटले, असो...आपण याला योगायोग समजूया.
 
या आंदोलनाविषयी सुरुवातीला बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणार्‍या तथाकथित आंबेडकरवाद्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काही जण म्हणाले की, दिपके हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पेरलेला माणूस आहे तर काही जणांनी त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी जाऊन त्याला आंबेडकरवादी असण्याचे प्रमाणपत्र दिले. हा वैचारिक गोंधळ का उत्पन्न होतो? याचे एकमेव कारण म्हणजे द्वेषावर आधारित चळवळ आज उभी राहिली आहे, नव्हे ती तशी जाणीवपूर्वक षडयंत्र करून बनवली गेली आहे. आपल्या समाजाची प्रगती व प्रतिष्ठा कशी वाढेल यासाठी काही न करता रोज उठून हिंदूंना शिव्या घालणारे व कारण नसताना सगळीकडे कसं वाईट चाललंय असं सांगणारे नेते निर्माण केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचा खोटा शत्रू रंगवण्यात आला व संघाशी किमान चर्चादेखील करू नये इतका द्वेष समाजात निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. जो स्वत:ला हिंदू म्हणून घेतो तो आपला शत्रू आहे असा विचार पेरून हिंदूद्वेषी समाज निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न झाला व अजूनही चालू आहे. अनुसूचित जातीजमातींमध्ये इतर हिंदूंबद्दल इतका द्वेष निर्माण करायचा की ते कम्युनिस्ट आणि मुस्लीम लोकांचा चारा झाले पाहिजेत असा चंग या डाव्या विचारसरणीने बांधलेला आहे. वास्तविक पाहता स्वतः बाबासाहेब म्हणतात की, मुसलमान हे केवळ मुसलमानांचे बंधू होऊ शकतात आणि असंच आहे. मग आपण आपल्या समाजातील समस्या सोडवण्याऐवजी मुसलमानांची फुकट वकिली का करतो याचं आत्मचिंतन करायला हवं.
 

CJP 
 
मुळात मला खर्‍या अर्थाने बाबासाहेबांना मानणार्‍या सर्वांना व खास करून तरुणांना हे विचारायचे आहे की बाबासाहेबांना द्वेषाचे प्रतीक बनवू पाहणार्‍यांना आपण कधी ओळखणार? आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी जाणीवपूर्वक कम्युनिस्ट विचारवंतांच्या हातात महापुरुषांचे लिखाण व साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी दिली आणि तिथूनच या सगळ्या गलिच्छ राजकारणाची सुरुवात झाली. संदर्भ न घेता कोणतेही वाक्य कुठेही वापरून बाबासाहेब कसे हिंदूविरोधी होते व जणू काही हिंदू म्हटल्यावर त्यांचा राग अनावर व्हायचा अशी मांडणी करायचा जणू पायंडाच पडला. काही अति थोर विचारवंत तर बाबासाहेबांच्या ख हर्रींश पे ोींहशीश्ररपव या उद्विग्न होऊन केलेल्या भाष्याचा बाबासाहेबांचे देशावर प्रेमच नव्हते, असे सांगायला कचरत नाहीत. मी नेहमी सांगत असतो की, बाबासाहेबांविषयी कुणी काय लिहिले हे वाचाण्यापेक्षा बाबासाहेबांनी स्वतः काय लिहिले आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे ते वाचा. वाचण्याचा कंटाळा असेल तर थोडा तर्क लावा. प्रत्येकाने बाबासाहेबांनी निष्कर्ष काय दिला हे जाणून घ्यायला हवे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन
लेखक : पद्मश्री रमेश पतंगे


बाबासाहेबांच्या चळवळीचा एक निष्कर्ष म्हणजे संविधान आणि दुसरा बुद्ध आहे आणि जो महामानव आपल्याला बुद्ध देऊन गेला त्या महामानवाच्या मनात द्वेष असू शकतो का? संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949 रोजी दिलेल्या भाषणात बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की, आता अराजकाला वाव नाही, विनाकारण आंदोलने व सत्याग्रह हे लोकशाहीसाठी चांगले नाही. याच भाषणात बाबासाहेब म्हणतात की, या संविधानाला सर्वात जास्त विरोध हा समाजवादी व साम्यवाद्यांनी केला. याच भाषणात बाबासाहेब म्हणतात की, पुढील पिढीला संविधानात बदल करण्याचे अधिकार मिळाले नाही तर हा देश मृत लोकांचा देश होईल, असं असताना कुणीही येऊन आपली माथी भडकवून संविधान बदलतील असा बिनबुडाचा आरोप करून जातो आणि आपण त्याला बळी पडतो ही खरी शोकांतिका आहे. कुणाला बाकी काही वाचायला वेळ नसेल तर किमान बाबासाहेबांचे हे भाषण नक्कीच वाचावे. आज आपण बाबासाहेबांना जे अभिप्रेत होते, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला जातोय. प्रत्येक नेता जणू काही आपणच बाबासाहेब आहोत असं वावरतो. देशात कुठेही आंदोलन झाले की, तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व संविधानाची प्रत घेऊन नाचायची जणू फॅशन झाली आहे. कॉक्रोेच आंदोलन आणि तथाकथित आंबेडकरवादी यांची युती ही पण या वैचारिक गोंधळाचाच एक भाग. जेथे शिव्या, द्वेष, बीभत्स वर्तन व अराजक वृत्ती असेल तिथे बाबासाहेबांचा विचार असूच शकत नाही. खर्‍या आंबेडकरवादी जनतेने अशा नेत्यांपासून लांब रहायला हवे. वास्तविक पाहता कुठलाही नेता आपलं कल्याण करू शकत नाही. आपण बुद्धाच्या मार्गाने जाऊन स्वतःचे कल्याण कशात आहे याचा विचार करायला हवा. नेत्यांच्या नादी लागून पिढ्या बरबाद होत आहेत. कुठल्याही आंदोलनात पोलीस कारवाई झाली तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. शेवटी एवढीच विनंती की बाबासाहेबांनी जो बुद्ध दिला त्या बुद्धाच्या मार्गाने जाऊन शांतपणे विचार करायला शिका. स्वयं प्रकाशित व्हा.
 
 
- लेखक भाजपाच्या (अ.जा. मोर्चा)चे
प्रदेश उपाध्यक्ष आहेत.