जगातील सर्व देशांनी अमेरिकेच्या फायद्याचीच धोरणे स्वीकारली पाहिजेत. यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी असलेल्या ‘अमेरिकन डीप स्टेट’नेही आपल्या उद्दिष्टांआड येणारी स्वतंत्र धोरणे आखणार्या देशांना स्वयंविध्वंसासाठी भाग पाडण्याचा मार्गच स्वीकारला आहे. या तंत्रावर हुकूमत असलेल्या डाव्यांशी त्यांनी युती केली आहे. ही युती भारतात सत्ताबदल घडवून आणण्याच्या निर्धाराने कामाला लागली आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी सांगितले की या युतीचे सैनिक असलेल्या ‘दिमागी नक्षल्स’ना ओळखा आणि आयसोलेट करा. असा शब्दप्रयोग जाताजाता केलेला कॅज्युअल उल्लेख नाही, तर अत्यंत विचारपूर्वक दिलेला महत्त्वपूर्ण इशारा आहे.
जंगलातील नक्षलवाद संपला असला तरी ’दिमागी नक्षल्स’ अजून कार्यरत आहेत. त्यांना ओळखणे आणि आयसोलेट करणे आवश्यक आहे. असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आणि ही टोपी ज्यांना फिट्ट बसली, अशा लोकांनी थयथयाट आणि कांगावा करायला सुरुवात केली.
ते असा अपप्रचार करत आहेत की, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान ’दिमागी नक्षल्स’ ठरवत आहेत. हे पूर्णपणे खोटे आहे. विद्यार्थ्यांचे नव्हे, तर त्यांच्या विचारांना आणि मानसिकतेला मॅनिप्युलेट करून त्यांच्या मनात अराजकतावादी, विध्वंसक विचारांची पेरणी करणार्यांचे वर्णन पंतप्रधानांनी ’दिमागी नक्षल्स’ या शब्दांत केले आहे.
’कोणी प्रश्न विचारले तर त्याला तुम्ही ’दिमागी नक्षल’ ठरवणार का?’ असा साळसूद प्रश्न विचारणार्या राजदीप सरदेसाईंना हे माहीत आहे की, प्रश्न अनेक लोक विचारतात. त्यांची उत्तरेही दिली जातात. त्यांना कोणी ’दिमागी नक्षल्स’ म्हणत नाही. तर...
’देशाचे भवितव्य आता संसदेत नाही, तर रस्त्यांवर ठरवले जाईल,’ या शब्दांत अराजकाचे उघड समर्थन करणारे योगेंद्र यादव आहेत ’दिमागी नक्षल’.
काश्मीर हा भारताचा भाग कधीही नव्हता आणि नाही; म्हणून देशाचे तुकडे व्हावे अशी मागणी करणार्या अरुंधती रॉय आहेत ’दिमागी नक्षल’.
देशाच्या न्यायप्रक्रियेतून संसदेवरील हल्ल्याचा गंभीर आरोप सिद्ध झालेल्या अफझल गुरूसाठी ’अफझल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है,’ अशा घोषणा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे जेएनयुमधील प्राध्यापक आहेत ’दिमागी नक्षल्स’.
शेकडो लोकांच्या कत्तली करणारे कसाब आणि याकुब मेमन यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा-पुन्हा याचिका दाखल करणारे मानवतावादाचा बुरखा पांघरलेले ’जिहादी समर्थक’ आहेत ’दिमागी नक्षल्स’.
स्यूडो लिबरल लॉबीने दुसरा एक सोयीस्कर गैरसमज करून घेतला आहे की, ते बुद्धिजीवी (Intellectual) आहेत म्हणून त्यांना ’दिमागी नक्षल्स’ म्हटले जात आहे. हे अर्थातच चुकीचे आहे. बुद्धी असलेले नव्हे, तर इतरांची बुद्धी भ्रष्ट करून तिचे विकृतीकरण करण्याचा जे प्रयत्न करतात ते आहेत ’दिमागी नक्षल्स’.
संविधानाने शांततामय आंदोलनाचा अधिकार दिलेला असतानाही पंतप्रधान आंदोलनकर्त्यांना ’आंदोलनजीवी’ म्हणतात असाही कांगावा केला जातो. एसटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका असे अनेक गट आंदोलने करतात. त्यांना कोणीही आंदोलनजीवी म्हणत नाही; पण सर्वसामान्य जनतेने आपल्या रास्त व न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या प्रत्येक आंदोलनात घुसखोरी करत, त्याला हायजॅक करून हिंसा आणि अराजकाची चिथावणी देणार्यांना पंतप्रधानांनी ’आंदोलनजीवी’ हे चपखल नाव दिले आहे. मूळ आंदोलनाशी वा मागण्यांशी यांचा काहीही संबंध नसतो. त्यांनी भडकवलेल्या ज्वाळांची आग सर्वसामान्य आंदोलनकर्त्यांना पुढे वर्षानुवर्षे भाजून काढते. हे आंदोलनजीवी मात्र मागे वळूनही न पाहता जिभल्या चाटत पुढल्या आंदोलनाकडे चालू लागतात. हे फॅशनेबल ’लिमोझीन लिबरल्स’ म्हणजे पंतप्रधानांनी उल्लेख केलेले ’दिमागी नक्षल्स’.
डावे हे संपूर्ण जगाने आपल्याच विचारांचा स्वीकार केला पाहिजे असा आग्रह धरणारी निरंकुशतावादी विचारधारा आहे. हे साध्य करण्यासाठी मार्क्स, लेनिन, माओ यांनी बंदुकीच्या नळीतून येणार्या रक्तरंजित क्रांतीचा मार्ग सांगितला होता; पण त्याला यश येत नाही म्हटल्यावर देशा-देशांतील लोकांची मानसिकता आणि विचारशक्ती यावर नियंत्रण मिळवून त्यांना स्वयंविध्वंसासाठी (subversion) प्रेरित करायचे अशी योजना आखण्यात आली. इस्लामी जगतात किंवा लष्करी हुकूमशाही असलेल्या देशांमध्ये याप्रकारे शिरकाव करणे शक्य नाही. तेव्हा लोकशाही देशामधील संविधानिक स्वातंत्र्यांचा वापर त्यांच्याविरुद्धच करून तेथील लोकशाही आणि संविधानाचा विध्वंस करायचा आणि अराजकाच्या मार्गाने एकेक देश आपल्या प्रभावाखाली आणायचा ही स्ट्रॅटेजी त्यांनी आत्मसात केली आहे.
हे साध्य करण्यासाठी लोकशाही देशातील दोन प्रकारच्या संस्थांवर ते प्रभुत्व मिळवतात. पहिला प्रकार म्हणजे लोकांच्या मनावर प्रभाव टाकणार्या शिक्षण, मीडिया, चित्रपट, साहित्य यांसारख्या संस्था. अमेरिका, पश्चिम युरोप, भारत येथे या क्षेत्रांवर असलेली डाव्यांची एकाधिकारशाही हा योगायोग नाही, तर दशकानुदशके पद्धतशीरपणे राबवलेली योजना आहे. दुसर्या प्रकारच्या संस्था म्हणजे धोरणांवर प्रभाव टाकणार्या राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था, नोकरशाही यांसारख्या संस्था. मार्क्सवादी पक्षाकडे लोक आकर्षित होणे अशक्य असल्याचे ध्यानात आल्यानंतर प्रत्येक लोकशाही देशातील किमान एक प्रमुख राजकीय पक्ष संपूर्णपणे आपल्या विचारांच्या प्रभावाखाली राहील याची खात्री केली जाते. अर्थात यासाठीही शिक्षण, मीडिया यासारख्या क्षेत्रांवर असलेली हुकूमत उपयुक्त ठरते. आज अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्ष, भारतातील काँग्रेस पक्ष, ब्रिटनमधील लेबर पार्टी हे ’लेफ्ट ऑफ सेंटर’ नाही, तर ’एक्स्ट्रीम लेफ्ट’ पक्ष ठरले आहेत. युपीएससीला बसणार्या तरुणांना प्रशिक्षण देणार्या संस्थांचा अभ्यास केल्यास यांपैकी बहुसंख्य संस्थांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये डाव्या विचारांचे रोपण (Indoctrination) केले जात असल्याचे लक्षात येते.
जंतर मंतरवरील आंदोलनात यांचा प्रामुख्याने सहभाग होता. तिथे ’काश्मीर हा भारताचा भाग कधीच नव्हता’ म्हणणार्या अरुंधती रॉय होत्या; ’आम्ही अराजकतावादी आहोत’ म्हणणारे केजरीवाल आणि सिसोदिया होते; ’भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणार्या उमर खालिदचे आणि चिकन नेकपाशी ईशान्य भारताला देशापासून तोडून टाकण्याची भाषा करणार्या शर्जिल इमामचे समर्थन करणारे 'AISA', 'SFI' या जेएनयुमधील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी होते; ’मेरा जेंडर मेरी मर्जी’ या वोक घोषणा देणारे होते... थोडक्यात म्हणजे ’नीट’ परीक्षेतील पेपरफुटीमुळे ज्यांचे नुकसान झाले ते विद्यार्थी सोडून बाकी सगळा ’दिमागी नक्षल्स’ गोतावळा तिथे जमला होता.

संस्थांमध्ये घुसखोरी करून त्यांना ताब्यात घेण्याचा हा उद्योग आपोआप घडलेला नाही, तर एका घातक, दीर्घकालीन योजने अंतर्गत हे घडविण्यात आले आहे. ही ’कॉन्स्पीरसी थिअरी’ असल्याचे सांगून निकालात काढण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी काही पुरावे बघूया. बंदुकीच्या नळीतून येणारी हिंसक क्रांती सोडून लोकांची सारासार विचारशक्ती पोखरून टाकत देशाला स्वयंविध्वंसाकडे नेण्याची योजना ज्यांच्या सिद्धांतांवर आधारित आहे, त्यात इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष अँटोनिओ ग्राम्स्की आणि फ्रँकफर्ट स्कूल या नावाने प्रसिद्ध असलेला जर्मनीमधील प्राध्यापकांचा एक गट, प्रमुख आहेत. ग्राम्स्की म्हणतो, ''Socialism will triumph by first capturing culture via infiltration of schools, universities, churches and the media by transforming the consciousness of society.'' फ्रँकफर्ट स्कूलचा एक प्राध्यापक मॅक्स हॉर्कहायमर याने ही कार्यपद्धती काय आहे, हे 1930 सालीच सांगून ठेवले आहे. तो म्हणतो, ''The revolution won't happen with guns, rather it will happen incrementally, year by year, generation by generation. We will gradually infiltrate their educational institutions and their political offices, transforming them slowly into Marxist entities.'' तर विली मंझेन्बर्ग अधिकच स्पष्ट शब्दांत सांगतो, ''We must organise the intellectuals and use them to make Western Civilization stink.''
अशाप्रकारे सभ्यता आणि संस्कृती यांची दुर्गंधी यावी यासाठी समाजाची बुद्धी भ्रष्ट करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना म्हणायचे ’दिमागी नक्षल्स’. समाजाला स्वयंविध्वंसासाठी तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्या आठवणी, त्याची ओळख पुसून टाकणे. त्यासाठी त्याची संस्कृती, त्याचा इतिहास नष्ट करणे. त्याचे सण, त्याच्या सांस्कृतिक परंपरा यांच्या विषयी अप्रीती निर्माण करणे, भ्रम निर्माण करणे. मग एक नवी, कचकड्याची दिखाऊ संस्कृती निर्माण करणे. वडीलधार्यांचा आदर, कुटुंबाशी बांधिलकी, सांस्कृतिक मूल्यांचा आणि प्रतिकांचा सन्मान, देशप्रेम या गोष्टी हास्यास्पद ठरवणे आणि मीडिया, मनोरंजन क्षेत्र यांच्या मदतीने एक उथळ ’मास कल्चर’ निर्माण करणे. थोडा विचार केला तर हे सगळे करण्यात सामील असलेल्या भारतातील व्यक्तींची नावे आपल्याला पटापट आठवतील. हीच ती ’दिमागी नक्षल’ टोळी.
जंतर मंतरवरील आंदोलनात यांचा प्रामुख्याने सहभाग होता. तिथे ’काश्मीर हा भारताचा भाग कधीच नव्हता’ म्हणणार्या अरुंधती रॉय होत्या; ’आम्ही अराजकतावादी आहोत’ म्हणणारे केजरीवाल आणि सिसोदिया होते; ’भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणार्या उमर खालिदचे आणि चिकन नेकपाशी ईशान्य भारताला देशापासून तोडून टाकण्याची भाषा करणार्या शर्जिल इमामचे समर्थन करणारे 'AISA', 'SFI' या जेएनयुमधील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी होते; ’मेरा जेंडर मेरी मर्जी’ या वोक घोषणा देणारे होते... थोडक्यात म्हणजे ’नीट’ परीक्षेतील पेपरफुटीमुळे ज्यांचे नुकसान झाले ते विद्यार्थी सोडून बाकी सगळा ’दिमागी नक्षल्स’ गोतावळा तिथे जमला होता. म्हणूनच तिथे सुरक्षा दलाच्या जवानांची कुचेष्टा आणि अपमान करण्यात आला, भारतीय सैन्यदलांविषयी अत्यंत हीन दर्जाच्या कॉमेंट्स आणि हावभाव करण्यात आले, हिडीस नृत्य करण्यात आली...हे करण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिले आणि कोणी त्याचे समर्थन केले हे आठवा. हे आहेत ’दिमागी नक्षल्स.’
सभ्यता आणि संस्कृती यांची दुर्गंधी यावी यासाठी समाजाची बुद्धी भ्रष्ट करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना म्हणायचे ‘दिमागी नक्षल्स’. समाजाला स्वयंविध्वंसासाठी तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्या संस्कृती, त्याचा इतिहास नष्ट करणे. त्याचे सण, त्याच्या सांस्कृतिक परंपरा यांच्या विषयी अप्रीती निर्माण करणे, दिखाऊ संस्कृती निर्माण करणे. वडीलधार्यांचा आदर, कुटुंबाशी बांधिलकी, सांस्कृतिक मूल्यांचा आणि प्रतिकांचा सन्मान, देशप्रेम या गोष्टी हास्यास्पद ठरवणे आणि मीडिया, मनोरंजन क्षेत्र यांच्या मदतीने एक उथळ ‘मास कल्चर’ निर्माण करणे. थोडा विचार केला तर हे सगळे करण्यात सामील असलेल्या भारतातील व्यक्तींची नावे आपल्याला पटापट आठवतील. हीच ती ‘दिमागी नक्षल’ टोळी.
यानंतर झालेल्या झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात मात्र देशविरोधी, फुटीरतावादी लोकांना कुठलेही स्थान देण्यात आले नाही; देशविरोधी घोषणा देण्यात आल्या नाहीत; सुरक्षादलांचा अपमान आणि कुचेष्टा करण्यात आली नाही; वोकिझमने शिकवलेला इस्लामो-लेफ्टिस्ट अजेंडा चालविण्यात आला नाही. कारण हे ’दिमागी नक्षल्स’नी पुरस्कृत केलेले आंदोलन नव्हते, तर हे होते खरेखुरे विद्यार्थी आंदोलन. या विद्यार्थ्यांना कोणीही ’आंदोलनजीवी’ म्हणणार नाही.
या ’दिमागी नक्षल’ कारवाया कोणी ठरवून करत असेल यावर पटकन विश्वास बसत नाही. कारण एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत वाईट वागते असे आपण मानतो. मूळ ध्येय आणि उद्दिष्टच समाजाच्या विध्वंसाचे असेल हे पटणे अवघड असते; पण वर सांगितल्याप्रमाणे मंझेन्बर्ग प्रभुतींनी हे प्रत्यक्ष लिहूनच ठेवले आहे आणि इतर अनेकांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. यासाठी, खोटेपणा करणे; सत्य, तथ्य आणि तर्क यांच्याकडे बिनदिक्कतपणे दुर्लक्ष करून आपण बोललेले असत्य हे सत्यच आहे असे पापणीदेखील न लववता म्हणत राहाणे...याच्याशी निगडित असलेली अपराधित्वाची भावना पुसून टाकावी लागते. हे एकदा साध्य झाले की, सदसद्विवेकबुद्धीची टोचणी बंद होते आणि खरे-खोटे, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक याचा निर्णय कुठल्या वस्तुनिष्ठ निकषावर नाही, तर आपल्या विचारधारेसाठी काय सोयीचे आहे यावर ठरवता येतो. आम्ही म्हणू तोच मानवतावाद आणि विवेकवाद असल्याचे इतरांना आत्मविश्वासाने सांगणे शक्य होते.
यासाठीच वामपंथी विचारधारेच्या सर्व महागुरूंनी नैतिकता ही क्रांतीच्या फायद्यासमोर दुय्यम असल्याचे ठासून सांगितले आहे. लेनिन म्हणतो, ''We say that our morality is wholly subordinated to the interest of the proletariat (कामगारांच्या फायद्यासमोर नैतिकता ही दुय्यम आहे).‘’ ग्राम्स्की व फ्रँकफर्ट स्कूलच्या प्राध्यापकांनी वैचारिक पातळीवर मांडलेल्या योजनेचे प्रत्यक्ष व्यावहारिक पातळीवरील डावपेचात रूपांतर करणारा सॉल लिन्स्की, जहाल चळवळीतील कार्यकर्त्यांचे ’रेड बुक’ ठरलेल्या ’रूल्स फॉर रॅडिकल्स’ या त्याच्या पुस्तकात म्हणतो, ”जहालमतवाद्याची (Radical) आपल्या सदसदविवेकबुद्धीशी तडजोड करण्याची वा तिला भ्रष्ट करण्याची नेहमीच तयारी असली पाहिजे.” एकदा नैतिकता आणि सदसद्विवेकबुद्धी दुय्यम ठरवली की खरे-खोटे, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यांची पर्वा करायचे कारण उरत नाही आणि कशाचेही समर्थन करता येते. वामपंथी लोक धडधडीत खोटे कसे बोलू शकतात आणि शेकडो पुरावे दिल्यानंतरही आपले असत्य प्रतिपादन पुढे कसे रेटू शकतात याचे रहस्य या शिकवणीत दडलेले आहे. हे कळले की, जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्यानंतरच त्यांनी लाठीमार केला, या उघड सत्याकडे दुर्लक्ष करून ’अन्यायविरुद्ध शांततामय आंदोलन करणार्या गरीब बिचार्या, निरागस मुलांना पोलिसांनी निर्दयपणे मारले’ हा नॅरेटिव्ह कसा चालवला जातो आणि त्याच वेळी झारखंडमधील पोलिसांनी कुठल्याही प्रोव्होकेशनशिवाय केलेल्या लाठीमाराकडे दुर्लक्ष कसं केले जाते, हे ध्यानात येते.
लिन्स्कीच्या तेरा रूल्स फॉर रॅडिकल्सपैकी दोन उदाहरणे बघूया. त्याचा पाचवा नियम सांगतो,'Ridicule is the most potent weapon' (उपहास आणि टिंगल हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे). झुरळ पार्टीतील डाव्याविचारांच्या तरुणांनी मोदींना अत्यंत गलिच्छ भाषेत केलेली शिवीगाळ आणि त्याची नक्कल करून राहुल गांधी करत असलेला अचरटपणा यांचे मूळ या शिकवणीत आहे; पण मुळातच रिडिक्युलस असलेल्या लोकांनी केलेली रिडिक्युल प्रभावी ठरत नाही, हे राहुल गांधींना कोणीतरी सांगायची गरज आहे. त्याचा तेरावा नियम सांगतो, ’आपल्या शत्रूच्या विचारांशी लढण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला त्या विचारांचा चेहरा ठरवा आणि तिला अमानवी, जुलमी खलनायक ठरवून तिच्याविरुद्ध समाजाचं ध्रुवीकरण करा.’
या नियमाचे उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अमानवीकरण आणि राक्षसीकरण (dehumanization and demonization) करण्याचा होत असलेला प्रयत्न. या सर्व उदाहरणांवरून हे लक्षात येते की, लोकशाही राष्ट्रांना स्वयंविध्वंसासाठी प्रेरित करून त्यांच्यावर आपले विचार लादण्यासाठी या मंडळींनी किती सखोल विचार आणि विस्तृत तयारी केली आहे. म्हणूनच त्यांनी पांघरलेल्या उदारमतवादाच्या मुखवट्याला न भुलता त्यांचा खरा वामपंथी, अराजकतावादी चेहरा ओळखणे आवश्यक आहे.
जगातील सर्व देशांनी अमेरिकेच्या फायद्याचीच धोरणे स्वीकारली पाहिजेत. यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी असलेल्या ’अमेरिकन डीप स्टेट’नेही आपल्या उद्दिष्टांआड येणारी स्वतंत्र धोरणे आखणार्या देशांना स्वयंविध्वंसासाठी भाग पाडण्याचा मार्गच स्वीकारला आहे. या तंत्रावर हुकूमत असलेल्या डाव्यांशी त्यांनी युती केली आहे. ही युती भारतात सत्ताबदल घडवून आणण्याच्या निर्धाराने कामाला लागली आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी सांगितले की या युतीचे सैनिक असलेल्या ’दिमागी नक्षल्स’ना ओळखा आणि आयसोलेट करा. कारण हे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी, जंगलातील नक्षलवादी, ईशान्य भारतातील फुटीरतावादी या सगळ्या देशविरोधी गटांना संविधानिक स्वातंत्र्याचा गैरवापर करून कव्हरवर देण्याचे काम करतात. देशाची सुरक्षा, अर्थव्यवस्था नागरिकांच्या सुखसोयी यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये अमर्याद अडथळे आणतात. सोशल मीडियाचे अल्गॉरिदम मॅनिप्युलेट करून अधिकाधिक लोकांच्या मनात विद्वेषाची भावना (hatred), बळीची मानसिकता (victimhood), प्रत्येक घटनेचे नकारात्मक आकलन (negative perception) रुजवून देशात अराजक माजविण्याच्या योजनांना चालना देतात. भारताला देशाबाहेरील शत्रूंपासून जितका धोका आहे, त्याहीपेक्षा अधिक धोका अंतर्गत शत्रूंपासून आहे, ज्यांचे वर्णन जनरल बिपिन रावत यांनी ’0.5 फ्रंट’ या शब्दात केले होते.
’दिमागी नक्षल्स’ हा पंतप्रधानांनी जाताजाता केलेला कॅज्युअल उल्लेख नाही, तर अत्यंत विचारपूर्वक दिलेला महत्त्वपूर्ण इशारा आहे.