दिवाळी अंक

आली विकासगंगा अंगणी

डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रत्येक जिल्ह्यात सेवाप्रकल्प उभा राहावा असा संघाने निर्णय घेतला आणि स्थानिक गरजा, स्थानिक साधनसुविधा यांचा अभ्यास करून या प्रकल्पाची सुरुवात करावी आणि त्यात निरंतर नवेनवे आयाम जोडले जावेत, ही अपेक्षा व्यक्त केली. त्या अपेक्षेची पूर्ती म्हणजे 'डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प'...

आम्ही आणि आमचे जीवनलक्ष्य

आम्ही आणि आमचे जीवनलक्ष्य ..

गोष्टीवाला काका

गोष्टीवाला काका..

वैद्यकीय क्षेत्रातील अज्ञात शिलेदार

अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्र हे नोबेल क्षेत्र मानून सेवा देणारे डॉक्टर फारच कमी दिसतात. कोणत्याही भौतिक लाभाच्या किंवा प्रसिध्दीच्या मोहात न पडता आपले आयुष्य वैद्यकीय सेवेसाठी खर्च करणारे डॉ. संजीव वेळंबे हे अशांपैकीच एक. नाशिक, मालेगाव, नामपूर, डांग अशा परिसरात ते कार्यरत होते. डॉ. बेळंबे यांची प्राथमिक आरोग्य केंद्रे नाशिक जिल्ह्यात कायम पहिल्या पाचमध्ये राहिली. 1987 ते 2007 या काळात त्यांनी 16000 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या. या सर्व कठीण प्रवासात रेखावहिनी सर्वार्थांनी त्यांच्या सोबत राहिल्या. ..

पालकत्व म्हणजे आव्हानच

पालकत्व म्हणजे आव्हानच ..

सुरीली कटयार

सुरीली कटयार ..

सोशल मीडियावर गुंतले मन हे

सोशल मीडियावर गुंतले मन हे ..

आव्हान अजून पुढेच आहे...

समाजमाध्यमाला बेदखल करून आपले अस्तित्व राखण्याचे धाडस यापुढे वर्तमानपत्रे करणार नाहीत. कारण, आजच्या बातमीचा उद्यापर्यंत ताजेपणा टिकण्याचे दिवस आता संपले, याची जाणीव वर्तमानपत्रांना ठेवणे भाग पडणार आहे. समाजमाध्यमांनीच ती किमया करून दाखविली आहे. त्यामुळे, बातमी चुकविणे आता वर्तमानपत्रांना परवडणारे नाही. ती चुकली, तर तळहातावरच्या मोबाइलवर एका बोटासरशी पर्याय देणारे साधन आता लोकांच्या हाती आले आहे. ते मात्र आव्हान आहे! ..

बदलतं मुस्लीम मानस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि टि्रपल तलाक विरोधी कायदा, मदरसा शिक्षणातील आधुनिकीकरण, पेन्शन योजना यांसारख्या सुविधा या परिवर्तनाला कारणीभूत ठरत आहेत. अर्थात ही सुरुवात आहे. मात्र त्यातून भविष्याचे आशादायी चित्र दिसून येते. या समाजातील काही प्रातिनिधिक लोकांना भेटून या बदलत्या मुस्लीम मानसाचा आढावा घेणारा हा रिपोर्ताज...

कालिदासाचं चिरंजीव मेघगान

महाकवी कालिदासाच्या रचना हे संस्कृत साहित्याचे अलंकार, तर मेघदूत हे त्यातील लखलखतं रत्न! आजही आषाढाच्या प्रथम दिवशी या तीव्रकोमल दुःखाचं स्मरण होतं. आषाढमेघाच्या वर्षावानंतर मोहोरलेल्या जमिनीवर रूप-रंग-गंधांचे उत्सव सुरू व्हावेत, तसंच यक्षाची वेदना कालिदासाच्या प्रतिभाशाली लेखणीतून प्रवाहित झाली आणि संपूर्ण काव्यसृष्टीलाच बहर आला. जोवर आषाढाचा मेघ वर्षत राहील, तोवर कालिदासाने शृंगारलेली ही मधुर वेदनाही चिरंजीव राहील!..

धर्मशास्त्राचे इतिहासकार भारतरत्न डॉ. पां. वा. काणे

संस्कृतचे गाढे अभ्यासक, महामहोपाध्याय, पुणे आणि अलाहाबाद विद्यापीठांकडून डी.लिट. पदवीने सन्मानित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, नॅशनल प्रोफेसर, लंडन युनिव्हर्सिटीच्या 'ओरिएंटल ऍंड आफ्रिकन स्टडीज'चे सन्माननीय फेलो, 'History of Dharmashastra' या ग्रांथाचे कर्ते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, राज्यसभा सदस्य, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांच्या जीवनकार्याचा हा संक्षिप्त परिचय. ..

अतूट बंधन!

 ***जयश्री देसाई****यंदा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 75वी पुण्यतिथी आणि त्यांच्या अलौकिक  कन्येच्या, लतादीदींच्या गान कारकिर्दीची पंचाहत्तरी असा दुर्लभ योग जुळून आला आहे. आजच्या पिढीने दीनानाथांना पाहिलेलं नाही. मात्र केवळ गेली 75 वर्षं अ..

महावस्त्र

 आपण जीवनाला महावस्त्र समजतो, ही चूक आहे. ती एक ठिगळांची वाकळ आहे. ती पुरेशी नसतेच. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांनी त्या तथाकथित महावस्त्राचा त्याग केला. मोठी माणसं होती ती. आपण लहान माणसं आहोत. त्या वाकळीची एक चिंधीही आपल्याला..

चूकभूल... फक्त घेणे...

 'भाभीं'चा नवरा बँकेच्या नोकरीत नडियादच्या शाखेत कामाला होते. तिथे सगळया गुजराथी अडोसपडोसमध्ये भाभींचं 'भाभी' हे नाव पडलं. पुढे महाराष्ट्रात राहायला आल्यावर 'भाभी' हे नाव त्यांच्या घरादाराला, राहणीसाहणीला शोभत नाही, असं अनेकांना वाटायचं. अगदी स्वत:..

अधल्यामधल्या करडया छटा

 पूर्वग्रहांमुळे आपण आसपासच्या जगाचं चित्रण काळं किंवा पांढरं या दोन रंगांमध्येच करू पाहतो. प्रत्यक्षात अशी काटेकोर विभागणी करणं अन्यायकारक असतं. कारण कोणतीही बाब किंवा कोणतीही विचारधारा संपूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. संपूर्णपणे विधायक किंवा वि..

प्रत्यक्षातील अद्भुत दुनिया

 वाढत्या वयाबरोबर मैत्री झालेल्या कीबोर्डवाल्या ई गॅजेट्सनी जाणवून दिलेलं सत्य म्हणजे, बालपणीची ती चित्रविचित्र दुनिया झूट असून त्या साध्या बालमनास रमवणाऱ्या उत्तम कल्पना होत्या. बालपणीचा हा सुखाचा काळ संपल्यावर करियर म्हणून निसर्गात काम करताना जाण..

भारतातील राष्ट्रीयतेचे परिदृश्य- रंगा हरी

प्रस्तावना बहुमताचा इतिहास रचत दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार अस्तित्वात आले आणि या सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रवाद, देशप्रेम, देशद्रोह या संकल्पनांची नव्याने चर्चा होऊ लागली. वाद झडू लागले. टोकाचे परस्परविरोधी विचार अस..

भारतीय राष्ट्रवादाच्या उत्क्रांतीत मराठयांचे योगदान - डॉ. सदानंद मोरे

अब्दालीची स्वारी आली, तेव्हा मराठयांचा सेनापती सदाशिवरावभाऊ याने उत्तरेतील सर्व हिंदू-मुसलमान सत्ताधीशांना पत्रे लिहून आपल्या सर्वांचा देश एक असून अब्दाली हा परका असल्यामुळे आपल्या सर्वांचाच शत्रू आहे, सबब आपण एक होऊन त्याचा मुकाबला करू असे आवाहन केले. मल..

एकविसाव्या शतकातील राष्ट्रवाद म्हणजे समन्वयातून विकास - मिलिंद कांबळे

एकविसाव्या शतकातील भारतीय राष्ट्रवाद - आशय आणि अभिव्यक्ती या परिसंवादाच्या निमित्ताने बोलताना मिलिंद कांबळे यांनी मोदी सरकारच्या यशाचा एक आलेख मांडला. दलितांसाठी, दलितांचे प्रेरणास्थान असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील निष्ठा अधिक वृध्दिंगत करण्य..

राष्ट्रवादाचं दर्शन घडवणारी कृती महत्त्वाची - आ. नीलम गोऱ्हे

राष्ट्रवाद या संकल्पनेबाबत आज बहुतेकांच्या मनात गोंधळ आहे. ज्या देशाचा स्वातंत्र्यलढा अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, अशा देशात आज या संकल्पनेबाबत चर्चा करावीशी वाटणं हे काही चांगलं लक्षण नाही. भारतमाता की जय म्हणायचं की नाही हा वादच निरर्थक आहे. भारतमात..

हा वैचारिक गोंधळ जगण्याची कक्षा व पर्याय बदलल्याने - मंदार भारदे

जगातल्या अनेक लोकशाही देशांची उदाहरणे आहेत, जिथे राष्ट्रवाद ह्या संकल्पनेला निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि विकास ह्या संकल्पनेच्या मागे लोक उभे राहिले. आज जगभरातले उच्च मध्यमवर्गीय आणि वरच्या आर्थिक स्तरातले लोक ज्या देशातले कायदे जगण्याला अधिक लायक आह..

गोनीदां आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

***प्राचार्य श्याम अत्रे****गोपाळ नीळकंठ उर्फ अप्पासाहेब दांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. गेल्या शतकातील एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणून अप्पा विख्यात होते. त्यांनी विविध वाङ्मय प्रकारांत सुमारे 100 ग्रंथांचे लेखन केले असले, तरी साहित्य जगतात ते ..

नायजेरीयन लग्न

***राजेश कापसे***एक दिवस संध्याकाळी आमच्यासोबत काम करणारा डॉ. ल्युक त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला. लग्नाचे निमंत्रण द्यायला जायचे असेल तर आपल्याकडे आपण तांदळाच्या अक्षता घेऊन जातो. मग ज्यांना पत्रिका दिली जाते ती व्यक्ती तुमचं अभिनंदन करते व तोंड गो..

आर्थिक आणि सांस्कृतिक समृध्दीसाठी मेक इन इंडिया

- प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी / प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी'मेक इन इंडिया' हे अभियान म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक. आज आपल्याकडे लाखोंनी पदवीधर होताहेत. पण आपल्या सध्याच्या अर्थचक्राची रोजगार निर्मितीची क्षमता क्षीण झाली आहे. म्..

अनुभवप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य व अंत:स्फूर्ती

आपणाला एखादा विषय नेमका समजतो म्हणजे काय होते? असा प्रश्न विचारला, तर तो हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घडामोडींची जी प्रतिमा आपल्या मनावर उमटते, त्यावरून आपण जे निष्कर्ष काढतो, ते म्हणजे आपले समजणे असे आपण गृहीत धरतो. परंतु ही प्र..

विज्ञानवादी भविष्यवेत्ता

ऑलविन टॉफलर यांनी तीन लाटांच्या माध्यमातून एका अर्थाने मानवी संस्कृतीच्या आर्थिक विकासाची रूपरेखा मांडलेली आहे. ही सगळी रूपरेखा काही गृहीतांवर आधारित आहे. मनुष्याचे भौतिक सुख हेच सर्वोच्च आहे आणि हे सुख साध्य करण्यासाठी वेगवेगळया रचना उभ्या राहतात. एक लाट..

माझी आनंदयात्रा

****शशिकांत सावंत*** 1996-97नंतर मी महानगरची नोकरी सोडली आणि जवळपास पूर्ण वेळ पुस्तके विकू लागलो. आणखी मी एक काम केले, ते म्हणजे एक शिपाई ठेवला. पुस्तके पोहोचवण्यासाठी. नंतर वेगवेगळया लोकांनी हे काम केले. अमित कुंभार असेल, अगदी श्रीकांत आगवणेसारखा ..

मार्तंड जे तापहीन

***डॉ. अनघा लवळेकर*** एखादी कणखर पण अत्यंत स्नेहल व्यक्ती निकटच्या लोकांना अशा परिस्थितीतही किती शांतपणे समजून घेऊ शकते, ते कळलं. जवळच्या-लांबच्या स्नेह्यांना स्वतःच्या उदाहरणातून-संवादातून दिलेलं मूल्यांचं देणं, प्रखर राष्ट्रनिष्ठा, शिक्षणाबद्दलचं..

सारे काही जाणशी तू

***वसंत वाहोकार***कॅलेंडरवाला भेटला रस्त्यात, चौकापलीकडे. बिडी फुंकत होता आणि हातात ती कॅलेंडरं उंच, लांबरुंद, कडकड करणारी... त्यात सगळेच होते, आपल्यासाठी वरदहस्त घेऊन आलेले. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे', अशी खात्री देणारे. सगळयात वर कॅलेंडर होतं, ते..

परीक्षा

***कृ.ज. दिवेकर***गांगल, परोपकारी आणि आता हे ओरपे. कोण होते हे आपले? आपणाला नोकरीतील उच्च पद मिळावे, म्हणून परीक्षेच्या घोडयावर स्वार होण्यासाठी, कोणतेही नातेसंबंध नसलेली ही मंडळी केवढी प्रयत्नशील होती, हे पाहून त्या तिघांबद्दलचा माधवचा आदर दुणावला आणि ..

सैराट

***मंगला गोडबोले****''लग्न झालं तेव्हा...'' ताई एकदम मनाने मागेमागे गेल्या. पुढयात दाणेवाला वगैरे काही त्यांना दिसलंच नाही. लग्नानंतरची पहिली दहाबारा वर्षं खरंच अवघड गेली होती त्यांची. घर लहान. एकटे दादाच कमावते. आईवडील, तीन धाकटी भावंडं घरात. सर्वात मि..

काळोखतिढा

*** सुरेंद्र पाटील***कसं आसंल माय माणूस जल्माचं? कोण तर सुखी हाय का इथं? परत्येकामागं परमात्म्यानं कायतरी किरकीर लावल्याली हायचं. दुख न्हाई आसा जगात कोण आसंल का? या घराला म्या लय नटत होते! खटलं मोठ्ठं म्हणून जरा वढवढ हुत्याय जीवाची; पर माजी तकरार न्हाई...

कोल्च

दुखऱ्या कमरेने खाली वाकून दुर्गाबाय त्या सगळया जिनसा उचलताना वरच तिला नेमका तो फूलपाखरांचा कोल्च सापडला आणि तिला एकदम चैत्राली आठवली. तिच्या सगळयात धाकटया पुतण्याची मुलगी. आता अमेरिकेत राहाणारी. वीस वर्षांपूर्वी कधीतरी एकदा उन्हाळयाच्या सुट्टीत इथे राहायल..

मुक्त - विमुक्त बंदिश

शांतीनिकेतनहे एक छोटंसं गाव होतं तेव्हा! रवींद्रनाथांनी जी शिकण्याची पध्दत सुरू केली, त्याचं ते नाव होतं. तो काळ होता 1901. श्री निकेतनची स्थापना झाली ती 1924. याला नाभाभिधान होतं 'ब्रह्मचर्याश्रम'. 1921ला विश्वभारती झाली. पहिली-दुसरी अशा इयत्ता सुरू झाल्..

मुस्लीम समाजाकडून अपेक्षित बदल

***डॉ. प्रमोद पाठक*****    आजवर हिंदू-मुस्लीम एकमेकांचे प्रथम भाऊ-भाऊ, नंतर शेजारी आणि आता केवळ नागरिक या स्तरावर संबंध राहिले आहेत. एकेकाळी काशीविश्वनाथाला सकाळी उठून सनई वाजविणाऱ्या बिस्मिल्ला खान यांची अथवा कोकणात रवळनाथाच्या आणि होळीच्या उ..

ईश्वरदत्त प्रतिभेचा आविष्कार जयदेवाचे गीतगोविंद

***मंदाकिनी गोडसे***संस्कृतमधील स्तोत्ररचनांच्या काळातली ही निर्मिती असली, तरी गीतगोविंद हे काही श्रीकृष्णाचं स्तोत्र नव्हे. गीतगोविंदातला कृष्ण हा तत्त्वज्ञ किंवा राजकारणी कृष्ण नसून तो वृंदावनात कामक्रीडा करणारा कृष्ण आहे. त्याच्या वासंतिक क्रीडेचं अत..

गगनविहार

अंतराळ संशोधनाची नांदी म्हणताना साराभाई यांनी जरी ''आपल्याला चंद्र, तारे यांच्यावर स्वारी करण्याची आकांक्षा नाही'' असं म्हटलं असलं, तरी आता परिस्थिती बदलली होती. आपण आपल्याच अंगणात खेळणारे खेळाडू राहिलो नव्हतो. जागतिक पटांगणात विहार करण्याची क्षमता आपण कष..