संपादकीय

आपली जबाबदारी ओळखू या

सरकार आणि सैन्य देशाचे रक्षण करत असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत असताना आपण आपल्या कर्तव्याचे भान ठेवू या. Vocal for local होण्यासाठी उद्यमशीलता समाजात रुजवू या. भारताला आर्थिकदृष्ट्या कणखर बनवणे ही आपल्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती फक्त ग्राहक म्हणून नाही, तर उत्पादक, निर्माता म्हणूनही आहे. ..

पेरले जे होते कधी...

मराठा आरक्षण आंदोलन, शेतकरी संप या आणि इतर आंदोलनांच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर कोणत्या शब्दात टीका केली गेली? आणि टीका करणारे कोणाचे साथीदार होते? हे उभ्या महाराष्ट्राला माहीत होते. त्या आंदोलनाच्या काळात शरद पवारांनी सोईस्कर मौन पाळले होतेच. पण आपल्या सहकारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना लकवा झाला आहे, विधानसभा निवडणुकीत विचित्र हातवारे करत आमचे विरोधी तृतीयपंथीय आहेत असा संकेत देणे ही शरद पवारांची राजकीय अभिव्यक्ती महाराष्ट्र विसरलेला नाही. आपण जे पेरतो ..

राजू शेट्टींचा स्वाभिमानी यू-टर्न

"हातकणंगलेच्या राजू शेट्टीची जात कोणती आहे?" असा जाहीर सवाल करणारे शरद पवार जेव्हा बेरजेचे गणित करत राजू शेट्टी यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याची घोषणा करतात, तेव्हा स्वाभाविक चर्चा होणारच होती. ती झाली, पण त्यानंतर राजू शेट्टींच्या राहुटीत जी खळबळ उडाली, त्यांची परिणती राजू शेट्टींनी माघार घेण्यात झाली असे म्हणायला हरकत नाही. ..

काकांपासून वाचवा

हजरजबाबी आणि मुद्देसूद वाद घालण्यात कुशल असलेल्या विरोधी पक्षनेत्याने पवारांच्या तिरक्या बोलण्याला चोख उत्तर दिले आहे. ते गरजेचे होतेच. माध्यमांनीही फक्त हा कलगीतुरा दाखवण्यातच रस घेतला. विरोधी पक्षनेत्याने या दौऱ्यात काय पाहणी केली, या प्रश्नाच्या सोडवणुकीसंदर्भात काय विचार केला, नंतर सरकारमधील संबंधितांशी काय चर्चा केली अशा त्यांच्या लेखी बिनमहत्त्वाच्या असलेल्या विषयांकडे माध्यमांनी साफ दुर्लक्ष केले. ..

अन्नदाता सुखी भव

अन्नदाता सुखी भव ..

शहामृगी पवित्रा कशासाठी?

महाराष्ट्र, मुंबई आज कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, सर्वाधिक मृत्यूही मुंबईमध्ये झाले असताना एका दूरचित्रवाहिनीवर मुंबईत कोरोनावर कसा ताबा मिळवला यांची स्टोरी चालवली जाते आणि 'मुंबई पॅटर्न' म्हणून तिचे कौतुक केले जाते. एका अर्थाने मुंबईत कोरोनचा प्रसार आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या यावर मात करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी अशा स्टोरी चालवल्या जातात. ही स्टोरी चालवताना केंद्रीय पथकाने मुंबई पॅटर्नचे कौतुक केले असे सांगितले जाते. मात्र केंद्रीय पथकाडून याचा इन्कार केला ..

ही भुई धोपटणं बंद करा!

विरोधी पक्षनेता हा शत्रू नसतो, राज्यावरच्या संकटाच्या वेळी सगळे मतभेद मनाआड करत त्याची मदत घ्यायची असते, हा राजकारणातला प्राथमिक धडाही मुख्यमंत्री विसरले आहेत. आणि आज जेव्हा राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करायला भाजपा मैदानात उतरला, तेव्हा त्यांनाच 'राजकारण करू नका' असा मानभावी सल्ला द्यायला, त्यांच्याविरोधात गरळ ओकायला मुख्यमंत्र्यांसह तिघाडीतले आजवर निद्रिस्त असलेले तथाकथित महारथी सरसावले आहेत. ..

पुरोगामित्व जपायचे असेल, तर..

प्रश्न केवळ पारधी हत्याकांडाचा नसून पुरोगामी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सामाजिक अराजकाचा आहे. ही घटना म्हणजे सामाजिक कीड असून तिचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला पाहिजे. महाराष्ट्र राज्याला आपले पुरोगामित्व जपायचे असेल, तर अशा घटनांचा तातडीने तपास करून दोषींना जबर शिक्षा झाली पाहिजे, तरच पुरोगामित्वाचा आब राहील. म्हणून शासन-प्रशासन यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे आणि भटक्या विमुक्त समाजात जे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ते दूर करून सामाजिक आधार दिला पाहिजे, तरच आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होईल. ..

नियोजनशून्यतेचे बळी

मंत्रालयातील सर्व राजकीय पक्षांना बैठकीचे निमंत्रण देणारे मुख्यमंत्री मात्र मातोश्रीवरून बैठकीत सामील झाले. एकूणच काय, तर महाराष्ट्रात कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी लढणाऱ्या डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कामगार आणि विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना यांच्या पाठीवर हात फिरवणाऱ्या आणि या योद्ध्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आज जाणवत आहे. आज शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देऊन या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नेतृत्वाचा अभाव ..

झेप घेण्यापूर्वी..

दि. १ मे २०२०, अर्थात आपल्या महाराष्ट्र राज्याच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा दिवस. गेल्या ६० वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक, आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आलं. आपल्या राज्याची राजधानी मुंबईने ‘देशाची आर्थिक राजधानी’ हे बिरूद टिकवलं - किंबहुना आणखी मजबूत केलं. आता या अशा महत्त्वाच्या टप्प्यावर दुर्दैवाने कोरोनाचं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलं आणि त्यातही महाराष्ट्राला याचा देशातील सर्वाधिक फटका बसला. पुन्हा त्यातदेखील महाराष्ट्राचा जो भाग सर्वाधिक प्रगत, सर्वाधिक ..

फादर, तुम्ही कुठे आहात?

दोन साधूंसह एकूण तीन जणांना दगड-धोंड्यांनी आणि काठ्यांनी ठेचून मारले. ही झुंडशाही दोन दिवस दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला माहीत असेलच की समाजमाध्यमातून व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तरीही मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहेत, हेही तुम्हाला माहीत असेलच. ..

'वारी' न झाल्याचा परिणाम?

भाजप काय किंवा काँग्रेस काय किंवा अन्य कुठलाही पक्ष काय, बहुतांश सर्व ज्येष्ठ – वरिष्ठ नेते सरकारच्या सोबतीने, एकजुटीने लढण्याची भाषा करतायत, तिथे राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तीने किरकोळ राजकीय वजन वाढवण्याच्या प्रयत्नात अशी दिशाभूल करणारी वक्तव्यं करावीत, हे दुर्दैवी आहे. राहुल गांधींचं चित्त थाऱ्यावर नसणं आपण समजू शकतो कारण आपल्या सर्वांप्रमाणे त्यांनाही ‘लॉकडाऊन’चा फटका बसला आहे, त्यांना वारंवार थायलंड वगैरे ठिकाणी ‘अध्यात्मिक सहलीसाठी’ (?) जावं लागतं ते आता जाता येत नाही. त्त्यातून आलेली निराशा, ..

संविधान आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यासमोरचे प्रश्नचिन्ह

संविधान आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यासमोरचे प्रश्नचिन्ह ..

मोदीजी, आपका जरा चुक्याच..

खरंतर देशातील वीस-पंचवीस निवडक रत्नं निवडून त्यांना आपल्या सल्लागारपदी नेमून त्यांच्या आदेशानुसार निर्णय घ्यायला हवे होते. आणि या रत्नांमध्ये देशातील एकेक ‘चुनिंदा’ डावे, तथाकथित पुरोगामी, लिबरल, सेक्युलर, बुद्धिवादी वगैरे लोक समाविष्ट करायला हवे होते. तरच सर्व समस्यांवर योग्य ते पर्याय या मंडळींनी शोधून दिले असते आणि त्यानुसार मोदींनी कार्यवाही केली असती. चुकलंच खरं.. ..

संयमाच्या आणि धैर्याच्या कसोटीचा काळ..

दिवसातून तीस-चाळीस वेळा साबणाने, भरपूर पाणी वापरून हात धुणं आजही आपल्या देशातील अनेकांना परवडत नाही, हे वास्तव आहे. मग त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून काळजी कशी घ्यायची? दुसरीकडे, 'घराबाहेर पडू नका' हे सांगण्यासाठी आपल्या पोलिसांना काठ्या घेऊन रस्त्यावर उभं राहावं लागतं. तरीही लोक हुल्लडबाजी म्हणून, स्टंट म्हणून रस्त्यावर उतरतात, पोलिसांच्या अंगावर गाड्या घालतात, काही ठिकाणी नमाजासाठी लोक एकत्र येतात; जनता कर्फ्यूच्या दिवशी पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य पोलिसांपर्यंत सर्व जण अक्षरशः ..

सोनाराची कानटोचणी

एखादा निर्णय आपल्या मनाविरुध्द झाला की त्या व्यक्तिविरोधात बोलताना वाट्टेल ती पातळी गाठायची, ही अंगवळणी पडलेली सवयच आहे. इतकी वर्षं या देशात हे सगळं खपत होतं, त्याला उलट 'खतपाणी'ही मिळत होतं. गेली सहा-सात वर्षं त्या खतपाण्याचा पुरवठा बंद झाल्याने आणि उलट तडाखेच अधिक मिळू लागल्याने ती आगतिकता, ते नैराश्य असं उफाळून येतं आहे. गोगोईंच्या निमित्तानेही ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे...

ही 'गरुड'झेप ठरेल का?

ज्योतिरादित्य शिंदे भारताला लाभलेलं सक्षम युवा नेतृत्व होते, जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या विरोधातील काँग्रेसच्या लढाईतील एक निष्ठावंत शिलेदार होते. उदयनराजे, संभाजीराजे यांचाही गौरवगान केलं जात होतं. आता ते एकदम दगाबाज वगैरे झाले. हे एका रात्रीत कसं काय घडलं? या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले? कारण एकच - त्यांनी 'भारतीय जनता पक्षा'त केलेला प्रवेश!..

घडतंय की बिघडतंय?

तीन महिन्यांत लक्षात राहण्याजोगा निर्णय, एखाद्या कामाची सुरुवात त्यांच्याकडून झालेली नाही. म्हणूनच आधीच्या सरकारच्या निर्णयांना एकापाठोपाठ एक स्थगिती देणे आणि झटपट प्रसिध्दीसाठी 'शिवथाळी'सारखी एखादी योजना जनतेच्या माथी मारणे याचीच चर्चा जास्त आहे...

पुन्हा पुन्हा, अजब तुझे सरकार!

आजवर भाजपाशी कितीही काहीही वाद झाले, तरी संघावर टीका करण्याइतकी शिवसेना खाली घसरली नव्हती. आता काँग्रोस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्यात आल्याने त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेने हीदेखील मर्यादा ओलांडली. या वेगाने शिवसेना जात पुढे राहिली, तर कदाचित एक-दोन वर्षांत माकप-भाकप वा एमआयएम, मुस्लीम लीगसारखे पक्ष आणि शिवसेना यांच्यात काही फरकच उरणार नाही, अशी परिस्थिती आहे. ..

शकुनीचे फासे.. की फास?

एल्गार परिषद प्रकरणही एनआयएकडे देण्यास 'पवार ऍंड कं.'चा विरोध आहे. शिवाय सध्या गजाआड असलेले संशयित हे कसे बिचारे लेखक-कवी, समाजसेवक-कार्यकर्ते वगैरे होते आणि भाजपा सरकारने जाणीवपूर्वक यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे, अशीही मांडणी आता काँग्रेस व राष्ट्रवादीकडून होते आहे. पण राज्यात आर.आर. पाटील गृहमंत्री असतानाच्याच काळात त्यांना तुरुंगवास घडला आहे. मग राष्ट्रवादीच्या स्व. आर.आर. पाटील यांनी अर्थातच, पवारांच्या आशीर्वादाने या सर्व गरीब बिच्चाऱ्या आरोपींना नक्षलवादी ठरवण्याचं षड्यंत्र ..

उध्दवजी, इतके थंड पडलात..?

उध्दवजी, इतके थंड पडलात..? ..

भय संपायला हवे!

मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रयत्न करायचे हे देशपातळीवर चालू असलेलं नियोजनबध्द काम दखलपात्रच आहे. या कामाच्या हेतूबद्दल मनात कसलाही संशय नाही. मात्र केवळ मुलींचे गर्भ वाचवून, जन्मल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करून समाजाला लागलेल्या या अत्याचाराच्या किडीचं उच्चाटन होणार नाही, असं या घटना सांगताहेत. जरब बसेल अशा जबर शिक्षेची तरतूद केवळ कागदावर राहिली की त्यातून ना कायद्याचा धाक निर्माण होतो, ना त्या शिक्षेचा - हीच गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. ..

घोडं आवरतही नाही, सोडवतही नाही!

फरहान आझमी म्हणाले उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर आम्हीही त्यांच्यासोबत येऊ आणि बाबरी मशीद पुन्हा बांधू' अशा आशयाचं विधान जाहीरपणे केलं. शिवसेनेचे 'फायरब्रँड' नेते-प्रवक्ते खा. संजय राऊत तर शरद पवारांना विठ्ठल बनवून त्यांची पूजा-अर्चा करण्यात मग्न आहेत. राऊत मागे एकदा इंदिरा गांधींबाबत काहीतरी बोलले आणि काँग्रेस नेत्यांनी असा काही समाचार घेतला की राऊत यांना माफीच मागावी लागली. असं बरंच काय काय राज्यात सुरू आहे आणि हे सर्व शांतपणे पाहणं, सहन करणं याशिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हाती ..

रंग बदलला, अंतरंगही बदलेल

हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष केंद्रात सत्तास्थानी आहे आणि हिंदू समाजाच्या खूप जुन्या मागण्या पूर्ण होत आहेत. अशा वेळी अनेक राजकीय पक्ष हिंदुत्वाचा तिरस्कार करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका समयोचित आणि समाजमनाची दखल घेणारी आहे...

पळा पळा... कोण पुढे पळे तो

विविध विचारधारांमधून आलेल्या, पत्रकारिता धर्माशी एकनिष्ठ राहून काम केलेल्या अनेक पत्रकारांच्या कामगिरीमुळे या क्षेत्राला जे वलय होतं, ते आजच्या या सनसनाटीत रमलेल्या, उठवळ आणि उथळ पत्रकारांमुळे लयाला जातं आहे. ..

प्रमोशनसाठी विवेकाला सोडचिठ्ठी

मुंबईतल्या स्पाइस पीआर या कंपनीने पहिल्यांदा दीपिकाचे हे फोटो प्रसिद्ध केले. या कंपनीच्या संकेतस्थळाला भेट दिली, तर लक्षात येईल की दीपिका त्यांची क्लाएंट आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी असे ‘इमोशनल’ प्रमोशनल कॅम्पेन करणे हे त्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, यात शंका नाही. दीपिकाची जी संवेदनशीलता या फोटोंमधून झळकत आहे, त्यातील थोडी जरी प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर तिने अशा देशद्रोही आंदोलकांच्या पाठीशी राहून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह टाळायला हवा होता...

बुरखे फाटू लागलेत!

राज्यपालांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही का? 'मौलाना आझाद यांच्या विचारांचा दाखला देण्याचा अधिकार राज्यपाल खान यांना नाही' असाही शोध नंतर इरफान हबीब यांनी लावला. का? ती काय तुमची खासगी जहागीर आहे का? राज्यघटनेतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे फक्त तुम्हा मोजक्या लोकांपुरतं मर्यादित आहे का? या प्रश्नांची उत्तरं हे लोक कधीच देणार नाहीत. कारण त्यांच्याजवळ ती नाहीत...

आधी यांना लगाम घातला पाहिजे!

आधी यांना लगाम घातला पाहिजे! ..

धर्मांतर की धर्मच विसरलात?

ज्या बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला स्वतः रस्त्यावर उतरून जोडे मारले, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला आज राहुल गांधींचा साधा निषेधही करता येऊ नये, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर लोकसभेत एक आणि काँग्रेसने डोळे वटारल्यावर राज्यसभेत भलतीच भूमिका घेऊन स्वतःचं पार हसू करून घ्यावं, या गोष्टी शिवसेनेची व या सरकारची पुढील वाटचाल स्पष्ट करतात. ‘काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणजे आम्ही काही धर्मांतर केलं नाही’, असं मुख्यमंत्री सांगत असले तरी, काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्ही धर्म विसरला तर ..

बोले तैसा चाले!

मोदी आणि शहा ज्या पक्षाचं आणि ज्या राष्ट्रीय विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात, त्या पक्षाच्या इतिहासातीलही ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. अंतिमत: राष्ट्रहिताचा असलेला विषय, मग तो कितीही संवेदनशील वा जोखमीचा असला तरी त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारा, दिलेल्या शब्दाला जागणारा हा पक्ष आहे, हे या घटनेने अधोरेखित केलं आहे...

आपण न्यायालय नाही

भीमा कोरेगाव प्रकरणातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना या निर्णयापर्यंत घेऊन जाणारे अनेक घटक आहेत, याबाबतचे धनंजय मुंडे यांचे पत्र समाजमाध्यमातून प्रकाशित झाले होते. त्यामुळे या निर्णयामागे राजकीय हेतू आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. ..

तीन पायांची शर्यत

या प्रयोगात परस्परांचे पाय खेचले जाण्याची, एकमेकांची राजकीय कोंडी करून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले, तरीही महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू झालेल्या या तीन पायांच्या शर्यतीला मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. ..

स्वागत व्हायलाच हवं..

सीमावर्ती भागात अनेक तालुके बांगला देशी बहुसंख्याक बनले असून इतकी वर्षं या प्रश्नाकडे तत्कालीन सरकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता स्थानिक आसामी नागरिकांपेक्षा हे बांगला देशी घुसखोर तेथील राजकारण, अर्थकारणात अधिक वरचढ ठरत आहेत. इथूनच या घुसखोरांचे लोंढे देशातील विविध शहरांत येतात, पुढे त्यांच्या झोपडपट्टया उभ्या राहतात आणि त्याचं पुढे काय होतं हे आपण पाहतोच आहोत. अगदी मुंबई-पुणेसुध्दा याला अपवाद नाहीत. त्यामुळे बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी काही ना काही पावलं उचलणं गरजेचं ..

स्वागतार्ह पाऊल

स्वागतार्ह पाऊल ..

कालातीत, न्याय्य आणि गौरवास्पद

भारतीयांच्या दृष्टीने, श्रीराम ही केवळ एक सर्वगुणसंपन्न आदर्श व्यक्ती नसून ती या देशाला एकतेच्या सूत्रात बांधणारी शक्ती आहे. म्हणूनच हे आंदोलन केवळ धार्मिक न राहता, ते राष्ट्रीय अस्मितेची ओळख झाले. रामजन्मभूमीसाठी आजवर जो काही संघर्ष झाला, जे बलिदान झाले त्या सगळ्याला आजच्या निकालाने यथोचित न्याय मिळाला असे म्हणता येईल. ..

जागं करणारा निकाल

कार्यकर्ते म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि उच्चपदस्थ राजकीय नेते यामधला महत्त्वाचा दुवा असतात. पक्षप्रमुख सांगतील तो आदेश पाळतानाच कामाच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यात त्यांचं योगदान असतं. पक्षप्रमुखांनी त्या योगदानाची कदर करायला हवी. पक्षातील योग्य व्यक्तीस उमेदवारी देणं आणि निष्ठावंतांच्या मतांचा मान राखणं या दोन गोष्टी न झाल्याचा फटका या निवडणुकीने दिला. ..

हे राज...!!

पक्ष संघटन हे नकला करून, घरात बसून इतरांना उपदेशामृत पाजून उभं राहत नाही. लोकप्रतिनिधी निवडून येणं तर लांबची गोष्ट. लोकांची मतं ही ना नुसत्या गर्जना करून मिळतात, ना अशा विनवण्या करून. ती जनतेपुढे काही ठोस कार्यक्रम ठेवून, तो तळागाळात नेणार्‍या कार्यकर्त्यांचं संघटन उभारून, त्यात सातत्य ठेवून, प्रसंगी टक्के-टोणपे खाऊन, तावून-सुलाखून निघाल्यावर मगच मिळतात. राज ठाकरे अजूनही हे न करता बाकी सर्व अनावश्यक ते करत बसणार असतील, तर राज ठाकरे आणि मनसे यांची कालबाह्य होण्याकडेच वाटचाल सुरू आहे, एवढं मात्र निश्चित. ..

बुडत्याला 'ईडी'चा आधार

अर्थात ईडीचे बोलावणे आल्याशिवाय स्वतः इतक्या घाईने हजेरी लावण्यासाठी शरद पवार का तयार झाले? पवारांना ईडीची नोटीस अशी बातमी आल्यावर आधी बारामती बंदची घोषणा करून आणि मुंबईत निवासस्थानी कार्यकर्त्यांची जमवाजमव करून शरद पवार आपली राजकीय ताकद दाखवू पाहत आहेत का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात...

यात्रेची यशस्वी सांगता

यात्रेची यशस्वी सांगता ..

ही दमाची लढाई आहे

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये असे वाटते, असे सारे तथाकथित विचारवंत आणि माध्यमकर्मी आरडाओरड करत आहेत. या गदारोळात सर्वसामान्य भारतीयांनी लक्षात ठेवायला हवे की ही दमाची लढाई आहे आणि लढाई यशस्वी होण्यासाठी मोदी-शाह यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. ..

आंदोलन नेमकं कोणाच्या भल्यासाठी?

केंद्रात आणि राज्यात भाजपाप्रणीत सरकार आल्यापासून त्यांच्या कामकाजात विघ्नं आणणं हा काही मंडळींचा, स्वयंसेवी संस्थांचा एककलमी कार्यक्रम ठरून गेला आहे. ज्या लोकांच्या भल्यासाठी हे आंदोलनाचं शस्त्र ते सतत परजत असल्याचं सांगतात, त्या लोकांचं तरी यातून काय भलं होतं? हा संशोधनाचा विषय ठरावा. सरकारच्या विरोधासाठी सतत विषय हुडकत राहणं आणि आंदोलनाचा अग्नी प्रज्वलित ठेवणं याभोवतीच या आंदोलनकर्त्यांची सगळी शक्ती एकवटली गेली आहे. मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रस्तावित असलेली आरे कॉलनी येथील कारशेड ..

अध:पतनाच्या दिशेने पुढचे पाऊल

अध:पतनाच्या दिशेने पुढचे पाऊल ..

पुढचं पाऊल

पुढचं पाऊल ..

निसर्गातले बदल गांभीर्याने घेण्याची गरज

निसर्गातले बदल गांभीर्याने घेण्याची गरज ..

भ्रमातून बाहेर येण्याची गरज

भ्रमातून बाहेर येण्याची गरज ..

प्रतीक्षा सहीसलामत सुटकेची

प्रतीक्षा सहीसलमात सुटकेची ..

झापडं निघणार केव्हा?

झापडं निघणार केव्हा? ..

दहा टक्क्यांची गोष्ट

  आर्थिक निकषावर आरक्षण देऊन त्याला घटनात्मक आधार निर्माण करून देण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले आहे. समाजाच्या सर्वच स्तरांतून त्याचे स्वागत होत आहे. आर्थिक दुर्बलता ही जातधर्माशी संबंधित नसते. खुल्या वर्गात मोडणाऱ्या सर्वच जातींमधील आर्थिक..

एकतेच्या प्रतीकासह सौराष्ट्र दर्शन

स्टॅच्यू ऑॅफ युनिटी हा पुतळा म्हणजे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देणारे हे उत्तुंग स्मारक, एकतेचे प्रतीक. त्यासोबतच सौराष्ट्र दर्शनात12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे नागेश्वर मंदिराचे दर्शन, द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ मंदिर, सुदामा सेतू, गोमती, स्वामीनारायण मंदिर, गायत्री मंदिर, घाटकेशव्रज, द्वारकाधीश त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, लक्ष्मीनारायण मंदिर, गीता मंदिर, गोलोक धाम, तसेच अशोक शिलालेख, दामोदर कुंड, राजराजेश्वरी मंदिर, नरसी मेहता समाधी दर्शन आणि साखरबाग प्राणिसंग्रहालय आणि गीर जंगल सफारी अशा अद्भूत सफारीचा ..

नव्या पक्षाचे स्वागत करताना ...

भारतीय राजकारणात अनेक विचारधारा कार्यरत असून या विचारधारांना प्रकट करणारे विविध पक्ष स्थापन झाले आहेत. एकाच विचारधारेचे वेगवेगळे पैलू आणि नेतृत्व यामुळे एकच विचारधारा सांगणारे अनेक पक्षही स्थापन झाल्याचा इतिहास आपण पाहिला आहे. उदाहरणादाखल आपण 'समाजवाद' ..

काश्मीर प्रश्नांचा नवा चेहरा

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वानी सुरक्षा दलाच्या दहशतवादविरोधी कारवाईत मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे रान पेटले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तीन प्रकारे काश्मीर प्रश्न हाताळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यापैकी पहिला प्रकार दहशतवाद्य..