महाराष्ट्राचे आजचे गढूळ वातावरण पाहता आपण महाराष्ट्राचा वारसा विसरत चाललो आहोत, असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु अशाही वातावरणात चैतन्य, पावित्र्य, मांगल्याचे दीपस्तंभ ठरावेत अशी शेकडो कामे महाराष्ट्रात नि:स्वार्थी वृत्तीने चालत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या अत्यंत विषारी धार्मिक, सांस्कृतिक वातावरणात राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे धर्मराजाप्रमाणे स्थिर आहेत...
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे स्वरूप जरा खोलात जाऊन पाहिले तर हा तीन देशांतील प्रवृत्तींचा लढा आहे. इराणपुरता नेस्तनाबूत झाला नाही तर पुढच्या वेळी तो इस्रायलचे अस्तित्व जगातून पुसून टाकेल. जसा चवताळलेला प्राणी जीवाच्या निकराने तुटून पडतो तसे ते युद्ध होईल. त्यासाठी इराण जेवढा खच्ची होईल तेवढे इस्रायलला पाहिजे आहे. त्याची इतकी अधोगती झाली पाहिजे की पुढची 50-100 वर्षे इराणला डोके वर काढता येऊ नये. ही स्वसंरक्षणाची अत्यंत टोकाची प्रवृत्ती आहे...
अमेरिकेचा इराणला दिलेला इशारा आणि खार्ग बेटावर नियंत्रण मिळवण्याची चर्चा यामुळे पश्चिम आशियातील तणाव नव्या टप्प्यात पोहोचला आहे. एका बेटावर नियंत्रण हा निव्वळ भूभाग नाही, तर जागतिक ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेवर कायम असलेला प्रभाव आहे. अमेरिकेला म्हणूनच तो हवा आहे...