डॉ. हेडगेवार हिंदुराष्ट्राच्या पंचगुणांचे व्यक्त रूप

विवेक मराठी    28-Jun-2021
Total Views |

आपल्या व्यवहारातून आपल्या कल्पना समाजात प्रसृत होतील असे वर्तन पाहिजे. जीवनाच्या सर्व अंगोपांगातून इच्छा-निश्चय प्रकट व्हावा. “अज्ञानी चर्चा करतात, ज्ञानी वागतातअसे डॉक्टर म्हणायचे. डॉक्टर हे हिंदुराष्ट्राच्या पंचगुणांचे व्यक्त रूप होते, हे नि:संशय! शतांशाने का होईना, त्यांचे अनुसरण करणे आपल्या हाती आहे.


RSS_1  H x W: 0

हिंदुराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेण्याचे ध्येय उराशी बाळगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य स्वयंसेवक प्रतिदिन संघशाखेवर प्रार्थना म्हणतात. ध्येयसिद्धी व्हावी म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वराकडे आशीर्वादासह विशिष्ट गुणांची याचना करतात. सार्या विश्वात अजिंक्य ठरेल अशी शक्ती, ज्याच्यासमोर सारे जग नम्र होईल असे शुद्ध चारित्र्य, स्वत:होऊन स्वीकारलेला खडतर मार्ग सुगम करण्यासाठी ज्ञान, भौतिक आणि पारलौकिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी तेजस्वी वीरव्रत आणि हृदयात सदैव जागृत असलेली चिरंतन ध्येयनिष्ठा अशा पंचगुणांची मागणी करतात. वास्तविक, स्वत:चा उत्कर्ष करू पाहणार्या कुठल्याही राष्ट्रासाठी हे सर्व गुण आवश्यक आहेत. म्हणून, संघशाखेत म्हटली जाणारी प्रार्थनासंघाची प्रार्थनानसून हिंदुराष्ट्राची प्रार्थना आहे. प्रार्थना संघस्वयंसेवक नव्हे, तर हिंदुराष्ट्राचे घटक म्हणत असल्याचा तिच्यात उल्लेख आहे. सन 1939मध्ये सिद्ध झालेली हिंदुराष्ट्राची ही प्रार्थना संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांच्या चिंतनाचा परिपाक आहे. आत्मविस्मृत आणि अवनत झालेल्या हिंदुराष्ट्राला परमवैभवाकडे नेण्यासाठी हे पंचगुण आवश्यक असल्याचा डॉक्टरांनी निष्कर्ष काढला. अमूर्त गुणांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी दैनंदिन संस्कार करणारी शाखापद्धती विकसित केली. संघकामाला डॉक्टरांनी दिलेले शारीरिक, सैनिकी आणि बौद्धिक आयाम या गुणांच्या संवर्धनासाठी होते.

हिंदुराष्ट्राचे घटक परमेश्वराकडे पंचगुणांची प्रार्थना करतात याचा अर्थ डॉ. हेडगेवार हिंदुराष्ट्रिकांकडून या पंचगुणांची अपेक्षा करत होते. आधी केले मग सांगितले, इतकेच नव्हे तर आधी केले, दहा-पंधरा वर्षांनी इतरांना सांगितले असे डॉक्टरांचे ब्रीद होते. इतरांकडून या गुणांची अपेक्षा करणार्या डॉक्टरांच्या ठायी हे गुण होते का? प्रस्तुत लेख या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे. अल्पज्ञात नि वानगीदाखल माहिती असे लेखाचे स्वरूप आहे. रा.स्व. संघाच्या अभिलेखागारात सुरक्षित असलेली मूळ कागदपत्रे हाच लेखाचा आधार आहे.
 


अंक नोंदणीसाठी https://www.evivek.com/dr-hedgewar/
 

अजिंक्य शक्ती

 व्यक्तिगत बलोपासना, तिचा परिपोष करणारी व्यवस्था निर्माण करणे आणि त्या दिशेने इतरांनी केलेल्या प्रयत्नांना सक्रिय प्रोत्साहन देणे डॉक्टरांनी आयुष्यभर केले. डॉक्टर लहानपणी हाडकुळे होते. ते लहानपणी घराच्या माडीवर वेताचा मल्लखांब करत असत. बाल केशव सुमारे बारा वर्षांचा असताना कोणीतरी त्याच्या वडिलांचा नळावर अपमान केला. या घटनेने राग येऊन तिघा हेडगेवार बंधूंनी व्यायामाला प्रारंभ केला. पहाटे उठून आपल्या सवंगड्यांसह मैलोन्मैल पळावयास जाण्याची सवय बाल केशवाला इंग्लिश शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच लागली होती आणि त्या वयातही त्याला मल्लखांबाच्या काही पकडी अवगत होत्या. मैलोन्मैल पळण्याची क्षमता केशवरावांना त्यांच्या क्रांतिकार्यात चांगलीच उपयोगी पडली. आपल्यामागे गुप्तचर लागला आहे हे पाहून केशवराव मैलोन्मैल पळायचे. बिचार्या गुप्तचराची चांगलीच दमछाक होत असे.


 
शत्रूच्या हृदयात धडकी भरेल अशीच डॉक्टरांची शारीरिक शक्ती होती. सन 1924ला मुस्लिमांच्या गुंडगिरीला नागपुरात ऊत आलेला असताना भीमकाय डॉक्टर आणि त्यांचे सहा सहकारी हातात सोटा घेऊन मुस्लीम मोहल्ल्यात निर्भयपणे जात. ते दृश्य बघूनच एकदोन वेळा मुस्लीम गुंडांनी पळविलेली हिंदू मुलगी निमूटपणे त्यांच्या स्वाधीन केली होती.

  


RSS_2  H x W: 0

 

नागपूर, महाराष्ट्र, भारत अशा नागपुरातील विविध आखाड्यांशी डॉक्टरांचा घनिष्ठ संबंध होता. संघस्थापनेपूर्वीच डॉक्टर गणेश मंडळांतील पाच-सात तरुणांना अनाथ विद्यार्थी गृहात शारीरिक शिक्षण देत आणि लाठीकाठी करीत. आबाजी कावळ्यांच्या विहिरीवर डॉक्टर स्वत: तरुणांना पोहायला शिकवीत. सन 1922च्या विजयादशमीला त्यांनी पूर्वक्रांतिकारकांसाठी वर्ध्यालाराष्ट्रीय मल्लविद्या शाळाकाढली. ऑक्टोबर 1922मध्ये देशी खेळांना आणि व्यायामप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. मुंज्यांनी सुरू केलेल्यानागपूर बेरार टूर्नामेंट्समध्ये नि जानेवारी 1930मध्ये डॉ. मुंज्यांनी सुरू केलेल्या रायफल असोसिएशनमध्ये डॉक्टर कार्यरत होते. पाश्चात्त्य सैनिकी शिक्षणासंबंधी ले. पटवर्धन यांची व्याख्याने डॉक्टर हत्ती चौकात करवीत असत. सन 1929मध्ये काही स्वयंसेवकांनी डॉक्टरांना हर्क्युलस सायकल घेऊन दिली. तत्पूर्वी ते महाल भागातून बर्डी, धंतोलीपर्यंत पायीच ये-जा करावयाचे. डॉक्टर सायकल वेगाने चालवीत. डॉक्टरांना घोडेस्वारी अवगत होती, हे बाळ देशमुख यांनी सांगितलेल्या पुढील आठवणीवरून स्पष्ट होते - सन 1931ला एका उत्सवप्रसंगी डॉक्टर पूर्ण गणवेश घालून मोठ्या घोड्यावर स्वार होऊन संघस्थानावर आले. या वेळी त्यांना बंदुकीच्या 101 गोळ्या उडवून मिलिटरी प्रणाम देण्यात आला. आसपासच्या गावांतून दहा बंदुका आणण्यात आल्या होत्या ही गोष्ट सर्वांना विस्मयकारक वाटली होती. डॉक्टरांना अशा स्थितीत ज्यांनी पाहिले, त्या सर्वांना ते प्रत्यक्ष शिवरूप वाटत असत असा अभिप्राय देशमुखांनी नोंदविलेला आहे. सन 1932मध्ये बनारसला गेले असता डॉक्टरांनी गंगेचे दीड मैलाचे पात्र पोहून पार केले ते पलीकडे रामनगर भागात पोहोचले (देशमुखांनी दि. 8 डिसेंबर 1954 ला सांगितलेली आठवण). चोरबाहुलीच्या जंगलात डॉक्टर शिकारीला जात. एकदा शिकारीला गेलेले असताना सरावाच्या वेळी पहिल्याच गोळीत त्यांनी वांग्याला छिद्र पाडल्याची आठवण अण्णा वैद्यांनी नमूद केली आहे.


आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.
सवलत मूल्य 160/- ₹
https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/
 
 


बजरंगबली
हे डॉक्टरांचे प्रिय दैवत! मारुतीरायाची मूर्ती समोर ठेवून डॉक्टर संघाची प्रतिज्ञा देत असत. संघात सुरू झालेली व्यायामपरंपरा देवगुरू मारुतीराय, आद्यगुरू बाळंभटदादा देवधर (ब्रह्मावर्त - पुणे), कोणभटनाना गोडबोले (काशी - पुणे), भाऊ अष्टपुत्रे, हरिपंत बर्वे, दामोदर बळवंत भिडे भटजी अशी असल्याचे संघातील शारीरिक शिक्षणाचे जनक अण्णा सोहोनींचे कथन आहे. लाठीकाठीबरोबरच संघात नेमबाजी, तलवार, भाला, धनुर्बाण, शॉटपुटचेही शिक्षण दिले जात असे. सन 1928मध्ये ब्रिटिशांनी महाविद्यालयीन युवकांसाठी सुरू केलेल्या युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोअरची (यूटीसीची) छावणी पाहावयास डॉक्टर एकदा गेले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा उल्लेख सापडतो. दि. 1 जानेवारी 1931 रोजी संघाच्या वीस अधिकार्यांना घेऊन डॉक्टर कामठी येथे हिंदी युरोपीय सैन्याचा कार्यक्रम पाहावयास गेल्याचा उल्लेखही सापडतो. ग्वाल्हेरच्या सैन्यातील उपासनी नावाचे अधिकारी सुट्टीसाठी नागपुरात येत. डॉक्टरांनी कृष्ण नारायण उपाख्य अन्याजी लांबे या स्वयंसेवकाची उपासनींशी भेट करविली. आगपेटीच्या काड्यांच्या साहाय्याने घरातल्या लहान खोलीत निरनिराळ्या सैनिकी हालचाली डॉक्टरांनी स्वयंसेवकांकडून आत्मसात करविल्या त्या शाखेत पुढे रूढ झाल्या. डॉक्टरांच्या काळात संघात सैनिकी विभाग असून सरसेनापती, सेनापती, नायक, सार्जंट-मेजर, कंपनी कमांडर अशी पदे असत. आज ज्यांला संघातशिबिरम्हटले जाते, त्याला डॉक्टरांच्या काळातलष्करी छावणीम्हणावयाचे. संघातबटालियन’, ‘प्लॅटूनहीच शब्दावली रूढ होती. संघाची स्वत:चीमिलिटरी लायब्ररीहोती. सन 1937मध्ये डॉ. मुंज्यांनी सुरू केलेल्या भोसला सैनिकी शाळेतील शिक्षणाचे स्वरूप निश्चित करण्यात डॉक्टरांचा पुढाकार होता. शिक्षणविषयक साधनांची खरेदी करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यांच्या समितीत डॉक्टर होते.


शत्रूच्या
हृदयात धडकी भरेल अशीच डॉक्टरांची शारीरिक शक्ती होती. सन 1924ला मुस्लिमांच्या गुंडगिरीला नागपुरात ऊत आलेला असताना भीमकाय डॉक्टर आणि त्यांचे सहा सहकारी हातात सोटा घेऊन मुस्लीम मोहल्ल्यात निर्भयपणे जात. ते दृश्य बघूनच एकदोन वेळा मुस्लीम गुंडांनी पळविलेली हिंदू मुलगी निमूटपणे त्यांच्या स्वाधीन केली होती. डॉक्टरांच्या शेवटच्या दिवसांत त्यांचा नागपुरात इतका धाक बसला होता की एकदा गणेश पेठ भागात मुस्लीम गुंडांकडून बाचाबाची चालली असता डॉक्टरांना पाहताचआले रे! हेडगेवार आले!” असे म्हणून त्यांनी धूम ठोकली होती.

शुद्ध चारित्र्य

व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात शुद्ध चारित्र्याचा आग्रह धरणारे डॉक्टर त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये उठून दिसतात. सार्वजनिक कार्य करताना भल्याभल्या लोकांचा पाय घसरताना त्यांनी पाहिले होते. नैतिक आचरण हा स्वयंसेवकाचा पाया असल्याचे डॉक्टरांचे मत होते. जर आपले आचरण विशुद्ध नसेल, नैतिकदृष्ट्या स्वयंसेवकाचे अध:पतन झाले असेल, तर तो स्वयंसेवक आपले कार्य करू शकत नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांत त्याला महत्त्व नाही, त्यांच्या नेत्यांचा आदर्श आपण समोर ठेवू नये. शिवाय नीतीच्या त्यांच्या आपल्या कल्पना यांत फार फरक आहे. तेव्हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे संघाचा घटक हा पूर्णत्वाने नीतिमान पाहिजे, असा डॉक्टरांचा आग्रह असे. डॉक्टरांचे चारित्र्य इतके निर्मळ होते की त्यांच्याशी मतभेद असलेली मंडळीही त्यांच्यापुढे लीन होत असत. वैराग्याकडून आपला कल विलासाकडे झुकू नये याची दक्षता घेतली पाहिजे, हा डॉक्टरांसाठी आचरणाचा विषय होता. ‘डॉक्टरांच्या चरित्रात गंगेप्रमाणे स्वयंभू असामान्य अकलुषत्व होतेअसा अभिप्राय डॉक्टरांचे वर्गमित्र पुढे चंद्रपूरचे संघचालक झालेले अधिवक्ता नारायण पांडुरंग उपाख्य नानासाहेब भागवत देतात.

व्यक्तिगत चारित्र्याबरोबरच डॉक्टरांनी सार्वजनिक चारित्र्याचा आदर्श घालून दिला. उच्चशिक्षित असूनही डॉक्टरांनी स्वत:साठी कधी अर्थार्जन केले नाही. त्यांची आर्थिक चणचण दर्शविणारे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. डॉक्टर आपल्या थोरल्या बंधूंचा चश्मा वापरीत. त्याने डोक्याला त्रास होईल, नवा का घेत नाही, त्याने त्रास थांबेल असे कुणी म्हटल्यासतू पैसे आण, मी लगेच विकत आणतोअसे उत्तर देऊन ते त्याची बोळवण करीत. दुसर्यांनी फंड द्यावा आपण देशभक्ती करावी ही पद्धती डॉक्टरांना पटत नसे. देशभक्ती करणार्यांनीच लागणारा पैसा दिला पाहिजे, असे ते म्हणत. स्वत:च्या घरखर्चाला गुरुदक्षिणेपैकी एक छदामही वापरावयाचा नाही, असा डॉक्टरांचा कटाक्ष असे. डॉक्टरांची ओढग्रस्तता पाहून सभोवतालच्या स्वयंसेवकांच्या हृदयात कालवाकालव होत असे. यादवराव जोशी यांनी शिकवणीतील पाच रुपये पाकिटात घालून डॉक्टरांना दिले, ते डॉक्टरांनी लगेच साभार परत केले आणि म्हणाले, “हे तूर्त आपल्याजवळच ठेव.” डॉक्टरांनी बाबासाहेब पाध्ये यांना संघाचेऑडिटरनेमले होते. संघकामासाठी झालेल्या व्ययाचा हिशेब संघाचेस्टोअर्स मॅनेजरगोविंदराव सोंगाडे यांना अगदी सरसंघचालक डॉक्टरांनीही देण्याचा शिरस्ता होता.

 

मध्य हिंदुस्थानात नेमलेल्या दादा परमार्थ यांना संघकामासाठी लाहोरच्या संघकार्यकर्त्यांनी बोलावून घेतले. दि. 2 नोव्हेंबर 1938 रोजी लिहिलेल्या पत्रात डॉक्टर दादारावांना सांगतात, ‘तुझी योजना मध्य हिंदुस्थानात केंद्र कार्यालयाकडून झालेली असून तुला लाहोरला बोलवावयाचे असल्यास त्यांनी केंद्र कार्यालयाला लिहिले पाहिजे, असे तू त्यांना कळवायला हवे आहे.’ तोलूनमापून शब्द वापरणे हा डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य! म्हणूनच त्यांच्या शब्दाला असाधारण किंमत होती. ‘(डॉ. हेडगेवार) कृष्णराव (मोहरीर) ह्यांना कधीकधी शब्दश: पत्र सांगत. कधी आशय सांगत. मनाजोगते पत्र होईपर्यंत पुन्हा लिहून घेत वा लिहीत. अपेक्षेपेक्षा दुसरा अर्थ कोणी काढणार नाही अशी दक्षता घेत. खोडाखोड खपत नसेअशी डॉक्टरांच्या पत्रलेखनाची आठवण बच्छराज व्यास यांनी दि. 17 नोव्हेंबर 1954 रोजी सांगितली आहे.


व्यक्तिगत चारित्र्याबरोबरच डॉक्टरांनी सार्वजनिक चारित्र्याचा आदर्श घालून दिला. उच्चशिक्षित असूनही डॉक्टरांनी स्वत:साठी कधी अर्थार्जन केले नाही. त्यांची आर्थिक चणचण दर्शविणारे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. दुसर्यांनी फंड द्यावा आपण देशभक्ती करावी ही पद्धती डॉक्टरांना पटत नसे. देशभक्ती करणार्यांनीच लागणारा पैसा दिला पाहिजे, असे ते म्हणत...

 


ज्ञान

आपणच स्वीकारलेल्या खडतर मार्गातील विघ्ने दूर करण्याचे विवेकयुक्त ज्ञान डॉक्टरांपाशी होते. ते त्यांनी आपल्या क्रांतिकाळातच मिळविले होते. ग्रहतार्यांचे उत्तम ज्ञान त्यांनी हौसेखातर खासच अवगत केले नव्हते. मे 1917मध्ये नागपूर-काटोल भागात महिनाभर चालू असलेले गुप्त क्रांतिकारक शिबिर संपल्यावर डॉक्टरांनी वर्धा जिल्ह्याचे काम आप्पाजी जोशींवर सोपविले. जन्मतिथी सांगू नये, हात दाखवू नये, बरळणे कसे टाळावे, गुप्तता कशी राखावी, सीआयडीचे डावपेच कसे असतात हे अप्पाजींना सांगायला डॉक्टर विसरले नाहीत. वजनदार माणसांची टोपणनावे कोणती, त्यांना भेटताना कोणता परवलीचा शब्द बोलायचा अशी मोठी यादीच डॉक्टरांनी दिली. अधिकृत तेच छापावे असा त्यांचा कटाक्ष असे.

संघाचा स्वयंसेवकज्ञानीअसावा असा डॉक्टरांचा नेहमीच प्रयत्न असे. शिक्षण ही ज्ञानाची पहिली पायरी असल्यामुळे की काय, संघाचा स्वयंसेवक सुशिक्षित असला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. वकिलीची परीक्षा त्याने उत्तीर्ण करावी असे त्यांना नेहमी वाटे. जरी वकिली करावयाची नसली, तरी पुष्कळ लोकांना त्यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण व्हावयास भाग पाडले. दिनकर वाईकर लिहितात, ‘प्रत्येक स्वयंसेवक हा राजकारणाचा अभ्यासू पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते... राजकारणापासून संघाला अलिप्त ठेवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला... परंतु ते नेहमी म्हणत, जगात काय चालले आहे याची संपूर्ण माहिती संघ घटकाला पाहिजे, अनेक प्रसंगी संघ चालवण्याकरिता आणि मार्ग काढण्याकरिता याचा उपयोग होतो.’

आश्चर्य वाटावे असे विषय त्या काळातील बौद्धिक वर्गांत हाताळले जात - नकाशा कसा वाचावा (बाबुराव मुठाळ, 17 फेब्रुवारी 1929), आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रीन (तात्या तेलंग, 24 फेब्रुवारी 1929), विमानांची माहिती (कॅप्टन पटवर्धन, 2 नोव्हेंबर 1929), डोमिनियन स्टेटस (बालाजी हुद्दार, 1 सप्टेंबर 1930), पाकस्तान पॅन-इस्लामिझम (विश्वनाथराव केळकर, 28 जानेवारी 1936). दि. 7 डिसेंबर 1928 रोजी इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या भाषणाला संघस्वयंसेवकांनी जावे, म्हणून संघशाखेला लवकर सुट्टी देण्यात आली. सन 1932च्या वय वर्षे 10-14 वर्षांच्या स्वयंसेवकांसाठीच्या पहिल्या वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या बौद्धिक अभ्यासक्रमात एकूण 54 पुस्तके होती. त्यांत हिंदू तत्त्वज्ञान, इतिहास, परंपराविषयक पुस्तकांव्यतिरिक्त स्कॉटिश आयरिश इतिहासनायकांच्या कथा, रॉबर्ट ब्रूस, गॅरीबाल्डी, सुन्यात सेन, हॅनिबाल, स्पार्टाचा लायकरगस .ची चरित्रे, टॉयनबीची ग्रंथमाला, कुओमिनटांग चिनी क्रांती, फिलिपाइन्सची स्वातंत्र्यचळवळ असे विषय होते.

वीरव्रत

अभ्युदयआणिनि:श्रेयसप्राप्त करण्याचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणजे वीरव्रत! वीरव्रताचा अंगीकार केल्यास बाह्य शत्रू आणि स्वत:तील षड्र्िपू या दोघांवर मात करता येते. षड्रिपूंपैकी क्रोध सोडल्यास अन्य सर्व रिपू डॉक्टरांच्या जवळपासही कधी फिरकू शकले नाहीत. क्रोध हा मात्र त्यांना वंशपरंपरेने प्राप्त झालेला होता. बोलताना त्यांच्या चेहर्यावर गंभीर भाव असे, पण क्रोध उमटत नसे (अधिवक्ता आनसिंगकर) किंवा कोणी कमी काम करतो म्हणून रागावताना वा कधी कोणाची टिंगल उडवताना ते आढळले नाहीत (हरिहर पुराड उपाध्ये), असे त्यांच्या समकालीन मंडळींनी म्हणावे इतका त्यांनी आपला मूळ स्वभाव संघटनेसाठी बदलला.

शाळेतून निष्कासित होऊ हे माहीत असूनहीवंदे मातरमम्हटले म्हणून क्षमा मागण्यास नकार देणे, वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ब्रिटिशांनी अन्यायाने अनिवार्य केलेल्या परीक्षेला बसण्यास नकार देणे, सश्रम कारावासाची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणे, नागपुरात दंग्याचे तंग वातावरण असताना रेल्वे स्थानकापासून एकट्याने शांतपणे घरी चालत येणे, मुस्लिमांना घाबरून मशिदीसमोर चाललेल्या मिरवणुकीत वाजंत्र्यांनी ढोल वाजविण्यास नकार दिल्यावर स्वत: गळ्यात ढोल घेऊन तो वाजविणे, जंगल सत्याग्रहात भाग घ्यायला जात असताना कसायाच्या तावडीतून गायीची सुटका होईपर्यंत तिथे हटून बसणे असे ध्येयाप्रती सातत्याने वाटचाल करण्याच्या शौर्याचे प्रसंग डॉक्टरांच्या चरित्रात सापडतात.

दि. 21 जुलै 1930 रोजी जंगल सत्याग्रह केल्याप्रकरणी डॉक्टरांना नऊ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवान म्हणून त्यांना रेल्वेगाडीने यवतमाळ ते अकोला नेण्यात आले. वाटेत प्रत्येक स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यात आले. दारव्हा रेल्वे स्थानकावर त्यांचे दहा-पंधरा मिनिटे भाषण झाले. दारव्ह्याच्या पुढे गाडी गेल्यावर डीएसपीच्या आज्ञेची खोटी सबब सांगत पोलीस सबइन्स्पेक्टरने शिपायाला डॉक्टरांना हातकडी घालण्यास सांगितले. त्यावर डॉक्टरांनी खरमरीत शब्दांत सुनावले, “तुझा हातकडी घालण्याचा निश्चय दिसतो. मग मलाही माझा निश्चय दाखविला पाहिजे.” “म्हणजे मला तुम्ही हातकडी घालू देणार नाही?” असे सबइन्स्पेक्टर म्हणाला. यावर डॉक्टर अतिशय संतापून म्हणाले, “घाल कशा बेड्या घालतोस. तू जास्त गमजा करशील तर तुला डब्यातून बाहेर फेकून देईन. फारतर दुसरा खटला भरशील. पण आम्ही जर सत्याग्रह करताना नऊ महिन्यांची शिक्षा होईल असे थोडेच धरले होते, तर नऊच्या जागी अठरा महिन्यांची शिक्षा होईल. तेव्हा पाहू कशा हातकड्या घालतोस.” डॉक्टरांचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी माघार घेतली.

ध्येयनिष्ठा

ध्येयनिष्ठाहा उदात्त गुण असला, तरी त्यातूनध्येयआणि त्याच्याप्रती निष्ठा ठेवणार्या व्यक्तीत द्वैत ध्वनित होते. पण डॉक्टरांचे यज्ञमय जीवन पाहिल्यावरध्येयनिष्ठाहा शब्द त्यांच्या बाबतीत अगदीच तोकडा वाटू लागतो. डॉक्टर ध्येयनिष्ठ नव्हे, तर ध्येयरूप होते.

आपले व्यक्तिमत्त्व पुसून टाकले पाहिजे. मी म्हणजे माझे राष्ट्र असे मानले पाहिजे. राष्ट्राशी तन्मय झाले पाहिजे. राष्ट्र आणि मी यांच्यात आपल्याला फरक वाटता कामा नये. ही जाणीव आपल्या अंगात इतकी भिनली पाहिजे की मी राष्ट्राकरिता काही करतो आहे असा अहंभावसुद्धा आपल्याला वाटता कामा नयेअसे म्हणणार्या डॉक्टरांच्या मनोवस्थेचे वर्णन करताना श्रीगुरुजी तुलसीदासाच्या पुढील ओळी सांगायचे, ‘...उत्तम के अस बस मन माहीं। सपनेहुँ आन पुरुष जग नाहीं।’ (जिच्या स्वप्नातही अन्य पुरुष नाही ती सर्वोत्तम पतिव्रता असे वेद, पुराण आणि संत सांगतात). त्याचप्रमाणे जीवघेण्या आजारात अर्धवट ग्लानीत असतानादेखील डॉक्टरांच्या मुखातून देशाशिवाय अन्य विषय बाहेर पडत नसे.

आपल्या व्यवहारातून आपल्या कल्पना समाजात प्रसृत होतील असे वर्तन पाहिजे. जीवनाच्या सर्व अंगोपांगातून इच्छा-निश्चय प्रकट व्हावा. अज्ञानी चर्चा करतात, ज्ञानी वागतात असे डॉक्टर म्हणायचे. डॉक्टर हे हिंदुराष्ट्राच्या पंचगुणांचे व्यक्त रूप होते, हे नि:संशय! शतांशाने का होईना, त्यांचे अनुसरण करणे आपल्या हाती आहे.