रामराज्याच्या दिशेने

विवेक मराठी    27-Jan-2024   
Total Views |
राम मंदिरासारखे अनेक शतकांचे स्वप्न आपण साकार केले, म्हणूनच तो भारतीयांसाठी आनंदसोहळा झाला. तरी ते अंतिम गंतव्य नाही, तर भारतवर्षाच्या एका नव्या शुभंकर प्रवासाचा हा आरंभ आहे, याची दोघांनी जाणीव करून दिली. तसेच रामराज्य ही कविकल्पना नाही. ती प्रत्यक्षात येऊ शकते आणि सर्व जगासाठी हितकर असू शकते, हा विश्वास मनी जागवत, इथून पुढे रामराज्य साकारायच्या दृष्टीने आपल्यापैकी प्रत्येकाला प्रवास करायचा आहे याचे लख्ख भान उभयतांनीं दिले.
ram mandir
 
 
‘सौगंध राम की खाते है.. हम मंदिर वही ब नायेंगे‘ हा मंत्र उराशी जपत, तोच ध्यास मनीमानसी बाळगत रामभक्तांच्या-देशभक्तांच्या कित्येक पिढ्यांनी राम मंदिर निर्माणासाठी अविरत संघर्ष केला. अखेर पाचशे वर्षांचा कलंक पुसून टाकत, दि. 22 जानेवारी 2024 रोजी रामजन्मभूमीवर भव्यदिव्य राम मंदिर उभे राहिल्याचे याचि देही याचि डोळां अनुभवले. एका अभूतपूर्व इतिहासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आजच्या भारतवर्षातील प्रत्येक नागरिकाला लाभले. ‘जन्म धन्य झाला’ असे वाटण्याजोगे काही दुर्मीळ क्षण असतात. असाच एक दुर्मीळ क्षण कोटी कोटी भारतीयांच्या नावे लिहिला गेला होता. साफल्याचा, सार्थकतेचा भावविभोर करणारा असा तो क्षण होता. केवळ दैवी वाटावी अशा रामलल्लाच्या मूर्तीची - बालकरामाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते झाली. तप:पूत जीवन जगणार्‍या भारतमातेच्या या दोन सुपुत्रांना हे भाग्य लाभले. प्रत्यक्ष अयोध्याभूमीत उपस्थित राहून आणि आपापल्या दूरचित्रवाणी संचावरून हा सोहळा पाहणार्‍या कोटी कोटी भारतीयांनी या दैवी सोहळ्याचा अनुभव घेतला.
 
 
अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अनेक कारणासांठी विशेष, एकमेवाद्वितीय असा ठरला आहे. अलौकिक तेज लाभलेली बालकरामाची मूर्ती, मूर्तीला साजेसे उभे राहत असलेले भव्य देखणे मंदिर, कोट्यवधींच्या उपस्थितीत मंगलमय पवित्र वातावरणात झालेला आणि कोणत्याही अपप्रसंगाचे गालबोट न लागलेला अखिल विश्वाचे लक्ष वेधून घेणारा सोहळा आणि त्याच शुभमुहूर्तावर देशाच्या सीमा ओलांडून अखिल विश्वात चालू असलेले रामपूजन.. खरोखरच ‘न भूतो, न भविष्यती’ असा हा दिवस. मात्र या सगळ्या वैशिष्ट्यांपेक्षाही आणखी एका विशेष कारणासाठी हा सोहळा अजरामर झाला आहे, ते म्हणजे प्राणप्रतिष्ठेनंतरच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उभ्या भारतवर्षाला दिलेले पाथेय. ते पुन्हापुन्हा ऐकणे, त्यावर मनन-चिंतन करणे आणि शक्य ते सारे आपल्या कृतीत उतरवणे हे प्रत्येक रामभक्ताचे-भारतीयाचे कर्तव्य आहे. भारतभूला विश्वगुरू करण्यासाठीची ती पूर्वअट आहे.
 
 
राम मंदिरासारखे अनेक शतकांचे स्वप्न आपण साकार केले, म्हणूनच तो भारतीयांसाठी आनंदसोहळा झाला. तरी ते अंतिम गंतव्य नाही, तर भारतवर्षाच्या एका नव्या शुभंकर प्रवासाचा हा आरंभ आहे, याची दोघांनी जाणीव करून दिली. तसेच रामराज्य ही कविकल्पना नाही. ती प्रत्यक्षात येऊ शकते आणि सर्व जगासाठी हितकर असू शकते, हा विश्वास मनी जागवत, इथून पुढे रामराज्य साकारायच्या दृष्टीने आपल्यापैकी प्रत्येकाला प्रवास करायचा आहे याचे लख्ख भान उभयतांनीं दिले. सोहळ्याच्या भारलेपणातून प्रत्येकाला भानावर आणत पुढचा रोडमॅप समोर ठेवत, ‘उत्तिष्ठत.. जाग्रत’ असा आदेशच सर्वांना दिला.
संघमुशीत घडलेल्या, भारतभूच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अवघे जीवन समर्पित केलेल्या या दोघांचे विचार किती सारखे आणि पथदर्शक आहेत, याची जाणीव त्यांच्या उद्बोधनाने झाली.
 
 
प्राणप्रतिष्ठेनंतरच्या जाहीर सभेत डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या आटोपशीर पण प्रभावी मांडणीचा विस्तार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मांडणी होती.
 
 
मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधानांनी अकरा दिवसांचे अनुष्ठान केले. “रामराज्य अवतरावे असे वाटत असेल, तर आता प्रत्येक भारतीयाला तप करावे लागेल” असे सांगत डॉ. मोहन भागवत यांनी या तपाचरणाबाबत मार्गदर्शन केले. अहंकाराचा त्याग करणे, सेवा-परोपकाराला अग्रक्रम देणे, सर्वांभूती राम या भावनेने सर्व भारतीयांशी आत्मीय नाते ठेवणे आणि ते कृतीत उतरवत तसेच व्यक्तिगत आणि समाजजीवनात अनुशासन राखणे अशा त्या तपाचरणाच्या काही पायर्‍या त्यांनी सांगितल्या. प्रत्येकाने नागरिकशास्त्राचे पालन केले तर भारताला विश्वगुरू बनणे अवघड नाही, अशा वरवर पाहता सोप्या वाटणार्‍या पण प्रत्यक्ष आचरणासाठी कष्टसाध्य असलेल्या कृतीचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
 
त्यांच्या याच मांडणीचा विस्तार करत, आपल्या भाषणातून पंतप्रधानांनी कोट्यवधी भारतीयांना भावनिक आवाहन केले. “राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे रामराज्याच्या दिशेने टाकलेले पहिले आणि आश्वासक पाऊल आहे. ही केवळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही, तर भारतीय संस्कृतीची, इथल्या मानवी मूल्यांचीदेखील प्राणप्रतिष्ठा आहे, ज्याची केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण विश्वाला गरज आहे. अर्थात हे निवडक लोकांचे काम नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे” अशा शब्दांत पंतप्रधानांनी जाणीव करून दिली. त्या ऊर्जाभारित वातावरणात उच्चारल्या गेलेल्या त्यांच्या या शब्दांना मंत्राचे मोल आले.
 
“हे राम मंदिर निर्माण म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातही ज्या गुलामीच्या शृंखला आपल्याभोवती होत्या, त्या तोडून टाकल्याचे प्रतीक आहे. भारत वैचारिक गुलामीतून मुक्त झाल्याचे प्रतीक आहे. पाचशे वर्षे पिढ्यांमागून पिढ्यांनी एका ध्यासासाठी आपण दिलेल्या लढ्याचे ते प्रतीक आहे. आपले ध्येय जर सत्याधारित असेल आणि ते गाठण्यासाठी आपण सामूहिक, संघटित प्रयत्न केले, तर अशक्य काही नाही, हा या राम मंदिराच्या लढ्याने दिलेला मोठा धडा आहे” याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. भारतातील युवा शक्तीला त्यांनी केलेले भावपूर्ण आवाहन हा त्यांच्या मांडणीतील परमोच्च बिंदू होता. युवकांना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतानाच हजारो वर्षांनी भारताला लाभलेली ही अमूल्य संधी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
 
ही जाहीर सभा म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कळसाध्याय होता. ते जसे भारतीयांना केलेले दिशादिग्दर्शन होते, तसे विरोधी विचारांच्या लोकांना दिलेला इशारा होता. भारताची पुढची वाट कोणत्या दिशेने असेल याचे अधोरेखन होते.
 
 
रामराज्य उभारणे म्हणजे ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हा मंत्र प्रत्यक्षात आणणे. तसे होणे हे जगाच्या हिताचे असेल, तर आपण प्रत्येकाने आपापला सोपवलेली.