‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशी सध्याची स्थिती आहे. ...आणि अनेक युद्धे ही प्रत्यक्ष युद्धभूमीवर नाही, तर मनोभूमीवरही लढली जातात याचे भान ठेवले; तरच या ’बहुरूपी जिहादशी’ दोन हात करणे शक्य आहे.
स्लीम धर्माच्या डीएनएमध्येच आक्रमकता असल्याने आणि काफीर द्वेष नसानसांत भिनवला गेलेला असल्याने, जगाने आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानात कितीही मोठी झेप घेवो; या समाजाची मानसिकता बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट अत्याधुनिक शिक्षण घेतलेले अनेक उच्चशिक्षित मुस्लीमही धर्मांध, जिहादी वृत्तीचे आणि त्यातून अनेक प्रकारच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याची उदाहरणे आज पहायला मिळतात. ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही. साधारण 25 ते 30 वर्षे मागे गेलो, तरी याच्या खुणा स्पष्ट दिसतील.
हिंदूबहुल असलेले भारत हे जगाच्या पाठीवरील एकमेव राष्ट्र. हिंदूबहुल असूनही अन्य धर्मांचा आदर करायला शिकवणारी इथली उदार संस्कृती. आक्रमकांसमवेत इस्लाम भारतात आला, भारताच्या विविध भागांत घडवून आणलेल्या धर्मांतरामुळे इथे रूजला, फोफावला. नुसता फोफावलाच नाही तर, फोफावतानाच या देशाच्या अखंडतेला चूड लावायचे उद्योग या धर्मातील जिहादी वृत्तीच्या धर्मांधांनी सुरू केले. अल्पशिक्षणामुळे वा गरिबीमुळे या समाजातील तरूण जिहादी कारवायांमध्ये गुंतवले जातात. हे गृहीतक अनेक वर्षे समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी मांडले आहे; मात्र या गृहीतकाला छेद देणार्या घटना अलीकडच्या काळात वरचेवर घडत असल्याने जिहादी, धर्मांध मानसिकतेचा अल्पशिक्षणाशी वा अशिक्षित असण्याशी काही संबंध नाही हे दिसून आले आहे.
‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे जगण्याचे साधेसोपे सूत्र या धर्मांध जिहादींना मान्यच नाही. सहिष्णुतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेला हिंदू धर्म, या धर्माचे पालन करणारी माणसे जगण्यालायक नाहीत हे त्यांचे ठाम मत. एक तर हिंदूंना या जगातून नाहीसे करायचे वा त्यांना धर्मांतरासाठी दबाव आणायचा, त्यासाठी बळजबरी करायची, हे यांचे जीवितकार्य. असे कृत्य हे संविधानविरोधी असले वा कायद्याने गुन्हा असला आणि तो सिद्ध झाल्यास कायद्याच्या चौकटीत शिक्षा असली तरी त्यांना त्याची तमा वाटत नाही. कारण असे वागणे म्हणजे धर्माचे पालन करणे, अल्लाच्या नजरेत खराखुरा धर्माभिमानी असणे ही त्यांची अढळ (अंध)श्रद्धा. ती खूप खोलवर रूजलेली आणि मदरशांमधून, अनेक कडव्या मुस्लीम धर्मप्रचारकांनी विखारी प्रवचनांमधून जिवंत ठेवलेली मानसिकता.
‘लव जिहाद‘, ‘लँड जिहाद‘, ‘वोट जिहाद‘ या समस्या गेली काही वर्षे हिंदू समाजाला भेडसावत आहेतच; पण ‘जिहाद’ तितकाच सीमित नसून ’कॉर्पोरेट जिहाद’ही अस्तित्वात असल्याचे नुकत्याच नाशिक येथे घडलेल्या घटनेवरून लक्षात आले आहे. या सर्व मार्गांनी देश पोखरण्याचे, इथला सनातन हिंदू धर्म संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत.
ज्यांना या विषयातील गांभीर्य आणि धोका समजतो आहे ते आपापल्या परिने झोपेचे सोंग घेतलेल्या, अन्यायाविरूद्ध लढण्याचे बळ व इच्छा क्षीण झालेल्या हिंदू समाजाला जागे करण्याचा परोपरीने प्रयत्न करत आहेत. मात्र समाजात वाढलेली सुखोपभोगता, आत्मकेंद्रित वृत्तीने गाठलेली परिसीमा, खुंटलेली सारासार विचारशक्ती आणि आलेले सर्व प्रकारचे दौर्बल्य यांमुळे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत व त्यामुळे जिहादी मानसिकतेच्या धर्मांधांचे फावते आहे.
’टाटा ग्रुप’ हा देशप्रेमासाठी ओळखला जाणारा प्रतिष्ठित उद्योग समूह. ’टीसीएस’ ही या ग्रुपमधील एक नामांकित कंपनी. या कंपनीच्या नाशिक येथील शाखेत राजरोसपणे हिंदू कर्मचार्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता. ’लव जिहाद’च्या घटनाही घडत होत्या. थोडीथोडकी नव्हे तर गेली चार वर्षे अशा घटना घडत असल्याचे तपासांमधून समोर येते आहे. हे केवळ धक्कादायकच नाही, तर या उद्योगसमूहाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
’विप्रो’चे आझिम प्रेमजी हे उद्योगजगतात आदराने घेतले जाणारे एक नाव. त्यांच्या पैशांतून आणि त्यांच्या नावाने चालू असलेल्या विद्यापीठांमध्ये ‘हिंदू धर्माचा समूळ विध्वंस करा’ हा सेमिनार राजरोसपणे भरवला जातो. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपार्ह कार्यक्रम तसेच उपक्रमांसाठी हे विद्यापीठ ओळखले जाते आहे.
’लेन्सकार्ट’ या चष्मा आणि गॉगलसाठी प्रसिद्ध असलेल्या, पीयूष बन्सल नावाचा हिंदू सी.ई.ओ. असलेल्या कंपनीत ‘ग्रूमिंग गाईड लाईन्स’ या गोंडस नावाखाली हिंदू धर्माची प्रतीके असलेल्या कपाळावरील टिळा, बिंदी, हातावरील कलावा यावर बंदी आणि हिजाबला मात्र मान्यता होती. त्यावर उशीरा का होईना पण, प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून जोरदार आवाज उठवला गेल्यावर पीयूष बन्सलने या गाईड लाईन्स बदलल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा धुरळा खाली बसत नाही तोवर ’एअर इंडिया’च्या केबिन क्रूसाठीही पेहरावाबाबत अशाच प्रकारचे नियम असल्याचे समोर येत आहे.
हे सगळे योगायोग नाहीत. तर सूत्रबद्धतेने चालू असलेल्या प्रयत्नांची ती एक अविरत चाललेली शृंखला आहे. त्यातले काही दुवे दृश्य आहेत तर काही अदृश्यपणे काम करत आहेत. हिंदूंच्या केवळ पोशाख आणि वेशभूषेवर केलेला हा आघात नाही तर हिंदू धर्मावर आणि त्याहूनही हिंदू संस्कृतीवर चालू असलेले हे हल्ले आहेत. ते ओळखून सर्वांनी एक होऊन त्याचा प्रतिकार करायला हवा. त्यासाठी गरज आहे आत्मकेंद्रित वृत्तीशी काडीमोड घेण्याची आणि अन्यायाविरोधात नीडरपणे उभे राहण्याची. आजचे शासन आणि प्रशासन याविषयी गंभीर आहे आणि सजगही. समाजाने सजग राहण्याची गरज आहे. कुटुंबात पालक आणि मुलांमधला संवाद अधिकाधिक निकोप, मोकळा असण्याची आवश्यकता आहे. त्यांना बाहेरच्या जगात डोळसपणे व धीटपणे वावरण्यासाठी तयार करणे ही घराची जबाबदारी आहे.
मनुष्यमात्राच्या विकासाला, उत्कर्षाला पोषक असलेल्या आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करायला हवे. आपण सर्वार्थाने जागृत आणि आचारशील हिंदू राहिलो नाही तर आणखी काही वर्षांनी आपल्यापुढचे संकट अधिक गंभीर असेल.
‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशी सध्याची स्थिती आहे. ...आणि अनेक युद्धे ही प्रत्यक्ष युद्धभूमीवर नाही, तर मनोभूमीवरही लढली जातात याचे भान ठेवले; तरच या ’बहुरूपी जिहादशी’ दोन हात करणे शक्य आहे.