शिवरायांच्या जयघोषात निनादली दिवाळी पहाट!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक31-Oct-2019   
|

आदित्य गार्डन सोसायटी-वारजेच्या चिमुकल्यांनी सादर केला  ‘शिवकल्याण राजा

 

पुणे : दिवाळीचं निमित्त साधत दिवाळी पहाट व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून संगीत, नाटक व इतर कलांची मेजवानी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रसिकांना मिळत असते. या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने पुढील पिढीवर आपल्या संस्कृती व इतिहासाचे संस्कार व्हावेत, यासाठी विविध अभिनव कार्यक्रम अलीकडच्या काळात अनेकजण करताना दिसत आहेत. आपल्या मुलांवर आपल्या मातीतील संस्कार व्हावेत, याच हेतूने पुण्यातील वारजे भागातील आदित्य गार्डन सोसायटीमधील काही समविचारी रहिवाशांनी एकत्र येत गेल्या काही वर्षांपासूनदिवाळी पहाटचं उपक्रम सुरू केला आहे. यंदा या कार्यक्रमात सोसायटीमधील ५५ लहान मुलांनीशिवकल्याणराजाहा कार्यक्रम सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले. तब्बल दोन महिन्यांपासून मेहनत घेऊन बालगोपाळांनी सादर केलेल्या या कार्यक्रमास या भागातील लहान मुले, पालक व प्रमुख पाहुणे यांचा उदंड प्रतिसाद व वाहवा मिळाली.


आदित्य गार्डन सोसायटीच्या या दिवाळी पहाट उपक्रमात मागील वर्षीमहाराष्ट्राची लोकधाराव त्याआधीच्या वर्षीबाल गीतरामायणहे कार्यक्रम सादर करण्यात आले होते. या दोन्ही यशस्वी कार्यक्रमांनंतर यावर्षी सोसायटीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची, पराक्रमाची व राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणाराशिवकल्याण राजाहा कार्यक्रम सादर केला. शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी आदित्य गार्डन सोसायटीमधील पटांगणात झालेल्या या कार्यक्रमात ५५ लहान मुलांनी सहभाग घेतला. वयवर्षे ५-६ ते १६-१७ अशा वयोगटातील मुलांचा यात समावेश होता. तब्बल दोन महिने ही सर्व मुले या कार्यक्रमासाठी मेहनत घेत होती. यंदाच्या या कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन विश्वेश जिरगाळे यांनी केले. तसेच, नाट्य व नृत्य दिग्दर्शन वर्षा मुजुमदार आणि जुईली देशपांडे यांनी केले. अनिरुद्ध खडके यांनी वाद्यवृंदाची जबाबदारी सांभाळली तर विश्वेश जिरगाळे आणि कल्पक पिंगळे यांनी निवेदन केले. तसेच, स्मिता जिरगाळे, पूजा पांडे, श्रीलेखा गोहाड, वीरजा दिवेकर, सुनीती भागवत, मेधा काळे, सीमंतिनी नागवेकर, ज्योती पप्पू यांच्यासह अनेक रहिवासी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी सांभाळली.यंदा या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे उपस्थित होते. चारुदत्त आफळे यांनीही या लहान मुलांनी परिश्रमपूर्वक साकारलेल्याशिवकल्याणराजाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांना गेले दोन महिने गाणी शिकवण्यात आली, शब्दोच्चार, सूर ताल शिकवण्यात आले, नाट्य व नृत्याचा सराव करून घेण्यात आला आणि त्याचसोबत शिवरायांच्या इतिहासाबद्दलही गोष्टीरूपात माहिती देण्यात आली. यामुळे सहभागी झालेल्या मुलांना या सगळ्यातून आनंद मिळालाच परंतु सोबतच आपल्या इतिहासाचे ज्ञानही मिळाले, याचा आनंद असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.