@ॠतुराज कशेळकर 9637414828
सामान्य लोकांना वोकिझम म्हणजे ‘काही विकृत लोकांचे वेडगळ चाळे’ वाटले तरी हे एक आंतरराष्ट्रीय सुनियोजित कारस्थान आहे. वोकिझम ही समजायला अतिशय दुर्बोध, तितकीच बालिश, पण सबंध जगाला एका भयाण नैराश्याच्या, आत्मग्लानीच्या आणि संघर्षाच्या खाईत ढकलणारी जागतिक समस्या आहे.मध्यपूर्वेतले अनेक देश या संकल्पनेने उद्ध्वस्त केलेच आहेत. आता ही संकल्पना भारतात मूळ धरू पाहते आहे. त्यामुळे वोकिझमचे उद्ध्वस्त करणारे मृगजळ वेळीच ओळखले पाहिजे.
जेव्हा टिकटॉक जगभर धुमाकूळ घालत होतं तेव्हा साड्या नेसून, पंजाबी ड्रेस घालून किंवा तत्सम महिलांच्या वेशभूषेतले पुरुष रील्समधून दिसू लागले. स्वस्तात मिळणारी प्रसिद्धी या एकमेव कारणामुळे भारतातल्या दुर्गम खेड्यात राहणार्या या तरुणांनी हे उपद्व्याप केले. हे करताना नकळत आपल्या हातून एक अत्यंत हिडीस, टुकार, जगाला नैराश्य, आत्मविस्मृतीच्या खाईत ढकलणारी एक तथाकथित विचारधारा प्रमोट होते आहे, हे त्यांच्या गावीही नव्हतं. ही विचारधारा म्हणजे वोकिझम.
वोकिझम ही समजायला अतिशय दुर्बोध, तितकीच बालिश, पण सबंध जगाला एका भयाण नैराश्याच्या, आत्मग्लानीच्या आणि संघर्षाच्या खाईत ढकलणारी जागतिक समस्या आहे.मध्यपूर्वेतले अनेक देश या संकल्पनेने उद्ध्वस्त केलेच आहेत. आता ही संकल्पना भारतात मूळ धरू पाहते आहे.
Omnes या ऑनलाइन magazine ने या वोकिझमची सोपी व्याख्या केली आहे. Victims of everything and responsible for nothing. जगातल्या प्रत्येक प्रस्थापित गोष्टीचा ती गोष्ट केवळ प्रस्थापित आहे म्हणून विरोध करायला सुरुवात करायची. रूढी, परंपरा, वेशभूषा ही त्यातल्या त्यात सॉफ्ट टार्गेट आहेत. या तिन्ही बाबींवर प्रहार करणं बरंच सोप्पं आहे. उदाहरणार्थ तिळाएवढं गोंदवून घेणं कसं मागास आहे, गोंदवून घेणार्या बायका कशा प्रतिगामी, गुलामीत जगत आहेत यावर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत भाषणं झाडली गेली. आता त्याच शहरात टॅटू पार्लर ही गोंदवण्याची दुकानं थाटली गेली. आता तिथे जाऊन अंगभर चित्रविचित्र गोंदकाम करणं मागास न वाटता स्टेटस सिंबॉल झालंय.
गोंदवणं चांगलं की वाईट हा मुद्दा वेगळा; पण ते प्रस्थापित होतं म्हणून विरोध करायचा हे वोकिझमचं मूलभूत तत्त्वज्ञान आहे. बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती अमेरिका आणि प. युरोपातल्या भांडवलवादी देशांनी नाकारली. कामगारांची ही बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती या देशांमध्ये दुबळी होत चालली आहे हे लक्षात आल्यावर या देशातल्या लोकशाहीचा वापर करून तिथल्याच नागरिकांचे मेंदू पोखरून काढायची दीर्घकालीन योजना साम्यवाद्यांनी आखली. त्यासाठी कुठल्याही देशातल्या नागरिकांना स्वकेंद्रित करायचं. जे जे नैसर्गिक आहे, ते ते चूक आहे, असं सतत सांगत राहायचं, असं या नव्या क्रांतीचं नवं रूप आहे. वोकिझम हा एका 4th generation warfare च्या अवतारात समोर येणारा साम्यवादी अमिबा आहे.
सृष्टिचक्र हे सृष्टीतल्या सजीवांच्या वंशसातत्यावर आधारलेलं आहे. हे वंशसातत्य टिकण्याची एक नैसर्गिक रचना आहे. ही रचना प्राणिमात्रांपासून ते मानवापर्यंत समान आहे. निसर्गतः स्त्री आणि पुरुषांच्या समागमातून हे वंशसातत्य टिकून आहे. येणारी प्रत्येक नवी पिढी याच पद्धतीने आपापल्या वंशाची अभिवृद्धी करत आलेली आहे. या कामात स्त्री-पुरुषांना परस्परांविषयी आकर्षण वाटणारेहार्मोन्सही निसर्ग निर्माण करत असतो. हजारांमागे एखाद्याच जीवाच्या बाबतीत हे हार्मोन्सचं गणित चुकतं आणि पूर्ण स्त्री किंवा पूर्ण पुरुष नसलेली एक वेगळ्याच लैंगिक ओळखीसह व्यक्ती जन्माला येऊ शकते. यात नाकारण्यासारखं काहीही नाही. अशी इतिहासप्रसिद्ध उदाहरणं आपल्याकडे होऊन गेली आहेत.
अमेरिकेसारख्या देशात स्त्रियांसारखी वेशभूषा करून ट्रान्सजेंडर पुरुष शाळांमध्ये जातात. अशा पुरुषांना ड्रॅगक्वीन असं म्हणतात.
अशी वेगळ्या लैंगिक ओळखीची व्यक्ती जन्माला येणं हा अपवाद आहे. या अपवादालाच नियम करण्याचा खटाटोप म्हणजे वोकिझमची सुरुवात आहे. अमेरिकेसारख्या देशात स्त्रियांसारखी वेशभूषा करून ट्रान्सजेंडर पुरुष शाळांमध्ये जातात. अशा पुरुषांना ड्रॅगक्वीन असं म्हणतात. अशा या ड्रॅगक्वीन्स शाळेत वय वर्षं पाच असणार्या मुलांनी स्वतःची लैंगिक ओळख ठरवावी यासाठी आग्रही असतात.
तुम्ही ओळखीतल्या वय वर्षं पाच असलेल्या मुलासमोर चॉकलेट आणि आइस्क्रीम हे दोन पर्याय ठेवा आणि त्याला म्हणा की, निवड तुला काय हवंय ते. तर ते मूल दोन्ही पर्याय निवडेल. अशा वयात स्वतःच्या लैंगिक ओळखीचा निर्णय घेण्याएवढी बौद्धिक क्षमता त्या मुलांची असेल का? मुळात जन्मलेलं मूल पुरुष असूनही वागणं स्त्रैण आहे किंवा हार्मोनल गडबड झालेली आहे, हे समजण्यासाठी आधी ते वयात यावं लागतं. मगच त्याच्या लैंगिक ओळखीचा वैद्यकीय दृष्टीने निर्णय करता येतो. त्याआधीच ती घाई केली किंवा straightअसणं अॅबनॉर्मल आहे आणि ट्रान्सजेंडर होणं कुल आहे, असं बालमनावर बिंबवलं गेलं तर तेच आकर्षक वाटू लागतं. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ट्रान्सजेंडर सेंटर, सेंट लुईस हॉस्पिटल इथे काम करणार्या जेमी रीड यांनी एका वेबपोर्टलवर त्या सेंटरवर काम करतानाचे भयानक अनुभव मांडले आहेत. अनेक मुलींनी मातृत्वाची क्षमताच गमावली आहे. एका मुलीने मुलासारखं दिसण्यासाठी शस्त्रक्रियेने स्तनच काढून टाकले. तिला आपण स्त्रीच आहोत, हे भान यायला काही वर्षं लागली. आता ती आई होत असताना तिला स्तन हवे आहेत.
असे अनेक प्रसंग, खरं तर हृदयद्रावक प्रसंग सांगता येतील; पण त्यापेक्षाही या सगळ्या विकृत अवधारणांमागे कोण आहेत, हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. लेनिन म्हणतो -
We must hate. Hatred is the basis of Communism. Children must be taught to hate their parents if they are not Communists.
सतत कशाचा तरी पराकोटीचा द्वेष हे साम्यवादाचं मूलभूत तत्त्वज्ञान आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जिथे कामगार विरुद्ध मालक हा संघर्ष नव्हताच, तिथे तिथल्या लोकशाहीच्या आधाराने संघर्ष निर्माण करायचा, रूप बदलत टिकून राहायचं, हे कम्युनिझमचं वैशिष्ट्य आहे.
एखाद्या नवजात अर्भकाचं जेंडर त्याच्या अवयवांकडे पाहून डॉक्टर आणि पालक बहाल करतात. म्हणजेच हा परंपरेने चालत आलेला सामाजिक निर्णय आहे; पण मला माझं जेंडर मनातून काय वाटतं, हा माझा व्यक्तिगत निर्णय असायला हवा. तसंच तो निर्णय वस्तुनिष्ठ वास्तवावर आधारित नसावा. तो भावनिक बदलांवर आधारित असावा किंवा असतो, असं क्रिटिकल जेंडर थिअरीचं तत्त्वज्ञान सांगतं.
सांस्कृतिक मार्क्सवादाने मांडलेल्या क्रिटिकल जेंडर थिअरीनुसार कोणत्याही मानवाचे जेंडर आणि सेक्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जन्मजात लिंग (सेक्स) काहीही असलं तर जेंडर हे मनातल्या भावनांवर अवलंबून असतं. एखाद्या नवजात अर्भकाचं जेंडर त्याच्या अवयवांकडे पाहून डॉक्टर आणि पालक बहाल करतात. म्हणजेच हा परंपरेने चालत आलेला सामाजिक निर्णय आहे; पण मला माझं जेंडर मनातून काय वाटतं, हा माझा व्यक्तिगत निर्णय असायला हवा. तसंच तो निर्णय वस्तुनिष्ठ वास्तवावर आधारित नसावा. तो भावनिक बदलांवर आधारित असावा किंवा असतो, असं क्रिटिकल जेंडर थिअरीचं तत्त्वज्ञान सांगतं. भावना या वास्तव आणि कल्पनेच्या दोन टोकांमध्ये सतत फिरत असतात. परिणामी भावना स्थिर दिसल्या तरी त्या सतत दोलायमान असतात. त्यामुळे आपल्या लैंगिक ओळखीचा निर्णय परिस्थितीसापेक्ष भावनांच्या आधारावर घ्यावा, या संकल्पनेनुसार किती जेंडर असावेत याची काहीही मर्यादा नाही. आज मला माझं जे जेंडर वाटतंय ते उद्या वाटायलाच हवं, अशीही सक्ती नाही. थोडक्यात, रोजच्या रोज कपडे बदलावेत तसे जेंडर बदलता येऊ शकतात.
आपल्यासारख्या सामान्य लोकांना हे ’काही विकृत लोकांचे वेडगळ चाळे’ वाटले तरी हे एक आंतरराष्ट्रीय सुनियोजित कारस्थान आहे. वेबसीरिजवर कोणतीही बंधनं नाहीत. अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य आहे. हे सगळं या वोकिझमसाठी पोषक आहे. अशा प्रकारच्या सीरिज, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट सतत आपल्या समोर येतील, राहतील याची सुसूत्र यंत्रणा आहे. फ्लुईट जेंडर ही संकल्पना खास लहान मुलांसाठी कार्टून्सच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात झाली आहे.
वोकिझमने युरोप, अमेरिकेत लेनिन म्हणतो तसा अपत्य आणि पालकांमध्ये द्वेष निर्माण केला आहे. सकाळी मुलगा म्हणून घराबाहेर पडलेलं अपत्य संध्याकाळी येताना लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून मुलगी होऊन येतं. हार्मोन्सची औषधं सर्रास आणि स्वस्त मिळतात. कोणतीही सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक बंधनं नाहीत. पालकांनी याविरोधात काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.
भारतात जेव्हा वोकिस्ट लोकांचे प्राइड मार्च निघाले त्यात Sambhavami U-GAY U-GAY! असं पोस्टर घेतलेली एक मुलगी दिसते. मुस्लीमबहुल देशांत Allah loves Equalityचे बॅनर घेऊन किस करणारे पुरुष दिसतात, तर ख्रिश्चनबहुल देशांत चरू लश May be Jesus was GAY, Sorry Jesus I'm gay असे फलक दिसतात. ही विकृत विचारधारा समाजमनात प्रभावीपणे रुजवणारे अभिनेते, खेळाडू असतातच. त्यांचा वापर करून हे हिडीस तत्त्वज्ञान तरुणांच्या माथी मारायचं. समलैंगिक संबंधांची दृश्ये असणार्या ढीगभर वेबसीरिज गेल्या काही काळात निघाल्या. भारतात एक महिला स्टॅन्ड अप कॉमेडियन जी स्वतःला बायसेक्शुअल समजते, तिचे रील्स व्हायरल होत होते. त्यात त्यांच्या दृष्टीने होमोफोब लोकांना ट्रोल केलं गेलं. आठवड्याभरापूर्वीच The Word Magazine ने साडी नेसलेल्या वेगवेगळ्या वयांच्या पुरुषांचे फोटो पोस्ट केले होते. Pinterest सारख्या साइट्सवर लिपस्टिक लावलेले, नथ घातलेले, केसात फुलं माळलेले असे अनेक पुरुष पाहायला मिळतील.
उमलत्या वयात आपली निसर्गदत्त ओळख पुसून मनातून वाटणार्या ओळखीच्या मृगजळामागे पळायचं. ही मनातून वाटणारी ओळख सतत लोलकाप्रमाणे दोलायमान राहणं, gender dysphoria सारखा मानसिक आजार, त्यातून येणारं नैराश्य, नैराश्यातून बाहेर पडायला लागणारं ड्रग्जचं व्यसन, त्यासाठी लागणारे पैसे, पैसे नसल्याने घडणारे गुन्हे, गुन्हेगारीतून येणारे बालगुन्हेगार आणि यातून उद्ध्वस्त झालेली कुटुंबं आणि कुटुंबव्यवस्था, हे अमेरिका, युरोपातलं वास्तव आहे.
या सगळ्यातून अनेक जटिल समस्या निर्माण होतात. बलात्कार केलेल्या एका आरोपीने मी स्त्री आहे म्हणून मला स्त्रियांच्या तुरुंगात ठेवा, अशी मागणी केली होती. स्त्री आहे असं मनातून वाटतंय म्हणून मला स्त्रियांच्या खेळात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ द्या, अशीही मागणी होऊ शकते आणि होमोफोबियाचा शिक्का आपल्यावर बसू नये म्हणून आयोजक हे मान्य करू शकतात. या समस्या वरवरच्या आहेत. मात्र उमलत्या वयात आपली निसर्गदत्त ओळख पुसून मनातून वाटणार्या ओळखीच्या मृगजळामागे पळायचं. ही मनातून वाटणारी ओळख सतत लोलकाप्रमाणे दोलायमान राहणं, gender dysphoria सारखा मानसिक आजार, त्यातून येणारं नैराश्य, नैराश्यातून बाहेर पडायला लागणारं ड्रग्जचं व्यसन, त्यासाठी लागणारे पैसे, पैसे नसल्याने घडणारे गुन्हे, गुन्हेगारीतून येणारे बालगुन्हेगार आणि यातून उद्ध्वस्त झालेली कुटुंबं आणि कुटुंबव्यवस्था, हे अमेरिका, युरोपातलं वास्तव आहे.
हा वोकिझमचा भस्मासुर भारतात गेल्या काही काळात चंचुप्रवेश करून तो आता वेगाने पसरताना दिसतोय. याचे अनेक कंगोरे आहेत. ते समजून घेणं गरजेचं आहे. मोठ्या शहरातली महाविद्यालयं, नामांकित विद्यापीठं अशा ठिकाणी अशा तरुणांचे जथे पाहायला मिळतात. तरुण-तरुणी जमतात अशा कॅफेंमध्येे दिवसागणिक अशा जेंडर न्यूट्रल किंवा फ्लुईड जेंडर मानणार्यांचा वावर दिसून येऊ लागला आहे. एका बहुराष्ट्रीय बँकेत मॅनेजर या पदावर कार्यरत व्यक्ती ड्रॅगक्वीनच्या अवतारात मीटिंग्जना येतो. वोकिझमचे गोडवे गातो, आवाहन करतो आणि यावर वरिष्ठ व्यवस्थापन त्यावर आक्षेप घेत नाही.
विभक्त कुटुंब, पाल्य आणि पालकांमधला कमी होणारा संवाद, लहान वयात हाती आलेलं तंत्रज्ञान ही सगळी कारणं असली तरी भारतातल्या आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी या समस्येकडे डोळसपणे पाहायला हवं. वयात येणार्या नव्या पिढीशी सुसंवाद, मैत्री आणि गरज पडली तर मार्गदर्शन करत या समस्येवर उपाय शोधता येतील.
मानववंशाच्या अभिवृद्धीसाठी स्त्री आणि पुरुष ही निसर्गाने केलेली सर्वोत्तम रचना आहे. त्यात निसर्गतः दोष उत्पन्न होणं हे हजार व्यक्तींमागे एकदा घडतं. अशा व्यक्तींप्रति सहानुभूती असावीच. मात्र आपल्याला निसर्गाने जी लैंगिक ओळख दिली त्यात बदल करायचा खटाटोप व्यर्थ आहे. तो केला तर पश्चात्तापाशिवाय हाती काही लागणार नाही, हे नव्या पिढीला समजावयाला हवं.