@अमिता आपटे
उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभ हा ‘महाकुंभ मेळा’ असणार आहे. यानिमित्तिने 40 ते 45 कोटी लोक आस्थेने त्रिवेणी संगमावर स्नान करायला येणार असा अंदाज आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी मिळून जवळपास 25 हजार करोड रुपयांची गुंतवणूक मूलभूत आणि इतर सुविधा निर्माणासाठी म्हणून केली आहे. जीएसटी, रेंटल, वेगवेगळे सेवा चार्जेस, परवान्यांच्या अनुमती, पर्यटन इत्यादीतून यावेळी दोन ते अडीच लाख करोड रुपयांची म्हणजे 26.67 बिलियन अमेरिकन डॉलर्सची संपत्ती निर्माण केली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. त्यामुळे कुंभमेळा हा अर्थव्यवस्थेला नवनव्या उंचीवर पोहोचवणारा आहे.

नद्यांच्या काठांवर विकसित झालेली, शेतीआधारित परंतु उद्योग आणि व्यापारप्रधान अशी भारतीय संस्कृती आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांची ददात नसल्यामुळे इथे संस्कृती, अध्यात्म, शास्त्र, भाषा, योग, गणित, आयुर्वेद, शिल्पकला, स्थापत्य, रसायन, विविध कला, वाणिज्य, अशा कित्येक विषयांत भारतीय उपखंडात प्रचंड काम गेली हजारो वर्षे होत आहे. या सगळ्याला मंदिर अर्थव्यवस्थेने एक कोंदण दिले. यातून जागोजागी प्रस्थापित झालेले ज्ञान, संशोधन जगभरात पसरविण्यासाठी कुंभमेळा व्यवस्था अस्तित्वात आली. र्डीीींरळपरलळश्रळीूं हा सनातन संस्कृतीचा मूळ आधार आहे. या तत्वाला अनुसरून दर सहा वर्षांनी येणार्या कुंभमेळ्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक चक्रे वेगाने फिरवण्यासाठी, मंदी येवू घातली असेल तर ती मोडून काढण्यासाठी होत राहिला. इतकेच नाही तर कुंभमेळा ही इथल्या अर्थव्यवस्थेला नवनव्या उंचीवर पोहोचवणारी यंत्रणा बनली. भारतीय खंडात सोन्याचा धूर निघू लागला.
हजारो वर्षे चालत आलेली ही व्यवस्था केवळ अपघाताने हिंदू असणार्या व्यक्तीच पंतप्रधान पदावर बसू लागल्याने मोडीत काढण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू झाले. हिंदूंना हिंदू असण्याची लाज वाटावी, हिंदुपणाच्या सर्व निशाण्या त्यांनी सोडून द्याव्यात, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. परंतु आता संधी मिळताच आपल्या उदार, समृद्ध परंपरेला धरून काळाच्या कपाळी उमटलेला हा केवळ एक ओरखडा आहे, असे समजून भारतीय अर्थव्यवस्था नव्याने आपल्या मूळ स्वरूपात मोगरा फुलावा तशी बहरून येवू लागली आहे. कुंभमेळा आता खरोखर ‘महाकुंभमेळा’ झाला आहे.
2013 साली कुंभमेळ्यात 12 हजार कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार संपन्न झाले होते. सहा लाख लोकांना रोजगार मिळाला होता. पुढे 2019 मध्ये इथे अर्धकुंभ संपन्न झाला, त्यातही सरकारने 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यातून 1.2 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे निर्माण केले गेले. केवळ या दोन आकड्यांवरून आपल्याला या दर सहा वर्षांनी येणार्या कुंभांचे महत्त्व आणि अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर पोहचवण्याची त्यांची क्षमता याचा अंदाज सहज येवू शकेल. ही हिंदू समाजाने भारतीय उपखंडाच्या आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शास्त्रीय, आर्थिक, उत्थानासाठी निर्माण केलेली हजारो वर्षांपासून सुरू असणारी व्यवस्था आहे. आर्थिक मंदीचा फटका टाळण्यासाठी कायमच भारताला कुंभमेळ्यांनी हात दिला आहे.
यावर्षीचा हा मेळा अर्धकुंभ किंवा दर 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा नाही, तर यावेळचा कुंभ हा ‘महाकुंभ मेळा’ असणार आहे. कारण महाकुंभ भरविण्यासाठी जी आकाशस्थ ग्रहतार्यांची स्थिती दर 144 वर्षांनी एकदा येते. तशी रीीीेंपेाळलरश्र लेपीींशश्रश्ररींळेपी या वर्षी आली आहेत. इतकेच नव्हे तर पृथ्वीतलावर इतकी प्रचंड मानव संख्या म्हणजे 8.2 बिलीयन लोक मानवजातीच्या ज्ञात इतिहासात प्रथमच पाहायला मिळत आहे.
या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून यावर्षी 40 ते 45 कोटी लोक आस्थेने त्रिवेणी संगमावर स्नान करायला येणार असा अंदाज आहे. महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 1.5 कोटी लोकांनी प्रयागराज येथील संगमावर स्नानाचे पुण्य मिळवले आहे. तर मकर संक्रांतीच्या शुभ दिनी हे अमृतस्नानाचे पुण्य सुमारे 3.5कोटी लोकांनी मिळवले आहे. लाखो तरुण मंडळी हळूहळू हिंदू धर्म आणि अध्यात्मिक ज्ञानाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. मोठमोठ्या वैद्यकीय, इंजिनीरिंग महाविद्यालयांमधून उच्चविद्याविभूषित मंडळी आणि अगदी मॉडेलिंग करणारे लोकसुद्धा अमृतस्नानाच्या ओढीने अंगाला राख फासून या लाखोकरोडोंच्या जमावात सामील होत आहेत.
आज भारताच्या एकूण जीडीपी पैकी 2.5 ते 3 टक्के उत्पन्न मंदिरे आणि त्यांच्याशी निगडित व्यवसायांद्वारे भारताला मिळते. याचाच अर्थ इतके लोक विविध प्रकारे मंदिरे, देव, श्रद्धा इत्यादी संकल्पनांशी जोडलेले आहेत. म्हणूनच त्यादृष्टीने राज्य आणि केंद्र सरकारनेही सर्व तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी सुरू असलेल्या व्यवस्था आणि आर्थिक गणिताचा आता विचार करू.
या होऊ घातलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मानवी एकत्रीकरणासाठी भारतभरातील लोकांना प्रचंड प्रमाणात रोजगार मिळाला आहे. गेल्या कुंभाच्या तिप्पट म्हणजे 2400 हेक्टर जागा सरकारने कुंभासाठी योजली असून यासाठी गंगेच्या तीरांवर तंबूंचे शहरच उभारण्यात आलेले आहे.
सात हजार नव्या इलेक्ट्रिक बसेस उत्तरप्रदेशच्या रस्त्यांवर उतरत आहेत. 13000 नव्या ट्रेन भारतभरातून प्रयागराजकडे यायला निघाल्या आहेत. नवे रस्ते, पूल, रेल्वेरूळ, स्थानकांचे निर्माण केले गेले आहे. लोकांना राहणे, खाणे, पिणे, फिरणे, खरेदी, धार्मिक कार्ये करता यावीत म्हणून प्रचंड व्यवस्थापन कामाला लागले आहे. नव्या प्रकारच्या स्वच्छता व्यवस्था शहरभर जोडून दिल्या जात आहेत. सुमारे 15 हजार सरकारी स्वच्छता मित्र यात आले आहेत. लोकांच्या सुविधेसाठी 1.5 लाख स्वच्छतागृहे उभी केली गेली आहेत. 20,000 तर केवळ नव्या कचरापेट्या ठेवल्या गेल्या आहेत. 25 लाख गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे. सरकारने उभ्या केलेल्या या व्यवस्था केवळ कुंभकाळासाठी नसून येणार्या पुढील काळासाठी उपयोगी ठरणार आहेत.
सुरक्षा यंत्रणासुध्दा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बसवण्यात आल्या आहेत. 23 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. ड्रोन्स, एआय सर्व्हिलियन्स व्हिडिओ आणि थर्मल इमेजिंग सिस्टिम अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी खूपच उत्तम उपयोग करून घेतला आहे.
आध्यात्मिक टुरिझम हा एक अत्यंत सफल असा व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. केवळ एका अयोध्येच्या राम मंदिरातच दर वर्षी कमीत कमी 5 कोटी लोक दर्शनाला येतील असा सरकारी अंदाज होता. परंतु पहिल्या सात महिन्यांतच भाविकांनी 12 कोटींचा आकडा पार केला. आणि भारतात अशी कित्येक अध्यात्मिक श्रद्धास्थाने, शक्तिपीठे आहेत, तिथे आजमितीला 200-250 देवालये आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत. तिरुपती बालाजी देवस्थानची वार्षिक आर्थिक उलाढाल 3000 करोड रुपयांची आहे. महाराष्ट्रातले शिर्डी देवस्थान कमीतकमी 500 कोटींची उलाढाल करीत असते. जगातल्या दोन क्रमांकाची लोकसंख्या असणार्या इस्लामच्या हज यात्रेला वर्षाला 2 कोटी लोक जातात. यावरून हे आकडे किती महाकाय आहेत याचा अंदाज बांधता येवू शकेल.
गेल्या काही दिवसांत प्रयागराजचा विमानप्रवास आरक्षित करण्यासाठीचा गुगल सर्च 162% वाढला आहे. ट्रेन्सचे बुकिंग्स 187% वधारले आहे तर प्रयागराज येथील हॉटेल्स बुक करण्यासाठी नेहमीच्या दहापट अधिक झुंबड उडाली आहे.
गेल्या कुंभमेळ्यासाठी सरकारने 4000 कोटीची गुंतवणूक केली. सामान्य अंदाजानुसार त्याद्वारे कुंभ काळात 1 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहिली. आता या महाकुंभासाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी मिळून जवळपास 25 हजार करोड रुपयांची गुंतवणूक मूलभूत आणि इतर सुविधा निर्माणासाठी म्हणून केली आहे. जीएसटी, रेंटल, वेगवेगळे सेवा चार्जेस, परवान्यांच्या अनुमती, पर्यटन इत्यादीतून यावेळी दोन ते अडीच लाख करोड रुपयांची म्हणजे 26.67 बिलियन अमेरिकन डॉलर्सची संपत्ती निर्माण केली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. म्हणजे जगातील देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाशी तुलना केली असता या कुंभाची अर्थव्यवस्था जगातील 107वी मोठी अर्थव्यवस्था असणार आहे.
स्वामी विवेकानंदानी शिकागोमध्ये जी हिंदू धर्माची छोटीशी ज्योत लावली होती, त्या ज्योतीचा प्रकाश आता जगभरातील कोट्यावधी मनांना तेजाळून टाकतो आहे. हिंदू आध्यात्मिक ज्ञानाची ओढ लागलेले लाखो परदेशी लोक या कुंभमेळ्यात डुबकी मारण्यासाठी येत आहेत. त्याद्वारे जवळपास 2.2 बिलियन डॉलर्सचा महसूल सरकारी खात्यात जमा होणार आहे. पहिल्याच दिवशी स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी, तसेच अभिनेता रिचर्ड गैयर इत्यादी या मेळ्यात महंतांचा आशीर्वाद घेताना लोकांना पाहायला मिळाले होते. असे अनेक जगप्रसिद्ध लोक या निमित्ताने भारतात येणार आहेत. केवळ अमृतस्नान घडवून भारतीय त्यांना परत पाठवणार नाहीत. तर हजारो वर्षांची आंतरराष्ट्रीय व्यापाराची आपली परंपरा आहे. त्याला अनुसरून नवनवे करार, नवे प्रकल्प या निमित्ताने महाकुंभाचे यजमानपद स्वीकारलेल्या भारतीयांच्या पदरात पडणार हे निश्चित. त्यामुळे केवळ हा दीड महिनाच नाही तर किमान दोन वर्षे तरी हा सोहळा भारतीयांना काही ना काही देत राहणार हे निश्चित.
अनेक छोट्यामोठ्या ब्रँडच्या विविध दुचाकीपासून सर्व गाड्यांच्या कंपन्या, कित्येक आर्थिक सेवा देणार्या कंपन्यांनी येथे प्रायोजकत्व घेतलेले आहे. त्यांच्या वस्तूंची जाहिरात आणि विक्रीही या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर होईल. केवळ ब्रँडिंगसाठी कंपन्यांनी तीन हजार कोटी खर्च केला आहे. लोकांना राहण्यासाठी हॉटेल, तंबू, आणि इतर सुविधा उभ्या केल्या गेल्या आहेत. टूर कंपन्या चांगल्याच तेजीत आल्या आहेत. मेळ्याला आलेले लोक अयोध्या, काशी, वृंदावन वगैरे आसपासच्या बहुतांश छोट्या मोठ्या धार्मिक स्थळांना भेटी देणार हे उघड आहे. त्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेलाही मजबुती मिळणार आहे.
ही सगळी तर प्रत्यक्ष आर्थिक उलाढालीची आकडेवारी झाली. पण भारतीय सनातन धर्माचा हुंकार, येथील समाजाची सर्व प्रकारची ताकद या निमित्ताने सिद्ध होते आहे. स्पेनच्या टोमॅटिना उत्सवात टोमॅटोचा चिखल पाहायचे आकर्षण असणारे आणि ‘कुंभमेळा म्हणजे मुले हरवायची जागा’ असे कुत्सितपणे बोलून नाके मुरडणारे लोकही आपली मते बदलू लागले आहेत. समाजात भारताच्या हिंदुपणाच्या शक्तीचा जागर या निमित्ताने होतो आहे. केवळ भारतीयच नाही तर सारे जगच ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्तीनुसार सर्वशक्तिमान परमेश्वराच्या या भव्य दिव्य महाआरतीला प्रयागराजकडे प्रस्थान करू लागले आहे. भारताच्या इतिहासात हा महाकुंभ मेळा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.