मतदारांची दिशाभूल करणारे त्यांच्याच कारनाम्यांनी उघडे पडत आहेत. स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेत आहेत. त्यांच्या खरेपणाविषयी मतदारांच्या आणि अनुयायांच्या मनात संशय कल्लोळ निर्माण करत आहेत. ‘ही तर फशिवसेना’ असे काही वर्षांपूर्वी ज्या मूळ शिवसेनेविषयी बोलले गेले, ते खरे करण्यासाठी आत्ताची उद्धव(ट)सेना जोमाने प्रयत्न करत आहे. त्यांची वैचारिक बांधिलकी ना त्यांच्या पूर्वसुरींशी आहे, ना ते त्यांच्या आजच्या (उरल्यासुरल्या)मतदारांशी प्रामाणिक आहेत. कोणे एके काळी, मलंगगडाच्या संदर्भात आंदोलन उभारणार्यांचेच हे वारसदार आहेत का अशी शंका यावी असं उद्धवसेनेच्या शीर्षस्थ नेत्याचे, त्यांच्या खासदाराचे वागणे आहे.

राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ शत्रू असत नाही वा मित्रही. इथे कोणाशीही सोयरीक जुळते ती प्रामुख्याने राजकीय लाभाचा विचार करूनच. त्यासाठी पक्ष म्हणून लवचीक भूमिका ठेवावी लागते, त्यापायी अनुयायांचा आणि पारंपरिक मतदारांचा रोषही ओढवून घ्यावा लागतो. हे कटू वाटले तरी वास्तव आहे. मात्र असे करताना जो पक्ष आपल्या मूळ विचारधारेशी-गाभ्याशीच फारकत घेतो तेव्हा तो आपले सत्व आणि स्वत्त्व दोन्ही गमावतो. आणि त्याबरोबर गमावतो, आपल्या कट्टर समर्थकांचा विश्वास.
पक्षाचे मूळ नाव न्यायालयीन लढाईत गमावल्यानंतरही आमचीच शिवसेना खरी, असे सांगत मतदारांची दिशाभूल करणारे त्यांच्याच कारनाम्यांनी उघडे पडत आहेत. स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेत आहेत. त्यांच्या खरेपणाविषयी मतदारांच्या आणि अनुयायांच्या मनात संशय कल्लोळ निर्माण करत आहेत. ‘ही तर फशिवसेना’ असे काही वर्षांपूर्वी ज्या मूळ शिवसेनेविषयी बोलले गेले, ते खरे करण्यासाठी आत्ताची उद्धव(ट)सेना जोमाने प्रयत्न करत आहे. त्यांची वैचारिक बांधिलकी ना त्यांच्या पूर्वसुरींशी आहे, ना ते त्यांच्या आजच्या (उरल्यासुरल्या)मतदारांशी प्रामाणिक आहेत. कोणे एके काळी, मलंगगडाच्या संदर्भात आंदोलन उभारणार्यांचेच हे वारसदार आहेत का अशी शंका यावी असं उद्धवसेनेच्या शीर्षस्थ नेत्याचे, त्यांच्या खासदाराचे वागणे आहे.
विषय आहे, तमिळनाडूच्या मदुराई येथील तिरुपारंकुंद्रममधील कार्तिगाई दीपम घटनेशी संबंधित. इथे असलेल्या मंदिरात कार्तिकस्वामींचा वास आहे अशी तमिळ लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. याच टेकडीवर तेराव्या शतकात एका सुफी संतांनी दर्गा बांधला. त्यामुळे कालांतराने हिंदू मुस्लीमांमध्ये वाद निर्माण झाला. 1920 साली हे प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा निकाल लागेपर्यंत या टेकडीवर कार्तिकी पौर्णिमेला ज्योत पेटवायला न्यायालयाने स्थगिती दिली. 105 वर्षे उलटली तरी अद्याप निकाल लागायचा आहे. याच परिसरात त्या दर्ग्यापेक्षाही जुना दीपस्तंभ मंदिराबाहेर उभा आहे (त्याचे जुनेपण कोणालाही कळण्याजोगे, सिद्ध होण्याजोगे). मंदिरात नाही तरी दीपस्तंभावर दिवे लावायला परवानगी मिळवण्यासाठी काही लोक उच्च न्यायालयात गेले. तथ्यांवर आधारित तर्कशुद्ध असा निकाल देत न्यायाधीशांनी हिंदू भाविकांना दिवे लावायला परवानगी दिली. याबद्दल आक्षेप असणार्या सत्ताधारी द्रमुकला या विरोधात, सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा मार्ग मोकळा असताना त्याऐवजी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालविण्याची परवानगी मागण्याचा अर्ज त्यांनी लोकसभाध्यक्षांकडे केला. या मागणीसाठी द्रमुकबरोबर इंडी आघाडीतले धर्मांध मुस्लीमांचे लांगूलचालन करण्यात उभी हयात घालवलेली काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षाच्या खासदारांचा गट, आरजेडी हे तर होतेच पण उबाठाचेही खासदार होते. यांची मागणी काय तर, न्यायाधीश जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवून त्यांची हकालपट्टी करावी. कशासाठी? तर भाविक हिंदूंना त्या टेकडीवरील दीपस्तंभावर दीप लावायची न्याय्य परवानगी दिली म्हणून!
द्रमुक हे कशासाठी करते आहे?...तर आपल्या मतपेढीच्या भल्यासाठी. पुढच्या वर्षी तमिळनाडूत निवडणुका होत आहेत. त्यासाठी हे मुस्लीम तुष्टीकरण चालू आहे. म्हणूनच तिथल्या सरकारने तिथल्या न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने दिलेेल्या तीन न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणीच केली नाही. तेव्हा,‘ महाभियोग चालवायचा तर या सरकारविरोधात चालवायला हवा’, अशी मागणी भाजपाच्या अन्नामलाई यांनी केली आहे. मात्र झाले भलतेच...सत्ताधारी द्रमुकने न्यायाधीशांविरोधात महाभियोग चालविण्यासाठी परवानगी मागायची कुटिल चाल खेळली.
झाल्या प्रकारामुळे, ‘संविधान धोक्यात आहे’, असे सातत्याने तारस्वरात ओरडणारा द्रमुक आणि इंडी आघाडीचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर उघड आला आहे. जेव्हा एखादा न्यायाधीश हिंदू परंपरांच्या बाजूने किंवा इंडी आघाडीच्या राजकीय अजेंड्याच्या विपरित निर्णय देतो तेव्हा ते त्याला पक्षपाती, सांप्रदायिक किंवा विकलेला असे लेबल लावतात. जेव्हा एखादा न्यायाधीश त्यांना पटेल असा निर्णय देतो तेव्हा ते त्याला पुरोगामी म्हणतात. ही काँग्रेस-द्रमुकची सोयीची नैतिकता जुनीच आहे.
याच इंडी आघाडीतल्या पक्षांनी यापूर्वी राज्यसभेत माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. न्या. गोगोई यांचा श्रीराम जन्मभूमी खटल्याचा दिलेला निकाल हे त्या मागचे खरे कारण. आता पुन्हा जी. आर. स्वामीनाथन यांच्या बाबतीत तोच प्रयोग चालू आहे.
न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभाध्यक्षांकडे महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी जे शिष्टमंडळ गठीत झाले त्यातला एक सदस्य म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा एकुलता एक खासदार. ‘आम्हीच खरे शिवसैनिक’, असे प्रमाणपत्र या पक्षाचे कार्यकर्ते स्वत:च स्वत:ला देत असतात. पण तसे वागत मात्र नाहीत. तमिळनाडूतला विषय आणि महाराष्ट्रातल्या मलंगगडाचा विषय यात साधर्म्य असतानाही, तिथल्या हिंदूंच्या बाजूने निर्णय देणार्या न्यायाधीशाची महाभियोग चालवून हकालपट्टी करण्याच्या कारस्थानात ही उद्धवसेना सामील होते. अशा वेळी, महाराष्ट्रात आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगगडावर हिंदूंच्या शिवमंदिरासाठी आंदोलन करणार्या शिवसैनिकांचे सळसळते रक्त या फशिवसेनेत आहे अशा भ्रमात रहायचे का?
गत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुंबईच्या मुुस्लीम मोहल्ल्यात जाऊन लांगुलचालनात मग्न असलेल्या नेत्याशी ईमान(?) राखणारे हे कार्यकर्ते आहेत. त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेशी कधीच काडीमोड झालेला आहे. न्यायालयाने त्यांच्याकडून पक्षाचे मूळ नाव काढून घेण्याआधीच पक्षाच्या मूळ विचारांशी त्यांनी फारकत घेतली आहे, हे ते पुन्हापुन्हा सिद्ध करत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा हिंदू कार्ड खेळण्याचा आणि विधानसभेच्या वेळेस जवळ केलेल्या मुस्लीमांपासून अंतर राखण्याचा निर्लज्ज खेळ ही उद्धवसेना करते आहे. त्यांना ना सत्याची चाड, ना धर्माशी इमान, ना न्यायाचे सोयरसुतक. तमिळनाडूतल्या दीपस्तंभाबाबत द्रमुक सांगेल तशी भूमिका घेणारा हा नेभळट पक्ष हिंदूंचा तारणहार कधीच नसेल हे त्याच्या इथल्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनीही लक्षात घ्यावे. अशा लबाड, स्वार्थी पक्षापासून दूर राहावे आणि त्याला सत्तेपासून दूर ठेवावे.