'अरे हाड्’ या संबोधनामागे समोरच्याला दुखावण्यापेक्षाही इथल्या सश्रद्ध हिंदू समूहमनाला जाणीवपूर्वक दुखावले जात असेल तर त्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवायलाच हवा. आणि तो नोंदविण्यासाठी इतकी पातळी सोडायचीही गरज नाही. अशा प्रकारे हिणवून महाकुंभाच्या पावनपर्वात सहभागी झालेल्या करोडो हिंदूंना दुखवायचे असेल तर, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हे त्यांनी पक्के लक्षात असू द्यावे. तसेच याची सव्याज परतफेड या हिंदूंकडून केली जाईल हे ही लक्षात ठेवावे. देवाच्या काठीला आवाज नसतो तसे मतदारांचा प्रत्यक्ष कौलही भल्याभल्यांचे अंदाज चुकवतो. खरे तर त्याची जाणीव 19 वर्षांच्या प्रवासात मिळालेल्या अनुभवानंतर व्हायला हवी होती.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचे त्याच्या पक्ष कार्यकर्त्याकडून कळत नकळत अनुकरण केले जाते. विचारांचे, विचारसरणीचे, बोलण्याच्या शैलीचे, भाषेचे असते, देहबोलीचे असते आणि अनेकदा पोशाखाचेही असते. यातूनच त्या पक्षाची कार्यसंस्कृती विकसित होत असते. ज्या पक्षात विचार, विचारसरणीला क्षुल्लक समजून सोडचिठ्ठी दिली जाते तिथे अनुकरण्याजोग्या बाह्य गोष्टीच उरतात. एकेका पक्षाचे, पक्ष कार्यकर्त्यांचे असे दुर्दैव असते.
‘अरे हाड्’ हा गेले काही दिवस प्रसारमाध्यमांनी आणि समाजमाध्यमांनी गाजवलेला एक उद्गार! समोरच्याला कस्पटासमान लेखण्याचे तो निदर्शक आहे. आपल्या साथीदारांना असे संबोधण्यातून नेत्याची मुजोरी, उद्दामपणा आणि अप्रगल्भताही दिसते. आणि जो हा अपमान निमूट गिळून वरकरणी हसतमुख राहतो त्याची स्वामीनिष्ठाही.
ज्या नेत्याला राजकीय प्रवासातल्या अवघड, आव्हानात्मक परिस्थितीत आजवर साथ दिली तोच असा जाहीरपणे अवमान करत असेल आणि समोरचा ते निमूट सहन करत असेल तर त्यातून पक्षाचे अस्वस्थ वर्तमान आणि चिंताजनक भविष्य लक्षात येते.
करोडो हिंदूंना दुखवायचे असेल तर, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हे त्यांनी पक्के लक्षात असू द्यावे. तसेच याची सव्याज परतफेड या हिंदूंकडून केली जाईल हे ही लक्षात ठेवावे.
या आक्षेपार्ह उद्गारानेे उभयपक्षी काही फरक पडत नसेल तर इतरेजनांनी व्यर्थ चिडचिड करून डोके शिणवून घेऊ नये, हे ही खरे. मात्र, ’अरे हाड्’ या संबोधनामागे समोरच्याला दुखावण्यापेक्षाही इथल्या सश्रद्ध हिंदू समूहमनाला जाणीवपूर्वक दुखावले जात असेल तर त्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवायलाच हवा. आणि तो नोंदविण्यासाठी इतकी पातळी सोडायचीही गरज नाही. अशा प्रकारे हिणवून महाकुंभाच्या पावनपर्वात सहभागी झालेल्या करोडो हिंदूंना दुखवायचे असेल तर, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हे त्यांनी पक्के लक्षात असू द्यावे. तसेच याची सव्याज परतफेड या हिंदूंकडून केली जाईल हे ही लक्षात ठेवावे. देवाच्या काठीला आवाज नसतो तसे मतदारांचा प्रत्यक्ष कौलही भल्याभल्यांचे अंदाज चुकवतो. खरे तर त्याची जाणीव 19 वर्षांच्या प्रवासात मिळालेल्या अनुभवानंतर व्हायला हवी होती. पण जे आडातच नाही ते पोहर्यात कसे यावे?
एखादी परदेशवारी झाली की इथे येऊन तिथल्या व्यवस्थांचे गोडवे गाणे आणि इथल्या सरकारला टोमणे मारणे यात 19 वर्षे सरली. यामुळेच पक्ष स्थापनेनंतरचा काही काळ सोडल्यास सत्तेच्या राजकारणात कायम भोपळाच नशिबी आला.
वास्तविक पक्षाचा वर्धापन दिन हे या समारंभाचे निमित्त होते. तो साजरा करण्यासाठी मैदान भरून जाईल इतकी गर्दी तर गोळा झाली होती. अशा वेळी सिंहावलोकन करावे, इथवरच्या वाटचालीत कळत-नकळत झालेल्या चुकांचे विश्लेषण करावे, ब्ल्यू प्रिंटच्या निव्वळ गप्पा न मारता जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, पक्ष म्हणून ठोस कृतीकार्यक्रम हाती घ्यावा, कार्यकर्त्यांना गाठता येण्याजोगी उद्दिष्टे द्यावीत, त्यासाठी प्रेरणा द्यावी अशी राजकारण गांभीर्याने घेणार्या राजकीय नेत्यांची सर्वसाधारणपणे पद्धत असते. ती वृत्ती नेत्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये झिरपत असते. मात्र इथे नेतृत्वातच इथे सनसनाटी विधाने करून सभा गाजवायची आणि वेळ मारून न्यायची सवय अंगात मुरलेली. या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला ना कसले वैचारिक अधिष्ठान, ना बांधीलकी. दोन चार सभा अशा प्रकारे गाजवायच्या, मग काही काळ सामसूम. एखादी परदेशवारी झाली की इथे येऊन तिथल्या व्यवस्थांचे गोडवे गाणे आणि इथल्या सरकारला टोमणे मारणे यात 19 वर्षे सरली. यामुळेच पक्ष स्थापनेनंतरचा काही काळ सोडल्यास सत्तेच्या राजकारणात कायम भोपळाच नशिबी आला. सुरुवातीचा काही काळ भाषणबाजीची भूल पडलेली जनता भानावर आली आणि यांची जी घसरण सुरू झाली ते अद्याप थांबायचे नाव घेईना. निवडणुका जवळ आल्या की कोणाला समर्थन द्यायचे आणि कोणाला झोडपायचे हे देखील त्या त्या वेळी ठरवायचे. त्यामागे विचारांपेक्षाही अन्य मुद्द्यांनाच महत्त्व.
गंगास्नानाचे कौतुक वाटत नसेल तर न वाटो. पण तुच्छभावाचे जाहीर प्रदर्शन कशासाठी?
गंगास्नानाला आणि ते मनोभावे करून आलेल्या सश्रद्ध भाविकांना अत्यंत आक्षेपार्ह अंगविक्षेप करत आणि आपली वैचारिक-बौद्धिक कुवत सिद्ध करणारे उद्गार काढत दुखावले. त्यातून काय साध्य झाले? ज्या कार्यकर्त्यांचे वैचारिक भरणपोषण अशा नेत्याच्या दिव्य भाषणांवरच होते ते बेभान होऊन टाळ्या वाजवतील आणि नेत्याची हीच कॅसेट अन्यत्र वाजवतील. कारण नेत्यामागे अंधपणे जाण्याचे अशांनी ठरवलेले असते. मात्र जे संवेदनशील नागरिक आहेत ते या तुच्छभावाची नांद करून ठेवतील. कुंभात जाऊन स्नान करावे की नाही हा ज्याचात्याचा प्रश्न. जे जे सर्वसामान्य भाविक पदरमोड करून तिथवर जाऊन आले त्या बहुसंसख्यांचा अनुभव आनंददायी आहे. या कुंभाचे, गंगास्नानाचे कौतुक वाटत नसेल तर न वाटो. पण तुच्छभावाचे जाहीर प्रदर्शन कशासाठी?
उत्तर प्रदेश सरकारने आणि केंद्र सरकारने तिथे उभ्या केलेल्या व्यवस्था याविषयी कौतुकोद्गार काढणारेच अधिक आहेत. ज्या दोन/तीन विपरित घटना घडल्या तरी परिस्थिती ताबडतोब नियंत्रणात आणली गेली. गेल्या 10 वर्षांत उत्तर प्रदेशात बदललेली परिस्थिती, तिथे राबवण्यात आलेली नदी स्वच्छता मोहीम ज्यांना दिसते आहे, ज्यांना गंगेच्या पाण्याच्या दर्जा संदर्भातले वारंवार प्रकाशित होणारे वैज्ञानिक अहवाल ठाऊक आहेत (अगदी काल परवाच नव्याने झालेले गंगेच्या पाण्याच्या परिक्षणाचे अहवाल वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आहेत. तेही सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेपासून दूर असलेल्या दैनिकातून...पण ते यांच्या गावीही नसावे) ते सजग, सावध, सुबुद्ध मतदार यांच्या अशा भाषणबाजीने विचलीत होणार नाहीत. या भाषणबाजीचा प्रभाव पडता तर एव्हाना यांच्या मतपेढीत वाढ झाली असती. पण तिथे तर खडखडाटाशिवाय काही नाही.
भाषण डोक्यावर घेणारे आणि जिथेतिथे बाजू घेऊन भांडणारे हे झापडबंद कार्यकर्ते सर्वसामान्य मतदारांचे मतपरिवर्तन करू शकत नाहीत, हे लक्षात घेण्याची ही वेळ आहे. तसे झाले नाही तर पक्षाला रौप्यमहोत्सव साजरा करता येणेही अवघड. सनसनाटी भाषणबाजी हेच यांचे भांडवल. पण या तुटपुंज्या भांडवलावर पक्ष चालत नसतो.
काही दिवसांपूर्वीच संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या विधानाचा विपर्यास करून आणि त्या निमित्ताने समाजमाध्यमांतून संघावर तोंडसुख घेऊन झाले होते. आपले राजकीय वय त्या कार्यकर्त्याच्या एकूण कारकिर्दीच्या निम्मेही नाही. तरी त्याची तमा न बाळगता तोफ डागून झाली होती. त्यावेळी नेहमीचीच सवय असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले. पण अशाने जर नेता असा सोकावणार असेल तर त्याला चार शब्द सुनावणे हे प्रसारमाध्यम म्हणून आमचे कर्तव्य आहे.
’अभ्यासोनि प्रकटावे।ना तरी झाकोनि असावे॥प्रकटोनी नासावे।हे बरे नोहे।’ हे समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटले आहे. आणि ते सार्वकालिक सत्य आहे. मात्र ज्यांनी अभ्यास करण्याच्या वृत्तीशीच फारकत घेतली आहे त्यांना हे कसे उमजावे?
ते प्रकटोनि नासणार, हेच खरे!