नंदुरबारात महाराष्ट्राचे पहिले आदिवासी मिलेट प्रक्रिया केंद्र
सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांत पिकणाऱ्या श्रीधान्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील मालपाडा (कंजाला) येथे महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित आदिवासी मिलेट प्राथमिक प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले आहे. या ऐतिहासिक उपक्रमामुळे श्रीधान्याला मूल्यवर्धन, आदिवासी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न, स्थानिक युवकांना रोजगार आणि सातपुड्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला विकासाची नवी गती मिळणार आहे...