वारसदार...दुर्दम्य इच्छाशक्तीचे

वारसदार...दुर्दम्य इच्छाशक्तीचे
सा.विवेकच्या नेट एडिशनसाठी सुरू करण्यात आलेले हे नवे पाक्षिक सदर. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही संकटं येत असतात. ते कधी दुर्धर आजाराच्या रूपात समोर उभं ठाकतं तर कधी आर्थिक संकटाच्या वा एखाद्या अपघाताच्या रूपात वा एखाद्या अनपेक्षित संकटाच्या रूपात. या संकटाशी दोन हात करण्याआधीच बरेच जण उमेद हरवून बसतात, काही अर्ध्या लढाईत पराभव स्वीकारून माघार घेतात तर काही मात्र यश मिळेपर्यंत झुंज देतात. राखेतून उठून पुन्हा नवी भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी नवचैतन्यासह नवी झेप घेतात...अशाच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या वारसदारांची प्रेरक कहाणी आपण दर पंधरा दिवसांनी वाचणार आहोत.