Enter your Email Address to subscribe to our newsletters
केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा स्वैर अनुवाद...
मराठी भाषेला अनेकविध बहुमान मिळतील. त्यासाठी आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आपल्याला सतत सतर्क राहून भाषेचा उपयोग करावा लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया दीर्घकालीन तरी अतिशय संथपणे चालणारी आहे. भाषेचं हे संथ तरी प्रवाही असणं, हेच खरं तिचं सौंदर्य आहे आणि तिचं हे प्रवाहीपण वाढवायची जबाबदारी आपली आहे. त्या जबाबदारीकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. त्यासाठीचे काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर, काही प्रयत्न सामाजिक पातळीवर, काही प्रयत्न शासकीय पातळीवर केले, तर ‘अभिजाततेच्या वलयामागची जबाबदारी’ ही रुक्ष न वाटता तो ‘जनांचा
केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. आर. अजित कुमार हे मुख्यमंत्री विजयन यांच्या जवळचे समजले जातात. या अजित कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे आणि राम माधव यांची भेट घेतली. त्यावर साहजिकच मोठे राजकीय वादळ उठले. सर्व सेक्युलर आणि लिबरल पक्षांनी ‘सेक्युलॅरिझम खतरे में’च्या आरोळ्या ठोकत रस्त्यावर यायला सुरुवात केली.
ज्येष्ठ उद्योजक व टाटा समूहाचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. रतन टाटा यांनी आपल्या उद्योगांचा विस्तार करताना उत्पादनाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. त्याचबरोबर कर्मचार्यांच्या हितालाही प्राधान्य दिले. टाटा उद्योगसमूहात उच्च पदाधिकारी म्हणून काम केलेले माधव जोशी यांना रतन टाटा यांच्या भेटीच्या अनेक संधी मिळाल्या. त्यामुळे रतन टाटांच्या व्यक्तिमत्त्वाचे जवळून दर्शन झाले. त्या आठवणींना उजाळा देणारा लेख...
महाराष्ट्रात नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून संविधान मंदिर साकारण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागांतर्गत 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचे लोकार्पण करण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेची महती, त्याचे महत्त्व समजावण्याचा उद्देश आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल!
उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक प्रगतीला सातत्याने हातभार लावणारे उद्योजक सर्वसामान्यांसाठी कौतुकाचा विषय असतात. तसेच त्यांचे राहणीमान, त्यांच्या आवडीनिवडी आदी गोष्टींविषयीही लोकांना अपार कुतूहल असते. असे असले तरी त्यांच्याविषयी निस्सीम आदराची आणि आपुलकीची भावना असतेच असे नाही. मात्र नुकतेच निवर्तलेले ज्येष्ठ उद्योजक, दोन दशकांहून अधिक काळ टाटा समूहाचे समर्थ नेतृत्व करणारे रतन टाटा लोकादराचे धनी होते. ते दैनंदिन कामातून दूर झाल्यावरही भारतीयांच्या कधी विस्मरणात गेले नाहीत, हे विशेष!
सोशल मीडिया, त्यावर वारंवार येणारी नोटिफिकेशन्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालेली आहेत. नोटिफिकेशन्सची सुरुवात महत्त्वाच्या माहितीकडे आपले लक्ष वेधून घेण्यासाठीच झालेली आहे; परंतु आपल्यासाठी ‘महत्त्वाचं काय’ हे नक्की कोण ठरवतंय? आपल्या एकाग्रतेवर, कार्यक्षमतेवर, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकणार्या ह्या नोटिफिकेशन्सना चाळणी आणि कात्री लावण्याचं काम आपणच करायला हवं, नाही का?
‘मिशन मौसम’ हा दोन वर्षांचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आत्यंतिक (एुीींशाश) हवामान आणि हवामानातील आव्हानांचा सामना करण्याची भारताची क्षमता वाढवणे असा आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2024 ते 2026 या कालावधीसाठी या ‘मिशन मौसम’ची आखणी केली आहे. देशाला कोणत्याही हवामानस्थितीसाठी सज्ज आणि जलवायूदृष्ट्या ‘सजग’ (डारीीं) करण्याचे या प्रकल्पाचे लक्ष्य आहे. हवामान आणि जलवायूची देखरेख, पूरक तंत्रज्ञान तसेच अधिक उपयोगी, अचूक आणि तत्पर सेवेसाठी यंत्रणांचे सक्षमीकरण हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
बदलत्या परिस्थितीशी संविधानाला जुळवून घ्यावे लागते. हे काम संविधानात कालानुरूप सुधारणा करून केले जाते. काही सुधारणा साध्या बहुमताने करता येतात. काही सुधारणांसाठी विशिष्ट बहुमत लागते आणि काही सुधारणांसाठी केवळ विशिष्ट बहुमत असून चालत नाही, तर राज्यांच्या निम्म्या विधानसभांची मान्यताही त्याला लागेल. याचा अर्थ राज्यघटना संपूर्णपणे बदलून नवीन राज्यघटना अस्तित्वात आणण्याचा विषय व्यवहारत: अशक्य आहे.
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
कमल ग्रुप्सअंतर्गत जनजागृती ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळा-शाळांतून मार्गदर्शन करणार्या डॉ. उन्नती शिंदे हिच्या निःस्वार्थी वृत्तीचा आणि समाज निरोगी ठेवण्याच्या कार्याचा घेतलेला आढावा.
डॉ. अजय हौदे हे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी खेड्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील होते. अजय यांनी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. काही रिसर्च प्रकाशने आणि तीन पेटंट्स मिळाल्यावर आज त्यांच्या नावे 68 पेटंट्स आहेत, ज्याचा उपयोग विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यात केला गेला. आरोग्य क्षेत्रात ही ‘अजय’ यात्रा निरंतर चालू आहे.
नुकताच मी तीनशे तरुण-तरुणींसोबत हिमालयामधील खेड्यांमध्ये सेवाकुंरच्या माध्यमातून एका सेवा प्रकल्पासाठी प्रवास केला त्या वेळी जाणवले की, भारत अजून जागा आहे. आपल्याला ज्या भारतीय मूल्यांचा अभिमान वाटतो, या काळातही टिकून आहेत. विशेष म्हणजे सेवांकुर हा सेवा उपक्रम गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याचे हे अनुभवकथन मांडताना मला विलक्षण संतोष होत आहे.
वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी येथील उमेश मुके या तरुण शेतकर्याने केळी प्रक्रिया उद्योगातून आर्थिक समृद्धी साधली आहे.
हिंगोली शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे भूषण साहेबराव देशमुख होय. देशमुख यांची शेती-मातीशी नाळ जोडली गेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी सुमारे 35 एकर क्षेत्रामध्ये रानावनात आढळणार्या करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या माध्यमातून ते वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. करवंदासारख्या दुर्लक्षित व काटक झुडुपवर्गीय फळपिकांतील हा राज्यातला पहिला यशस्वी प्रयोग मानला जात आहे.
महाराष्ट्रातील अनेक गावांना समृद्ध इतिहास आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. हिंगोली जिल्ह्यातील येहळगाव गवळी या गावात दुधाचे उत्पादन घेतले जाते; पण त्याची विक्री केली जात नाही. शेकडो वर्षांपासून ही परंपरा गावकर्यांनी जपली आहे. या गावात दुधाची विक्री का केली जात नाही? त्यामागचे कारण काय? याविषयी जाणून घेऊ या.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
पॅरालिम्पिक स्पर्धांमधील गेल्या चार वर्षांच्या कामगिरीकडे पाहिले तर लक्षात येईल, की भारताच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. भारताने पॅरिसमध्ये 29 पदके मिळवली. सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि तेरा कांस्यपदकांचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेची पात्रता मिळवणार्या खेळाडूंची संख्याही वाढत आहे. पॅरिसमधील भारताचे हे यश या सर्व सकारात्मक बदलांची नांदी ठरेल, हीच अपेक्षा आहे. तसेच पदकांची आकडेवारी पाहता 2028 च्या लॉस एंजिलिस पॅरालिम्पिकमध्ये आपण पदकांच्या अर्धशतकापर्यंत मजल मारली तरीही आश्चर्य वाटणार नाही.
पॅरिसमधील दिव्यांग खेळाडूंसाठी असलेली पॅरालिम्पिक ही स्पर्धा ऑलिम्पिकइतकीच महत्त्वाची मानली जाते. शारीरिक कमतरतांवर मात करून असामान्य कामगिरी करणारे खेळाडू हा प्रेक्षकांसाठी कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो. ह्या स्पर्धेतील प्रत्येक पदकामागे एक प्रेरणादायी कहाणी असते. दिव्यांगत्व कुणी मुद्दाम मागून घेतलेली गोष्ट नाही. अनेक शारीरिक अडचणींवर हे खेळाडू किती धैर्याने मात करतात हे बघून आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळू शकते.
ऑलिम्पिक विजेते काही आकाशातून पडत नाहीत, ते घडवावे लागतात आणि हा मार्ग सोपा नसतो. गेली काही वर्षे ‘खेलो इंडिया’अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन मुलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ह्या स्पर्धांमधील विजेत्यांना शिष्यवृत्तीही मिळते. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि लेखिका नीला वसंत उपाध्ये यांचे सोमवार, दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. नीला उपाध्ये यांचे ‘सा. विवेक’शी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या ‘वसंततिलका’ नावाने ‘विवेक’मध्येही ललित सदर लिहीत असत. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा श्रद्धांजलीपर लेख.
भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव कळंबेळकर यांचे 16 जून 2024 रोजी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
संघ संस्काराचे बीज व्रतासारखे जोपासलेले माधव जोशी यांनी आर्थिक कमाईसाठी जी माध्यमे निवडली ती ही राष्ट्रीय वृत्तीच्या जोपासनेला आणि राष्ट्रहिताच्या कार्यविस्ताराला पूरक ठरावी अशी. मुळातच नोकरी करावी ही मानसिकता नसल्यामुळे त्याने ’आपला परममित्र’ नावाचे द्वैमासिक सुरू केले आणि त्यातूनच पुढे ’परममित्र पब्लिकेशन्स’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. परममित्र पब्लिकेशन्सलाही आता 25 वर्षे पूर्ण होत आली आहेत. ’पॉप्युलिस्ट आणि पेइंग’ पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने न वळण्याचा कटाक्ष माधवने बाळगला. राष्ट्रीय-सामाजिकदृष्ट्या महत
रामोजी राव अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. 1998 साली भारतातलं पहिलं सॅटेलाइट अपलिंकिंग स्टेशन फिल्म सिटीमध्ये उभारून टेलिकास्ट त्यांनीच सुरू केलं. त्यांना गाठायला इतरांना बरीच वर्षे लागली. त्यांचं सगळं करणं म्हणजे प्रचंड... भव्य... डझनात! नक्षली अतिरेक्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा विचार करणे हीच गोष्ट दुरापास्त अशा ठिकाणी ‘रामोजी फिल्म सिटी’ हे 2000 एकरांचं भव्य पार्क निर्माण केले. आज लाखोे पर्यटकांचे पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जातं.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
आता बास झालं तुझे हे दुबळेपण. तू दुर्गा, काली यांची वारसदार ना? विसरलीस का तुझे तेज, तुझे सत्त्व? आज वेळ आली आहे, स्वत:ची ताकद जोखण्याची, आत्मविश्वास जागवण्याची. हे तरुणी, निश्चय तुलाच करावा लागेल. जोखमीचा विचार तुलाच करावा लागेल. हे करताना मुलांच्या व पुरुषांच्या प्रबोधनाचे कामही आपल्याला हाती घ्यावे लागेल. या नवरात्रीच्या निमित्ताने अष्टभुजांमध्ये युक्त्या-प्रयुक्त्यांची आयुधे घेऊन, मनात आत्मविश्वास जागवून स्व-संरक्षणासाठी सज्ज हो!!
उत्सव मनुष्याच्या मनात नवचैतन्य जागवतात. प्रत्येक उत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. दैनंदिन रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनात उत्सव म्हणजे चैत्रपालवी. अमूर्ताला वेगवेगळ्या रूपांत साकार करून त्याचे पूजन करण्यासाठी देवतांची निर्मिती झाली असावी. मनुष्य सकारात्मक प्रवृत्तींना दैवताचे रूप देतो आणि साकार स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. उत्सवात रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारची सजावट, मूर्ती घडविणे अशा वेगवेगळ्या कलांमधून मनातले सौंदर्य बाहेर काढले जाते. उत्सव म्हणजे सौंदर्याची पूजा. नवरात्र उत्सव याला अपवाद कसा असेल.
75 वर्षे हा मोठा कालखंड! विवेकपूर्वी सुरू झालेली आणि विवेकनंतर सुरू झालेली कितीतरी साप्ताहिके काळाच्या ओघात लुप्त झाली. पण विवेक अजूनही ऐन उमेदीत आहे. कालानुरूप आपल्यात बदल करण्यात ज्यांना यश येते, तेच कालप्रवाहात टिकून राहतात. विवेकमध्ये कालानुरूप काही बदल अवश्य झालेले आहेत. मात्र काही बाबतीत विवेक अजिबात बदललेला नाही. कारण विवेक कशासाठी चालवायचा हे आमच्यासमोर स्पष्ट आहे. हिंदू समाजाशी संबंधित अनेक विषयांत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करावी लागते. हे विवेकने स्वीकारलेले व्रत आहे. घेतला वसा टाकू
या शतायुषी कार्याच्या इथवरच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि वर्तमानाचा विवेकच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेतलेला वेध...
इजिप्तमधील कार्नाक मंदिर त्याच्या भव्यतेने भारून टाकते. भव्यता हा इजिप्तमधील मंदिरांचा स्थायिभाव आहे. कार्नाक मंदिरही याला अपवाद नाही. इजिप्तमधील छोट्यात छोट्या पुरातन मंदिरांची उंची कमीत कमी सात मजली तरी असतेच! अवाढव्य ’हायपोस्टाइल हॉल’ हे कार्नाक मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. याला ’हॉल’ कसे म्हणावे इतका तो अजस्र आहे. भारतातील कोणार्क मंदिर सूक्ष्म तपशिलांनी आकर्षित करते. दगडामध्ये एवढे सूक्ष्म तपशील कोरणे त्या काळात कसे साध्य केले असेल, याचे आश्चर्य वाटते. एका दृष्टीने कोणार्क मंदिर हे विज्ञान आणि सौंदर्य य
‘बंगलोर डेज’ या चित्रपटात तीन भावंडांची गोष्ट आहे. लग्नसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अनुभव ह्यातील तिन्ही मुलांसाठी वेगवेगळा आहे, परंतु तरीही आयुष्यभरासाठी साथ देणारा सोबती शोधायची इच्छा तिघांचीही आहे. त्यासाठी स्वत: बदलण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. प्रत्येक कुटुंबात ऊन आणि चांदण्याचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. एकमेकांसाठी आपण आहोत एवढी जाणीव त्यातून बाहेर यायला मदत करते, हा संदेश हा चित्रपट देतो.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये